सिंधु खोरे पाणी करार, हे कुणि उलगडून सांगू शकेल का ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
11 Aug 2019 - 2:09 pm
गाभा: 

शहरात जसे गाड्यांच्या पार्किंग वरून होणारी भांडणे पेल्यातली तात्कालीन वादळे असली तरी, जसे कोणताही छोटाही संघर्ष अनुभव सुखद नसतो तसे पाण्यावरून होणारे संघर्ष अनुभव मग घरगुती नळावरील असो आंतरराज्य असो वा आंतरराष्ट्रीय असो सुखद असत नाहीत हे समजण्यासारखे आहे.

नद्यांच्या पाणी वाटपाची गणिते सर्वसाधारण पणे सर्वसामान्याम्च्या डोक्यावरून जातात -माझ्यासुद्धा डोक्यावरूनच जातात. सिंधु खोरे पाणी करार हा भारत - पाकीस्तान दरम्यानचा पाणी करार. ज्यात पश्चिम बाजुच्या तीन नद्यांचे पाणी पाकीस्तानने वापरावे आणि तीन नद्यांचे पाणी भारताने वापरावे.

पाणी दोन्ही देशाच्या जनतेस वपरण्यास लागते हे ठीक. जागतिक बँकेचा पैसा सिंचन विकासासाठी लगतो हे ठिक, धरणांमध्ये गुंतवणूक केल्या नंतर शत्रुराराष्ट्राकडून फोडले जाऊ नये म्हणून त्यास संरक्षणाची गरज असते हे ठीक. पाकीस्तान भारता दरम्यान सर्वचर्चा द्विपक्षीयच असतील हा हट्ट बाजुस ठेऊन जागतीक बँकेची मध्यस्तता स्विकारली हे ठीक. राजकीय कारणावरून संघर्ष झाले तरी पाण्यावरून तुम्ही संघर्ष केले नाही त्याचे कौतुक करून घ्यावे वाटते ते ठीक.

आता या कराराच्या मला न समजलेल्या बाजू देतो

१) दोन्ही देशातील विशीष्ट सिंधू खोर्‍यातील सिंचन प्रकल्पाला दिलेले जागतिक बँकेचे कर्ज सव्याज फिटत नाही तो पर्यंत पाणी करारातून बाहेर पडता येणार नाही ही आंतरराष्ट्रीय अट समजता आली असती, पण जागतिक बँकेचे कर्ज सव्याज फिटल्यानंतरही पाणी करारातून आजीबात बाहेर पडता येणार नाही अशा स्वरुपाची अट १९६० मध्ये भारत सरकारने कशी काय स्विकारली ?

-त्याच नेहरु सरकारने अनफेअर अटी असलेले अनेक आंतरराष्ट्रीय करार नाकारले होते करारात्न कधीच कोणत्याच परिस्थितीत बाहेर पडता येणार नाही ही अट कशी काय स्विकारली ? करारातून बाहेर पडणे आदर्श नसते अवघड असावे पण करारातून बाहेर पडण्याची व्यवस्थाच नाही. म्हणजे भरला एकत्र कुटूंब तोडून वेगळा घरोबा केलेला चालतो पण पाणी करारातून बाहेर पडण्याची व्यवस्था असणे चालत नाही हा विरोधाभास माझ्या समजण्या पलिकडचा आहे. कुणाही सिंचन तज्ञाने किंवा काँग्रेसीने यावर प्रकाश टाकल्यास आभारी असेन .

२) पाकीस्तानचे पाणी अडवण्याचा विचार काही क्षण बाजूला ठेवा. सिंधू खोरे पाणी करार दोन्ही बाजूच्या पजांबच्या सिंचनाची पुरेशी काळजी घेतो. - पुर्ण नाही कारण भारतीय पंजाबची शेजारच्या राज्यांना पाणी देण्यास कुरकुर चालते म्हणजे त्यांना स्वतःसही पाणी कमी पडते. पण तरीही पंजाबातले सिंचन अगदीच वाईट नाही. करारातील पुढचा अनफेअर मुद्दा पाहू.

काश्मिर आणि लदाख मध्ये नद्यातील पाणी तिथल्या तिथे शेती साठी वापरता येते पण साठवून जिथे सिंचनाची गरज असलेल्या इतर काश्मिरी आणि लदाखी जनतेला कालव्यांचे जाळे करून देता येत नाही कारण त्या तिन्ही नद्यातील पाणी पाकीस्तानच्या वाट्याचे आहे. भारतीय जम्मु काश्मीर मध्ये अथवा लदाख मध्ये पाणी अडवून सिंचन करायचे तर पाकीस्तानची परवानगी घ्यावी लागेल . आता अशी परवानगी पाकीस्तान का देईल. आणि अशी परवानगी हवीच असेल तर काश्मिरी लोकांना पाकीस्तानात जॉईन व्हा म्हणेल आणि सिंचनासाठी परवानगी मिळेल या आशेने किमान काही काश्मिरी पाकीस्तानात जातो म्हणतील अशी शेखचिल्ली अट नेहरू सरकार कशी काय स्विकारली? आणि लदाखी जनतेने काय करायचे ?

३) या वर कडी म्हणजे करार होण्यापुर्वी भारत पाकीस्तनला पाणी देण्यास कुरकुर करत असेल भारताकडून पाणी घेण्यासाठी करारा आधी पाकीस्तान भारताला पैसे पण मोजत असे. करारा मध्ये एका विचीत्र अटीचा समावेश केला गेला मी वरवर चाळलेल्या स्रोताततरी करारा नंतर भारताने भारतीय टॅक्स पेयरचा पैसा पाकीस्तानी पंजाबमधील कालव्यांचे जाळे पुर्ण करण्यासाठी थोडा थोडका नाही प्रचंड मोजला . इथे स्वतः भारतातील सिंचनावर असंख्य ठिकाणी पैसा आजही अपुरा असताना ? किस खुशीमे ?

Indus Waters Treaty
या इंग्रजी विकिपीडिया लेखातून

Per Article 5.1 of IWT, India agreed to make fixed contribution of UK Pound Sterling 62,060,000/= (Pound Sterling sixty two million and sixty thousand only or 125 metric tons of gold when gold standard was followed) towards the cost of construction of new head-works and canal system for irrigation from western rivers in Punjab province of Pakistan.[14] India had paid the total amount in ten equal annual installments despite the 1965 Indo-Pak war.[15][16][12] As of 2019, adjusted for gold price inflation and exchange rates, it is estimated that India paid Pakistan $ 5.2 billion or INR 359 billion

इंग्रजी विकिपीडिया लेखात उपरोक्त परिच्छेदात खालील संदर्भ येतात.

१४ ) http://www.thedialogue.co/struggle-power-indus/
१५) http://e-collection.library.ethz.ch/eserv/eth:7481/eth-7481-01.pdf
१६) https://books.google.com/?id=nrcqGF3agsEC&pg=PA98&dq=Ravi+River&q=Ravi%2...
१२) http://siteresources.worldbank.org/INTSOUTHASIA/Resources/223497-1105737...

१७) https://www.gold.org/goldhub/data/gold-prices

इथे तुम्ही पाकीस्तान वेगळा झाल्यानंतर पाकीस्तानला ५० कोटी दिले तर आजही प्रश्न विचारले जातात. मला इंग्रजी विकिपीडियावर खालील महिती मिळाली याचे रिझनींग माझ्या डोक्याला सुटत नाही, करार विशेषज्ञ सिंचन तज्ञ आणि काँग्रेसींनी भारताने हा प्रचंड पैसा पाकीस्तानला का मोजला ते सांगावे ? आणि काँग्रेसेतर मंडळी तुम्ही या बद्दल प्रश्न विचारताना का दिसत नाही ते सांगावे ? कदाचित विकिपीडिया लेखातील माहिती चुकीची असेल तर तेही सांगावे.

व्यक्तिशः लोकांनी पाण्यावरून भांडावे असे मलाही वाटत नाही त्या शिवाय पाकीस्तानच्या विमान दळ आणि मिसाईल क्षमता पूर्ण अक्षम करण्याची क्षमता असल्या शिवाय -युद्धात सर्व माफ असते हे खरे असले तरी- शक्यतो एकमेकाची धरणे फोडणारे युद्ध होणार नाही याची काळजी घेणे श्रेयस्कर .

इतर कशापेक्षाही जम्मु-काश्मिरी आणि लदाखी जनतेचा सिंचनाचे जाळे बनवण्याचा आधिकार त्यांना वापस मिळवून देणे गरजेचे असावे.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे शुद्धलेखन आणि व्याकरण चर्चा व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी अनेक आभार.

*** ' माझे नेहरवायण' (अनुषंगिक धागा मालिका जाहीरात ) ***
* माझे नेहरवायण १

* माझे नेहरवायण २

* माझे नेहरवायण ३

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

11 Aug 2019 - 5:44 pm | कपिलमुनी

प्लँचेट करून नेहरूच्या आत्म्याला बोलवा , म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील आणि आम्ही पण सुटू

माहितगार's picture

11 Aug 2019 - 6:56 pm | माहितगार

=))

निरुत्तर झाले की संताप होणे स्वाभविक असावे :)

कपिलमुनी's picture

11 Aug 2019 - 10:56 pm | कपिलमुनी

प्रश्न तुमचा , म्हणजे तुमच्याकडे उत्तरे नाहीत , मग आम्ही निरुत्तर कसे ?
असल्या चुइंगम वर संताप करणे बालपणी सोडले आहे

व्वा, काम , क्रोध, लोभ, मद, मोह और मत्सर या षड्रिपुंवर बालपणीच विजय मिळवलेल्या महानुभावांशी संवाद साधण्याचे अहोभाग्य आम्हाला या लेखामुळे मिळाले :)

नाही म्हणजे षड्रिपुंवर एवढा विजय मिळवूनही चर्चेत विचारलेल्या प्रश्नांचा गळा घोटण्याची इच्छा कुणाला का व्हावी ? चुंईगम म्हणायचे तर धागा लेखातील प्रत्येक प्रश्न नवा बहुधा भारतात प्रथमच कुणि उपस्थित करत असेल एवढा नवा आणि फ्रेश आहे. आणि प्रत्येक भारतीयाच्या आज्जी-आजोबाने आई-बाबांनी प्रत्यक्ष नाहीतर अप्रत्यक्ष कर भरलेलाच असतो त्याचा अब्जावधीने अपव्यय झाला असल्यास - भारतिय प्रदेशांवर अन्याय झाला असल्यास साधा प्रश्नही विचारू नये ? मिपाकर सोडून द्या, असा १ रुपायचाही अपव्यय झाला असेल तर प्रश्न करण्याजोगा नाही हे स्वपरीवार, आप्तस्वकीय बंधु, शेजारी आपले गुरुजन यांच्याकडून लिहून सह्या घेऊन आपल्या प्रमाणेच त्यांच्याही षड्रिपु विजयाचे छायाचित्र मिपाच्या माध्यमातून आंतरजालावर लावल्यास हजारो मिपाकरांना षड्रिपुंपासून सुटका करून घेण्यास प्रेरणा मिळू शकेल म्हणून अशा छायाचित्राची आपल्याकडून आवर्जुन प्रतिक्षा असेल.

प्रश्न विचारणारा अनुत्तरीत असतो प्रश्न उपस्थित करत असतो. अनुत्तरीत = निरुत्तर नसावे किंवा कसे ?

जोन's picture

13 Aug 2019 - 6:36 pm | जोन

प्ल्याण्चेट टाक्ला व्हता....नेह्रु काका "आम्च्या बाळाला भाव द्येत न्हाय तार आम्हि पन न्हाइ द्येत जा" म्हुन शान निघुन गेले....

माहितगार's picture

11 Aug 2019 - 9:53 pm | माहितगार

जरा फिरुन आलो तेव्हा वेताळाने- सॉरी नेहरुंच्या प्लान-चीट म्हणजे डिस्कव्हरी ऑफ ईंडियातल्या व्यक्तीपुजीत-आत्म्याने हि लेख मालिका म्हणजे त्यांचीच करामात असल्याचे डिस्कव्हरी ऑफ ईंडियातल्या राहुन गेलेल्या उणिवांचे खरे गुपित समस्त मिपाकरांसमोर उघडे करण्यास हरकत नसल्याचे सांगितले; म्हणून हे अधिकचे स्पष्टीकरण.

प्लान-चीट वेताळ प्लान-चीट आणि वेताळ ह्या खर्‍या गोष्टी नसतात व्यक्तीपुजक अंधश्रद्धा पसरवू नयेत म्हणून ऐतिहासिक पुरुषांच्या कार्याची यथा योग्य चिकित्सा करणे योग्य असते असेही म्हणाला.

सध्या कृष्णा पाणी वाटप करार सिंधू पेक्षा महत्वाचा आहे. पार दोन जिल्हे बुडाले तरी कर्नाटक अलमट्टी मधुन पाणी सोडत नव्हते. त्या करारात अशा कुठल्या अटी आहेत, ज्यामुळे दरवर्षी कोल्हापूर, सांगली बुडते?

माहितगार's picture

11 Aug 2019 - 10:04 pm | माहितगार

कर्नाटकी लोक गुरुएत राव तामिळनाडू महाराष्ट्र आणि गोव्या विरुद्धची बुद्धी त्यांनी पाकीस्तान विरुद्ध लावली तर सिंधू खोरे करारात नेहरुं सरकार कडून झालेल्या चुका चुटकी सरशी सोडवता येतील.

आता नितीन गडकरींना कुणीतरी हि चर्चा पाठवलीच पाहीजे. प्रतिसादास उत्तर देताना आंजावर उंची तपासली अमृतसर २३४ मीटर आणि लाहोरची २१७ मीटर म्हणजे तिथे एक अलमाटी बांधले की लाहोरमध्ये पाणी जाईल आजीबात विनोद मस्करी नाही या करारातून सुटण्यासाठी पाकीस्तानचे नाक असेच काहीसे दाबावे लागेल.

महाराष्ट्राकडे क्षेपणास्त्र आणि अतिरेकी दोन्ही नाहीत परंतु पाकड्यांकडे आहेत.

खूप चांगले प्रश्न उपस्थित केले आहेत. जर वरील माहिती खरी असेल तर खूप दुर्दैवी आहे.
- करारातून बाहेर पडू शकता न येणे
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सिंचनाची सोय भारताने करणे, तेही इतका प्रचंड पैसा खर्च करून
- लडाख भागात सिंचनाच्या सोयी न करता येणे

रच्याकने, कपिलमुनी का चिडले समजले नाही.

कपिलमुनी's picture

16 Aug 2019 - 12:18 am | कपिलमुनी

असल्या धाग्यांची मज्जा घ्यायची असते चिडणे दूर !

आकाश कंदील's picture

16 Aug 2019 - 12:51 pm | आकाश कंदील

कपिलमुनी साहेब,
जेंव्हा योग्य प्रतिवाद करणे शक्य नसते अथवा महितीचा अभाव असतो अथवा नवीन माहिती समजू शकत नाही तेव्हा अश्या धाग्याची मजाच घ्यावी लागते पर्याय नाही :(
नेहरू आणि गांधी परिवार झिंदाबाद देश किती का खड्यात जाऊ देत आम्ही झापड बांधून बसलो आहोत

कपिलमुनी's picture

17 Aug 2019 - 4:29 pm | कपिलमुनी

मिपा इतिहासात राजकीय धुळवडीच्या धाग्यानी बरीच वाट लावली आहे, त्यावर मालकांची सूचना आली तेव्हापासून लांब आहे. वाद , प्रतिवाद करायचे असल्यास खव सदैव उघडी आहे. काय करायची ती चर्चा तिथे करायला या.
आणि उगा दुसर्यांना मारलेले उडते तीर घेऊ नका

इरामयी's picture

16 Aug 2019 - 2:50 pm | इरामयी

अंगाशी आलेले फाजील लाड.