आकाशदर्शन - फोटोग्राफी

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
30 Jan 2016 - 10:38 am

आकाशदर्शनाची आवड निर्माण होऊन आमच्या घराजवळच असलेल्या खगोलमंडळाच्या शाखेत जाऊ लागलो.तिथे असलेल्या बय्राच पुस्तकांतून,नकाशांतून तसेच चर्चेतून माहिती मिळत गेली.आकाशदर्शनांच्या कार्यक्रमांनाही जाऊ लागलो.त्यांचे कार्यक्रम वांगणी येथे होतात.दुसय्रा काही संस्थांचीही माहिती मिळाली.चुनाभट्टी मु्ंबईची मराठी विज्ञान परिषद - यांचे कार्यक्रम मुरबाडजवळच्या हिंदू सेवासंघाच्या जागेत होतात. कल्याणच्या हेमंत मोनेच्या 'आकाशमित्र'चेही कार्यक्रम इथेच होतात.पुण्याच्या ज्योतिर्विद्या मंडळाचे कार्यक्रम ही जवळच्या मुळशी धरणाजवळ होतात.आणखी दोन मोठ्या सरकारी /यूनिवर्सिटी च्या संस्था म्हणजे पुणे विद्यापीठ आवारातील 'आयुका' आणि वरळी मुंबई येथील नेहरू सायन्स सेंटर.TIFR मधील काही निवृत्त कर्मचाय्रांनीही बोरिवली येथे एक संस्था काढली आहे.

माझ्याकडचा कॅम्रा फिल्मवाला असल्यामुळे आकाशाची फोटोग्राफी करता आली नाही.नंतर डिजिटल फोटोग्राफीसाठी चांगले कॅम्रे येऊ लागले आणि हे काम शक्य झाले.माझा एक भाचा निनाद यास फोटोग्राफीची आवड आहे त्याने काही फोटो काढले आहेत त्याच्याकडून खालील लेख लिहून घेतला.पुढेमागे त्यालाही मिपा आवडू लागेल व तो स्वत:च लेख लिहिल.तरुणवर्गाला सध्यातरी फेसबुकची आवड असलीतरी अशा संस्थळांचं महत्त्व पटलं की ते इथे नक्कीच येतील.त्याने दिलेला लेख आणि एक फोटो-

1) आकाशगंगा

अवकाश-फोटोग्राफी (Astro-Photography) :
अवकाश-फोटोग्राफी मध्ये आपली आकाशगंगा तिचे फोटो काढणे किंवा सूर्यमालेतील एखाद्या ग्रहाचे फोटो काढणे समाविष्ट केले आहे. खालील लेख हा आपल्या आकाशगंगेचा फोटो कसा काढावा हे स्पष्ट केले आहे.
Astro-Photography हा Photography मधील एक प्रकार आहे. सर्वसाधारणपणे अमावास्येच्या रात्री किवा दोन ते तीन दिवस आधी अथवा नंतर चा काळ अवकाश निरीक्षणासाठी अतिशय उपयुक्त असा काळ असतो कारण चंद्राच्या प्रकाशात आकाशातील तारे लपून जातात व त्यामुळे तारे, ग्रह याचं निरीक्षण कारण अशक्य होत. त्याचप्रमाणे हा काळ अवकाश-फोटोग्राफी साठीही उपयुक्त असतो कारण तारे, ग्रह स्पष्ट दिसू शकतात आणि त्यांचा फोटो ही उत्तम येतो.तसेच आकाश स्वच्छ असावे, ढग विरहित असावे.
चंद्र असलेल्या रात्री प्रमाणेच आपल्या शहरातील दिवे आणि प्रकाशामुळे देखील तारे,ग्रह स्पष्ट दिसत नाहीत त्यामुळे त्यांचा फोटोही चांगला येत नाही याचं कारण असं आहे की जेव्हा आपण ग्रह, तारे किंवा रात्रीच्या आकाशाचा फोटो काढतो तेव्हा कॅम्राचं shutter speed सेकंदांमध्ये ठेवावे लागते ज्यामुळे जास्त प्रकाश कॅमेरा खेचतो व फोटो फक्त प्रकाशानेच भरून जातो.
वरील दोन कारणांमुळे अवकाश संशोधन व अवकाश-फोटोग्राफी ही शहरापासून दूर जाऊन केली जाते जिथे शहरातील प्रकाश व दिवे फोटो वर परिणाम करणार नाहीत. शहरापासून दूर म्हणजे एखादं छोटं गाव, त्यालगतचं एखाद शेत किवा एखादी टेकडी अथवा एखादा गड अश्या काही प्रकाश विरहित जागा अतिशय उपयुक्त आहेत.
उपकरणे :
१. DSLR कॅमेरा
२. वाईड Angle लेन्स (10mm ते 20mm )/ वाईड Angle लेन्स नसल्यास DSLR कॅमेरा सोबत आलेली १८-55mm लेन्स हि चालेल पण फोकल लेन्थ 18mm ठेवावी
३. ट्रायपॉड
फोटो कसा घ्यावा किव्वा कॅमेरा settings :
हल्ली अनेक Mobile Apps उपलब्ध आहेत जी चंद्राची कला अथवा पूर्ण आकाशाबद्दल माहिती देऊ शकतात. App जसे कि Stellarium किंवा Google Sky सहज उपलब्ध होऊ शकते. Play Store वरून download करता येते. ही Apps iPhone साठी देखील उपलब्ध आहेत.
एखादा असा दिवस निवडा जो अमावास्ये च्या आस पास असेल. त्या दिवशी आपली आकाशगंगा व तिचा मध्य भाग आकाशात कधी दिसेल ही वेळ बघा व त्या नुसार वर सांगितल्या प्रमाणे प्रकाश नसेल अश्या ठिकाणी पोहोचा.
कॅमेरा settings :
कॅमेरा मोड Manual ठेवा, लेन्स वाईड Angle वर ठेवा. Aparture वाईड ठेवा उदा. एफ/१.२ किंवा एफ/१.८. कॅमेरा सोबत आलेल्या लेन्स चा जे वाईड Aparture असेल ते ठेवा. कॅमेरा चा shutter स्पीड हा २० सेकंद ते २५ सेकंद ठेवा. कॅमेरा चा ISO ३२०० किवा ६४०० ठेवा. ISO जास्त ठेवलात तर shutter स्पीड थोडा कमी करू शकता. कॅमेरा ट्रायपॉड वर फिक्स करा व कॅमेरा वर आकाशात जिथे आपल्या आकाश गंगेचा मध्य भाग दिसतोय त्यावर केंद्रित करा.
आता फोटो click करण्यासाठी तो ऑटो मोड वर ठेवा व त्यात वेळ ५-१० सेकंद्स ठेवा जेणे करून हातानी click करताना होणारे व्हायब्रेशन निघून जाईल. कॅमेरा स्वताहून फोटो काढेल.
जवळ जवळ २०-२५ सेकंदानी जेव्हा shutter बंद होईल तेव्हा आपल्या आकाशगंगेचा फोटो निघालेला असेल.
पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात February ते मे महिने हे या फोटोग्राफी साठी योग्य महिने आहेत.
मुंबई जवळ Ambey Valley रोड , लोणावळा किंवा आजूबाजूचे काही गड यावर जाऊनही फोटोग्राफी करता येईल.
कोणतेही प्रश्न असल्यास आपण मला ninadvsane@gmail.com वर email करू शकता.
2) अजून एक फोटो

***
विजय पुरोहित एक आकाशदर्शनावर लेख देणारच आहेत त्यात कसे ,काय कुठे पहायचे वगैरे माहिती येईलच.टेलिस्कोप आणि बाइनोक्युलर्जसाठी वेगळा देता येईल.या लेखामध्ये फक्त फोटोग्राफीबद्दल आपापले अनुभव लिहू शकता.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Jan 2016 - 10:49 am | प्रचेतस

सोप्या भाषेत अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी समजावून सांगणारा उत्कृष्ट लेख.

एस ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रति़क्षेत.

मयुरMK's picture

30 Jan 2016 - 10:58 am | मयुरMK

कॅमेरा कोणता आहे ?. बाकी फोटो छान आले आहे

विजय पुरोहित's picture

30 Jan 2016 - 11:07 am | विजय पुरोहित

मस्तच फोटो काढलेला आहे कंजूसकाका. निनादसाहेबांना विशेष थँक्स सांगा. अगदी प्रोफेशनल अ‍ॅस्ट्रॉफोटोग्राफी जमलेली आहे.

अर्रे! मस्त लेख! आता एकदा असे करुन पाहीन.

संदीप डांगे's picture

30 Jan 2016 - 11:46 am | संदीप डांगे

+१

टवाळ कार्टा's picture

30 Jan 2016 - 11:42 am | टवाळ कार्टा

वांगणीला आकाश दर्शनाला गेलेलो आहे...शाळेत असताना बरेच वेड होते...एकदा तरी तो आकाशगंगेचा पट्टा खुल्या आकाशात नुस्त्या डोळ्यांनी पहायची इच्छा आहे

चौकटराजा's picture

30 Jan 2016 - 7:35 pm | चौकटराजा

आपल्याला अगदी मनापासून आकाशदर्शन घ्यायचे असेल तर माउन्ट अबू जवळ गुरूशिखर नावाचे एक उंच ठिकाण आहे. तिथे एक दत्ताचे देऊळ ही आहे. मस्त फरसबन्द गच्ची आहे. इथे बाजूला एक ऑबझर्व्हेटरी पण आहे पण तिची इमारत फक्त दुरून पहाता येते. गुरूशिखर प्रदेश मिलेट्रीच्या ताब्यात आहे त्यामुळे तिथे रात्री राहू देतील की नाही याची शंका आहेच. पस्चिम भारतातील हे सर्वात उंच ठिकाण आहे. याचे विशेष असे की भवतालचे ३६० अंशातील पूर्ण क्षितिज आकाशात मिसलून गेलेले असते. अगदी पावसाळा सरून वातावरण लक्ख असेल तरच क्षितिज रेखा दिसण्याची शक्यता.

पद्मावति's picture

30 Jan 2016 - 2:20 pm | पद्मावति

फारच मस्तं.

इनू's picture

31 Jan 2016 - 12:19 am | इनू

टवाळ कार्टा जी,
अमावास्येच्या रात्री किंवा चंद्रप्रकाश कमी असताना आकाशात उत्तर-दक्षिण पसरलेला ता-यांचा एक पट्टा दिसेल. तो पट्टा म्हणजेच आपली लाडकी आकाशगंगा!