काही दुवे...... आज एवढेच

ज्ञानव's picture
ज्ञानव in कलादालन
31 Aug 2013 - 10:28 pm

१) टंकलेखन आणि संगीत हे मिश्रण भुवया उंचावणारे आहे. आज मी इथे एक लिंक देतो आहे ज्यात एक मोठ्या सिम्फनीने टंकलेखकाचा वापर संगीत तयार करण्यासाठी केला. अनेक वेळा मी यु ट्युबवर काही गंमतीशीर पाहायला मिळेल म्हणून मुशाफिरी करत असतो (गमतीशीर पण सभ्यही!!) त्यात मला हा ऑर्केस्ट्रा पाहायला मिळाला आणि तो मला आवडला त्यातल्या मुझिक पीस तसेच वाजवणारे आणि typist (!!!???)ह्या दोघांचेही एक्स्प्रेशन्स फारच छान वाटतात.
एके काळी मला आठवतंय टंकलेखक आणि शिवणाचे मशीन दोघांनी अनेकांच्या संसाराला आर्थिक हातभार लावला. संगणक आल्यावर ती कागदावरची नादमय टक टक बंद झाली आणि संगणकाचे "गुपचूप" काम सुरु झाले.
तरीही कालपरवा पर्यंत धडधडणाऱ्या ह्या टंकलेखकानमध्येही संगीत शोधण्याचे काम कुणीतरी अज्ञात व्यक्तीने केले आहे जे माझ्यासाठी त्या मशीनला दिलेली एक मानवंदना आहे. कदाचित माझे वर्णन जरा अति वाटेल पण ज्याला नाद कळतो त्याला एकदातरी पाहायला हे नक्कीच आवडेल.

हा ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
(मुळ पानावर जाण्याआधी एक जाहिरात येते जी आपण स्क्रीनच्या उजव्या हाताला वर skip ad ह्यावर क्लिक केल्यावर जाते आणि मुख्य पेजवर घेऊन जाते तर जाहिरात आहे म्हणून एका चांगल्या अनुभवाला मुकु नये म्हणून....)

२) कधी कधी चुकून किंवा कुणी खोडसाळपणे आपली एखादी महत्वाची file संगणकावरून गायब करतो तर अश्या गायब होणार्या फाइल्स पुन्हा मिळविण्यासाठी एक उपयुक्त सोफ्टवेर इथे क्लीक केल्यावर मिळू शकेल.

मांडणी

प्रतिक्रिया

काकाकाकू's picture

31 Aug 2013 - 11:42 pm | काकाकाकू

यावरनं व्हिक्टर बोर्ग आठवला! माहिती नसला तर या लिंकने सुरूवात करा. youtube वर ढिगभर व्हिडिओज मिळतील.

आणि ads.fly पेक्षा हि डायरेक्ट लिंकच द्या.

ज्ञानव's picture

1 Sep 2013 - 7:14 am | ज्ञानव

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.मी जरा भीत भीतच हे दुवे द्यायला सुरवात केली कारण जे मला आवडते ते इतरांना आवडेलच असे नसते तरीही सगळ्यांनी दखल घेतली त्याबाबत सगळ्यांना धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

1 Sep 2013 - 9:37 am | मुक्त विहारि

घाबरू नका..