Marrital Rape अर्थात वैवाहिक बलात्कार

chittmanthan.OOO's picture
chittmanthan.OOO in जनातलं, मनातलं
5 Apr 2020 - 11:21 am

"उसका मन हो तो वो लेटेगी और उसका मन नही तो नही.. ऐसा कैसे चलेगा भाई..." अश्या प्रकारच्या कॉमेंट्स आपण सहज ज्या विषयावर पास करतो तो विषय म्हणजे marrital rape...!!! . हा शब्द ऐकला की अनेकांच्या भुवया उंचावतात किंवा याबद्दल बोलणं म्हणजे लग्नसारख्या पवित्र गोष्टीवर धर्मविरोधी लोकांनी उडवलेले शिंतोडे वाटतात. पण आजच्या दिवस माझ्यासोबत तिची बाजूही ऐकण्याचा प्रयत्न करा. जमलं तर यावर विचार करा नाहीतर काय फालतूपणा आहे म्हणून ही गोष्ट सोडून द्या.
पहिल्यांदा तुम्हाला बलात्कार म्हणजे काय हे सांगतो. बलात्कार म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी तिच्या मनाविरुद्ध ठेवलेले शारीरिक संबंध होय. मी व्यक्ती हा शब्द जाणूनबुजून वापरला कारण बलात्कार हा स्त्री आणि पुरुष या दोघांवरही झाल्याची उदाहणे या जगात आढळतात.
बलात्कारासारखा गंभीर विषय असूनही त्याची व्याख्या ही जो बलात्कार करतो त्याच्यावर अवलंबून असते. म्हणजे जर पर पुरुषाने जबरदस्ती केली तर बलात्कार पण नवऱ्याने बायकोशी तिची ईच्छा नसताना संबंध ठेवले तर आपला समाज त्याला intence lovemaking म्हणतो.
Intence lovemaking म्हणताना बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर किंचितशी smile सुद्धा येते. त्याच हसू येणाऱ्यांना एक किस्सा सांगतो एक खरं घडलेला किस्सा... जेव्हा नवीन लग्न झालेली रूपा हनीमून साठी केरळ ला जायचं प्लॅन ऐकते तेव्हा तिथल्या समुद्रकिनारे निसर्ग याबद्दलचे विचार तिच्या मनात उड्या मारायला चालू होतात.पण जेव्हा ती हनिमून ला जाते तेव्हा तिचा नवरा निसर्ग सोडा पण साधं हॉटेलच्या पण बाहेर नेत नाही त्या चार दिवसात फक्त आणि फक्त संभोगच करतो... तेव्हा वाटत की अश्या intence lovemaking वर प्रश्न उठवावा की नको....!!!
भारताबद्दलच बोलायचं तर फक्त ५-६ % महिला अश्या आहेत ज्यांना आपला पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे. बऱ्याच मुलींना हे देखील माहीत नसते की आपण ज्याच्याशी लग्न करतोय तो माणूस नेमका कसा आहे . त्याच्याशी नीट ओळख व्हायच्या आतच शारीरिक संबंध ठेवला जातो . घरच्यांकडून ह्या विषयावर विचार करण्याऐवजी हा विषय थट्टा मस्करी मध्ये घेतला जातो.
जर marrital rape कायद्याच्या चौकटीत आणून त्यावर शिक्षा सुनावण्यात आली तर भारतीय विवाह संस्था धोक्यात येईल अशीही टिप्पणी करणारे लोक सापडतील. काही महाभाग तर असाही म्हणतात की स्त्रिया या कायद्याचा वापर करून नवऱ्याला ब्लॅकमेल करतील. असाच निश्कर्ष लावायचा तर बलात्काराचा कायदा पण रद्द करायला हवा कारण खोट्या केसेस आहेतच ना...!!!
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक कायद्याला पळवाट असतेच त्याचा दुरुपयोग होतो . तशी ती marrital rape कायद्याच्या मध्ये पण असेल पण म्हणून २% खोट्या केसेस दाखल होतात त्याच्या ओझ्याखाली ९८% महिलांवर अन्याय होतो त्याच काय?
शेवटी एक गोष्ट नक्की की पितृसत्ताक आणि feminist या दोन्ही चष्मे बाजूला टाकून एक माणूस म्हणून या विषयावर बघायला शिकल पाहिजे.

समाजविचार

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2020 - 5:11 pm | मराठी कथालेखक

मला वाटतंय अगदी feminist म्हणवणार्‍या स्त्रियादेखील marital rape च्या कायद्याबद्दल आग्रही असणार नाहीत. कारण हा कायदा केलाच तरी त्याला योग्य आधार नाही (बेसलेस) ना त्याची अंमलबजावणी नीट होवू शकते.
लग्नाच्या बायकोशी संबंध ठेवतानाही तिची मर्जी, तिचा मूड , तिची मानसिक तयारी याचा विचार केला पाहिजे हे मान्यच. मला वाटतं अनेक पुरुष हे करतच असतील आणि त्यात जर स्त्रीचा अगदी मनापासून होकार नसला तरी पुरुष कधी प्रेमाने, लाडीगोडी लावून, कधी रागवून, चिडचिड करुन किंवा क्वचित संसार मोडण्याची धमकी वगैरे देवून तिचा होकार मिळवत असतील.. याला बलात्कार म्हणता नाही येणार. याला फारतर "नकाराला होकारात बदलण्याचा आग्रह" असे म्हणता येईल. पण तरीही जर स्त्रीचा अगदीच ठाम नकार असेल आणि पुरुषाने टिपिकल बळजबरी करत बलात्कार (म्हणजे बळजबरीने संभोग ) केलाच तरी तसे करताना त्याच्याकडून पत्नीचा विरोध मोडून काढण्याकरिता पत्नीला ईजा पोहोचवली जाईल आणि त्यावेळी पत्नीला घरगुती हिंसाचारविरोधी कायद्याचा आधार घेता येईल.
मुळात लग्नसंस्था ही शरीरसंबंधांच्या अधिकृत मान्यतेकरिताच आहे. ज्या पुरुषाशी संबंध ठेवायचे नाहीत तर त्याच्याशी लग्न का करायचे किंवा लग्न झाले असेल तरी संसार का चालू ठेवावा ? फारतर पत्नीने घटस्फोटाचा दावा दाखल केलेला असेल आणि त्याच्या संबंधीची नोटीस पतीला मिळालेली असेल व त्यानंतर आणि घटस्फोट होण्याच्या आधी जर पतीने संबंधाकरित जबरदस्ती केली तर त्याला बलात्काराच्या कक्षेत आणावे.
जर marital rape चा कायदा केला तर ती एकतर्फी गोष्ट होईल . मग एखादा पुरुष शरीरसंबंध ठेवण्यास पात्र नाही वा शरीरसंबंध ठेवत नाही या आधारावर पत्नीचा घटस्फोटाचा दावा मान्य करण्याची तरतूदही रद्द करायला लागेल तरच समतोल राहील,

भारताबद्दलच बोलायचं तर फक्त ५-६ % महिला अश्या आहेत ज्यांना आपला पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे. बऱ्याच मुलींना हे देखील माहीत नसते की आपण ज्याच्याशी लग्न करतोय तो माणूस नेमका कसा आहे

यात पतीचा काय दोष ? पालकांनी बदलले पाहिजे.

जेव्हा नवीन लग्न झालेली रूपा हनीमून साठी केरळ ला जायचं प्लॅन ऐकते तेव्हा तिथल्या समुद्रकिनारे निसर्ग याबद्दलचे विचार तिच्या मनात उड्या मारायला चालू होतात.पण जेव्हा ती हनिमून ला जाते तेव्हा तिचा नवरा निसर्ग सोडा पण साधं हॉटेलच्या पण बाहेर नेत नाही त्या चार दिवसात फक्त आणि फक्त संभोगच करतो

यात नेमकं अडचण काय झाली ? समुद्रकिनारे बघता आले नाहीत याचं दु:ख झालं का ? तसं असेल तर त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही. किनारे नंतर पण बघता येतील.
की दिवसातून एकापेक्षा अधिक वेळा संभोग केल्याने शारिरिक त्रास झाला ? हे असू शकेल. मान्य आहे. पण कायद्याने हा प्रश्न सुटेल का ? समजा कल्पना करा की तुम्ही म्हणता तसा कायदा अस्तित्वात आहे आणि रुपाने दिवसातून तीन वेळा झालेल्या संभोगांपैकी दोन वेळचे हे आपल्या मर्जीविरुद्धचे होते असे म्हणून तक्रार केली तरी काय होणार ? नवरा तुरुंगात खडी फोडायला जाणार आणि रुपाच्या संसाराचं काय होणार ? तो नवरा पुन्हा तिच्याशी संसार /संभोग करायची हिंमत करेल का ? किंवा हे लग्न मोडलं तर ज्या मुलीने वैवाहिक बलात्काराची तक्रार करत नवर्‍याला खडी फोडायला पाठवलं तिच्याशी दुसरा कुणी मुलगा लग्न करेल का ?
तेव्हा मुद्दा हा आहे की या समस्या योग्य लैंगिक शिक्षण , समुपदेशन , पती-पत्नीतील विश्वास , समंजसपणा याआधारेच सोडवल्या जावू शकतात. बेडरुममध्ये घडणार्‍या अतिशय खासगी अशा गोष्टीत जिथे भावनिक , कौटुंबिक पैलू आहेत त्यात कायदा आणून उपयोगाचे नाही.
जाता जाता एक विनोद सांगावासा वाटतो
एकदा एका ऑफिसमध्ये एक ट्रेनी, एक टीम लीडर आणि एक मॅनेजर गप्पा मारत बसलेले असतात. तिघे विवाहित पुरुष. बोलता बोलता "लग्नानंतरची पहिली रात्र" चा विषय निघतो.
टीम लीडर प्रोढीने म्हणतो "मी पहिल्या रात्री तीन वेळा कार्यक्रम केला"
यावर मॅनेजर दुप्प्ट प्रोढीने म्हणतो "मी तर सात वेळा केला"
मग दोघे ट्रेनीला विचारतात "तुझं काय रे , पहिल्या रात्री तु किती वेळा केलंस ?"
ट्रेनी नम्रपणे उत्तर देतो "मी एकदाच केलं"
यावर बाकी दोघे हसू लागतात.. हसून झाल्यावर मॅनेजर थोडा कुत्सितपणे ट्रेनिला विचारतो "का रे ? एकदाच का ?"
त्यावर ट्रेनी थंडपणे उत्तरतो "कारण माझ्या बायकोला या गोष्टीची सवय नव्हती ना"

सुचिता१'s picture

5 Apr 2020 - 11:48 pm | सुचिता१

+100
प्रत्येक वेळी कायदा करून उपयोग नसतो . आपल्या जोडीदाराला सन्मानाने वागवणे हे आपण आपल्या पुढच्या पीढीला शिकवायला हवे.

सुबोध खरे's picture

6 Apr 2020 - 11:48 am | सुबोध खरे

[375. Rape.—A man is said to commit “rape” who, except in the case hereinafter excepted, has sexual intercourse with a woman under circumstances falling under any of the six following de­scriptions:—
(First) — Against her will.
(Secondly) —Without her consent.
(Thirdly) — With her consent, when her consent has been obtained by putting her or any person in whom she is interested in fear of death or of hurt.
(Fourthly) —With her consent, when the man knows that he is not her husband, and that her consent is given because she believes that he is another man to whom she is or believes herself to be law­fully married.
(Fifthly) — With her consent, when, at the time of giving such consent, by reason of unsoundness of mind or intoxication or the administration by him personally or through another of any stupe­fying or unwholesome substance, she is unable to understand the nature and consequences of that to which she gives consent.
(Sixthly) — With or without her consent, when she is under sixteen years of age. Explanation.—Penetration is sufficient to constitute the sexual intercourse necessary to the offence of rape.

हा बलात्काराबद्दल कायदा आहे.

यात स्त्रीच्या मर्जीविरुद्ध आणि तिच्या संमती विरुद्ध केलेला संभोग हा बलात्कार म्हटला जाईल.

आता प्रश्न असा आहे कि बायकोची काल मर्जी होती आणि आज ती म्हणते नव्हती हे सिद्ध कसे करणार.यात नवऱ्याचा शब्द विरुद्ध बायकोचा शब्द.

त्यातून हे कायदे (स्वाभाविक कारणामुळे) प्रामुख्याने स्त्रियांच्या बाजूने केलेले आहेत. म्हणजे स्त्री म्हणते म्हणजे ती बरोबर असेच सकृतदर्शनी कायदा मान्य करतो. मग रागाच्या भरात एखाद्या स्त्रीने पोलिसात तक्रार केली कि नवरा पोलीस/ न्यायालयीन कोठडीत टाकला जाईल.

त्यातून बलात्कार हा अजामीनपात्र कायदा आहे. त्यामुळे उद्या बायकोला पश्चात्ताप झाला तरी न्यायालयातून सुटका होईपर्यंत नवरा तुरुंगातच राहील. सध्या तुरुंगातील ६८ टक्के आरोपी (अजामीनपात्र गुन्ह्यासाठी असलेले) हे न्यायालयात एकदाही पाऊल न टाकता खटला चालू होण्याची वाट पाहत तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडलेले आहेत.

समजा हा कायदा नवरा( किंवा बायको साठी) जामीनपात्र केला तरी जामिनासाठी भरायचे पैसे आणायचे कुठून? केवळ जामिनाचे ५-१० हजार रुपये नसल्यामुळे कित्येक आरोपी ( आकडे सापडले नाहीत) तुरुंगातच सडत आहेत.

मग असा एक दिवस जरी तुरुंगात राहून बाहेर आलेला नवरा मुलीशी कसा संसार करणार? पुढच्या प्रत्येक वेळेस संभोग करताना त्याचे मन कधीही शांत असू शकणार नाही.
एकदा मुलाला तुरुंगात पाठवले कि त्या सुनेशी सासू सासरे कधीही सुखाने वागू शकणार नाहीत. एकत्र कुटुंबकेंद्रीत व्यवस्था असलेल्या भारतात त्या मुलीला आपल्या घरात ठेवायला कोणताही सासरा तयार होणार नाही कारणभारतात लवकर लग्न झाले असल्याने बहुसंख्य बाबतीत घर नवऱ्याचे नसतेच.

किंवा खायला एक तोंड वाढेल या भीतीने त्या मुलीचे आईबाप? भाऊ तिला आपल्या माहेरीपण घेणार नाहीत. अशा परित्यक्तांचे नक्की कायदा काय करू शकेल.

वैवाहिक बलात्कारासाठी कायदा करण्याचा हेतू कितीही उदात्त असला तरी रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती होईल हे जणू असल्यामुळे आपल्याकडे साडे तीन फेमिनिस्ट सोडल्या तर कोणताही कायदे तज्ञ ( राजकीय पक्षाचे नव्हे) त्याला संमती देताना आढळत नाही

गामा पैलवान's picture

7 Apr 2020 - 2:58 pm | गामा पैलवान

वैवाहिक बलात्काराचा कायदा लागू झाल्यावर एक संमतीची नोंदवही ठेवावी लागेल. फक्त एक सही केली की झालं काम. हल्लीच्या काळी तर हातगणावर अभिलाग ( = मोबाईल अॅप) देखील बनवता येईल.

-गा.पै.

चलत मुसाफिर's picture

7 Apr 2020 - 3:36 pm | चलत मुसाफिर

हा आरोप न्यायालयात सिद्ध किंवा बाद कसा काय करणार?

जोडीदाराची जबाबदारी नेमके किती वेळा व कसे शरीरसुख देण्याची आहे, हे कसे ठरवणार?

एका जोडीदाराला शरीरसुखात स्वारस्य नसेल किंवा अगदी त्या घडीपुरता रस वाटत नसेल, तर दुसऱ्याला अन्यत्र जाऊन क्षुधाशांती करून घेण्याची मुभा असेल काय?

सर्व प्रश्न पूर्ण गांभीर्याने विचारत आहे.

अती व्यक्ती स्वतंत्र मुळे असलेले फालतू विचार आहेत हे.
लग्नानंतर सेक्स करण्यासाठी स्त्री ची सहमती आहे असे समजले जाते.
लग्नानंतर सेक्स करणे ज्या स्त्री ला मान्य नाही त्यांनी लग्न करू नये सर्वात सोपा मार्ग आहे.
Corona virus ni sarv vyakti स्वतंत्र वाल्यांचे १२ वाजवले आहेत.
लग्न करताना लिखित स्वरूपात स्त्री कडून लिहून घेतले जाईल तुला नवऱ्या बरोबर सेक्स करण्यास काही हरकत नाही ना.
तरच लग्न केले जाईल.

सुबोध खरे's picture

8 Apr 2020 - 6:46 pm | सुबोध खरे

लग्न करताना लिखित स्वरूपात स्त्री कडून लिहून घेतले जाईल तुला नवऱ्या बरोबर सेक्स करण्यास काही हरकत नाही ना.

विवाह कायद्यात पत्नीची संमती हि "गृहीत" धरलेली आहे

पत्नीची संमती गृहीत धरणे हे स्त्रीच्या मूलभूत हक्कावर गदा आहे असा कायद्याच्या समर्थकांचा दावा आहे

म्हणूनच हा कायदा बदलावा का असा मूळ मुद्दा आहे.

त्यामुळे अजून कागदावर लिहून घेण्याला काहीही अर्थ नाही.

chittmanthan.OOO's picture

25 Jan 2024 - 7:25 pm | chittmanthan.OOO
सोत्रि's picture

2 Feb 2024 - 5:26 pm | सोत्रि

समस्या योग्य लैंगिक शिक्षण , समुपदेशन , पती-पत्नीतील विश्वास , समंजसपणा याआधारेच सोडवल्या जावू शकतात. बेडरुममध्ये घडणार्‍या अतिशय खासगी अशा गोष्टीत जिथे भावनिक , कौटुंबिक पैलू आहेत त्यात कायदा आणून उपयोगाचे नाही.

चपखल.

- (लैंगिक शिक्षण समर्थक) सोकाजी

कायद्याची चौकट वेगळी. खोलीची वेगळी. पण चार वर्षे धागा कुठे गेला होता?