कुणी पाहिली भोर उद्याची अवचित होइल भेट
किती भांडणे तंडुन घेशी अखेर अंत समेट
कोण्या नशिबी असे न संचित धुके हरवली वाट
नसे दूर; अंधारी उमले रोज नवीन पहाट
भंगुर हे क्षण भोगाचे उपभोगाचे वा दाट
नियतीचे चिरअनंत फिरते आशा एक रहाट
......................अज्ञात
प्रतिक्रिया
1 Oct 2012 - 11:05 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सहज सुंदर....
1 Oct 2012 - 6:24 pm | स्पंदना
नसे दूर; अंधारी उमले रोज नवीन पहाट>>>>
सुरेख!
1 Oct 2012 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा
भंगुर हे क्षण भोगाचे उपभोगाचे वा दाट
नियतीचे चिरअनंत फिरते आशा एक रहाट >>> सुंदर... !
2 Oct 2012 - 10:09 am | अज्ञातकुल
सर्वांचे मनापासून आभार :-)