आत्ताच मिळालेल्या बातमी नुसार
ठिकाण : सी.के.पी. हॉल, ठाणे
वेळ : सगळ्यांच्या विचारांती नक्की करू या.
कशासाठी : सीकेपी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी
तारीख : १६ फेब्रुवारी.
मला १५ पण चालेल.तसेही १५ ता. मी ठाण्यातच आहे.पण दर कट्टा शनिवारीच कशाला? असा योग्य आक्षेप कुणी घेवू नये म्हणून.
बाकी...
दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे ते गुरुवारी आणि मासे खावेत ते रविवारी सकाळीच असे माझे मत आहे
प्रतिक्रिया
9 Feb 2014 - 8:51 pm | भाते
आत्ताच मिळालेल्या बातमी नुसार>>>> बातमी कोणाकडुन मिळाली? सोर्स काय आहे?
ठिकाण : सी.के.पी. हॉल, ठाणे
तारीख : १६ फेब्रुवारी.
वार : जर, २०१४ असेल तर, रविवार.
मला १५ पण चालेल.>>>> म्हणजे १५ किंवा/आणि १६.
१५ आणि १६ ला सी.के.पी. हॉल, ठाणे येथे काही खादाडी समारंभ (फुड फेस्टिवल) आहे का? (हा माझा प्रश्न)
मासे खावेत ते रविवारी सकाळीच>>>>> म्हणजे अचानक कट्टा आणि तोही रविवारी सकाळी???
सर्वात महत्वाचे ---- कट्टा (धाग्याकर्त्याकडुन) प्रायोजित आहे का?
मुक्त विहारि, संपादक मंडळ, मिपाकर,
सगळ्यांनी कृपया हलकेच घ्या हो.
संपादक मंडळ,
अनावश्यक मजकुर/संपुर्ण प्रतिसाद अवश्य वगळावा/ऊडवावा ही नम्र विनंती.
9 Feb 2014 - 9:07 pm | मुक्त विहारि
हो..
हा फूड फेस्टिवल आहे.
आणि प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.
सध्या आमचा खिसा थोडा हलका झाला आहे.
17 Feb 2014 - 5:36 pm | चौकटराजा
मुवि ना "कट्टा रत्न" हा पुरस्कार दिला तर .......? तर कोंण कोण राग येऊन मायबोलीत ( महायुती ? ) त जातील ?
9 Feb 2014 - 9:30 pm | किसन शिंदे
.
9 Feb 2014 - 9:42 pm | बॅटमॅन
नकळत कट्टे ठरले
मुविकाका फॉर्मात आले
मी किती कट्ट्यांना मुकतोय
हे माझ्याच कसे लक्षात नाही आले?
पुणेकरांना मुंबैत येणे, कधीतरीच जमत आहे
मुंबैत कमी श्रमात जमते, हीच खरी गंमत आहे
कट्ट्याचा पूर्वार्ध वाटेल, थोडंसंच जमलम
उत्तरार्धात कळेल, रंग मस्त भरलम
यदाकदाचित माझ्या कट्ट्याला तू म्हणशील ई ई ई...
तरी मी कट्टा करून तुला असा हसेनः "ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!"
9 Feb 2014 - 9:54 pm | मुक्त विहारि
पण.....
तुम्हाला तुमच्या गोथॅम शहरातून बाहेर यायला वेळ मिळेल तर ना?
हे, असे कट्टे करता यावेत म्हणून तर आम्ही आमचे सगळे पाश सोडून दिले आणि ते बायकोच्या स्वाधीन केले.ती बसली आहे आमच्या अर्थाला सांभाळत आणि आम्ही जगण्यातला खर्याखूर्या अर्थाचा उपभोग घ्यायला मोकळे झालो.
(आणि तसेही, आजकाल आमच्या कडे एक हक्काचा मिपाकर आहे म्हटले.)
ह.घ्या.
आणि माझ्या धाग्यावर धांगडधिंगा करायला तुम्हाला पुर्ण मोकळीक आहे.....हेवेसांनल....
(बॅटमॅन फॅन) मुवि
9 Feb 2014 - 10:00 pm | बॅटमॅन
धन्यवाद मुविकाका.
(मुविफॅन) बॅटमॅन.
9 Feb 2014 - 10:15 pm | सुहास..
तु भेट रे एकदा बॅट्या !! *)
9 Feb 2014 - 10:59 pm | बॅटमॅन
अवश्य भेटू, हाकानाका.
10 Feb 2014 - 11:22 am | पिवळा डांबिस
या बॅट्याला लेकाला एकदा भेटायचंच आहे...
हा नवा असला तरी आपल्या ग्रूपमध्ये फिट्ट बसेल असं वाटतंय...
कुठे असतोस रे तू बॅटमॅना?
:)
10 Feb 2014 - 11:28 am | बॅटमॅन
येस्सार!!! पिडांकाकांनाही भेटायची इच्छा आहेच!
खरे तर गॉथममध्ये पण सध्या 'जिथे काय उणे'.
10 Feb 2014 - 11:32 am | पिवळा डांबिस
ओके! तिथे येण्याआधी संपर्क करीन. बहुदा या वर्षातच!!!
इन्शाला, सब ठीक हो जायेगा!!!
:)
10 Feb 2014 - 11:46 am | बॅटमॅन
जबरी!! इन्शागणपती भेटूच!!!
9 Feb 2014 - 11:01 pm | प्रचेतस
ही ही ही.
प्रेरणेचा उल्लेख कर की रं बॅट्या =))
9 Feb 2014 - 11:06 pm | बॅटमॅन
मूळ प्रेरणा का लपविता ;) =))
9 Feb 2014 - 11:10 pm | प्रचेतस
=))
9 Feb 2014 - 9:57 pm | भाते
धन्यवाद पद्मश्री चित्रे.
मी हा धागा आणि तुमचा हा प्रतिसाद न वाचताच इथे प्रतिसाद दिला.
9 Feb 2014 - 10:42 pm | मुक्त विहारि
येताय का?
चला मस्त बियर पिवू, मासे खावु आणि येवू परत लोकलने.
आणि फोटो काढून आपल्या इतर वेळेअभावी, न येवू शकणार्या मिपाकरांना आपल्या आनंदात सहभागी करू.
10 Feb 2014 - 8:53 am | निरंजन
सी.के.पी. हॉल ऍव्हेलेबल आहे का ? अचानक मिळणार नाही.
10 Feb 2014 - 9:11 am | सुनील
अहो, CKP हॉलमध्ये फूड फेस्टिवल ठरलेलाच आहे. त्याला फक्त कट्टा म्हणून हजेरी लावायची, असे सुचवताहेत ते.
10 Feb 2014 - 10:32 am | मुक्त विहारि
तसेही मी आणि अजून एक मिपाकर जाणार आहोतच आणि साग्रसंगीत व्रुत्तांत पण लिहीणार आहोतच.
पण
बर्याच मिपाकरांची तक्रार असते, की आधी का नाही सांगीतले? आम्ही पण आलो असतो.
शिवाय ठाणे आणि त्यातून सीकेपी हॉल हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, बहाणे करायला चान्स मिळतो.
तो मिळू नये आणि चार नाखट मंडळी मिळून धमाल करता यावी म्हणून ठरवले.
10 Feb 2014 - 12:46 pm | निरंजन
केव्हा जायच व कुठे भेटायच ठरवा. मी ठाण्यातच राहतो. या निमित्तानी फ़ुड फ़ेस्टिवलला भेट द्यायला आवडेल.
10 Feb 2014 - 12:46 pm | निरंजन
केव्हा जायच व कुठे भेटायच ठरवा. मी ठाण्यातच राहतो. या निमित्तानी फ़ुड फ़ेस्टिवलला भेट द्यायला आवडेल.
10 Feb 2014 - 12:46 pm | निरंजन
केव्हा जायच व कुठे भेटायच ठरवा. मी ठाण्यातच राहतो. या निमित्तानी फ़ुड फ़ेस्टिवलला भेट द्यायला आवडेल.
10 Feb 2014 - 1:52 pm | निरंजन
मिपाला माझी ही पोस्ट इतकी का आवडली ३ वेळा रिपीट केली आहे.
10 Feb 2014 - 2:37 pm | मुक्त विहारि
जमल्यास मला व्य.नि. करा
17 Feb 2014 - 5:42 pm | चौकटराजा
बर्याच मिपाकरांची तक्रार असते, की आधी का नाही सांगीतले? आम्ही पण आलो असतो.
हे वाक्य फार चतुराईने पूर्वीच कोणीतरी इथे टंकलेय . चोप्य पस्ते करायला सोपं आहे.
10 Feb 2014 - 8:59 am | चित्रगुप्त
अहो, एकादा कट्टा दिल्लीत पण होऊन जाउद्या. जागा वगैरे आम्ही सुचवू शकतो.
10 Feb 2014 - 10:24 am | मुक्त विहारि
जरुर....
तशी पण एकदा तरी दिल्ली बघायचीच आहे.
तेंव्हा त्याच वेळी दिल्ली कट्टा पण करू या...
11 Feb 2014 - 5:26 am | चित्रगुप्त
सध्या अजून दोन महिने दिल्लीचा मौसम छान असेल. जरूर यावे.
10 Feb 2014 - 9:19 am | आतिवास
मुविंनी 'कट्टेकरी' असं नाव धारण करावं अशी नम्र विनंती, तेही शोभून दिसेल ;-)
(मुवि: गंमतीने म्हणते आहे, गैरसमज नसावा हीदेखील विनंती)
10 Feb 2014 - 9:47 am | अत्रुप्त आत्मा
पण..पण.. मुक्तविहारी याचाच एक अर्थ कट्टेकरी असाच होत नै का? ;)
10 Feb 2014 - 10:28 am | मुक्त विहारि
मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
बादवे,
घारापुरी कट्ट्याला भेटूच....
10 Feb 2014 - 10:26 am | मुक्त विहारि
बिंधास्त मस्करी करा.
आमचा धागा आणि मिपाकरांचा धांगडधिंगा.
10 Feb 2014 - 11:28 am | पिवळा डांबिस
ठाण्यात सीकेपी हॉलमध्ये भेटा....
खुशाल सीकेपी पाककृती खा...
अगदी सोड्याची खिचडी आणि वालाचं बिरडं खा!!!!
(मनातल्या मनातः पोटात दुखणार बघा तुमच्या!!!)
:)
10 Feb 2014 - 11:57 am | सूड
अचानक करायच्या कट्ट्याचा धागा काढणे हा विरोधाभास नव्हे काय? त्यापेक्षा पुणेकर बरे!! एका फोनवर हजर होतात.
स्वगतः काडी टाकली...आता पळा.. *JOKINGLY*
10 Feb 2014 - 12:27 pm | मुक्त विहारि
हा ठरलेला कट्टा न्हवता.
जसे..
मार्च मधला घारापुरी कट्टा
एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात होणारा ओरीगामी कट्टा
जून-जुलै मधली पावसाळी सफर
वगैरे वगैरे....
हा बातमी समजल्यावर आणि डोक्यात किडा वळवळल्यावर ठरलेला कट्टा आहे.
10 Feb 2014 - 12:38 pm | चिप्लुन्कर
सी के पी हॉल म्हणजे महागिरी मधला ना , चालेल कि मग मला तर मस्तच . एकदम हाकेच्या अंतरावर आहे माझ्या घरापासून .
10 Feb 2014 - 12:42 pm | पिवळा डांबिस
ही २०१४ मध्ये कुठे आहे ते कळवा...
अर्थात आम्ही आता वयोमानाप्रमाणे फक्त भुईकोट किल्ले किंवा सिंधुदुर्ग करतो....
तीन-चार मैलाचा चढ वगैरे ऐकुनच आम्हाला हार्ट-अॅटॅक येतो....
:)
10 Feb 2014 - 1:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे
MuVi, don't you have some other commitments on fifteenth ??
10 Feb 2014 - 1:42 pm | मुक्त विहारि
काही मित्रांबरोबर गप्पा टप्पा करून मग
परत
मिपा करां कडे हजर....
हाकानाका
10 Feb 2014 - 11:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे
Arranging Mipa katta on 15th is realy not good idea, if you ask me.
13 Feb 2014 - 10:30 am | भाते
आजच्या मटामध्ये हि बातमी आली आहे.
13 Feb 2014 - 10:45 am | मुक्त विहारि
मी आताच तिथल्या एका व्यक्तीशी बोललो.
रविवारी सकाळी १० वाजल्या पासून ते रात्री ९/१० वाजेपर्यंत ही खाद्य जत्रा आहे.
आपण रविवारी सकाळी ११ वाजता सीकेपी हॉलला भेटलो तर?
आधी स्टॉल वगैरे फिरू आणि मग दु.१२ पासून हादडायला सुरुवात करू.....
भरलेले पापलेट, सोड्याची खिचडी, कोलंबी भात, मटण वडे, खिम्याचे पॅटीस, कानोले, वालाचे बिरडे, जवळ्याची भजी हे आरोग्यवर्धक पदार्थ खायला आमची कधीच ना नसते.
13 Feb 2014 - 3:08 pm | शिद
ओ मुविशेठ... कशाला ह्या पदार्थांची नावे घेत आहेत? हे सगळे पदार्थ म्हणजे आमचा जिव की प्राण... बादलीभर लाळ जमा झाली तोंडात.
13 Feb 2014 - 3:40 pm | भाते
तुम्हाला जळवण्यासाठी वर दिलेल्या दुव्यातले सगळे पदार्थ मुविंनी मुद्दामुन चोप्यपस्ते केले.
तेव्हा शक्य असल्यास वेळ काढुन कट्टयाला या असे अप्रत्यक्ष सुचवले त्यांनी सगळ्यांना.
लक्षात ठेवा, आता कट्टा झाल्यावर आणखी जळवण्यासाठी वृत्तांतामध्ये त्यांचे फोटो टाकुन पुन्हा एकदा जळवतील ते.
13 Feb 2014 - 3:44 pm | शिद
वाट पाहतोय... :)
13 Feb 2014 - 3:54 pm | सूड
माझ्यासाठी त्या निनाव चा फोटो काढून कुणीतरी डकवा.
13 Feb 2014 - 8:22 pm | मुक्त विहारि
आयला,
परवाच तर म्हणालात सगळ्या कट्ट्यांना येणार.तरी पण काळा घोडा महोत्सवाला आला नाहीत.
(एकदा गेलात की पुढच्या वर्षापासून दररोज जाल.आम्ही लग्नाळलेले असून पण देवाच्या करणीने दिपून गेलो.बरोबर बायको असल्याने,आमची गत धोंडो भिकाजी जोश्या सारखी झाली.)
आणि आता खाद्य जत्रेला पण नाही.
असो.
निनावाचा फोटो नक्की काढतो.
15 Feb 2014 - 11:25 am | चिप्लुन्कर
सी के पी ला रविवारी १० ते १० अशी वेळ आहे , त्यामुळे दुपारी १. ३० किंवा २ हि वेळ खादाडी ला उत्तम असेल .
15 Feb 2014 - 11:56 am | मुक्त विहारि
आणि पहिल्या पंगतीत जेवायला जास्त मज्जा येते.
गर्दी नसल्याने होणारे फायदे.
१. पदार्थ निवडीला वेळ मिळतो.
२. आरामात बसून खाता येते.
३. पदार्थात नंतर येवू शकणारे घटक जास्त येत नाहीत.
तस्मात,
११ वाजता भेटू आणि १२ ते १२:३० ला खायला सुरुवात करू,
मी ११ ते ११:१५ पर्यंत तिथे पोहोचत आहे.
काला घोडा महोत्सवाला पण आम्ही लवकर गेल्यामुळे, हाच फायदा झाला.
17 Feb 2014 - 10:16 am | सुनील
कट्ट्याचा शेवट कसा झाला?