Worth a Hundred words

एस's picture
एस in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:36 am

g

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

21 Oct 2014 - 5:33 pm | तुषार काळभोर

पण केस का बुवा विस्कटलेत?
आणि डोक्यात हळद पडलीये/टाकलीये का?

एस's picture

22 Oct 2014 - 11:14 am | एस

माध्यम - जलरंग (वॉटरकलर ऑन पेपर).

सूचकता आणि तरलता हे या माध्यमाचे वैशिष्ट्य. शीर्षकातही तेच सुचवले आहे, वर्थ थाउजंड वर्ड्स असे न म्हणता. पहा, काही तरी अपूर्ण आहे, काही तरी उकललेले नाहीये अजूनही. जमतंय काय? :-)

बादवे, दिवाळी अंकासाठी घाईघाईनेच काढलंय, काय इतके काही खासबिस नाही जमलेले! :-P

स्पंदना's picture

27 Oct 2014 - 6:05 am | स्पंदना

हे खास नाही जमलेलं? ऑ?

सस्नेह's picture

21 Oct 2014 - 10:46 pm | सस्नेह

डोळ्यातले भाव गहिरे उमटलेत

एस's picture

22 Oct 2014 - 11:15 am | एस

चित्र आहे. पेंटिंग.

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Oct 2014 - 11:56 pm | माम्लेदारचा पन्खा

शब्द थिटे पडतायत....

विस्कटलेले केस म्हणजे भोवतालची स्त्रियांबद्द्लची अस्थिर आणि भयावह परिस्थिती पण..." मी हे बदलू शकेन" ही चमक दिसतेय तिच्या डोळ्यात !

पैसा's picture

22 Oct 2014 - 1:52 pm | पैसा

चित्र आवडलंच एकदम, लहान मुलगी आहे. निरागस, पण हसतही नाहीये. रागाने काहीतरी बोलणार आहे, जरा थांबलीय असं वाटलं. डोळे जरा खोल गेलेले, वेण्या २/३ दिवसांपूर्वी घातल्यात. काही तरी बोलायचं आहे हे नक्की!

चौकटराजा's picture

22 Oct 2014 - 6:33 pm | चौकटराजा

दुरूस्तीची काहीही संधी नसलेले जलरंग हे माध्यम आहे. सबब बर्‍याच वेळी ते पोट्रेट साठी वापरले जात नाही. ते केले या बद्द्ल कौतुक ! चेहर्‍या वरील प्रकाशाच्या दिशेत काही तरी गडबड वाटतेय.उदा. चेहर्‍याच्या खाली मानेवर डाव्या बाजूस सावली आली आहे मग डावा खांदा उजेडात कसा राहील ? तसे डाव्या गालावरही शेड येणार ! मानेखाली जर सावली येत असेल तर डोळ्याच्या खोबणीवरही बर्यापैकी सावली येईल.

एस's picture

22 Oct 2014 - 11:47 pm | एस

प्रकाश दोन तर्‍हेचा आहे. एक म्हणजे बॅकलाइट आणि दुसरा अ‍ॅम्बियंट लाइट. बॅकलाइटमुळे खांदे मागून उजळलेत. तर गाल किंवा चेहर्‍यावर तितका कॉन्ट्रास्ट नाही. मानेखालची सावली जरा जास्त गडद झालीये हे मान्य. बर्‍याच गोष्टी तितक्या चांगल्या उतरल्या नाहीत ब्रशमधून. केसांचा भुरेपणा दाखवण्यासाठी त्यात पिवळ्या-यलो ऑकर वगैरे रंगांचा वापर केला आहे. काळा व पांढरा रंग जलरंगात वापरला जात नाही. पांढरा रंग हा कागदाचा शुभ्रपणा वापरून दाखवला जातो, तर काळ्या रंगासाठी वेगवेगळ्या गडद रंगछटा एकत्र करून गडदपणा आणला जातो. ही तत्त्वे पाळण्याचा प्रयत्न केला आहे. कागद शासकीय पेपरमिलमधील असल्याने त्याची क्वालिटी दिव्य होती. पण त्यावरच काम भागवावे लागले...! :-) गोड मानून घ्यावे!

प्रभाकर पेठकर's picture

27 Oct 2014 - 1:46 am | प्रभाकर पेठकर

सुंदर जलचित्र. आवडलं.

सानिकास्वप्निल's picture

27 Oct 2014 - 1:38 pm | सानिकास्वप्निल

सुरेख आहे जलचित्र.
डोळ्यातले भाव खूप काही सांगून जात आहेत....

मीता's picture

27 Oct 2014 - 2:13 pm | मीता

सुंदर उतरलय..

विनोद१८'s picture

27 Oct 2014 - 3:46 pm | विनोद१८

सध्या मध्यपूर्वेतील चालु असलेल्या अराजकात सर्वस्व गमाविलेली, विस्थापित झालेल्या मुलीपुढे अस्तित्चाचा प्रश्ण निर्माण झालेला दिसतोय. आता करायचे काय, जायचे कुठे, पुढे काय ??? असे अनंत प्रश्ण तिच्या डोळ्यात दिसतायत.

बबन ताम्बे's picture

31 Oct 2014 - 5:58 pm | बबन ताम्बे

खुपच सुंदर. चेह-यावरील भाव केवळ अप्रतिम.

आतिवास's picture

31 Oct 2014 - 7:32 pm | आतिवास

मला फक्त 'जी' हे रोमन अक्षर दिसतंय.
कुणी मदत करेल का चित्र पाहायला?

दुसर्‍या एखाद्या ब्राऊजरमध्ये ओपन करून पहा. बादवे आतिवासताई, हे चित्र तुम्ही तर पाहिलेच पाहिजे. नसेल दिसत तर पत्ता व्यनि करा, चित्र फ्रेम करून पाठवून देतो.

आतिवास's picture

3 Nov 2014 - 2:19 pm | आतिवास

आज दिसलं.
आवडलं.
सध्या देशाबाहेर आहे - पण फ्रेम मिळणार असेल तर पत्ता नक्की पाठवेन.
(अवांतरः आन्जीचं चित्र काढण्यासाठी कुणाला विनंती करायची, हा प्रश्न मिटला!)

सुरेख उतरलयं कागदावर.

प्रचेतस's picture

3 Nov 2014 - 6:10 pm | प्रचेतस

अतिशय बोलकं.

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2014 - 11:15 pm | श्रीरंग_जोशी

खूपच सुंदर. मनापासून आवडलं.

जुइ's picture

4 Nov 2014 - 4:05 am | जुइ

खुप छान काढले आहे!

hitesh's picture

5 Nov 2014 - 11:57 am | hitesh

अराकता फिराजकता काही नाही.

आताच झोपेतुन उठुन बसली आहे.

विशाखा पाटील's picture

9 Nov 2014 - 2:59 pm | विशाखा पाटील

आवडलं! थोडी पुढे झुकलेली मान...आणि डोळ्यातले भाव...खूप सुंदर...

प्यारे१'s picture

18 Nov 2014 - 4:39 pm | प्यारे१

चित्र आवडलंय.