ज्ञानोबांस नंब्र विनंती

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
2 Mar 2020 - 9:53 pm

कवी बिचारा
मेटाकुटीने
कविता पाडत असतो
शाई ओली
असताना हा
टपली मारून जातो

वसुदेवाच्या
मनी जशी
कंसाची दहशत होती
तसे मिपा-कवि
विडंबनाचा
कंस बघुनी हादरती

कवितारतिच्या
विनयाचा हा
भंग त्वरेने करतो
शीघ्रकवित्वा
याच्या बघुनी
मनोमनी मी जळतो

हात जोडुनी
हतप्रभ कवि हा
दारी तुझिया उभा
दयावंत हो
पैजारा तू
आवर निर्दय प्रतिभा

विडंबनाच्या
वावटळीतुनी
कविता माझी सुटावी
ज्ञानोबांनी
पैजाराला
सज्जड तंबी द्यावी

मार्गदर्शनव्यक्तिचित्रमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Mar 2020 - 8:28 am | प्रचेतस

=))

पैजारबुवांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2020 - 9:03 am | प्राची अश्विनी

पैजारांवर
झकास कविता
लिहिती अनंत यात्री
उत्तर त्याचे
असेल भारी
याची सगळ्यांं खात्री

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Mar 2020 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

कवी नव्हे हो इश्वर तुम्ही
वंदन करतो तुम्हाला
अथांग आहे प्रतिभा तुमची
आशिश द्यावा तुम्ही मजला

कंस नसे मी, रावण नाही
मी तर पुजक सृजनाचा
उपमर्द तव कधी ही न घडो
ध्यास असे मम जगण्याचा

विदुषक मी तर एक बापडा
साधन माझे नकलेचे
आस एक की प्रोक्षण व्हावे
कवितेच्या या गंगेचे

वाट पहातो मी चातका सम
तुमच्या नव्या कवितेची
क्षणार्धात मी हरखून जातो
भेट घडता विठुरायाची

एकच विनवणी तव चरणाला
क्षमा करा या वेड्याला
काव्यामृत पाजित रहावे
मुढ अजाण या बालकाला

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

3 Mar 2020 - 10:01 am | प्रचेतस

__/\__

अत्यंत सुरेख.

नावातकायआहे's picture

3 Mar 2020 - 10:51 am | नावातकायआहे

दंडवत !!!

खिलजि's picture

7 Mar 2020 - 10:17 pm | खिलजि

साष्टांग दंडवत स्वीकारा पैंबुकाका,, मस्तच झालंय

नि३सोलपुरकर's picture

3 Mar 2020 - 10:11 am | नि३सोलपुरकर

पैजारबुवा दंडवत
__/\__

यात्री आणि पैजार दोघांच्याही उपरोक्त काव्य जुगलबंदीस सादर प्रणाम

श्वेता२४'s picture

3 Mar 2020 - 12:35 pm | श्वेता२४

यात्री आणि पैजार दोघांच्याही उपरोक्त काव्य जुगलबंदीस सादर प्रणाम

हेच म्हणते

चांदणे संदीप's picture

3 Mar 2020 - 1:09 pm | चांदणे संदीप

काय म्हणावे कवित्वाला
अन् यात्री, पैजार द्वयीला
शीघ्र शीघ्र कुठे शोधिता?
शीघ्रांस ठेविले यांनी... पाणी भरण्याला!

मिपावर काळ असा लोटला
कविता न सापडे औषधाला
अनंत यात्री अन् साक्शात माऊली
आणती शोभा मिपांगणाला!

सं - दी - प

नाखु's picture

7 Mar 2020 - 3:04 pm | नाखु

वाचक बिचारा
मेटाकुटीने
मिपा वाचत असतो
गोडि आलेलि
असताना हा
जिलबि टाकुन जातो

दुचाकी स्वाराच्या
मनी जशी
मामाची दहशत होती
तसे मिपा-कवि
रतिबाचा
ओघ बघुनी हादरती

वाच्काच्या
सन्नशीलतेचा हा
अन्त त्वरेने करतो
बद्बदा कविता त्या
यान्च्या बघुनी
मनोमनी मी पळतो

हात जोडुनी
हत्बल वाचक हा
दारी तुझिया उभा
क्रुपावन्त हो
कविश्वरा तू
आवर अफाट प्रतिभा

काव्य जन्जाळातुन
इतरत्र
तुझि लेखणि सुटावि
कविश्वरानि
किन्चित कविंना
अजोड तांबी द्यावी

वि.सु. अनन्त यात्रि आप्लया,सन्दीप्,प्राचि आदि कविता सरस आनि पुरेश्या अव्धि घेउन आलेल्या असतात पन मिपावर फक्त श्ब्द्फुले फेकुन ननतर कुठेहि न दिसणार्या धुम्केतु कविंना हि कलाकृति सादर..

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Mar 2020 - 4:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रत्येक आईला आपले बाळ गुणी गोड आणि सुंदरच दिसत असते,
कविचे ही तसेच असते.
पैजारबुवा,