रोजचाच प्रवास

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
23 Nov 2012 - 7:02 pm

रोजचाच प्रवास (आज मात्र विचार करत करत )

डेक्कन क्वीन पुण्याहून मुंबईकडे जात आहे. रोजचाच प्रवास. आता असे सांगा डेक्कन क्वीनचा कोणचा भाग, रुळांच्या हिशेबाने, (relative to railroad track) पुण्याकडे जात आहे ?

शरद

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

23 Nov 2012 - 7:14 pm | दादा कोंडके

डेक्कन क्वीनच्या टेल लाईटचा प्रकाश आणि भोंग्याचा पुण्याच्या दिशेत जाणारा आवाज सोडला तर काहीच नाही! :)

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Nov 2012 - 11:04 pm | माम्लेदारचा पन्खा

डेक्कन क्वीनचा रुळाच्या दिशेने असलेला खालचा भाग.........

रमेश आठवले's picture

26 Nov 2012 - 9:46 am | रमेश आठवले

मला शरद यांच्या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर माही नाही. पण मी मुंबईला अपरिहार्य असेल तरच जातो . सहज जाण्यासाठी हे शहर आता राहिलेले नाही. म्हणून मी deccan queen ने किंवा इतर कुठल्याही वाहनाने मुंबईकडे प्रवास करत असलो तरी माझे मन पुण्याच्या दिशेनेच जात असते.

विनटूविन's picture

26 Nov 2012 - 11:19 am | विनटूविन

हे मस्त आहे...

शरद's picture

26 Nov 2012 - 12:14 pm | शरद

श्री. माम्लेदारांचा पंखा यांचे उत्तर बरोबर आहे. रेल्वेच्या चाकाचा भाग,bottom of the protruding Rim of the wheel, हा नेहमीच पुण्याकडेच जात असतो.

शरद

दादा कोंडके's picture

26 Nov 2012 - 1:25 pm | दादा कोंडके

bottom of the protruding Rim of the wheel

म्हणजे नक्की काय आहे हे पटकन लक्षात आलं नाही. आणि गूगल मुळे डोक्याला थोडासुद्धा ताणदेण्याची सवय गेलिये. त्यामुळे हे पान मिळालं.

अ‍ॅनिमेशन बघून लगेच कळलं पण थोडासा विचार करायला हवा होता असं वाटलं, आय मिस्ड द फन. :(

मराठी_माणूस's picture

26 Nov 2012 - 9:16 pm | मराठी_माणूस

उत्तर पटले नाही.

चिरोटा's picture

26 Nov 2012 - 12:20 pm | चिरोटा

चाकाचा भाग पुण्याकडे? आणि गाडी मुंबईच्या दिशेने? काय चाल्लय काय हे ?

शरद's picture

28 Nov 2012 - 6:41 am | शरद

गाडी मुंबईकडे जात असतांना चाकाचा a येथील भाग क्षणापुरता का होईना पुण्याकडे सरकत असतो.
शरद
Rail

अगोचर's picture

3 Dec 2012 - 12:55 am | अगोचर

पन्खा जर पुरेशा वेगानी फिरत असेल तर आणि पंख्याचा अक्ष हा डेक्कन क्वीन च्या प्रवासाच्या दिशेला समांतर नसेल तर पंख्याचा पात्याचा दूर्चा भाग (जो सगळ्यात वेगानी फिरतो) तो विरुद्ध दिशेनी जात असेल. हाच हिशोब इंजिनाशी निगडीत पट्टे, साखळ्या, गिअर इत्यादींना पण लागु होईल.