दिनकर रायकर यांचा लेख,सत्यता पडताळणी

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in काथ्याकूट
18 Sep 2016 - 6:51 pm
गाभा: 

नमस्ते
नुकताच दिनकर रायकर यांचा लोकांमधील लेख वाचण्यात आला ,ह्यातील खालील माहिती वर जाणकारांनी कृपया अधिक माहिती द्यावी ,

http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=4219

1)

१९७७ साली लोकसभा निवडणुकीत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पानिपत झाले. त्यावेळी जनता पार्टीची विशाल विजय सभा शिवाजी पार्कवर झाली होती. त्या काळी सभेला माणसे भाड्याने आणावी लागायची नाहीत. उत्स्फूर्तपणे त्या सभेला आलेले लोक पायी परत जाताना त्यांच्यावर शिवसेना भवनातून दगड आणि सोडावॉटरच्या बाटल्यांचा पाऊस पडला. बिथरलेल्या लोकांनीही रस्त्यावरचे दगड शिवसेना भवनावर भिरकावले. ते दृश्य अनेकांच्या आजही स्मरणात आहे.

2)

कामगार नेते कृष्णा देसाईंच्या निर्घृण खुनानंतर शिवसेनेवर टीकेचे मोहोळ उठले. याच शिवसेनेचे वामनराव महाडिक विधिमंडळात दाखल होतील, याची व्यवस्था काँग्रेसमधून केली गेली. शिवसेनेचा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकरवी झालेला वापर उघड होता. परिणामी शिवसेनेला ‘वसंतसेना’ हे राजकीय संबोधनही चिकटले

3)

प्रतिक्रिया

एकुलता एक डॉन's picture

28 Sep 2016 - 8:29 pm | एकुलता एक डॉन

409 वाचने आणि प्रतिसाद एक पण नाही ?

कसं करायचं आता? गुंडाळायचा का धागा? करूयात काय विनंती उडवायची?

भक्त प्रल्हाद's picture

28 Sep 2016 - 8:47 pm | भक्त प्रल्हाद

काही वाचन्खुना

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/khabar-maharashtrachi...

“शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली आणि त्यापुढची दोन दशकं ठाकरे यांनी केवळ मुंबई आणि ठाणे याच परिसरातील महापालिकांच्या राजकारणावर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं होतं. कम्युनिस्ट आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या निर्घृण हत्येनंतर तापलेल्या वातावरणाचा फायदा उठवत, शिवसेनेनं आपला पहिला आमदार १९७० मधे विधानसभेत धाडला आणि पुढे अधूनमधून विधानसभाच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरुन बघितलं. १९६६ ते १९८५ या दोन दशकांत काँग्रेसशी साटंलोटं करुन शिवसेनेनं विधान परिषदेच्याही काही जागा हासील केल्या. या २० वर्षांच्या काळात शिवसेना एकीकडं डांगे – एस. एम. जोशी – अत्रे – जॉर्ज फर्नांडिस अशा नेत्यांना ‘लक्ष्य’ करीत होती आणि ते काँग्रेसच्या सोयीचं असंच राजकारण होतं… आज राज्यात काँग्रेसविरोधातील एक प्रमुख पक्ष म्हणून मान्यता मिळवणार्‍या या संघटनेनं पहिल्या दोन दशकांत सातत्यानं काँग्रेसलाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या बळ पुरवलं. शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या दहा वर्षांत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जारी केली, तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलन केलं आणि बड्या राजकीय नेत्यांबरोबरच लक्षावधी कार्यकर्त्यांनी कारावासही पत्करला. पण, शिवसेनेनं मात्र आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला होता! एवढंच नव्हे तर आणीबाणीनंतर जनता पक्षाचा प्रयोग फसला आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यावर १९८० मधे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर ठाकरे यांनी थेट काँग्रेस प्रचाराची पालखी खांद्यावर घेऊन विधान परिषदेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. यावर आताच्या तरुण शिवसैनिकांचा विश्वासही बसणं अवघड आहे…” (साभारः प्रकाश अकोलकर (‘महाराष्ट्राचे राजकारण : नवे संदर्भ’ या पुस्तकातून))

https://raajmat.wordpress.com/

भक्त प्रल्हाद's picture

28 Sep 2016 - 8:50 pm | भक्त प्रल्हाद

एक इथलाच लेख.

शिव सैनिकाचे मनोगत आहे इथे.

http://www.misalpav.com/node/8224

एकुलता एक डॉन's picture

28 Sep 2016 - 9:01 pm | एकुलता एक डॉन

पण दगड फेक खरंच झाली होती ?

एकुलता एक डॉन's picture

18 May 2021 - 6:27 pm | एकुलता एक डॉन

आता पण शिव सेना चोन्ग्रेस्स एकत्र

विजुभाऊ's picture

24 May 2021 - 10:27 pm | विजुभाऊ

शिवसेना उड्या मारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
दिशा सालीयान आणि सुशांत मर्डर केस मधे ज्या उड्या मारल्या.
कंगना राणावत च्या घराला अनधिकृत ठरवून पाडताना ,
सचिन वझे ला नोकरीत परत घेताना.
सरनोबतांची पाठराखण करताना
त्या अगोदर गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणूकी नंतर त्यांनी ज्या उड्या मारल्या
वर्षभरापूर्वी ज्यांच्या उद्गारांचे असभ्य भाषेत वाभाडे काढले होते त्या दादांना पावन ठरवताना , ज्यांना मैद्याचे पोते , बारामतीचा म्हमद्या अशा शेलक्या नावानी उल्लेखुन वाईट लबाड म्हंटले त्यांच्याच कृपेने स्वतःला पावन करुन घेताना.
त्या अगोदर पाच वर्षे फडणीसांच्या सोबत बसताना खिशात कधीच बाहेर काढण्यासाठी ठेवलेले राजिनामे बाळगत ज्या उड्या मारल्या.
त्या अगोदर मुंबई मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ज्या उड्या मारल्या
त्या अगोदर त्यांनी १९८२ च्या कामगार संपात ज्या उड्या मारल्या
त्या अगोदर आणिबाणीत ज्या प्रकारे लोटांगण घातले.
त्या अगोदर वसंतराव नाईकांच्या वेळेस
लोकांनी हे सर्व पाहिलेले आहे.
दुर्दैवाने लोकांनाच याचा विसर पडलेला आहे. हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.