दिवाळी सुट्टी असून सुद्धा काम देतात च्यायला . लाज लज्जा शरम सगळं विकून आलेत हे लोक. कॉम्प ऑफ आणि एक्स्ट्रा पे ची लालूच दाखवून काम करवून घेतात . आणि आम्ही त्याला बळी पडलो . पण जाऊदे . संपलीच दिवाळी .
तर , मुद्दा असा कि लैच कटाळा येतोय . आणि कोकणात जाण्यास सोबती मिळत नाहीये . पण बेळगावातून बाहेर पडायचं आहे , आणि पुण्याशिवाय दुसरी जागा सुचत नाहीये . त्यामुळे , पुढल्या रविवारी(म्हणजे २२ नोवेंबर ला ) पुण्यात येणे होईल . होऊन जाऊद्या एक कट्टा . काय म्हणता ??
वेळ :- सकाळी ५ - ६ दरम्यान पोचेन . आणि रात्री ९.३० ला "ऐरावत" आहे बेळगाव साठी स्वारगेट होऊन , यामधल्या वेळात कधीही भेटण्याचे ठरवावे .
स्थळ :- नदीच्या अल्याड पल्याड कुठेही चालेल , जिथे कुठे बस / रिक्षा सहज पोचू शकेल अशी कोणतीही जागा .
कार्य :- भरमसाठ गप्पागोष्टी आणि नंतर जेवण (शाकाहार मांसाहार काहीही चालतो )
काही ठरत असेल तर कळवा लोक्स . .
टीप : नेहमीच्या प्रथेप्रमाणे पुण्यात होणाऱ्या कट्ट्या साठी कमीत कमीत ३ धागे काढावेत अशी सूचना होती . पण ती पाळली जाणार नाही .
मला कोणीच फारसं ओळखत नाही . पण सगळ्यांना भेटण्याची लैच इच्छा आहे मला . सो वेळ काढा च
प्रतिक्रिया
11 Nov 2015 - 8:24 pm | प्रचेतस
२२ तारखेला तसाही पुणे कट्टा होणार आहेच. टिळक स्मारकला ओरिगामी कलाप्रदर्शन आहे. मुंबईहून नूलकर काका येत आहेत. त्यामुळे पुणेकर मंडळी भेटतीलच.
11 Nov 2015 - 8:30 pm | अद्द्या
हे माहित नवतं मला .
ब्येष्ट
11 Nov 2015 - 8:35 pm | प्रचेतस
जाहिर धागा टाकणारच होतो तसा.
11 Nov 2015 - 8:40 pm | अद्द्या
टाका मग . .
किंवा यालाच एडीट करा . .
अपनेको बस टाइम बताव .
14 Nov 2015 - 1:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
कट्टा सुरू होण्याचे ठिकाण आणि वेळ ???
टिळक स्मारक उत्तम ठिकाण होईल असे वाटते.
14 Nov 2015 - 2:49 pm | टवाळ कार्टा
ते पुढल्या धाग्यात ठरेलच की :)
11 Nov 2015 - 10:16 pm | बॅटमॅन
नी बारपा, भेटि पक्का माडोणं!
11 Nov 2015 - 10:54 pm | अभ्या..
हा री आपी. बर्री अद्द्या.
11 Nov 2015 - 11:33 pm | अद्द्या
KSRTC ऐरावत इदे रो .
आर घंटे हेळी ४ घंटेगे मुटतान मगा
11 Nov 2015 - 11:49 pm | पीके
क्यट व्हडीतार..
11 Nov 2015 - 10:40 pm | परिकथेतील राजकुमार
नदीपलीकडे पुणे संपते.
धन्यवाद. ;)
11 Nov 2015 - 11:31 pm | अद्द्या
=]]
भेट तू ..
11 Nov 2015 - 11:35 pm | पीके
भेटू २२ ला...
11 Nov 2015 - 11:37 pm | पीके
कुंदाला सोबत आणने..
11 Nov 2015 - 11:43 pm | अद्द्या
कुंदाला ?
नको . .लग्न झालाय तीच आता . मारेल घो तिचा =]]
11 Nov 2015 - 11:52 pm | पीके
;)
...
11 Nov 2015 - 10:40 pm | पीके
हि कुठलि भषा?क
11 Nov 2015 - 10:42 pm | टवाळ कार्टा
मी येईन....मुंबैहून कोणी गाडीवाले जाणार अस्तील तर माझे पार्सल उचला मधे* :)
*आणि परत आणून पण पोचवा :D
11 Nov 2015 - 10:43 pm | पीके
हि कुठली भाषा? * असे वाचावे...
11 Nov 2015 - 10:48 pm | पीके
बरबेक अनूत्तेन.. यल्ली अदु हेळ्लबेकु.म
12 Nov 2015 - 3:59 am | कंजूस
बेळगावी कुंदा तेगदुकोन्डु.नान बर्तिनी बहुधा।
कानडी-मराठी अवलक्कि कट्टा?
12 Nov 2015 - 7:07 am | पीके
मी पन म्हनलो तर तीचा घोव मारिल म्हंतोय..
12 Nov 2015 - 6:33 pm | अद्द्या
नक्कीच :)
12 Nov 2015 - 9:03 am | मुक्त विहारि
आमच्या दत्तक मुलीच्या, (लिलीच्या), मित्र-मैत्रीणींचे स्नेह-संमेमी, डोंबोलीला, असल्याने, मी येवू शकत नाही.
नुलकर येत असल्याने, ओरिगामी कट्टा जोरदार होणार...
कट्ट्याचा वृत्तांत टाकालच आणि तो फोटोसहितच असेल ही खात्री आहे.
14 Nov 2015 - 11:04 am | अद्द्या
कोण आहे का रे
14 Nov 2015 - 11:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
दुसरा कधी येणार?
14 Nov 2015 - 12:33 pm | नाखु
पन्नास पर्यंत पोचला नाही आणि तुला दुस्रयाची काळजी !!!
अद्याने काहीतरी भव्य"दिव्य"केले तर आणि तरच तो तिसर्या धाग्यापर्यंत पोहोचेल.
बाराच्या गावात चौदावाला नाखु
14 Nov 2015 - 2:04 pm | अद्द्या
हे असं करतात इथले जुने लोक .
नाव लेखकांना एक धागा पण नीट पाडू देत नाहीत . .
आणि त्यातली सूचना न वाचताच "दुसऱ्याची" मागणी करतात
14 Nov 2015 - 2:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
किमान दोन तरी नकोत का?
14 Nov 2015 - 2:55 pm | अद्द्या
एकात संपवून टाकू कि
मी दिव्य व्यक्ती थोडीच आहे =]]
14 Nov 2015 - 12:41 pm | यशोधरा
सुट्टी असल्यास जरूर येणार.
14 Nov 2015 - 4:15 pm | अद्द्या
ए वर्क फ्रॉम होम असतं तसं वर्क फ्रॉम कट्टा करता येतं का बघा
14 Nov 2015 - 9:19 pm | पियुशा
कट्ट्याला शुभेच्छा
15 Nov 2015 - 1:53 am | श्रीरंग_जोशी
कट्ट्याला शुभेच्छा!!
सचित्र तपशीलवार वृत्तांत येऊद्या.
15 Nov 2015 - 12:28 pm | त्रिवेणी
कत्त्याला सुभेच्छया
15 Nov 2015 - 1:57 pm | नूतन सावंत
कट्ट्याला शुभेच्छा!
सचित्र वृत्तांत वाचायला आवडेल.
18 Nov 2015 - 12:08 am | सूड
तिकडे पण ब्याट्या नि तू कन्नड मध्ये सुरु होणार असलात तर अजिबात येणार नाही.
18 Nov 2015 - 12:24 am | टवाळ कार्टा
तिसरा धागा कधी येणार?
18 Nov 2015 - 6:58 am | निनाद मुक्काम प...
ह्या धाग्याचे औचित्य साधून
पुढ्ल्या महिन्यात आमची भारतवारी नक्की झाली आहे. ह्यावेळी खास पुण्यात येउन मिपाकर दोस्त मंडळींच्या सोबत कट्टा करायला बेत आहे. तारीख लवकरच कळवेल, तारखांचे दोन पर्याय तरी नक्की सुचवेल ,आम्ही त्यावेळी रिकामटेकडे असणार असल्याने पुणेकरांच्या सोयीनुसार स्थान व वेळ नक्की करू.भारतात आलो कि जन्म गावी डोंबिवली मध्ये येणे मस्ट तेव्हा एक कट्टा तेथे तर तिसरा कट्टा ठाणे किंवा मुंबई कुठेही मिपाकरांच्या सोयीनुसार करूया.
आपण कुठेही येउन काहीही खायला पायाला तयार असतो.
खाणे पिणे जगणे हा आमच्या व्यवसायाचा भाग म्हटले तर जीवनशैलीचा भाग आहे.
आगामी पुणे कट्यासाठी आगामी शुभेच्छा
18 Nov 2015 - 8:43 am | नाखु
लेका हा धागा पन्नास प्रतिसादी करता येईना आणि कसला कट्टा करतो,चिमण बघ किमान ५० च्या खाली एकही धागा टाकत नाही. मला शिक्रेट नाही तुला सांगीतले तर बघ जरा.
बाकी कट्ट्याला शुभेच्छा !!!!!
18 Nov 2015 - 12:51 pm | अद्द्या
मला पण नाय सांगितलं . आता भेटला कि विचारून बघतो
18 Nov 2015 - 8:58 am | शित्रेउमेश
हा कट्टा मिस नाही करणार भौ.....