सरकार इडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करत आहे काय?

राजे १०७'s picture
राजे १०७ in काथ्याकूट
25 Sep 2019 - 6:44 pm
गाभा: 

आजच शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या विरोधात इडी कारवाई करणार आहे. अशी बातमी वाचली. या अगोदर राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती व चौकशी केली गेली होती. भुजबळ सुध्दा तुरुंगात होते.
नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इडी तत्परतेने कारवाई करायला बघत आहे. यापाठीमागे सरकारचा हात असावा काय? नुकतेच शरद पवार मी अजून तुरुंगात गेलो नाही. असं म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्याला धरुन कारवाई होत आहे काय. मिपाकरांची मते जाणून घेण्यासाठी धागा काढला आहे. धन्यवाद.

प्रतिक्रिया

राजे १०७'s picture

25 Sep 2019 - 6:48 pm | राजे १०७

माबोकरां ऐवजी मिपाकर अशी दुरुस्ती संपादक महाशयांनी करावी ही विनंती. घाईघाईत चूक झाली तरी क्षमा करा.

महासंग्राम's picture

25 Sep 2019 - 7:05 pm | महासंग्राम

हा प्रकार नवीन खचितच नाही, याआधीही कित्येक सरकारांनी अश्या पद्धतींचा वापर केलाय. तामिळनाडूत तर याची उदाहरणे ढिगाने मिळतील. प्रत्येक सरकार आपल्या पूर्वसूरींची रि ओढते इतकंच

सरकारच या संस्थांंना आदेश देत नाही हे कॉन्ग्रेसचे म्हणणे होते ना?

राजे १०७'s picture

25 Sep 2019 - 7:15 pm | राजे १०७

धन्यवाद संपादक महाशय.

सरकार इडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करत आहे काय? अजिबात नाही. हा आरोप करण्याआधी आपण कॉंग्रेसने सत्तेवर असताना काय उद्योग केले होते याचा जरा विचार करावा. सध्याच्या विरोधकांनीच सत्तेवर असताना केलेल्या गैरकारभारामुळेच ही वेळ आपल्यावर ओढवून आणलेली आहे.

तेंव्हा कोठे गेला होता राधासूता तूझा धर्म. .
सत्तेत असतान कॉंग्रेसने सर्व यंत्रणांचा (गैर)वापर करून मोदि व शहा यांना संपवण्याचा घाट घातला होता हे सर्वश्रुत आहे त्यामूळे आता कॉंग्रेसला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात काहीही चूक नाही.. कारण.........

कर नाही त्याला डर कशाची..
सन २००२ पासुन जवळपास सर्वच पक्ष मोदि व शहा या जोडगळीच्या मागे हात धुवून लागले होते. त्यातच २००४ मधे केंद्रात कॉग्रेसचे सरकार आल्यावर या हल्यांची तीव्रता आणखीनच वाढली. आपल्या हाताखालच्या सर्व सरकारी यंत्रणांचा व त्याच बरोबर माध्यमांचा यथेच्छ वापर करून या जोडगळीला पूर्णपणे नेस्तनाबुत करण्यासाठी जंगजंग पछाडले गेले. परंतू ह्या अत्यंत धूर्त व चाणाक्ष जोडगळीने त्यातून कोणतीही कायदेशीर पळवाट तर काढली नाहीच उलट सर्व न्यायालयीन चौकशांना बेडरपणे सामोरे जाऊन आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करून आज ते बहुमताने पंतप्रधान व गृहमंत्री या क्र.१ व २. या सर्वोच्च पदांवर विराजमान आहेत. आपले नाणे जर खणखणीत असेल तरच हे शक्य आहे. नाहीतर........

मनी(money) चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची..
याच्या विपरीत ज्यांच्या विरूद्ध आजकाल कारवाईचा बडगा उगारला आहे त्या सर्वांचा कल चौकश्यांना सामोरे जाण्याऐवजी कायदेशीर पळवाटा काढण्याकडेच जास्ती आहे. जर विरोधकांमधे धमक असेल तर त्यांनी सर्व न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाउन आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करावे.

मान्य ,पण नेमक्या निवडणूक तोंडावर आल्यावर नव्हता केला तर बाकी वेळी केला होता

आणि मनसेवर काँग्रेस ने काहीच चौकश्या टाकल्या नव्हत्या

तसेच मोदी शहा ह्यांचा धसका होता म्हणून त्यांना त्रास दिला असे तुम्ही म्हणू ईच्छिता तर आत्ता पण विरोधकांचा धाक आहे असे का म्हणू नये

जॉनविक्क's picture

26 Sep 2019 - 12:33 pm | जॉनविक्क

ढब्ब्या's picture

25 Sep 2019 - 9:47 pm | ढब्ब्या

आजच शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या विरोधात इडी कारवाई करणार आहे => फार पुर्वीच अशी कारवाई व्हायला पाहीजे होती, पण साहेब खुपच हुशार असल्याने ईडी ला खणायला वेळ लागला.

राज ठाकरे, भुजबळ आणी साहेब पण ऊगाच कोट्याधीश बनलेले नाहीत आणी धुतल्या तांदळासारखे स्वछ्छ तर अजीबात वाटत नाहीत.
आणी खरच पुरावे लपवले असतील हुशारीने, तर ईडी काय कुठल्याही चौकशीतून बाहेर पडतीलच की ....

बाकी साहेबांचे न्युज बाईट मजेशीर आहेत .. ओव्हर कॉन्फिडन्स नसावा म्हणजे झाले :)

https://www.loksatta.com/mumbai-news/i-will-myself-go-to-enforcement-dir...

महासंग्राम's picture

25 Sep 2019 - 9:52 pm | महासंग्राम

बारामतीकरांवर चौकीपहारे बसवणं रावसाहेबांच्या काळापासून सुरू आहे :)

#काकांनावाचवा
#SaveKaka

आनन्दा's picture

25 Sep 2019 - 10:22 pm | आनन्दा

ईडी ला बोलावले म्हणजे तुरुंगात टाकतात काय डायरेक्ट?

महासंग्राम's picture

25 Sep 2019 - 10:55 pm | महासंग्राम

डभोईच्या लढाईत निर्णायक विजय मिळवून श्रीमंत बाजीराव पेशवे पुण्यात आले.त्यावेळी नुकताच शनिवार वाडा बांधून पेशवे त्यात सहकुटुंब राहायला आले होते. मोहिमेतून आल्यावर राऊसाहेबांनी तातडीने युद्धाचा खर्च,मिळालेली लुट याचे हिशेब मांडायचे आदेश चिमाजी आप्पांना दिले आणि फडाच्या कारभारात तरबेज असलेल्या आप्पांनी ते तातडीने पुर्ण करून बाजीराव साहेबांसमोर हजरही केले.या हिशोबातील एकएक गोष्टी तपासताना बाजीरावांची नजर अडखळली ती बारामतीकर सराफांच्या लुटीच्या हिशोबात.लढाईत मिळालेली लुट प्रथम सरकारात जमा करायचा दस्तुर,पण बारामतीकर सराफांनी लुटीत मिळालेला हत्ती परस्पर स्वतःच्या वाड्यावर नेला होता.बरं, बारामतीकर सराफ म्हणजे कुणी सामान्य गृहस्थ नव्हे,खुद्द पेशव्यांना कर्ज दयावे इतकी मोठी असामी ती आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे ते पेशव्यांचे जावई, बाजीरावांची बहीण भिऊबाई यांचा
आबाजी जोशी तथा बारामतीकर सराफ यांच्याशी विवाह झाला होता. हिशोबातील या बारीक घटनेकडे कानाडोळा करतील ते पेशवे बाजीराव कसले ! त्यांनी ताबडतोब बारामतीकरांकडे तगादा लावला पण सराफ उन्मत्त, हत्ती देणं म्हणजे प्रतिष्ठा गमावणे,त्यांनी या मागणीला ठाम नकार दिला....दस्तुरखुद्द पेशव्यांच्या आदेशाला नाकारलं.
मग मात्र थोरल्या महाराजांच्या राजगादीशी इमान वाहिलेला पेशवा जसं वागेल तसं- अगदी तसंच राऊसाहेब वागले.त्यांनी हुकुम दिला,"बारामतीकरांच्या वाड्यावर चौक्या पहारे बसवा." शेवटी तो हत्ती परत सरकारात जमा होईपर्यंत ते चौक्यापहारे अव्याहतपणे बारामतीकरांच्या वाड्यावर होते.

थोडक्यात पेशव्यांनी बारामतीकरांवर अनियमिततेसाठी चौक्या बसवण्याची ही काही पहिली वेळ नव्हे.

#जागर_इतिहासाचा

जॉनविक्क's picture

25 Sep 2019 - 11:00 pm | जॉनविक्क

थोडक्यात पेशव्यांनी बारामतीकरांवर अनियमिततेसाठी चौक्या बसवण्याची ही काही पहिली वेळ नव्हे.

कठीण आहे!

एक प्रकारे हा गैरवापरच आहे. पण त्यात पवारांना त्रास देण्याचा अजीबा उद्देश नाहि. भाजप-सेनेने सत्ता वाटुन घ्यावी, पवारांबद्दल सहानुभूती निर्माण करुन शक्य तितक्या विरोधी पक्षातल्या जागा त्यांना मिळु द्याव्या, आणि काँग्रेसचं पूर्ण पानिपत करावं, असा प्लॅन आहे मोदि+पवारांचा.

तीन वर्षे जेलमध्ये जावे लागते मग ?

सुप्रीया ताईंचा मार्ग निष्कंटक होईल :ड

भंकस बाबा's picture

26 Sep 2019 - 8:54 am | भंकस बाबा

मोदी आणि अमित शाह एक नंबरची डामरट माणसे आहेत, कोंग्रेसचे पानिपत करता करता काकाना कात्रज दाखवला नाही म्हणजे मिळवली!

भंकस बाबा's picture

26 Sep 2019 - 8:58 am | भंकस बाबा

असा काही बसला आहे की पेंटरबाबू वेगळी चूल मांडण्याची भाषा करत आहेत.
बेंगाली रोशगुल्ला देखिल सध्या साखरेत घोळतो आहे.

त्यांनी घाबरून जायचे कारण नाही,आणि केलेच असेल तर परीणाम भोगायची तयारी ठेवावी लागते.

कारण फक्त यांनीच हिशोब चुकते केले पाहिजेत असे थोडीच आहे.

शिक्कामोर्तब झालेला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

नाखु's picture

26 Sep 2019 - 11:42 am | नाखु

काही सांगण्याची गरज नाहीकाही सांगण्याची गरज नाही

प्रभू-प्रसाद's picture

27 Sep 2019 - 11:08 am | प्रभू-प्रसाद

एकच नंबर.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2019 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्याचं सरकार मोकाट सुटलं आहे, इकडेही आणि वरही.
जनता सर्वांचा माज उतरवते, फक्त वाट पाहावी लागते.

कालच धावत्या मेसेजेस मधे एक मेसेज वाचला.

''E.D. चे नामांतर आता B.D. ( ब्लॅकमेल डिपार्टमेंट) असे करावे का ?
म्हणजे, त्यांना शोभेल असं नाव आहे.

जे विरोधी नेते घाबरले ते आधीच सरकार पक्षात गेलेले आहेत,
आता उरलेले सर्व जेलमधे जातील..''

चालू द्या...!

-दिलीप बिरुटे

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Sep 2019 - 1:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

निवडणुकीच्या तोंडावर विरोधी नेत्यांच्या मागे चौकशा लावणे आणि त्यांची पापे बाहेर काढणे, जेणेकरुन मतांवर परीणाम होईल असा कावा दिसतो. शिवाय भाजप सोडुन बाकिच्या नेत्यांच्या चौकशा होत असल्याने भाजपात ईनकमिंग वाढले आहे (केवळ सुरक्षित राहण्यासाठी)

राघव's picture

27 Sep 2019 - 11:39 am | राघव

अहो सरळ हिशोब आहे इथे..

- चर्चा रंगतील त्या भाजप विरोधकांना संपवण्यासाठी सगळं करतंय याच्या.
- चर्चा रंगतील त्या विरोधकांनी केलेल्या / विरोधकांवर आरोप असलेल्या भ्रष्टाचारांच्या.
- सरकार सांगत बसेल की आम्ही अशी अशी कामं केली. विरोधक सांगत बसतील की आम्हाला संपवण्यासाठी सरकार चाली खेळतंय. भारतीय मिडीया हा सनसनाटीलाच फार महत्त्व देतो हे उघड आहे. चर्चा कामांवर होणारच नाहीत. किंवा झाल्यात तरी त्यांना तेवढं कव्हरेज मिळणार नाही.
- निवडणुका झाल्यानंतर सगळ्या केसेस पुन्हा स्लो होतील.
.
.
.
- निवडणुका सेंटिमेंट्सवर खेळवण्याची ही एक राजकीय चाल आहे आणि तसेच ते होणार.
- सगळ्या चर्चांचा रोख हा सरकारच्या कामावर न ठेवता इतरत्र राहील याची सोय आहे अशा चाली. हे सरकारही करते आणि विरोधकही. फायदा सेंटिमेंट्स ज्यांच्यासाठी मोठ्या त्यांना होतो.

असो. :-)

उपेक्षित's picture

27 Sep 2019 - 12:32 pm | उपेक्षित

खर तर BJP हा तत्व सांभाळणारा (त्यातल्या त्यात वासरात लंगडी गाय प्रमाणे.) पक्ष म्हणून पूर्वीपासून माहित होता पण या २ बनिया लोकांनी तत्वांची वाट लावून त्याला राष्ट्रवादी BJP खान्ग्रेस असा नवीनच पक्ष काढलाय.

राष्ट्रवादी -खान्ग्रेस ला जनतेने का नाकारले हे खरच मोदि- फडणवीस यांना समजत नाहीये ? कि सत्तेची धुंदी आहे ? कारण या नाकारलेल्या पक्षातील जवळपास ६०% लोक आपल्या पक्षात भरून घेतली आहेत यांनी. गेल्या ७० वर्षात यांना २८८ निष्ठावान कार्यकर्ते तयार करता आले नाहीत साधे ? बिग शेम.

त्यात यांना काही प्रश्न विचारायला गेले तर पिसाळलेल्या जनावरां सारखे अंगावर येऊन वयक्तिक शेरेबाजी करायला येतात इथे मिपाववर देखील तेच चालत असते.

इतकी कसली भीती आहे या चेल्यांना कि जरा कोणी आरसा दाखवायला गेले तर पिसाळून जातात आणि हल्ला करतात झुंडीने ? मोदी काय किंवा फडणवीस काय कोणीही वरून छत्रचामर घेऊन आलेले नाहीयेत मग आपल्या आपल्यात इतके वयक्तिक होऊन झुडीने हि टोळी का भांडत असते ?

असो या सर्व प्रश्नांची उत्तरे या भक्तीने अहंकारी झालेल्यांकडून मिळतील हि अपेक्षाच व्यर्थ आहे.

जाता जाता हिटलरच्या हुकुमशाहीची सुरवात अशाच टोकाच्या राष्ट्रवादातून झाली होती हे आपले उगाच नोंदवतो.

आपला उपेक्षित (छोटा माणूस)

राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 1:55 pm | राजे १०७

सौ प्रतिशत सहमत!

कसला तत्व पाळणारा ? अमित शहा ह्यांचायवर घोटाळ्याचे प्रकरण होते १५ वर्ष आधी तेव्हा विखे नि सोडवले होते
पक्षांतर आधी पण होत होती

आणि जनता आंधळी आहे ते फक्त पक्ष आणि मोदी साहेबानाना मत देतात ,पक्षांतर करून आल्याचे नाव पण बघत नाहीत

स्वधर्म's picture

27 Sep 2019 - 5:15 pm | स्वधर्म

उपेक्षित साहेब. समर्थकांना जसं काही विरोधी मत अाजिबात दिसत नाही, ऐकू येत नाही, असं वाटतंय. हा खरं म्हणजे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीला धोका नाही, त्यांचं दिवाळं वाजलंय अाधीच. हा लोकशाहीला धोका अाहे असं वाटू लागलंय.

दुर्गविहारी's picture

27 Sep 2019 - 6:13 pm | दुर्गविहारी

सणसणीत भावा ! एकुणच देशातील सध्याच्या वातावरणाचा वीट आला आहे. काही सकारात्मक बदल होतील अशी अपेक्षा होती. पण ....

विजुभाऊ's picture

27 Sep 2019 - 6:56 pm | विजुभाऊ

खर तर BJP हा तत्व सांभाळणारा (त्यातल्या त्यात वासरात लंगडी गाय प्रमाणे.) पक्ष म्हणून पूर्वीपासून माहित होता पण या २ बनिया लोकांनी तत्वांची वाट लावून त्याला राष्ट्रवादी BJP खान्ग्रेस असा नवीनच पक्ष काढलाय.

कसला तत्व सांभाळणारा म्हणताय! त्यानी काहितरी करायचं आणि अंगलट आले की सोयीस्करपणे आमचा आणि त्यांचा ( विहींप , संघ , बजरंगदल इत्यादी) संबन्ध नाही असे म्हणून टाकायचे
भाजपचा संघाशी संबन्ध नाही, संघाचा विहीम्पशी संबन्ध नाही. बजरंगदलाचा भाजपशी संबन्ध नाही , सनातनचा कोणाशीच संबन्ध नाही. असे जनमत करत ठेवायचे. त्यामुळे एखादी चाल जमलीच तर ती भाजपची नाही तर त्याच्याशी संबन्ध नाही असा मी नाही त्यातली छाप ….. पावित्रा संघ आणि भाजप नेहमीच घेत आलाय.
बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी भाजप किंवा संघाने थेट जबाबदारी कधीच घेतली नाही. (. शिवसेनेने निदान आडमार्गाने का होईना ते क्रेडीट घेतले)
आणि बनिया ना कशाला नावे ठेवायची? भाजपची धोरणे ही आज ठरलेली नाहीत. प्रमोद महाजन असताना त्यांनी करलो दुनिया मुठीमे कंपनीला कसे झुकते माप दिले ते सर्वश्रुत आहेच. समुद्रात बुडणार्‍या एन्रॉनला कोणी पुनरुज्वीत केले हे रीबेका मार्क सांगु शकतील.
नोटबंदी सारखे काही निर्णय फसले किंवा आततायी ठरले तरी जनतेने मोदींना त्या साठी संपूर्ण सहकार्य दिले होते.
मोदीं सारखा थेट भिडणारा , अरे ला कारे म्हणणारा पंतप्रधान भारताला बर्‍याच वर्षानी मिळाला आहे. कोणत्याही देशाला असे नेतृत्व आवश्यक असते. तरच देश काही धोरणे राबवू शकतो. हिटलरला हुकूमशहा म्हणून नावे ठेवतो पण त्याने अगदी पहिल्या महायुद्धानंतर अल्पकाळात जर्मनीला जर्मनीला पुन्हा जगत्जेतेपदाचे स्वप्न दाखवले. औद्योगीक उत्पादन वाढवले. जेत्या इम्ग्लंडला हे जमले नव्हते. ते पंतप्रधान बदलत बसले होते आणि तिकडे जर्मनी सुसज्ज होत होता.

उपेक्षित's picture

28 Sep 2019 - 5:19 pm | उपेक्षित

@ विजुभाऊ अहो हे माझे वयक्तिक मत आहे आणि ते ठाम आहे. आपले वेगळे मत असेल तर असू द्या कि आपल्याही मताचा आदर आहेच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Sep 2019 - 3:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम चर्चा . गेल्या खेपेस मोदीनी राष्त्रवादीस भ्रष्टवादी म्हणले. मग निवांत मोदी व पवार बारामतीला एकत्र व्यासपीठावर दिसले. यथावकाश पवाराना पद्मविभूषण हा किताब सरकारने दिला. ह्यावेळेस पण असेच काहीसे होईल.
पक्षातील मरगळ संपवायला मला मदत करा. कॉन्ग्रेस संपवायला मी तुम्हाला मदत करतो. असे राष्ट्रवादी व भाजपात डील झाले असण्याची शक्य्ता नाकारता येत नाही असे ह्यांचे मत.

हस्तर's picture

27 Sep 2019 - 3:39 pm | हस्तर

सरकारला राष्ट्रवादी ने पाठिंबा दिलेला विसरलात ?

आणी त्याच सरकार विरोधात मोर्चात इतके लोकं(कोणाचे हे सांगायची गरजच नाही) रस्त्यावर उतरले असताना, "...तर आम्हाला पाठिंब्याचा विचार करावा लागेल" अशी साधी बतावणीसुद्धा करायला जमली न्हवती राष्ट्रवादीला. लय कन्फ्युस झालतो ह्यांना सरकार सहयोगी की विरोधी समजावे यासाठी.

गौतमीपुत्र सातकर्णि's picture

27 Sep 2019 - 6:30 pm | गौतमीपुत्र सातकर्णि
राजे १०७'s picture

27 Sep 2019 - 6:54 pm | राजे १०७

चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

जॉनविक्क's picture

28 Sep 2019 - 4:13 pm | जॉनविक्क

आता राऊत गेले तिकडे समजूत काढायला. एकूण प्रकरण फारच गुंतागुंतीचं होतंय.

शाम भागवत's picture

28 Sep 2019 - 7:02 pm | शाम भागवत

:)

शाम भागवत's picture

28 Sep 2019 - 8:10 pm | शाम भागवत

फाटाफुटीचे राजकारण करता करता ते घरातच शिरलं असल्याची शंका काही महिन्यांपासून येतीय.

"आपण आता पन्नाशी ओलांडलीय. तेव्हा आपण आता निर्णय घ्यायचे व मोठ्यांकडे आशिर्वादाला जायचे." असं वक्तव्य अजितदादांनी फार पूर्वी केल्याचे अनेकांना आठवत असेलच.

तेच आता आणखीन पुढे गेलाय का?
http://jagatapahara.blogspot.com/2019/09/blog-post_28.html?m=1