मागच्याच दिवाळीच्या सुमारास आपला मंगळ कट्टा (http://www.misalpav.com/node/25976) छान पार पडला.तिकडून परत येतांना मला पण काही कॉकटेल्स सुचली.(मंगळाचा गूण...दुसरे काय?)सुदैवाने परतीच्या प्रवासात मी आणि सोत्री एकत्रच बसलो होतो.मला सुचलेले कॉ़कटेल मी सोत्रींना सांगीतले.त्यांनी पण ही संकल्पना उचलून धरली.
ऑक्टोबर हीट चालू झाली.आणि मला काही तरी थंड पेय प्यावे असे वाटायला लागले.आणि अशा कडाक्यात आंबा नसेल तर काय अर्थ तरी आहे का?
असो. नमनाला थेंबभर तेल खूप झाले.
आता जिन्नस....
१. आपल्याला जितकी पचते तितकी व्होडका.
२. माझाचा मेंगो ज्युस
३. मेंगो आइस्क्रीम
४. भरपूर बर्फ
५. मिरपुड् + दालचिनी पुड् + सुंठ पूड (थोडी मिरमिरीत चव असेल तर आणि तरच ह्या कॉकटेलला रंग जमतो.)
६. सर्वात महत्वाचा जिन्नस म्हणजे माहौल....
छान रविवार असावा.बाहेर कडक उन असावे.उत्तम मासे, खास आपल्यासाठी म्हणून कोळीणीने मुद्दाम बाजूला काढलेले असावेत.(आमची कोळीण म्हातारी असल्याने,बायकोला नको त्या शंका येत नाहीत.)आदल्याच दिवशी उत्तम नाटक पाहिल्याने घरची ग्रुहिणी ठाक-ठीक असावी.पापलेट आणि कोलंबी स्वच्छ करून त्यांना बायकोच्या स्वाधीन करावे.घरची सगळी मंडळी खूष आहेत,ह्याची खातरजमा करून आपण आता क्रुतीच्या मागे लागावे.
तसा मी स्टीलच्या ग्लासातूनच मदिरास्वाद घेतो.(कारण लिहायला परत एखादा लेख टाकायला लागेल.)पण ह्यावेळी मला काचेच्या ग्लासातून मदिरास्वाद घेता आले.तर मंडळी,आता ह्या ग्लासात भरपुर बर्फ आणि पहिल्या वेळी जितकी घेता तितकी व्होडका टाका.हे करण्यापुर्वी बायकोने तेल तापायला ठेवून, कोलंबीला पीठात बुडवलय का? ह्याची खात्री करून घ्या.
त्या रसायनाला थोडी चव आणण्यासाठी त्यात मँगो ज्युस टाका.तेल तापत आलेले आहे आणि बायकोने आता पापलेट्ला रवा लावायला घेतला आहे की नाही, हे पण हळूच बघून या.(कारण दुसरा ग्लास पापलेट बरोबर आहे.)
आता त्या रसायनाला थोडे ढवळून घ्या आणि थोडे मँगो आइस्क्रीम टाकून परत एकदा ढव़ळून घ्या.थोडे आइस्क्रीम टॉप अप करून मग त्यावर आपली मिरपूड्+दालचिनीपुड्+सुंठ पुड भ्रुरभरून टाका.तो पर्यंत स्वैपाक घरातून कोलंबी भज्जीचा खंग्री वास आला असेलच.
बायकोने केलेली कोलंबी भज्जी आणि हे कॉकटेल ह्याचा आस्वाद घेता घेता साउंड ऑफ म्युसिकची व्ही.सी.डी. शोधून ठेवा.
दुसर्या ग्लासला तळलेले पापलेट आणि सुंदर सिनेमा आणि बायको ह्यांच्या बरोबर रविवार साजरा करा.
डिस्क्लेमर : दारु पिणे प्रक्रुतीला हानीकारक आहे. हे कॉकटेल सोत्री गुरुजींना अर्पण.तळलेल्या कोलंबीचे आणि पापलेटचे फोटो मुद्दामच टाकलेले नाहीत."साउंड ऑफ म्युसिक" हा बघण्याचा विषय आहे.लेखनाचा नाही.मी जगातील सगळ्यात "ढ" फोटोग्राफर असल्याने, जे काही फोटोसारखे दिसत आहे, त्याला फोटो म्हणा.माझ्या लेखातील शुद्धलेखन,व्याकरण ह्यांच्या कडे जास्त लक्ष न देण्याची वाचकांना सवय झाली असेलच.झाली नसेल तर सवय लावून घ्या,ही विनंती.
प्रतिक्रिया
4 Feb 2014 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
झकास ! आमचे एक खूप जुने गुरुजी म्हणत असत तसे: "प्रयोग करून पहाण्याजोगा आहे :) "
4 Feb 2014 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रयोग केल्यावर कॉकटेलचे बारसे केले जाईल !
4 Feb 2014 - 1:00 pm | आचारी
मसाला-ए-आम
4 Feb 2014 - 1:01 pm | प्यारे१
तुमचा धागा हीट्ट कसा करावा माणसानं?
लेखापेक्षा मोठा डिस्क्लेमर टाकताय?
दिलपे नै लेने का चिच्चा? आप भी नये हय क्या? ;)
4 Feb 2014 - 1:10 pm | सर्वसाक्षी
हे नाव कसे वाटते?
4 Feb 2014 - 1:25 pm | सौंदाळा
छान
नावः आम्रदिरा
4 Feb 2014 - 1:28 pm | गवि
Mangifera piper
खुलासा :
मॅंजिफेरा इंडिका = आंबा.
पायपर निग्रम (नायग्रम)=मिरी
4 Feb 2014 - 11:12 pm | पिवळा डांबिस
आवडलं!!
5 Feb 2014 - 4:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे
कधीतरी चुकून मराठी नाव सुचवा ;-)
5 Feb 2014 - 4:40 pm | प्यारे१
व्होडका कुठं मराठी आहे?
उद्या संत्र्याची नि फुगा एकत्र केला तर 'ऑरेन्जिनो बलूयाना' नाव घेऊया मग!
5 Feb 2014 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले
ऑरेन्जिनो बलूयाना'
>>> =))
4 Feb 2014 - 1:28 pm | मृत्युन्जय
याला तुम्ही "आम पार्टी कॉकटेल" हेच नाव द्या.
4 Feb 2014 - 1:40 pm | मुक्त विहारि
ह.ह.पु.
एकही मारा लेकीन सॉलेड मारा.
4 Feb 2014 - 3:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
4 Feb 2014 - 1:30 pm | जेपी
आधी ट्राय करुन बघतो .
नंतर बुद्धि चालली तर बगतो . :-)
4 Feb 2014 - 1:58 pm | सुहास..
अश्या वेळी हा सोक्या कुठ सुकत असतो काय माहीत ...
त्याने नक्की सुचविले असते ;)
4 Feb 2014 - 2:28 pm | सूड
मिरीव्होडक्याचा आमरस, सुंठमिर्याचा व्होडकांबा, आमरसाची तिखटी !! ;)
4 Feb 2014 - 2:58 pm | वैभव जाधव
हेचं अंबानी ठेवा नाव... लई चढ्ल..
4 Feb 2014 - 3:14 pm | रमेश आठवले
(कॉ़कटेल म्हणजे) कोंबडीतुरा हे नाव तुमच्या पेयासाठी कसे वाटते ?
4 Feb 2014 - 4:47 pm | भ ट क्या खे ड वा ला
नाव काहीही द्या
बारश्याला बोल्वा
आहेर घेऊन येतो
4 Feb 2014 - 6:36 pm | मुक्त विहारि
आहेर म्हणून फ्लॉवरची भज्जी घेवून या...
4 Feb 2014 - 7:51 pm | कैलासवासी सोन्याबापु
व्होडका + माझा जरा जास्तच चिंगाट असतंय असं ऐकिवात आहे, खरंय का ? (व्होडका इतकीशी नाही आवडत मला ) , असे एखादे कॉकटेल अस्तित्वात आहे का
बकार्डी लिमोन (लाईम स्वादाची व्हाईट क्युबन रम)+ बर्फ (तुम्ही गल्लासात भरलाय तसाच)+ऑरेंज ज्युस + ऑरेंज वेजेस (उगा आपला साहेबीणीचा मेकअप ) नसल्यास हा आमचा आदाब अर्ज आहे!! असे समजा (फोटु नाहीत) कारण दारु पोटात गेली अन गल्लास धुवुन ठेवला.
4 Feb 2014 - 8:15 pm | मुक्त विहारि
मदिराचार्य "सोत्रि" गुरुजीच ह्या कॉकटेल बाबत जास्त माहिती सांगू शकतील.
बाय द वे, व्होडका म्हणजे Smirnoff असे माझे मत आहे. व्हाईट मिश्र्चिफ पण ट्राय करुन बघीतले. पण Smirnoffची मजा़ काही वेगळीच.
4 Feb 2014 - 8:33 pm | कैलासवासी सोन्याबापु
आपली आपली चॉईस आहे हो देवा, फॉर मी , जर सुट्टी असेल ड्युटीज चा ताप नसेल तर मस्त दुपारी ग्लेन्फिड्डीच किंवा ग्लेनमोरेंज (१२ इयर्स मॅच्युर्ड) सोबतीला खरपुस कोंबडीची टांग. अन थोडं हेक्टीक असेल पण रिलॅक्स व्हायचं असेल तर मस्त एक लार्ज ओल्ड माँक किंवा कुठली ही रम ऑन द रॉक्स
बियर हे भुलोकीचे अमृत "दारु" म्हणुन हिणवु नये ही आमची श्रद्धा!!!! माईल्ड फेसाळती बियर अन सोबत बार्बेक्यु किंवा तंदुरी ( बटाटे ते बदक काहीही) :)
4 Feb 2014 - 10:50 pm | सोत्रि
व्हाइट रम + ऑरेंज ज्युस = Rum Screwdriver!
- (साकिया) सोकाजी
5 Feb 2014 - 7:08 am | कैलासवासी सोन्याबापु
ज ब र द स्त!!!!! काय तो व्यासंग!! देवा गंडा बांधा ह्या शिष्याला :)
4 Feb 2014 - 9:22 pm | विनायक प्रभू
पैला प्रतिसाद वाल्या लेखकु भौ चे नाव द्यावे ही णम्र विनंती?
4 Feb 2014 - 9:24 pm | सूड
जीमो जीमो ;)
4 Feb 2014 - 9:42 pm | प्यारे१
+२
सहमत!
4 Feb 2014 - 9:55 pm | मुक्त विहारि
भाऊंना कथा लिखाणासाठी ह्या पेयाची आवश्यकता भासत असेल असे वाटत नाही.
पण
पण
पण
भाऊंच्या कथेला प्रतिसाद देतांना , कथा पचवायला , कथेचा आस्वाद घ्यायला... हे पेय जवळ असेल तर उत्तम...
हाच मुख्य फरक आहे..
4 Feb 2014 - 9:54 pm | श्रीरंग_जोशी
कल्पक आहे कॉकटेल.
यह जाम मो जी के नाम. तुमचे आवडते लेखक मोजी यांचेच नाव का नाही देत?
मोजी कॉकटेल - जो पिये एक बार, वोह पिये बार बार!!
4 Feb 2014 - 10:00 pm | मुक्त विहारि
खरे तर भाऊंच्या "अपहरण की खूण" (हो, त्यांनी "खून"च्या जागी "खूण" हाच शब्द वापरला होता.)
ह्या अनेक भागी कथेचा आस्वाद, सोत्री आणि इतर मंडळींबरोबर घेता घेताच, हे कॉकटेल सुचले.
भाऊंनी ते कथा भाग इथे प्रकाशित केले तर......
5 Feb 2014 - 1:24 am | आनन्दिता
त्यापेक्षा ए जी ( टँव टँव ) ओ जी ( टँव टँव ) लो जी पियोजी, ये है मँगो "मोजी"....
पिता हु मै भी अब तुम भी पियोजी... वन टु का फोर.. फोर टू का वन..
माय नेम ईज जीवन... माय काम इज लेखन.... सजनों का भजन,, मेरा नाम है जीवन!! *DRINK*
ही जिंगल कशी वाटतेय?.
5 Feb 2014 - 8:33 am | श्रीरंग_जोशी
माहोल जिंगल आहे.
मानले तुम्हाला.
4 Feb 2014 - 10:38 pm | सोत्रि
वाहव्वा, भनाट प्रयोग!
नाव मॅन्गो टॅन्गो, जे ऑलरेडी लाउंजमध्ये कव्हर झाले आहे,'मॅन्गो टॅन्गो' नावानेच.
काही गोष्टी सुचवाव्याशा वाटताहेत त्या अशा:
1. आइसक्रीम असल्याने "मिरपुड् + दालचिनी पुड् + सुंठ पूड" असे दणदणीत गार्निशिंग कितपत चव वाढवू शकेल याची कल्पना नाही. माझ्यामते चव बिघडेल. (अर्थात हा पर्सनल चॉइसचा मामला आहे!)
2. आंबा आइसक्रीम आणि व्होडका असल्याने हे कॉकटेल 'digestif' ह्या कॅटेगरीत मोडायला हवे. कोलंबी भज्जी किंवा पापलेट रवा फ्राय ह्या कॉकटेल बरोबर जुळणार नाही. दोन्ही चवींची जातकुळी पार वेगळी आहे. म्हणजे असे की आमरसाबरोबर कोलंबी भज्जी किंवा पापलेट रवा फ्राय खायला कसे वाटेल?
3. कॉकटेल बनवताना साहित्याचा मापात वापर महत्वाचा असतो, चव आणि कॉकटेलची गंमत त्यावर बहुतांशाने अवलंबून असते.
अर्थात, हे तीन्ही मुद्दे फक्त कॉकटेलविषयीच्या आणि कॉकटेलच्या आस्वादाच्या कळकळीतुन आलेले आहेत. ह्या प्रयोगाबद्दल आणि प्रयोगशीलतेबद्दल आदर आहेच.
कॉकटेल बनविणे इज अॅन आर्ट ऑफ मिक्सॉलॉजी!
- (साकिया) सोकाजी
4 Feb 2014 - 10:57 pm | राजेश घासकडवी
मॅंगो मिरमिरा
5 Feb 2014 - 1:10 am | प्रभाकर पेठकर
ह्या कॉकटेलच्या पूर्व तयारीत इतर जिन्नसांबरोबरच 'गृहीणी' नामक जहाल जिन्नस अंतर्भूत असल्याने 'मँगो ज्वाला' असे नांव सुचवावेसे वाटते.
बाकी, चवी बाबत सोत्रींशी सहमत.