मराठा आरक्षण दोन्ही बाजू

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
19 Nov 2014 - 10:20 pm

मराठा आरक्षण या विषयावर पुन्हा चर्चा सुरु झालेली आहे. याचे कारण न्यायालयाचा आलेला निकाल.
या विषयावर टिव्हीवर सर्व बाजू मांडणारी चर्चा झाली. कुठलेही मत बनवण्यापूर्वी ही चर्चा जरूर पहा.

यात तज्ञांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे

राज्यकर्त्या जमातीलाच बॅकवर्ड ठरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. संविधानाला धरून नाही - संघराज रुपवते

मराठा समाजामधल्या अनेक थोर, अगदी राज्यकर्त्या लोकांवरही अन्याय झाला, त्यांना शूद्र ठरवून त्रास देण्यात आला - श्रीमंत कोकाटे

राणे समिती अभ्यासपूर्ण नव्हती, अहवाल अभ्यासपूर्ण नव्हता - दिवाकर रावते

जाता जाता
इतका संवेदनशील विषय सूत्रसंचालकाने अत्यंत संयमितपणे हाताळला आहे, त्याहीबद्दल दाद दिली पाहीजे.

https://www.youtube.com/watch?v=ZFeVoX1t_mc

समाजविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Nov 2014 - 10:31 am | पैसा

या विषयावर तुमचं काय मत जोगसाहेब? मला तरी शिक्षणक्षेत्रातले आरक्षण हे जातीवर आधारित न ठेवता आर्थिक निकषावर असावे असे वाटते. त्यातही गरीब मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकारने करावा. मुळात आधी प्रत्येक मूल शाळेत येऊन निदान १२ वी पर्यंत शिकेल ही सरकारची जबाबदारी असली पाहिजे.

काळा पहाड's picture

20 Nov 2014 - 12:24 pm | काळा पहाड

आर्थिक निकषावर आरक्षण हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. एखाद्या श्रीमंताच्या मुलाला फक्त त्याचा बाप श्रीमंत आहे म्हणून प्रवेश नाकारायचा? तसेच एखाद्या गरीब मुलाचा बाप कदाचित त्याच्या मट्ठ पणामुळे किंवा आळशीपणा मुळे पण गरीब असेल म्हणून त्याच्या मुलाला राखीव जागा ठेवायच्या.

जातीनिहाय आरक्षणाचे समर्थक असं बोलणारच.

काळा पहाड's picture

20 Nov 2014 - 3:59 pm | काळा पहाड

मी जातीनिहाय आरक्षणाचा पण विरोधच करतो. त्याचा मलाही तोटा झालेला आहे. पण एका आरक्षणाचा विरोध म्हणून दुसरं आरक्षण ठेवावं या मताचा मी नाही.

मुळात आरक्षण हा तात्पुरता प्रकार असावा अन निकष शक्य तितका व्यापक असावा इतकाच त्यामागचा विचार. असो.

एखाद्या श्रीमंताच्या मुलाला फक्त त्याचा बाप श्रीमंत आहे म्हणून प्रवेश नाकारायचा? तसेच एखाद्या गरीब मुलाचा बाप कदाचित त्याच्या मट्ठ पणामुळे किंवा आळशीपणा मुळे पण गरीब असेल म्हणून त्याच्या मुलाला राखीव जागा ठेवायच्या.
यात केवळ पैशाच्या अभावी शिक्षणात येतात म्हणून त्या मुलाना थोडा अ‍ॅडव्हान्टेज देण्याचा विचार आहे. श्रीमंत असणारी मुले हुशार असू शकत नाहीत का? त्या शिवाय सर्वच जागा राखीव असाव्यात असे कुठे म्हंटलय?
एखाद्या गरीब मुलाचा बाप हा का गरीब राहीला हा प्रश्न येतोच कुठे. तो आपल्या मुलाला शैक्षणीक सुविधा देऊ शकत नाही इतकेच त्याचे कर्तृत्व. कदाचित बापाला परीस्थितीमुळे योग्य शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्याला चांगला रोजगार मिळाला नाही. परीणामी तो गरीब राहीला हीच व्हिश्यस सायकल पुढे चालू राहून त्या परीस्थितीची मुलाला झळ बसू नये. योग्य बुद्धीमत्ता असेल त्याला चाम्गले शिक्षण मिळावे व चाकोरी तुटावी म्हणूण हा विचार आहे.

काळा पहाड's picture

20 Nov 2014 - 11:55 pm | काळा पहाड

यात केवळ पैशाच्या अभावी शिक्षणात येतात म्हणून त्या मुलाना थोडा अ‍ॅडव्हान्टेज देण्याचा विचार आहे.

अ‍ॅडव्हान्टेज असं दिलं जात नाही. अ‍ॅड्व्हान्टेज शिक्षणाच्या फी मध्ये सवलत, फी माफी, ज्यादा शिकवणी, गरीब मुलांच्यावर जास्त लक्ष अशा पद्धतीनं दिलं तर ते उपयोगीही असेल आणि अन्यायही करणारं नसेल.

कदाचित बापाला परीस्थितीमुळे योग्य शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्याला चांगला रोजगार मिळाला नाही.

हा साम्यवादी विचारसरणी सारखा प्रकार वाटतो. एखादा बाप गरीब असेल तर त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मोफत द्यावं. पण हुशार श्रीमंत मुलाची नोकरी काढून त्याला द्यावी हा कुठला न्याय? मुद्दा आर्थिक आरक्षणा बद्दल आहे. माझा मुद्दा हा आहे की असं आरक्षण न्यायसंगत नाहीच.

केवळ एव्हढेच कारण नाही. बर्‍याच वेळेस गरीब मुलांकडे बौद्धिक पात्रता असूनही केवळ परिस्थिती नाही म्हणून ती इतर मुलांसारका झोकून देऊन अभ्यास करू शकत नाहीत. (पार्ट टाईम जॉब वगैरे.) त्या मुळे ती मुले स्पर्धात्मक गुण मिळवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी ती अट थोडी शिथेल असणे आवश्यकच आहे.

काळा पहाड's picture

20 Nov 2014 - 11:58 pm | काळा पहाड

हे न्यायसंगत नाही. आर्थिक दृश्ट्या श्रीमंत असणं हा गुन्हा ठरतो या मुळं.

माझ्यामते त्या न्यायापेक्षा निकोप स्पर्धा महत्वाची आहे. दर्जेदार साधनांच्या सहाय्याने मिळवलेले गुण सामान्यतम साधनांच्या सहाय्याने मिळवलेल्या गुणांशी स्पर्शा करू शकत नाहीत, म्हणून त्यांची स्पर्धा आपापसातच व्हावी अशी भूमिका आहे.

सुहास पाटील's picture

21 Nov 2014 - 5:46 pm | सुहास पाटील

मी आरक्षणाच्या विरोधात आहे. पण कोणीही कितीही बोंबाबोंब केली तरी ह्ये राजकारणी ( कोणीही असो भाजप , कॉंग्रेस , शिवसेना , समाजवादी , मायावती, जयललिता , राष्ट्रवादी ) हे आरक्षण सात जन्मात बंद होऊ देणार नाहीत. काहीही होऊ शकत नाही

आशु जोग's picture

20 Nov 2014 - 11:28 am | आशु जोग

मीही मोठ्या उत्सुकतेने हा एपिसोड पाहीला. सर्वजण अत्यंत जाणकार होते. मुद्देसूद होते. अशी चर्चा फारशी पहायला मिळत नाही.

क्लिंटन's picture

20 Nov 2014 - 3:10 pm | क्लिंटन

श्रीमंत कोकाटे या गृहस्थाचे 'विचार' एक बाजू म्हणूनही द्यायच्या लायकीचे वाटले हे बघून मिपाच्या भाषेत डोळे पाणावले.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Nov 2014 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ त्ये व्हय? आओ त्ये कोकाटल्या मुळे च श्रीमंत झालय! एव्हढीच लायकी त्याची.

विटेकर's picture

20 Nov 2014 - 3:34 pm | विटेकर

आरक्षणाचा कटोरा ....
भारतातून हद्दपार होईल तो सुदीन होय ! कुणाच्यातरी ( अगदी सरकारच्या तरी ) मेहेरबानीने जगायचे ही कसली जिंदगी ?
कसोटी ( पक्षी प्रवेशासाठी लागणारी अर्हता) सैल करून जर निवड झाली तर त्याला रडीचा डाव म्हणतात.
मात्र जे लोक अर्थिक अथवा सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांच्यासाठी फुकट आणि विशेष तयारी करुन घेणारी केन्द्रे असायला हवीत. ज्या जाती संघटनेला असे वाटते त्यांनी आपल्या ज्ञाती बांधवासाठी असे विशेस। वर्ग सुरु करावेत पण निवड - कसोटी सैल करण्याचे खेळ करु नयेत.
जे असे मागास आहेत त्यांनी आपण मागास असल्याने आप्ल्याला अधिक तयारी करायला हवी , मगच आपली निवड होऊ शकेल हे लक्षात घेऊन तसे कष्ट करायची तयारी ठेवावी. मूळात काहीही न करता केवळ मी एखाद्या जातीत जन्माला आलो , कर्तृत्व काहीही नाही किन्वा माझा बाप गरीब आहे ( यात ही त्याचे काहीच कर्तृत्व नाही ) त्याचा मला आपोआप फायदा मिळावा अशी अपेक्षा करणे हा अत्यन्त कोडगेपणा आहे.
"सबसिडी" आणि "आरक्षण" हे आधुनिक भारताचे हे अनुक्रमे "क्यान्सर" आणि "एडस" आहेत .

आरक्षण आलं त्याची कारणं, ती परिस्थिती वेगळी होती. आता काळ कुठच्याकुठे गेला आहे. जातीनिहाय आरक्षण हा आजच्या काळात अवैध विचार आहे. त्यापेक्षा आर्थिक निकष लावा; अर्थात त्याचीही सखोल पडताळणी करूनच. भारतात त्यातही झोल होण्याची पूर्ण खात्री आहे.

आणि आम्हाला आरक्षण आहे यात श्रेष्ठता पाळणा-यांनी हा एकदा प्रामाणिक विचार करावा, की असं म्हणून आपण स्वतःचं बौद्धिक अपंगत्वच मान्य करत आहोत. त्याउलट आरक्षण नाकारून नव्या उंची गाठाव्यात. आणि यात वाद नाही की प्रत्येक व्यक्तीत ती पात्रता आहे. ती जोखायची जिद्द मात्र कमी पडते आहे. आणि याला खतपाणी देतंय ते आरक्षण.

राजकारणी आरक्षणं काढतच रहाणार. अमका समाज, तमका समाज. मग प्रत्येकाला 'हा..... आपल्याला आरक्षण' असं फसवं समाधान देऊन मतं मिळवायचा प्रकार चालूच रहाणार. जोपर्यंत समाज हे नाकारत नाही तोपर्यंत. पण दुर्दैव हे आहे की कुबड्या घेऊन चालण्यातच आम्हाला धन्यता वाटते.

असो !

विजुभाऊ's picture

20 Nov 2014 - 5:39 pm | विजुभाऊ

मराठा समाजाला जातीनिहाय आरक्षण मिळावे हा विचार ठाम चुकीचा आहे.
मराठा समाज या ना त्या प्रकारे राजाश्रय राखून आहे. सर्व सोयी उपलब्ध असूनही हा समाज जर स्वतःला मागास समजत असेल तर ते दुर्दैव. स्वतःच्या शैक्षणीक सम्स्था / ब्यांका /पतसंस्था / शासन / शेती असूनही जर या समाजाला स्वतःचा विकास केला नाही असे म्हणायचे असेल तर ते अप्पलपोटेपणाचेच ठरेल.
एक समाज म्हणून पाहिले तर यातले किती लोक स्वतः समाजातील बायकाना /मुलीना पुढे येवू देतात?
मुली शिकलेल्या असल्या तरी त्याना स्वैपाकघराबाहेर पडू देत नाहीत.

आशु जोग's picture

20 Nov 2014 - 8:38 pm | आशु जोग

मला एक शंका आहे

मराठा आरक्षणासाठी लढणार्‍या अनेकांचा आर्थिक आरक्षणाला विरोध आहे. तर मग अजित पवार, पद्मसिंह पाटील यांच्या नातवंडांनाही आरक्षण मिळणार का...

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2014 - 8:56 pm | टवाळ कार्टा

तर मग....मिळाल्याच पाहिजेत

आशु जोग's picture

21 Nov 2014 - 2:47 pm | आशु जोग

आपण हा व्हिडीयो पाहीलात का

हस्तर's picture

6 May 2021 - 11:59 am | हस्तर

मराठा आरक्षण उडाले
mpsc भरती रखडणार
नवीन भरती नसल्याने सरकारनी यंत्रणाना ताण

हस्तर's picture

6 May 2021 - 10:52 pm | हस्तर

वामन देशमुख's picture

7 May 2021 - 12:11 pm | वामन देशमुख

कोणत्याही क्षेत्रात काही निवडक गटाला इतरांच्या तुलनेत कमी पातळीचे पात्रता निकष उपलब्ध करून देणारे कसल्याही प्रकारचे आरक्षण देणे हे धोरण हे समाजविघातक, स्पर्धामारक आणि अर्थव्यवस्थेस अनिष्टकारक असे असते.

जे विद्यार्थी आर्थिक, सामाजिक किंवा इतर कोणत्याही कारणाने स्पर्धेत कमी पडू शकतात त्यांना अधिक शिकवणी, शुल्कात सवलत, इतर आर्थिक मदत इ. योग्य त्या मार्गांनी समान पात्रता निकषांपर्यंत पोहोचण्यात मदत करणे हे धोरण योग्य ठरू शकते.

अर्थात, भारतात हे होणे शक्य दिसत नाही.

भारतात आरक्षणाची परंपरा फारच जुनी आहे व तेंव्हाही सार्वमत आरक्षणाच्या बाजुने न्हवतेच, फक्त आता कोण मानव जन्म घेइल, क्रांती करेल व आरक्षणमुक्त भारत सत्यात उतरवेल याचीच उत्सुकता आहे...

पण ही क्रांती होण्यासाठी

  1. पहिली अट म्हणजे आरक्षणधारी लोकं मुठभर उरले पाहिजेत
  2. पण त्यांचे आरक्षण ९०%+ असले पाहिजे.

तरच जनमत क्रांतीच्या बाजुने झुकु शकते. त्यामुळे काय घडेल हे येणारा काळच जाणे

आरक्षन हे हजारो वर्षा पासुन चालू आहेच.. राज्य कोणी करायचे ह्याचे आरक्षन होतेच , पुरोहित कोणी करायचे ह्याचे पन आरक्षन आहे.. जनावर कोणी सोलायची हे पन आरक्षित होते.. पन हे सगळे बंद पडले म्हणून हा विरोध ....