
शब्दाने वाढला शब्द
कडाक्याचे भांडण झाले
मी सुन्न आणि स्तब्ध
अन, ती निघून गेली
न मागे वळून पाहणे
न माघारी ते फिरणे
वादातून तुटला धागा
आता उरले ते झुरणे
मी आशा का ठेवावी?
की जीवनी असेच व्हावे
साथ ही सुखाची
नेहमी मनाजोगे घडावे
ती निघून गेली आता
तिच्या एकल्या मार्गाने
कोमेजून गेली स्वप्ने
मी व्याकुळ इथे विरहाने
भेटेल कुणी कधी तिला
तो मार्ग चालता चालता
दाटूनी कंठ माझा आला
मज काही न ये बोलता
आता माझ्याही नशिबी
हे थांबणे निश्चित आहे
या स्तब्ध आयुष्याचा
मी सहप्रवासी आहे.
==============
संकटग्रस्त..
(चित्र जालावरुन साभार)
प्रतिक्रिया
3 Jan 2015 - 10:36 pm | सतिश गावडे
प्रेरणा १ आणि प्रेरणा २
3 Jan 2015 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रेरणा राहिल्या...>>> +++१११ हेच सुचवायचं! :)
3 Jan 2015 - 10:46 pm | एस
वि आणि सु-
डंबनग्रस्त वाचक!
3 Jan 2015 - 10:50 pm | प्रचेतस
अर्थपूर्ण.
3 Jan 2015 - 11:42 pm | खटपट्या
खूप छान !!
सहज संप्रदाय वाढतोय !!
4 Jan 2015 - 12:06 am | मित्रहो
भारी आवडल.
जबरी.
4 Jan 2015 - 12:43 am | टवाळ कार्टा
ह.भ.प.आमिर खान महाराजांच्या सल्ल्याचे (तोच "बस, ट्रेन और लडकी..." वाला) पालन लवकरच चालू करा ;)
4 Jan 2015 - 6:44 pm | यशोधरा
भारी.
5 Jan 2015 - 9:12 am | नाखु
जरा भीत्-भीतच उघडला कारण (धूम्-१,धूम्-२,धूम-३ हा चढत्या भाजणीने भिकार@@ होता). *DASH* *WALL*
पण सुखद झुळुक यावी तशी कवीता अलगद समोर आली याला विडंबन म्हणण्यापेक्षा "सु"डंबन जास्त समर्पक वाटते.
मूळ अवांतर : कवीता झक्का$$$$$$$$$$स आहे.
5 Jan 2015 - 9:13 am | प्रचेतस
परत वाचलं. परत आवडलं.
5 Jan 2015 - 10:21 am | अजया
आवडलंच.
5 Jan 2015 - 2:33 pm | सूड
पण जमलंय.
5 Jan 2015 - 2:34 pm | बॅटमॅन
क्या बात!
5 Jan 2015 - 2:40 pm | मदनबाण
वाह्ह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || अच्युतम केशवं ||
5 Jan 2015 - 3:37 pm | प्यारे१
स्वतंत्र कविता आहे ही. आणि छान आहे.
6 Jan 2015 - 4:06 pm | सौंदाळा
+१
सुंदर आहे कविता
5 Jan 2015 - 5:04 pm | पैसा
स्वतंत्रपणे छान कविता.
5 Jan 2015 - 5:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
दोन दोन कंसमामांच्या विळख्यातून काढून तुमच्या कवितेला मुक्त करा. ती स्वयंभू म्हणूनही एक मस्त कविता आहे !!
6 Jan 2015 - 8:35 am | नाखु
कंस हटलेच पाहीजेत या मागणीला जोरदार पाठींबा.
5 Jan 2015 - 6:11 pm | mbhosle
छान कविता आहे.
6 Jan 2015 - 4:23 pm | विजुभाऊ
जिंदगी प्यार मे तेरी रफ्तार बढ क्यूं जाती है
मै ही शायद रुक गया था. .... प्यार के खोते ही ... तुम्ही भी खो दिया......