काळा घोडा आर्ट फेस्टिवल - २०१६

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
15 Feb 2016 - 8:45 pm

काळा घोडा कला जत्रा २०१६
काला घोडा आर्ट फेस्टिवल

मुंबईतल्या म्युझिअमजवळ सुरू झालेली ही फेब्रुवारीच्या दुसय्रा आठवड्यात होणारी वार्षिक जत्रा फारच लोकप्रिय होत चाललेली आहे.टाइम्स ग्रुपने सुरू केल्यावर काही वर्षांपुर्वी सहभाग काढून घेतला.इथे कला सोडून इतर सर्व जत्रा असते अशी मध्यंतरी टीकाही झाली होती. आता एचटीमीडिआ -हिंदुस्तान टाइम्स ग्रुप चालू ठेवत आहे.प्रायोजकांनी खूप खर्च आणि पूर्ण सामर्थ्य लावले आहे हे लगेच लक्षात येते.खरं म्हणजे असा काही एखादा चेहरा मुंबईस मिळण्याची गरज आहे.राजस्थानातल्या चारपाच जत्रेंत परदेशी पर्यटक आवर्जून येताना पाहतो.इथे अजून ते येत नाहीत याचे कारण फेब्रुवारी महिना त्यांच्या डायरीत राजस्थान,गोवा,ओरिसा आणि मध्य प्रदेशसाठी लिहिलेला असतो.परंतु मुंबईकर मात्र या जत्रेला आता मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत.

याच वेळेस तरुणाईस भुलवणाय्रा व्हलेंनटाइन डे'चे आगमन असते.त्यासाठी लागणारी जागा म्हणून जत्रा हेच योग्य ठिकाण तसेच सुरक्षितही.निरनिराळे कला विक्रीचे स्टॅाल्स असतात.कला महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या कलाकृती आता विशेष गर्दी खेचतात कारण की नवीन चांगले सेल्फी- मोबाइल कॅम्रे. हौशी डिएसएलारकरांना तर त्यांच्या कॅम्य्रासाठी भरपूर खाद्य ( subjects)मिळते. शिवाय "परमिशनही" काढावी लागत नाही.मला माझ्या मोबाइलात पकडता आलेली क्षणचित्रे देत आहे.फोटो काढण्यासाठी झुंबड असल्याने कंपोझिशन वगैरे विसरून जायचे आणि फटाफट दोन चार बाजूने क्लिक करायचं.फोटो कसा आलाय हे बघायचंही नाही कारण मध्येच कोणीतरी फ्रेम बिघडवतं.उंचीचा इथे उपयोग होते.
१ ) मुंबईतला हा भाग ओळखला जातो bull,bear साठी.मात्र इथे सुरवातिलाच अडीच चालीचा पटावरचा घोडा.

२ ) हसय्रा चेहय्रांनाच मागणी आहे.

३ ) चा'वाल्यांचा लोगो

४ ) आज फक्त आराम करायचा.

५ ) नाचरे मोरा

६ ) dear's/deer's eyeview

७ ) मुंबईच्या पाट्या

८ ) चल्ला हवा येऊ द्या स्वच्छ

९ ) तिरछि काली नजरसे बचने के लिए -लिंबू मिरची.

१० ) प्रतिबिंब

११ ) मीटिंग ( meeting of divas)
हल्ली स्टार्सना diva म्हणतात इंग्रजी सिने मॅगझिनवाले.

१२ ) कोणाकडे वेळ आहे का दहा मिनिटं?
बस्तरच्या स्टॅालकडे कुणी फिरकेना.

१३ ) मला या घोड्यावर बसव.
(खरा काळा घोडा पुतळा राणीबागेत नेलाय.)

१४ ) पडली का थंडी मुंबईत?

१५ ) कलेचा हिशोब?

१६ ) छोट्यांसाठी मातीकाम

१७ ) चित्रं काढण्यासाठी बाळे तय्यार

१८ ) किती तो ट्राफिकचा धूर! कोणी मास्क देता का मास्क?( श्रेय नटसम्राट,कुसुमाग्रज)

फोटोंत जे चेहरे पाहतो ते जत्रेत अमुक एक व्यक्ती म्हणून नसतात.ते केवळ एक विक्रेता ,ग्राहक,आनंदयात्री,मनोरंजनासाठी जमलेले नागरिक असतात.एक फोटो मी काढू शकलो नाही -तो म्हणजे व्हलेंनटाइन दिवसानिमित्त बरीच प्रेमळ युगुलं म्युजिअम भागात फिरत होती त्यातील 'ति'च्या डोक्यावर होता छोट्या कागदी गुलाबांचा मुकुट आणि चेहय्रावरचा आनंद.त्यासाठी त्यांना फोटोसाठी विचारावे लागणार होते.हा न काढलेला फोटो कल्पनेनेच पाहा.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 Feb 2016 - 8:48 pm | प्रचेतस

मस्त.
छोटेखानी वृत्तांत आणि छायाचित्रे खूपच आवडली.

यशोधरा's picture

15 Feb 2016 - 8:52 pm | यशोधरा

मस्त वृत्तांत आणि प्रचि.

एक एकटा एकटाच's picture

15 Feb 2016 - 8:54 pm | एक एकटा एकटाच

मस्त आहेत फ़ोटो

ह्यावेळेस नाही जाता आलं
:-(

होबासराव's picture

15 Feb 2016 - 8:58 pm | होबासराव

इथेहि फक्त तेच फोटो दिसताहेत जे खफ वर दिसत होते..मिन्स
1,2,5,6,8, 13, 14, 18 हे फोटो दिसत नाहियेत. क्रोम सुध्द्दा ट्राय केल.

मुक्त विहारि's picture

15 Feb 2016 - 10:04 pm | मुक्त विहारि

मागच्या वेळी (बहूदा २-३ वर्षे झाली असावीत.) रामदास, भाते आणि सर्वसाक्षी ह्यांच्याबरोबर केलेला काळा घोडा फेस्टीवल कट्टा आठवला.

मुक्त विहारि's picture

15 Feb 2016 - 10:04 pm | मुक्त विहारि

मागच्या वेळी (बहूदा २-३ वर्षे झाली असावीत.) रामदास, भाते आणि सर्वसाक्षी ह्यांच्याबरोबर केलेला काळा घोडा फेस्टीवल कट्टा आठवला.

फोटो लोड होतील कधी ना कधी या आशेने धाग्यावर प्रतिक्रिया नोंदवून ठेवतोय. नंतर परत प्रतिसाद देईन.

अमोघ शिंगोर्णीकर's picture

15 Feb 2016 - 11:30 pm | अमोघ शिंगोर्णीकर

तिथेच लहान मुलांवर होणार्‍या अत्याचारावरसुद्ध्हा एक कलाक्रुती सादर करण्यात आलेली... एका बाजूने मुलगा आणि दुसर्‍या बाजूने मुलगी...
हे त्याचे फोटो..

आणि हे चहाचे कप... :)

श्रीरंग_जोशी's picture

16 Feb 2016 - 10:46 am | श्रीरंग_जोशी

या धाग्यावरील प्रतिसादांत हे फोटो म्हणजे मोदकावर ओतलेले तूप :-) .

तुमचा उपवृत्तांत वाचायला आवडेल.

भाते's picture

15 Feb 2016 - 11:52 pm | भाते

सचित्र वृत्तांत आवडला.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. २०१४ मध्ये रामदास काका, सर्वसाक्षी आणि श्री व सौ मुवि यांच्याबरोबर केलेला काळा घोडा आर्ट फेस्टिवल कट्टा आठवला. रामदास काकांबरोबर केलेले ते मुंबई दर्शन केवळ अप्रतिम. सर्वसाक्षी यांची फोटोग्राफी आणि रामदास काकांचा चालताबोलता शब्दकोश.

रेवती's picture

15 Feb 2016 - 11:59 pm | रेवती

चित्रे आवडली कंजूसकाका!
मोर आवडला. घड्याळांच्या ष्टॉलवरील दोन तीन घड्याळे तरी आवडली.

पॅशनच्या टाकीचा मोर आवडला. मस्तय एकदम. :)

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2016 - 1:05 am | स्वाती दिनेश

कालाघोडा फेस्टिवल फोटो व वृत्तांत आवडला,
स्वाती

बाबा योगिराज's picture

16 Feb 2016 - 1:23 am | बाबा योगिराज

चौथा फटू माझाच आहे कि काय.
;-)

नीलमोहर's picture

16 Feb 2016 - 10:33 am | नीलमोहर

फोटो आणी वृत्तांतासाठी अनेक धन्यवाद,
सगळ्या एकसे एक कलाकृती आहेत, अजुनही फोटो असतील तर अ‍ॅड करा प्लीज.

नाखु's picture

16 Feb 2016 - 11:26 am | नाखु

होय आणि कुणी मुंबईकर मिपाकर बरोबर* नव्हते काय ?

बरोबर* याचा अर्थ सोबत असा, "योग्य" असा नव्हे खुलासा संपला.

"धागा भरकटू नये म्हणून संवेदन्शील मनाची बोच म्हणतात ती हीच"

अभ्या .. लिखित स.गा. संपादीत मिपा मोती व मुक्ताफळे या आगामी ग्रंथातून साभार

श्रीरंग_जोशी's picture

16 Feb 2016 - 10:38 am | श्रीरंग_जोशी

कलात्मक अन कल्पक वाटताहेत सर्वच स्टॉल्स. फोटोतून दिसणारी तुमची कल्पकता आवडली :-) .

क्रेझी's picture

16 Feb 2016 - 11:45 am | क्रेझी

मी २०१० आणि २०११ ला ह्या फेस्टिवल ला गेले होते त्यामानाने ह्या वर्षी फारच निराशा झाली! कारण ह्या वेळेस
आर्टिफेक्ट्स फारच कमी दिसले आणि वेगवेगळ्या महागड्या 'एन.जी.ओ' चे स्टॉल्स जास्त दिसले!

विवेक ठाकूर's picture

16 Feb 2016 - 11:45 am | विवेक ठाकूर

आभार !
प्रतिसादातले अमोघचे फोटो उत्तम आहेत.

इतकी गर्दी होऊनही हिंदुस्थान टाइम्स प्रायोजक असल्याने इतर पेपरवाले या जत्रेविषयी एक बोटभरही बातमी छापत नाहीत.यावरून पत्रकारितेचा रंग कळतो.

पैसा's picture

16 Feb 2016 - 2:26 pm | पैसा

मस्त वृत्तांत आणि फोटो!

जत्रेतील होणार्‍या गर्दी मागच्या विविध कारणांचा घेतलेला मागोसा आवडला.

चौकटराजा's picture

17 Feb 2016 - 6:51 am | चौकटराजा

मी यंदा या उत्सवाला अपघातानेच हजर राहिलो. गर्दी कसली म्हणून आत गेलो . एक मस्त अनुभव होता. काही फोटो पाहून आपल्याबरोबर स्पा किन्वा एस असायला पाहिजे होते असे वाटले. माझ्या मोबाईलचा क्यामेरा अरेस्ट झाल्याने फोटो घेता आले नाहीत. तरूणाईचा उत्साह अमाप दिसला पण कलास्वाद वा अभ्यास या ऐवजी घोड्यासारखे उधळणेच जास्त दिसले.

मदनबाण's picture

17 Feb 2016 - 7:32 am | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

बय्राच जणांचा समज होतो की त्या ठिकाणी ठेवलेल्या कलाकृती एवढाच फेस्टिवल आहे.तिढल्या स्टॅाल्सवरच्या वस्तुंच्या किंमतीही जास्ती वाटत होत्या.परंतू आपल्याकडे असे स्टॅाल्स खाद्याजत्रा अथवा मेळावा असेल तर आयोजक आठ हजार रु भाडं घेतात.मुंबईत इतका पोलिस फौजफाटा ठेवून किती खर्च आला चसेल याची कल्पना करा.

फेब्रु ६ ते १४ , रोज सकाळी दहा ते रात्री सातपर्यंत दीड दीड तासांच्या कार्यशाळा, मान्यवरांची भाषणे आजुबाजूंच्या हॅाल,मैदानात होती याकडे बरेच दुर्लक्ष करतात.त्या कार्यक्रमाची भलीमोठी पुस्तिका आहे माझ्याकडे.

मोबाइलचे फोटो ही झलक आहे. हौशी आणि प्रगत चित्रकारांनी पुढच्या वर्षीतरी संधी सोडू नये.

बय्राच जणांचा समज होतो की त्या ठिकाणी ठेवलेल्या कलाकृती एवढाच फेस्टिवल आहे.तिढल्या स्टॅाल्सवरच्या वस्तुंच्या किंमतीही जास्ती वाटत होत्या.परंतू आपल्याकडे असे स्टॅाल्स खाद्याजत्रा अथवा मेळावा असेल तर आयोजक आठ हजार रु भाडं घेतात.मुंबईत इतका पोलिस फौजफाटा ठेवून किती खर्च आला चसेल याची कल्पना करा.

फेब्रु ६ ते १४ , रोज सकाळी दहा ते रात्री सातपर्यंत दीड दीड तासांच्या कार्यशाळा, मान्यवरांची भाषणे आजुबाजूंच्या हॅाल,मैदानात होती याकडे बरेच दुर्लक्ष करतात.त्या कार्यक्रमाची भलीमोठी पुस्तिका आहे माझ्याकडे.

मोबाइलचे फोटो ही झलक आहे. हौशी आणि प्रगत चित्रकारांनी पुढच्या वर्षीतरी संधी सोडू नये.