नेता की अभिनेता ?
लई नाटकी नाटकी
या देशामधला नेता
मतलबापायी होतो
घडीघडी अभिनेता
झोपडीतल्या दीनाची
त्याला येई ना कदर
पण खुर्चीसाठी खातो
गरीबासंगे भाकर
तसे तर खुर्चीदास
सदा एसीतच राहे
पण मतासाठी मात्र
डोईवर भार वाहे
पैशांशीच देणे-घेणे
विकासाला मारी लाता
परि भाषणात त्यांच्या
करी विकासाच्या बाता
आपल्या छाताडावर
उड्या मारती हे मस्त
डोळ्यावरले झापड
काढा, राहू नका सुस्त
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
==================================
प्रतिक्रिया
26 Oct 2012 - 9:39 pm | गणामास्तर
छान कविता..अजून येऊ द्या.
तुमच्या सारख्या कवींची आज देशाला गरज आहे.
27 Oct 2012 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा
@तुमच्या सारख्या कवींची आज देशाला गरज आहे. >>> देशाचं आहेच हो...! मि.पा.चं काय? -ते बोला. ;-)
27 Oct 2012 - 1:12 pm | अन्या दातार
मिपासाठी तुम्ही आहात की. कशाला चिंता करता?
27 Oct 2012 - 1:57 pm | अत्रुप्त आत्मा
@मिपासाठी तुम्ही आहात की.>>>माताय विसरलोच होतो मी,पण अता लक्षात आलं,की लक्षात अणून द्यायलाही तुम्ही आहात की. :-p
26 Oct 2012 - 10:04 pm | तर्री
तो एक राजपुत्र आणि जनता त्रस्त !
27 Oct 2012 - 12:01 pm | विश्वजीत दीपक गुडधे
खुप खुप धन्यवाद !!!!!!