ठाण्यातला पाचू : कै दत्ताजी साळवी उद्यान

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
13 Mar 2016 - 2:58 pm

आपल्या आजुबाजुच्या झाडांची ओळख करून देण्यासाठी मुंबईचा "Tree appreciation Walks, Mumbai हा एक ग्रुप प्रयत्न करत असतो त्यात सहभागी होऊन दोन महिन्यांपुर्वी राणीबाग/ जिजामाता उद्यान येथे गेलो होतो.आज ठाण्यातल्या "कै० दत्ताजी साळवी निसर्ग शिक्षण केंद्र" ( कोपरी पूल, सर्विस रोड,ठाणे पूर्व.) येथे सकाळी भेट दिली.
३०० पेक्षा जास्त फुलझाडे ,वनस्पती,फळझाडे प्रजाती आणून लावल्या आहेत.सध्या बाग फुलांनी डवरली आहे.

फोटो १
फोटो २
फोटो ३)केरसुणीचं झाड
फोटो ४
फोटो ५
फोटो ६
फोटो ७
फोटो ८
फोटो ९
फोटो १०
फोटो ११
फोटो १२
फोटो १३
फोटो १४
फोटो १५
फोटो १६
फोटो १७
फोटो १८

कॅम्रा कमी पडतो.ते सौंदर्य स्वत: जाऊन पाहा.
पाणवनस्पतींचे विशेष संकलन आहे.कमळ,वॅाटर लिली,केरसुणी,वॅाटर कॅबेज इत्यादी.
फळझाडे: गुलाबी केळी,मोठे अंजीर,चारपाच गरे असलेला फणस,रामफळ.सफरचंदाचेही झाड आहे.
सुगंधी :सुरंगी,चमेली,जाई,मदनबाण,चाफा,उंडी,रानजाई,हजारी मोगरा.
परदेशी : इतर ठिकाणी सहसा न दिसणाय्रा वनस्पती भरपुर आहेत.प्रत्येक फुलाचे वैशिष्ट्य आहे.

ठाण्यातल्या या पाचूचे अवश्य दर्शन घ्या.

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

13 Mar 2016 - 3:05 pm | मार्मिक गोडसे

नक्किच

प्रचेतस's picture

13 Mar 2016 - 7:40 pm | प्रचेतस

सुंदर छायाचित्रे.

सुधांशुनूलकर's picture

13 Mar 2016 - 8:01 pm | सुधांशुनूलकर

आम्ही उभयता कधीतरी नक्की जाऊच.

सर्वसाक्षी's picture

13 Mar 2016 - 8:03 pm | सर्वसाक्षी

एकदा जायलाच हवे

एस's picture

13 Mar 2016 - 9:54 pm | एस

+१

अभ्या..'s picture

13 Mar 2016 - 8:12 pm | अभ्या..

मस्तय केंद्र.
दत्ताजी साळवी म्हणजे सेनेचे का? बरय बाबा. ठाणे/मुंबईत तरी दिवंगत सेना नेत्याच्या नावाने काहीतरी आहे. ;)
लास्टचे फूल मला पाहिइहजे.

अजून फोटो टाकायचे होते ना! सुरेख चित्रे!

हा कार्यक्रम असा असतो- दोन तासांची वेळ असते.प्रथम सर्वांना त्यादिवशी कोणती झाडे दाखवणार याची यादी फेसबुक ग्रुपपेजवर चारपाच दिवस अगोदर येते.सकाळी तीच छापील यादी जमलेल्या सगळ्यांना देण्यात येते .सर्वच झाडे दाखवत बसल्यास वेळ पुरणारच नाही. जेव्हा माहिती सांगितली जाते तेव्हा फोटो काढता येतात परंतू या बागेत गर्दीने झाडे होती व वीसजण एकाचवेळी फोटो काढू शकत नव्हते.नंतर काढू असा विचार केला पण यादीतल्या व्यतिरिक्त अजून दहापंधरा पाहताना साडेदहा झाले.बाग बंद झाली. अजून पन्नास फोटो शक्य होते.तुम्ही कोणी जाल तेव्हा काढा.मोबाइलपेक्षा चांगले पाहायला मिळतील.

खटपट्या's picture

13 Mar 2016 - 11:30 pm | खटपट्या

जन्मापासून ठाणेकर असून हे ठीकाण माहीत नाही याची लाज वाटली.
माहीती करुन दील्याबद्द्ल खूप धन्यवाद...

बोका-ए-आझम's picture

14 Mar 2016 - 1:12 am | बोका-ए-आझम

नक्की जाणार!

नाखु's picture

14 Mar 2016 - 10:23 am | नाखु

कट्टा जमवून त्याचा खट्टा मिठ्ठा वृत्तांत टाकावा ही अपे़क्षा !!

प्रचि मस्त आहेत (आणि सगळी दिसली त्याचा वेगळाच आनंद आहे)

नीलमोहर's picture

14 Mar 2016 - 10:33 am | नीलमोहर

वेगळी फुले पहायला मिळाली, धन्यवाद.

शान्तिप्रिय's picture

14 Mar 2016 - 2:27 pm | शान्तिप्रिय

छान कंजुस मामा. सर्व फोटो आवडले.