सरकारच्या बाजूने बोललो तर भक्त.
सरकार विरोधात बोललो तर देशद्रोही.
हिंदू धर्मविरोधात बोललो तर बुबुडाउविपुमाधवि*.
हिंदू धर्माच्या बाजूने बोललो तर सनातनी, हिंदुत्ववादी, प्रतिगामी.
जातीव्यवस्थेविषयी बोललो तर बामणी, मनुवादी.
जातीव्यवस्थेविरोधात बोललो तर आंबेडकरवादी, फुलेवादी.
खर्चाच्या बाजूने बोललो तर भांडवलशाही.
काटकसरीच्या बाजूने बोललो तर समाजवादी.
स्त्रियांना विशेष अधिकार असावेत बोललो तर फेमिनाझी.
स्त्रियांना विशेष अधिकार नसावेत बोललो तर एमसीपी.
प्रार्थनेच्या बाजूने बोललो तर आस्तिक.
कर्मकांडाविरोधात बोललो तर नास्तिक.
आठवणीतून एखादा किस्सा सांगितला तर खोटारडा, फेकू.
मुद्द्याच्या समर्थनार्थ संदर्भ दिले तर लिंकपिसाट**.
संयतपणे चर्चा केली तर भित्रट, नामर्द, षंढ.
वैतागून शिवी हासडली तर असंस्कृत, शिवराळ.
भारतीय म्हणवून घेण्यासाठी काय करू?
माणूस म्हणवून घेण्यासाठी काय करू?
===================================================
*बुबुडाउविपुमाधवि: बुद्धीवादी बुद्धीप्रामाण्यवादी डावे उदारमतवादी विवेकवादी पुरोगामी मानवतावादी धर्मनिरपेक्ष विचारवंत
सौजन्य: गॅरी ट्रुमन आणि सचिन७३८
**लिंकपिसाट: सौजन्य: गामा पैलवान
प्रतिक्रिया
7 May 2018 - 11:33 am | श्वेता२४
भारीच . बाकी
बुबुडाउविपुमाधवि*याचा विस्तारअर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद7 May 2018 - 11:37 am | जेम्स वांड
म्हणजे आयुष्यात मजा घेण्यालायक अजून भरपूर गोष्टी आहेत की, उगाच इकडले नाहीतर तिकडले एजंडे कश्याला राबवत बसावे म्हणतो मी.
हे म्हणजे आपलं आमचं वैयक्तिक मत.
7 May 2018 - 12:19 pm | अक्षय कापडी
तुमच्या लेखापेक्षा तुमच नावंच खुप आवडलं मला [फीदीफीदी]
7 May 2018 - 7:30 pm | आनन्दा
कापडी सर प्रोफाइल ला जाऊन फटू बघून आलात का? ((खुसुखुसू))
9 May 2018 - 9:36 am | प्रकाश घाटपांडे
बुबुडाउविपुमाधवि हे एक नाहीत यांच्यात बी अनेक प्रकार आहेत अन ते आपापसात वाद बी घालत्यात
12 May 2018 - 3:48 pm | तनमयी
हे हे हे
भारीय
12 May 2018 - 3:49 pm | तनमयी
विठ्ठला कोणता झेंडा घेवू हाती
13 May 2018 - 2:11 am | प्रसाद गोडबोले
भारीच लिहिलंय !
समाजाचं क्लस्टरींग झाले आहे ही एकदम १००% वस्तुस्थिती आहे !
एकदम वस्तुस्थिती आहे , २०१४ मध्ये मोदी सत्तेत येईपर्यंत मतभेद नव्हते अशातला भाग नाही पण मोदी आल्यावर एकदमच प्रकर्षाने हे समाजातील घटक वेगळे जाणवायला लागलेत ! आणि आपण कितीही अलिप्त रहायचं ठरवलं तरीही कोठेतरी ब्रेकिंग पॉईंट येतोच कि जिथे आपल्याला स्टॅन्ड घ्यावा लागतो .
आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये एक शांततेच्या धर्माचा मित्र होता , आहे , त्याचा मोदी द्वेष इतका ओथंबुन वहात होता की एके दिवशी दहशतवादावर चर्चा चालु असताना त्याने मोदी हा लादेनजींच्या इतकाच दहशतवादी आहे असे विधान केले ! मी स्वतः राष्ट्रवादीला मत देतो पण हे जरा अतीच झाले- म्हणुन त्या दिवशी स्टॅन्ड घेणे भाग पडले -
जगातल्या सर्वात मोठ्ठ्या लोकशाहीत तब्बल ३०+- वर्षांनी स्पष्ट बहुमताने निवडुन येणार्या माणसाची तुलना जगजाहीर शांतंतेच्या कट्टर अनुयायाशी , समर्थकाशी होताना आपण पाहु शकत नाही ! त्या दिवशी त्या ग्रुपमधुन बाहेर पडलो !
मिपावरही हे समाजातल्या दुफळीचे प्रतिबिंब पडलेले स्पष्ट दिसत आहे पण त्याला नाईलाज आहे , काही मुद्द्यांवर तुम्हाला स्पष्ट स्टॅन्ड घ्यावा लागतो .
तुमचं लेबल कोणतं ?
भारत तेरे तुकडे होंगें इन्शाला इन्शाला म्हणणार्यांना विरोध करणार्यांचे कि समर्थन करणार्यांचे ?
२६११ हिंदुत्ववाद्यांचे करकरेंना मारणार्याचे कारस्थान होते असे मानणार कि तो पाकिस्तानचा कट होता असे मानणार ?
दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणार कि भगव्या दहशतवादाविरुध्द फेसबुकी चळवळ चालवणार ?
हिंदवी स्वराज्याचा छत्रपतींच्या पेशव्यांच्या सैन्याच्या पराभव (?) साजरा करणार कि शोक करणार ?
दुसर्यांच्या श्रध्दांना डिवचणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणार कि नसत्या उठाठेवी ! मंदिरातल्या मुर्तीवर शु केल्याची कबुली देणारा रादर गर्वाने सांगणारा माणुस मारला गेला तर आनंद मानणार की दुख?
महिषासुर बलिदान दिन साजरा करणार की दसरा ?
रोहिंग्यांना त्यांच्या समर्थकांना सहानुभुती दाखवणार की आझाद मैदानावर मार खल्लेल्या अन विनयभंग झालेल्या पोलिसांना ?
मराठी बोला चळवळ चालवणार कि शुध्द मराठी बोलल्यावर बामणी असा शिक्का मारणार ?
सैराटवरुन नागराज ला शिव्या घालणार कि कोल्हापुरातल्या ऑनरकिलिंग विषयी बोलणार ?
असो. कैक प्रश्ण आहेत कि ज्यावर आता तुम्हाला काहीतरी स्वतःचा स्टँड घेणे भाग आहे ! कारण तुम्ही स्टॅन्ड घेतला नाहीत म्हणुन इतरजण स्टँड घ्याय्चे थांबणार नाहीयेत , ते त्यांच्या बाजुने चेपत रहाणारच आहेत ! ह्याचे अतिषय उत्तम उदाहरण म्हणजे आस्तिकनास्तिकपाव वरील वादावादी !! कोणीही ह्यांव पुजा करा अन त्यांव व्रत उद्यापनं करा असले लेख पाडत नव्हते म्हणुन काही नास्तिक लोक शांत बसले नाहीत , २०१८ नेवाळे पुरस्कार विजेत्यांनी अक्षरशः काल्पनिक कैच्याकै कथा रचुन स्वतःचे मत दामटत ठेवले =))))
देशभरात हेच चालले आहे , २०१९ मध्ये जर मोदी परत जिंकले तर अजुन पुढील ५ वर्ष हेच चालु रहाणार आहे ह्याची शास्वती बाळगा , आणि महाराष्ट्रात फडणवीस जिंकले तर मग विचारुच नका , मुक मोर्चे , मुंबई बंद , स्वाभिमान यात्रा , सोवळे ओवळे वाद , शेतीमाल रस्त्यावर फेकुन देणे , !
फुल्ल इन्टरटेनमेन्ट आहे तेही करमणुक कर न भरता =))))
त्यातुन इकडे ट्रम्पतात्या जिकले तर मग विषयच संपला =)))) ऐश करा लेको !
-
तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||
13 May 2018 - 11:39 am | mayu4u
सहस्रशः सहमत!
13 May 2018 - 1:03 pm | गामा पैलवान
मार्कस,
मोडी आल्यावर लोकं पवित्रा घ्यायला लागलेत हे अगदी समर्पक निरीक्षण आहे. बौद्धिक ठेकेदारांची (पक्षी : डावे विचारवंत) नेमकी हीच अडचण आहे. जोवर लोकं ऑटोपायलट वर होती तोवर आपली प्रसारमाध्यमांतली वट वापरून अखिल भारताच्या नावाने स्वत:चंच मत खपवता येत होतं. पण मोदी आल्यापासनं लोकं आपापली मतं बिनधास्तपणे व्यक्त करायला शिकलेत. इथेच तर सगळी गोची आहे. देशद्रोही डाव्यांच्या तोंडाकडे बघंत त्यांच्या संमतीसाठी दबून राहायची गरज नाही.
आ.न.,
-गा.पै.
6 Jun 2018 - 10:02 am | नाखु
राज्यातील व देशातील सगळ्या समस्या गेल्या चार वर्षांत/वर्षांपासून आल्या आहेत असं मिपावरील मोजक्या सदस्यांची ठाम मत आहे,परीणामी प्रतिसादही दुराग्रही होतात,मूळ विषय अलगद बाजूला ठेवून जुनी धुणी नव्याने धुतली जातात
कुणालाही व कशालाही चांगलं म्हणण्याची सवय नाही आणि दुसर्या कुणी म्हटलं तर लगेचच शिक्का मारलाला सर्वात पुढे!!
भरपुर शिक्के बसूनही चांगुलपणावर विश्वास कायम असलेला किरकोळ सदस्य नाखु