एखादा चांगला वेब होस्टींग सर्व्हिस प्रोव्हाइडर

मनिष's picture
मनिष in काथ्याकूट
6 Aug 2008 - 4:53 pm
गाभा: 

एखादा चांगला वेब होस्टींग सर्व्हिस प्रोव्हाइडर (? ? सेवादाता) सुचवाल का? नेट-४-डोमेन ची सेवा फार खराब झाली आहे आणि जागा कमी आणि दर जास्त. कोणी दुसरा एखादा सुचवेल का? माझी (कमीत-कमी) गरज व बजेट साधारण असे आहे -

(१) ५०० एम. बी. वेब-स्पेस
(२) १० मेल आय डी - पॉप/आय-मॅप/एस.एम.टी.पी. सह
(३) निदान ३ सब-डोमेन
(४) लिनक्स सर्व्हर आणि पर्ल्/पी.एच.पी.
(५) डाटाबेस असल्यास उत्तम.
(६) सगळ्यात मह्त्वाचे - चांगली सेवा/सपोर्ट आणि अखंडीत सेवा.

बजेट - ३०००/वर्ष

प्रतिक्रिया

II राजे II's picture

6 Aug 2008 - 4:57 pm | II राजे II (not verified)

१. http://www.hostmonster.com/
२.http://www.drupalvaluehosting.com/members/order.php

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

नीलकांत's picture

6 Aug 2008 - 5:15 pm | नीलकांत

मी होस्टमॉन्सटर सुचविल किंवा ब्ल्युहोस्ट , दोघेही एकाच कंपनीचे आहे. सॉलीड ओव्हरसेलींग करतात मात्र तुझ्या गरजा पाहल्यास अतिशय उत्तम. म्हणजे तुला हवे त्यापेक्षा जास्त देताहेत. होस्टमॉन्स्टरला जात असशील तर डिस्काऊन्ट कुपन सुध्दा शोधता येईल.
www.hostmonstor.com
www.bluehost.com
www.midphase.com

येथे अनलिमीटेड डोमेन नेम ठेवतायेतात. म्हणजेच एका अकाउन्टला दहा सुध्दा साईट्स चालवता येतील.
सबडोमेन हवे तेवढे :)

--**सगळ्यात मह्त्वाचे - चांगली सेवा/सपोर्ट आणि अखंडीत सेवा.
साधारणत: तुझ्या गरजा बघता यातही काही अडचण येऊ नये. मात्र एक लक्षात ठेव की हे लोक ओव्हरसेलींग करत असल्यामुळे सिपीयु वापर मर्यादा खूप कसोशीने पाळतात. ताबडतोब साईट स्सपेन्डेडचा संदेश येतो. :(

तुझ्या गरजेत (५) डाटाबेस असल्यास उत्तम
चे ऑप्शन असल्यामुळे तुला ह्या सर्व बाबींची काळजी करण्याची गरज नाही.

अधीक काही शंका असल्यास विचार.

एक सुचवतो.

तुझ्या गरजा कमी आहेत त्यामुळे या बजेटमधे भारतीय सेवा दात्यांच्या सेवा तुला घेता येतील. त्या एवढ्या ओव्हरसेल करत नाहीत मात्र सपोर्ट चांगला असतो. फोन करून सरळ बोलता येते.

संदर्भासाठी...
www.webhostingtalk.com

( टीप : वरील कुठलेही संकेतस्थळ माझे नाही किंवा कुठल्याच संकेतस्थळासाठी मी काम करीत नाही. माझा अनुभव व नेटवर अवांतर वाचनातून माझी मते येथे देत आहे.)

नीलकांत

आशु जोग's picture

22 Sep 2020 - 11:25 pm | आशु जोग

छान

मनिष's picture

6 Aug 2008 - 5:33 pm | मनिष

मोठे सेवा-दाते मलाही माहित आहे, अगदी त्यांच्या बेंचमार्क्ससकट -- पण माझ्या गरजांच्या मानाने, त्यांचे दर फार जास्त आहेत. मी आता वर्षाला २०-२५ हजार नाही खर्च करणार ह्यासाठी.

माझा net4domains चा अनुभव गेले ७-८ वर्ष फार चांगला होता, पण आता बघतो तर त्यांनी खुपच दरवाढवले आहेत (अशा गोष्टींमधे दर खर तर कमी होतात) शिवाय सपोर्ट फक्त नवीन खरेदीच्या वेळेस मिळतो...पॅकेज बदलल्यामुळे माझे २ मेल आय. डी.. डिलीट केले. :(

MX records, sub-domain ह्या गोष्टी समजतच नाही त्यांना बर्‍याच वेळा. इतर भारतीय सेवा दाते माहित आहेत का? तसे net4domains सगळ्यात विश्वसनीय आहे, पण आता वैतागलो आहे त्यांना!

II राजे II's picture

6 Aug 2008 - 5:52 pm | II राजे II (not verified)

net4domains सगळ्यात विश्वसनीय आहे, पण आता वैतागलो आहे त्यांना!

सगळ्यात फालतू !

:)

GoDaddy.com हा ट्राय करा.
www.3ix.in हा जरा नवीन आहे पण सुविधा कमी रेट मध्ये आहेत !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

आशु जोग's picture

5 Sep 2018 - 12:03 am | आशु जोग

लोकसत्ता पेपर net4domains वर असतो

अमिगो's picture

6 Aug 2008 - 6:44 pm | अमिगो

1and1.com, ते क्लेम करतात की ते नंबर १ वेब होस्टींग सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत.

नीलकांत's picture

6 Aug 2008 - 6:50 pm | नीलकांत

ते क्लेम करतात की ते नंबर १ वेब होस्टींग सर्व्हिस प्रोव्हाइडर आहेत.

असा दावा न करणारा सेवा दाता पाहण्यात आहे का? ;)

नीलकांत

अवलिया's picture

6 Aug 2008 - 7:03 pm | अवलिया

indialinks.com ला एकदा बघा
मला बरे वाटले सपोर्ट पण चांगला आहे

नाना

इनोबा म्हणे's picture

7 Aug 2008 - 1:04 am | इनोबा म्हणे

गो हिंदी डॉट कॉमला भेट देऊन पहा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

नर्मदेतला गोटा's picture

28 May 2021 - 4:51 pm | नर्मदेतला गोटा

२००८ चा हा धागा आहे
सध्या काय स्थिती आहे या सर्विस प्रोवायडर लोकांची

net4india बंद झाले हे माहीत आहे
पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलेले आहे

नर्मदेतला गोटा's picture

13 Mar 2024 - 7:50 pm | नर्मदेतला गोटा

एनी अपडेट्स