जावे फेरोंच्या देशा - भाग ७ : अबू सिम्बल

कोमल's picture
कोमल in भटकंती
13 Oct 2019 - 3:37 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४

.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}

२३ सप्टेंबर २०१८

पहाटे ३ वाजता रिसेप्शन वरून फोन आला, "तुमची अबू सिम्बल टूर ची बस २० मिनिटात पोहोचते आहे. वेळेत खाली येऊन थांबा.' आठव्या मिनिटाला आम्ही दोघे खाली येऊन थांबलो. तिथे आमचा नाश्ता पाकिटांत भरून तयार ठेवला होता. ३:२५ पर्यंत बस आली. छोटीशी आपल्या १७ सीटर TT पेक्षा पण लहान अशी. बऱ्यापैकी सगळ्या सहप्रवाश्यांना गोळा करून मग आम्हाला घेऊन अबू सिम्बल च्या दिशेने पळू लागली. रस्ता फार छान होता. एक दोन चेकपोस्ट मागे टाकून मुख्य रस्ताला लागलो. ३ तासाच्या प्रवासात उरलेली झोप वसूल केली आणि बस अबू सिम्बल गावामध्ये शिरतांनाच जाग आली. छोटेखानी नीटनेटकं गाव मागे पडलं आणि गाडी अबू सिम्बल मंदिराच्या आवारात शिरली. 

तिकीट घेऊन सिक्युरिटी चेक झाल्यावर एका टेकडीसमोर आलो आणि आखून दिलेल्या रस्त्याने चालू लागलो. उजव्या हाताला निळाशार नासर लेक डाव्या हाताला टेकडी. थोडं पुढे आल्यावर मंदिराची समोरची बाजू दिसू लागली. इजिप्तचा सर्वात जास्त म्हणजे ९० वर्षांपर्यंत जगलेल्या फेरोने, रॅमसिस दुसरा याने बांधलेलं हे स्वतःचं मंदिर. सुरवातीलाच त्याचे ४ पुतळे आयुष्याच्या ४ अवस्था दर्शवतात; बाल्य, तारुण्य, प्रौढ आणि वृद्ध (चारही पुतळ्यांमध्ये रॅमसिस मात्र सारखाच दिसतो हा भाग वेगळा). चार पैकी एका पुतळ्याचा चेहरा दगडात चीर जाऊन बऱ्याच वर्षांपूर्वी केव्हा तरी खाली पडलेला आहे. या चार पुतळ्यांशिवाय अजूनही काही पुतळे आहेत. रॅमसिसची पट्टराणी नेफरटारी, आई टुया आणि त्याची लेकरं वगैरे. पण कोणाच्याही मूर्तीची उंची रॅमसिसच्या गुढघ्यापेक्षा जास्त नाही. फेरोंना सर्वोच दाखवण्याचा हा अजून एक नमुना. अशी उदाहरणे संपूर्ण इजिप्तभर पाहायला मिळतात. 

5 Terre

डावीकडील रॅमसिसचे उजवीकडील नेफरटारीचे

5 Terre

रॅमसिसचे मंदिर प्रवेश्द्वार

आत गेल्यावर मोठ्या हॉल मध्ये 'ओसायरिस' गॉड ऑफ अंडरवर्ल्ड (अर्थात मृत्यूनंतरच्या साम्राज्याचा देव) च्या ४-४ मूर्त्या दोन्ही बाजुंना उभ्या दिसतात. छतांवरील बार्स रिलीफ मधून काही युद्धाचे प्रसंग दाखवले आहेत ज्यात फेरो (साहजीकच) विजयी होतं आहे. मुख्य हॉल मधून पलीकडे अजून काही खोल्या आहेत ज्यात रॅमसिस आणि नेफरटारी वेगवेगळ्या देवांना नैवेद्य, भेटवस्तू देतांना दाखवले आहेत. अतिशय सुंदर काम आहे हे. मंदिराच्या सगळ्यांत शेवटच्या दालनात आहे अमुन, रॅमसिस, रा आणि प्ताह यांच्या मूर्ती.  मंदिराची रचना अशी केली गेली होती कि २१ फेब्रुवारी रॅमसिसचा जन्मदिवस आणि २१ ऑक्टोबर रॅमसिसचा राज्याभिषेकाचा दिवस या दोन्ही दिवशी पहिली सूर्यकिरणे थेट अमुन, रॅमसिस आणि रा यांच्या चेहऱ्यावर पडतील आणि प्ताह पाताळाचा देव असल्याने कायम अंधारात असेल. मला कोल्हापुरातील किरणोत्सवाची आठवण झाली. आणि भारतीय-इजिप्शियन संस्कृती मधील अजून एक समान धागा सापडला. 

5 Terre

ओसायरिस

5 Terre

मंदिरातील रिलिफ्स

5 Terre

मंदिरातील रिलिफ्स

5 Terre

मंदिरातील रिलिफ्स

5 Terre

अमुन, रॅमसिस, रा आणि प्ताह

रॅमसिसच्या मंदिराशेजारीच थोड्या अंतरावर नेफरटारी आणि देवी हॅथॉरचं मंदिर दिसतं. इजिप्त मध्ये राण्यांची मंदिरे फार कमी दिसतात. सर्वांत पहिले मंदिर फेरो आखेनतेन याने आपली राणी नेफेर्तीती साठी बांधलेले आढळते. अबु सिम्बल येथील हे दुसरे मंदिर. या मंदिराच्या आत सुद्धा सुंदर बार्स रिलीफ आहेत. काही ठिकाणी रॅमसिस इजिप्ती देवतांना भेटवस्तू देताना तर काही ठिकाणी देवता त्याला आशिर्वाद देतांना. खांबांवर ठिकठिकाणी हॅथॉरचे मुखवटे लावलेले आहेत. हॅथॉर हि सौंदर्य, प्रेम आणि मातृत्वाची देवता. हिला इजिप्त मध्ये काही ठिकाणी गायीच्या स्वरूपात पण दाखवले जाते आणि बाकी ठिकाणी तिच्या मुखवट्याला गायीचे कान असतात. रिलिफ्स मधून हॅथॉरच्या मुकुटावर गायीची शिंगे, मधोमध सूर्य आणि भोवतीने साप असे दाखवले आहे. 

5 Terre

नेफरटारीचे मंदिर

5 Terre

मंदिरातील रिलिफ्स

5 Terre

मंदिरातील रिलिफ्स

5 Terre

मंदिरातील रिलिफ्स

5 Terre

खांबांवरील हॅथॉर

5 Terre

रॅमसिस, हॅथॉर आणि नेफरटारी

निळ्याशार नासर लेक ने तीन बाजूने मंदिराला घेरलं आहे. पण हे मंदिर इथे आलं कसं याची गोष्ट फार रोचक आहे. आफ्रिकेची जीवनदायिनी नील नदीवर असलेल्या जुन्या आस्वान धरणाच्यावर अजून एक नवीन मोठं धरण बांधायचा निर्णय प्रेसिडेंट नासर यांनी घेतला. वीज निर्मिती आणि शेतीसाठी हा प्रोजेक्ट फार महत्वाचा होता. पण धरणाच्या बॅक वॉटरमुळे आस्वानच्या दक्षिणेकडील जवळपास ५५० किलोमीटरचा प्रदेश पाण्याखाली जाणार होता, आणि यात समाविष्ट होती अनेक पुरातन मंदिरे आणि एक संपूर्ण नुबीयन संस्कृती. नुबीया मधील लोकं आपली राहती घरं सोडून आस्वान मध्ये स्थायिक होणार होते. पण मंदिरांचं काय? मंदिरांच्या पुनर्वसनासाठी नासर यांनी युनेस्को कडे मदत मागितली. युनेस्को ने जगभरात आवाहन केल्यावर जवळपास ३० देश इजिप्तच्या मदतीला आले. 

5 Terre

नासर जलाशय

या प्रोजेक्टच्या अंतर्गत अबू सिम्बल इथली रॅमसिस आणि नेफरटारीची मंदिरे, आस्वान हाय डॅम च्या एका बाजूस वसवलेलं फिलाई मंदिर, आणि दुसऱ्या बाजूला वसवलेलं कलाबशा मंदिर या मोठ्या मंदिरांसोबतच अजून ३ लहान मंदिरे धरण क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. प्रत्येक मंदिर हे मोठ्या तुकड्यांत कापून, त्या प्रत्येक तुकड्याला नंबर देऊन, नवीन ठिकाणी नेऊन परत जोडलं आहे. आणि हे काम इतक्या शिफातीने केलं आहे कि ना कुठे मंदिराचे दगड कापल्याच्या खुणा आहेत ना कुठे ड्रिल केल्याच्या खुणा आणि कुठेही दगडांना जोड दिल्याचं दिसतं. हि मंदिरे हलवतांना प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी ठेवली गेली आहे. अगदी रॅमसिसच्या ४ पैकी एका पुतळ्याचा पडलेला चेहरा सुद्धा जसा पूर्वी त्याच्या पायथ्याशी होता, हुबेहूब इथे ठेवला आहे. या संपूर्ण प्रोजेक्टला संपायला ५ वर्ष लागली. इथे सापडलेल्या काही मूर्त्या कैरोच्या इजिप्तशियन म्युसिअम मध्ये ठेवण्यात आल्या तर इतर ४ मंदिरे इजिप्तने या प्रोजेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात मदत केलेल्या स्पेन, नेदरलँड, इटली आणि अमेरिका या ४ देशांना भेट दिले. नॅटजिओच्या वेबसाईटवर या प्रोजेक्टची फार छान माहिती दिली आहे ती इथे नक्की बघा. 
https://www.nationalgeographic.com/archaeology-and-history/magazine/2019...

मंदिरे पाहून झाल्यावर आम्ही ब्रेकफास्ट बॉक्स उघडला. तोच लांबुळका ब्रेड, बटर आणि जॅम, सोबतीला फ्रुट ज्युस आणि उकडलेली अंडी असं सगळं रिचवून आम्ही मंदिराच्या आवारात चक्कर मारली. अबू सिम्बल मधून बाहेर पडायला १०:३० वाजले, १ पर्यंत परत आस्वान. जातांना मात्र झोपलो नाही. आजूबाजूचा रस्ता आणि वाळवंटी प्रदेश बघत होतो. ठिकठिकाणी चेक पॉईंट्स होते आणि प्रत्येक चेकपॉईंट वर सध्याच्या राष्ट्रपतींचा अब्देल फत्ताह अल-सिसी यांचा मोठा फोटो दिसला. मुस्तफाने सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती मिलिटरी बॅकग्राऊंडचे असल्याने सेनेचा अंमल जरा जास्तंच जाणवतो, आणि ते या चेकपॉइंट्स वर दिसून येत होतं. 

5 Terre

नील नदी रुफटॉप रेस्टॉरंट मधून

5 Terre

नुबियन जेवण आणि ग्रील

१ च्या सुमारास हॉटेलवर पोहोचलो आणि तडक रुफटॉप रेस्टॉरंट गाठलं. इथून दिसणारा नील नदीचा नजारा फार सुंदर होता. मध्यान असली तरी नदीवरून येणारा गार वारा सुखावत होता. नुबीयन जेवण आणि सोबत चिकन आणि फिश ग्रील मागवले. जेवण झाल्यावर थोडी ताणून दिली आणि ५:३० वाजता परत नदीचा किनारा गाठला. मुस्तफाने एक फेलुका आधीच बुक करून ठेवली होती. फेलुका चालवणाऱ्याचं नाव पण मुस्तफाच होत. एक म्हातारा नुबीयन. ज्याला नदीवर, धरणावर राग नव्हता तर प्रेमचं होतं, जरी त्याचं घर जमीन सध्या पाण्याखाली गेलं असलं तरी. 

5 Terre

फेलुका

5 Terre

सूर्यास्त

फेलुका नदीच्या पाण्यावर तरंगू लागली, आणि जणू तीच आणि नदीचं हितगुज सुरु झालं. लहान लहान लाटांवरून फेलुकाचा प्रवास सुरु होता, अगदी शांततेत. अधून मधून गल पक्षी फेरी मारून जात होते. एलिफंट बेटाला संपूर्ण फेरी मारून परत येई पर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली होती. दीड तास कसा गेला कळलंच नाही. 
संपूर्ण दिवसात जे बघितलं होत, मानवाच्या कामाच्या विविध छटा अनुभवल्या होत्या, त्यामुळे फार समाधानी वाटत होत.

उरलेलं आस्वान दुसऱ्या दिवशी मुस्तफा सोबत बघायचंच ठरवून, we called it a day!

क्रमश:

.polaroid {
width: 80%;
background-color: white;
box-shadow: 0 4px 8px 0 rgba(0, 0, 0, 0.2), 0 6px 20px 0 rgba(0, 0, 0, 0.19);
margin-bottom: 25px;
}

.container-p {
text-align: center;
}

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

13 Oct 2019 - 4:39 pm | जॉनविक्क

प्रत्येक मंदिर हे मोठ्या तुकड्यांत कापून, त्या प्रत्येक तुकड्याला नंबर देऊन, नवीन ठिकाणी नेऊन परत जोडलं आहे. आणि हे काम इतक्या शिफातीने केलं आहे कि ना कुठे मंदिराचे दगड कापल्याच्या खुणा आहेत ना कुठे ड्रिल केल्याच्या खुणा आणि कुठेही दगडांना जोड दिल्याचं दिसतं.

कोपऱ्यापासून दण्डवत _/\_

फोटो आणी भित्तिचित्रे सुरेख.

खादाडीच्या फोटो बद्दल काय बोलावे ? हां क्यो जले प

जॉनविक्क's picture

13 Oct 2019 - 4:42 pm | जॉनविक्क

खादाडीच्या फोटो बद्दल काय बोलावे ? तेच ते नुबियन जेवण आणि ग्रील

हां, क्यो जले पे नमक छिडक रहे हो :(

कोमल's picture

13 Oct 2019 - 5:38 pm | कोमल

हा हा.
नुबियन जेवण खरंच छान मिळालं आम्हाला. तसं आपल्याकडे कुठे मिळत असेल असं नाही वाटत मला.

जेम्स वांड's picture

13 Oct 2019 - 5:17 pm | जेम्स वांड

शिडाची जहाजे/बोटी मस्त वाटतात पाहायला फुल भारी एकदम शांतपणे पाणी कापणारी बोट, न इंजिनची घरघर न अजून मशीनचा आवाज न प्रदूषण!

बाकी जानराव विक्क ह्यांच्याशी सहमत, नुबीयन जेवण पाहून लैच जळजळ झाली मनाची! ती चपाती सारखी फोल्ड केलेली ब्रेड आहे तिला काय म्हणायचं? खुब्बूस का पिटा म्हणतात ती हीच का?


न इंजिनची घरघर न अजून मशीनचा आवाज न प्रदूषण!

अगदी. फक्त हलक्या लाटांचा चुबुक चुबुक आवाज.
आणि इंजिन नसल्याने पाण्यावर तेलकट थर सुद्धा नसतो.

तो पिटा ब्रेडचा भाऊ आईश बलादी आहे. दिसायला पिटा सारखा असला तरी चवीत जरा फरक असतो, कारण यात गव्हाच्या लोंब्याची पूड घातलेली असते.

यशोधरा's picture

13 Oct 2019 - 5:42 pm | यशोधरा

मस्त लिहिलेय, कोमल!

नुबियन जेवण काय सुरेख दिसतंय! चवीलाही उत्तम असणारच. सगळे फोटोही सुरेख. अबू सिम्बल भारी आहे! सगळं अनुभवताना त्या काळात पोचायला होईल!

फेलुकाची सफर पाहताना वो शाम कुछ अजीब थी.. आठवलं.

कोमल's picture

13 Oct 2019 - 5:53 pm | कोमल

धन्यवाद यशो.

मुख्य म्हणजे नुबियन जेवण ही शाकाहारी लोकांसाठी पर्वणीच असते. जोवर तुम्ही त्यात वेगळं काही नॉनव्हेज मागवत नाही तोवर संपूर्ण जेवण शाकाहारी असतं.

संपूर्ण इजिप्त मध्ये शाकाहारी लोकांचं अजिबात अडणार नाही, उलट तिथले स्थानिक पदार्थांची सुद्धा चव चाखता येऊ शकते.

कंजूस's picture

13 Oct 2019 - 10:36 pm | कंजूस

सुरेख.

जालिम लोशन's picture

13 Oct 2019 - 10:38 pm | जालिम लोशन

भारतीय-इजिप्शियन संस्कृती मधील अजून एक समान धागा सापडला.
राजाचेा नाव रामसेस त्याच्या वडिलांचे नाव दॅॅशरट काही क्लिक होते आहे का?

कोमल's picture

14 Oct 2019 - 12:34 pm | कोमल

हा हा.
दॅशरत तर नाही, सेती पहिला नाव होतं त्याचं.
दशरती-सेती असं काही जुळवलं तर :))

सुधीर कांदळकर's picture

14 Oct 2019 - 6:21 am | सुधीर कांदळकर

रिलीफ्सची प्रचि खास उच्च दर्जाची. सीफरटीटी नावामुळे मी पाहिलेला पहिलावहिला आयमॅक्स चित्रपट आठवला. तो एक ईजिप्तच्या इतिहासावरील एक माहितीपट होता. तेव्हा ती भव्यता आयमॅक्समुळे दिसते आहे असे वाटले होते. पण मिपावरील प्रचि मधून जाणवले की ती भव्यता अस्सल आहे.

भव्य दिव्य बांधण्यातच फेरोंना समाधान वाटे. मग तो लोअर इजिप्त मधील पिरॅमिड असो वा अप्पर इजिप्त मधील अशी मंदिरे..

अस्वान आणि अबु सिम्बलच्या आठवणी ताज्या झाल्या....
योगायोग म्हणजे रात्री हा भाग वाचत असतानाच आयमनचा फोन आला होता, त्यांच्या इथे संध्याकाळचे साडे आठच वाजले असले तरी आपल्या इथे तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले असतात हे त्याच्या अजून लक्षातच राहत नाही 😀

कोमल's picture

14 Oct 2019 - 12:38 pm | कोमल

:))
हुक्क्याचा परिणाम असेल रे..

मंदिराची रचना अशी केली गेली होती कि २१ फेब्रुवारी रॅमसिसचा जन्मदिवस आणि २१ ऑक्टोबर रॅमसिसचा राज्याभिषेकाचा दिवस या दोन्ही दिवशी पहिली सूर्यकिरणे थेट अमुन, रॅमसिस आणि रा यांच्या चेहऱ्यावर पडतील आणि प्ताह पाताळाचा देव असल्याने कायम अंधारात असेल.

अबू सिंबेल मंदिर स्थलांतरित झाल्यावरही हा चमत्कार साधण्यात आला आहे का?

बाकी इजिप्तमधील रिलिफ्स अतिशय सुंदर आहेत. संक रिलिफ प्रकारचा उत्तम नमुनाच.

लोनली प्लॅनेट's picture

14 Oct 2019 - 11:33 am | लोनली प्लॅनेट

हो, मंदिर दुसरीकडे प्रस्थापित करताना देखील याचा विचार केलेला आहे आतासुद्धा या दोन दिवशी सूर्यकिरणे फेरो च्या चेहेऱ्यावरच पडतात
मी काही वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक वर documentary पाहिली होती.. ही एक अभियांत्रिकीची कमाल आहे

प्रचेतस's picture

14 Oct 2019 - 4:30 pm | प्रचेतस

ग्रेट.
हे खरेच भारी आहे.

लोनली प्लॅनेट's picture

14 Oct 2019 - 11:33 am | लोनली प्लॅनेट

हो, मंदिर दुसरीकडे प्रस्थापित करताना देखील याचा विचार केलेला आहे आतासुद्धा या दोन दिवशी सूर्यकिरणे फेरो च्या चेहेऱ्यावरच पडतात
मी काही वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक वर documentary पाहिली होती.. ही एक अभियांत्रिकीची कमाल आहे

लोनली प्लॅनेट's picture

14 Oct 2019 - 11:33 am | लोनली प्लॅनेट

हो, मंदिर दुसरीकडे प्रस्थापित करताना देखील याचा विचार केलेला आहे आतासुद्धा या दोन दिवशी सूर्यकिरणे फेरो च्या चेहेऱ्यावरच पडतात
मी काही वर्षांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक वर documentary पाहिली होती.. ही एक अभियांत्रिकीची कमाल आहे

अबू सिंबेल मंदिर स्थलांतरित झाल्यावरही हा चमत्कार साधण्यात आला आहे का?

हो फक्त आता हे 21 ऐवजी 22 तारखेला होतं

प्रचेतस's picture

14 Oct 2019 - 4:30 pm | प्रचेतस

ओके. १ दिवस फरक म्हणजे अगदीच मार्जिनल.

अनिंद्य's picture

14 Oct 2019 - 10:30 am | अनिंद्य

अबू सिम्बल आणि नुबीयन पाहुणचार आवडला.
शाकाहारींचे हाल होणार नाहीत हे ऐकून आनंद दुप्पट झाला.
पु भा प्र

हाही भाग अतिशय उत्कृष्ट झालाय ताई. पुढील भाग लवकर येउदे.