बास्टऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽर्ड

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
31 Mar 2020 - 10:18 pm

जण्या ( एक वहीतले पान दाखवत ): गुरुजी, गुरुजी !

बास्टऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽर्ड
त्याच्यातला आदेशात्मक व्याकरणाभिमानी शिक्षक जोरात किंचाळला
मग स्वतःच्याच रागास गिळत
समजावणीच्या स्वरात
तुला नाही रे, तुझ्या अमूर्त
अबोध कलेला म्हणालोय
जिची एकही रेषा सरळ नाही
जिचे एकही वळण बरोबर नाही

सहपाठी मुरक्या मारत कुत्सितपणे
जण्याला हसू लागले

तोंड पाडण्याएवजी जण्याबी तोंडवर करुन हसू लागला

जण्या मूर्खा गाढवा लाज नाही वाटत
वर तोंड वर करुन हसतोस

जण्या : त्यो अमूर्त चुकलेलं चित्तर बास्टर्ड म्हजी
काडणारा स्लट! व्हय ना गुरुजी ?

त्यो पान तुमच्या लहानपणाच्या वहीतलं हाय !
अगदी माझ्या वहीतल्या पानावणी दिसतय न्हव !
जण्या म्हणाला.

वाङ्मय

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

2 Apr 2020 - 12:08 pm | धर्मराजमुटके

तुम्ही या प्रांतात ?? आवडले. एरवी तुमच्या आगगाडी सारख्या लांबलचक वाक्यांत मुळ मुद्दा शोधणे दुरापास्त होते. पण हा प्रयोग आवडला. असेच 'शॉर्ट" लिहित जा.

सतिश गावडे's picture

2 Apr 2020 - 12:14 pm | सतिश गावडे

असेच 'शॉर्ट" लिहित जा.

म्हणजे वाचणार्‍यांच्या डोक्याला "शॉट" लागणार नाही ;)

माहितगार's picture

2 Apr 2020 - 4:10 pm | माहितगार