काल माझ्याकडून एक चूक झाली.खरे तर काल माझ्या अनेक दीपस्तंभांपैकी एका वीर-पुरूषाची पुण्यतिथी होती.राजमान्य आणि स्वधर्माभिमानी , छ. संभाजी राजे ह्यांची. पण कसे काय कोण जाणे मी त्यांच्या विषईच्या भावना व्यक्त करायला विसरलो.लहानपणी इतिहास जास्त आवडत न्हवता.कारण सनावळ्या आणि इतर फालतू माहिती.ह्या व्यक्ती विषईपण असेच झाले.पुढे वाचनाची आवड असणारे मित्र मिळाले आणि थोडा-फार ईतिहास समजायला लागला.ह्या व्यक्तीने काय-काय भोगले आहे, त्याचा जर नुसता आढावा घेतला तरी खूप झाले.
१. जन्मतःच आई गेली.
२. सावत्र आईचे कूटिल राजकारण.
३. वडिल सतत समाजकारण करायला गुंतलेले.
४. राजकारणाचाच एक भाग म्हणून औरंगजेबाकडे जायला लागले.
आणि
५. अतिशय हालात म्रुत्यु.
मला ह्यांचा सगळ्यात जास्त आवडलेला गूण कुठला असेल तर, स्वधर्मासाठी प्राण समर्पण.तुम्हालाही ह्यांचा कुठला गूण आवडतो ते सांगा.मला त्यांचे गूण जाणून घ्यायला आवडेल.
प्रतिक्रिया
16 May 2012 - 12:47 am | अर्धवटराव
मला भावलेला संभाजीचा गुण म्हणजे तत्वाधारीत लवचीकपणा आणि त्याची विजुगिषु वृत्ती. संभाजीने प्रत्येक संकटात आपला नवीन मार्ग चोखाळला. घरी कर्तुत्वाला वाव मिळात नाहि, किंबहुना विरोधी राजकारणाची सरशी होतेय हे बघुन तो सरळ दिलेरखानाला जाऊन भेटतो. (हा शिव-संभाचा राजकारणी डाव होता असाही एक प्रवाद आहे...) चुक कळुन येताच घरची वाट धरतो. सुरुवातीला शिवाजीराजांच्या मंत्र्यांना अगदी तोंडावर भ्रष्टाचारी म्हणणारा संभाजी त्याच मंत्र्यांना उदार मनानी माफ करुन राज्यसेवेत रुजु करुन घेतो. लाखांचे शत्रु सैन्य राज्यात घुसलेले असताना दक्षीण मोहीम हाती घेतो. जे आहे ते टिकवुन ठेवतो आणि नवीन निर्माण करायचा प्रयत्न करतो... आणि या सगळ्या भानगडी करत असताना आपली रसीकता मरु देत नाहि... हॅट्स ऑफ्फ !!
अवांतर - धर्माकरता मरण पत्करण्याचा गुण मिपावर सर्वात मोठा अवगुण ठरु नये म्हणजे मिळवली.
अर्धवटराव
16 May 2012 - 9:59 am | क्लिंटन
शंभूराजांना विनम्र अभिवादन.
+१
शंभूराजांना औरंगजेबाने मराठा राज्यातील सर्व किल्ल्यांच्या किल्ल्या दे (म्हणजे सगळे स्वराज्य मोंगलांच्या ताब्यात दे) आणि मोंगल सैन्यातील ज्यांनी मराठ्यांना मदत केली होती (मोंगलांच्या दृष्टीने फितूर) त्यांची नावे सांग असे सांगितले होते, धर्मांतर करायला सांगितले नव्हते असे नरहर कुरूंदकरांच्या लेखनात वाचल्याचे आठवते. (पुस्तक शाळेत असताना वाचले होते. नक्की नाव लक्षात नाही. मध्यंतरी कुरूंदकरांवर काही लेख मिपावर आले होते. त्याचे लेखक ते नाव सांगतीलच). तसेच विश्वास पाटलांच्या संभाजी या कादंबरीतही औरंगजेबाने संभाजीराजांना धर्मांतर करायला सांगितले होते असा उल्लेख वाचला नाही. (ती कादंबरी असली ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करून लिहिलेली आहे असे विश्वास पाटलांनी स्वतःच म्हटले आहे). तेव्हा शंभूराजांनी स्वराज्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली हे अगदी निर्विवाद आहे. पण "मुसलमान व्हायला तयार असशील तर तुला सोडतो" असे औरंगजेबाने म्हणणे आणि त्यावर "तुझी मुलगी द्यायला तयार असशील तर मी मुसलमान व्हायला तयार आहे" असे शंभूराजांनी म्हणणे ही नाट्यमयता नंतर कोणी घुसडली आहे का याची कल्पना नाही. पण वस्तुनिष्ठ अभ्यासात अशा नाट्यमयतेला स्थान नसावे.
असे म्हणतात की जगायचे कसे हे शिवाजी महाराजांनी शिकवले पण मरायचे कसे हे शंभूराजांनी शिकवले.शंभूराजांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण अभिवादन.
16 May 2012 - 11:35 am | शिल्पा ब
+१ अन पैसातैंच्या प्रतिसादालासुद्धा +१
16 May 2012 - 11:50 am | मस्त कलंदर
अर्धवटराव, क्लिंटन आणि पैसा तिघांचेही प्रतिसाद आवडले.
कधी कधी आपल्याला तेच म्हणायचं असतं, शब्दांची जुळवाजुळव मनात चालू असताना असे प्रतिसाद वाचायला मिळाले की 'हेच ते' असं लगेच होऊन जातं. ;-)
16 May 2012 - 1:50 pm | नितिन थत्ते
>>पण "मुसलमान व्हायला तयार असशील तर तुला सोडतो" असे औरंगजेबाने म्हणणे
औरंगजेब दक्षिणेत संभाजीला मुसलमान करण्यासाठी आला नव्हता. मराठ्यांचे राज्य संपवण्यासाठी आला होता. त्यामुळे संभाजी त्याची ऑफर स्वीकारील आणि मग तो संभाजीला (पर्यायाने मराठ्यांच्या राज्याला) जीवदान देईल अशी शक्यता नव्हती. अश्या शक्यतेची ऑफर देण्याइतका औरंगजेब खुळा नसावा.
16 May 2012 - 6:20 pm | अर्धवटराव
>>औरंगजेब दक्षिणेत संभाजीला मुसलमान करण्यासाठी आला नव्हता.
-- पण मुस्लीम राज्यकर्ता म्हणुन आला होता, आणि मुस्लीम राज्य वाढवण्यासाठी आला होता
>> मराठ्यांचे राज्य संपवण्यासाठी आला होता.
-- जे औअंगजेबाच्या दुर्दैवाने एक हिंदु राज्य होते
>>त्यामुळे संभाजी त्याची ऑफर स्वीकारील आणि मग तो संभाजीला (पर्यायाने मराठ्यांच्या राज्याला) जीवदान देईल अशी शक्यता नव्हती. अश्या शक्यतेची ऑफर देण्याइतका औरंगजेब खुळा नसावा.
-- मराठी राज्य संपवण्याची आशा औरंगजेब कधिचाच गमाऊन बसला होता. ते राज्य समुळ नष्ट होणार नाहि हे त्याला कळुन चुकले होते. त्या राज्याची मुळं लोकमानसात किती खोलवर रुजली आहेत हे औरंजेबासारख्या मुत्सद्दी राजकारण्याला समजले नसणार काय ? तेंव्हा संभाजीने मुस्लीम धर्म स्विकारणे हे औरंगजेबासाठी मराठी राज्य जिंकण्यासारखेच होते.
अर्धवटराव
18 May 2012 - 8:47 am | पुण्याचे वटवाघूळ
स्वतः थोरल्या छत्रपतींचा मुस्लिम धर्म किंवा समाज याविषयी काहीही आकस नव्हता हे इतिहासात अगदी स्पष्टच आहे. तसेच नेताजी पालकर आणि बजाजी नाईक निंबाळकर या धर्मांतरीत झालेल्यांना थोरल्या महाराजांनी परत हिंदू करून घेतलेच होते. या पार्श्वभूमीवर शंभूराजांना मुस्लिम धर्म स्विकारायला लावून जीवदान दिले असते तर त्यानंतरच्या काळात स्वतः शंभूराजे परत हिंदू झालेच असते आणि स्वराज्याचा 'उद्योग' चालूच राहिला असता. तेव्हा औरंगजेबाला नक्की काय पाहिजे होते? संभाजीला मुसलमान करणे की मराठी राज्य संपविणे?
एकदा शंभूराजांना मुकर्रबखान आणि गणोजी शिर्के यांनी पकडल्यानंतर एक तर मराठी राज्याचा अंत किंवा शंभूराजांचा अंत निश्चित होते. राजांनी स्वतःचा जीव वाचवायला हजारे-लाखोंच्या त्यागातून निर्माण झालेल्या स्वराज्याबाबत कोणतीही तडजोड स्विकारली नाही. त्यातच औरंगजेबाच्या हातातून स्वतःचा बाप सुटला नाही मात्र थोरले छत्रपती त्यापूर्वी एकदा आणि स्वतः शंभूराजे दोनदा मुठीत सापडूनही निसटले याचे शल्य त्याला असणारच. तेव्हा शंभूराजांचा अंत होणे क्रमप्राप्त होते. त्यातही राजकारणाचा भाग म्हणून मराठी राज्य मोंगलांच्या ताब्यात दे बदल्यात तुला सोडतो ही ऑफर औरंगजेब शंभूराजांना देईल हे समजू शकतो (आणि शक्यता अशी आहे की जरी शंभूराजांनी तसे राज्य औरंगजेबाच्या ताब्यात दिले असते तरी सगळ्या किल्ल्यांचा ताबा घेऊन नंतर औरंगजेबाने राजांना मारलेच असते). पण मुसलमान हो मग तुला सोडतो ही ऑफर औरंगजेब देईल याची तर्कसंगती लागत नाही.
12 Jun 2012 - 1:50 am | अर्धवटराव
लिहीतो म्हटलं तर प्रतिसाद खुप लांबलचक व्हायचा.
थोडक्यात सांगायचं, तर... प्रत्येक काळाची एक अस्मीता असते. त्यावर घाव घालुन शत्रुचा तेजोभंग करणे, मानसीक खच्चीकरण करणे हा राजकारणातला नेहमीचा उद्योग, आणि प्रभावी अस्त्रही.
ज्याकाळी भाषीक अस्मीता राजकारणात अस्तित्वातच नव्हती त्याला "मराठी" राज्य म्हणायचे, व आजच्या राजकारणात धार्मीक अस्मीतेला स्थान नाहि म्हणुन त्याकाळी देखील ती नव्हती असा स्वतःचा गैरसमज करुन घ्यायचा... याला बाळबोधपणा म्हणतात. असो.
>>मी मिसळपाव सोडून जात आहे.
-- राम राम !!
अर्धवटराव
16 May 2012 - 5:56 pm | अर्धवटराव
औरंगजेबाने एक मुसलमान काऊण्ट वाढवावा म्हणुन संभाजीला धर्मंतरची ऑफर दिलेली नसणार... त्याबद्दल पुरावा आहे आहे कि नाहि ते माहित नाहि... पण कुरुंदकरांनीच म्हटल्याप्रमाणे औरंगजेब हा त्याकाळचा मुस्लीमराज्यप्रणालीचा रिप्रझेंटेटीव्ह होता... त्याचा उद्देश केवळ मुघल साम्राज्य संस्थापन नव्हते तर अखीलभारतीय पातळीवर हिरवा रंग पसरवण्याचे होते. या उद्देशाची पूर्तीच्या मार्गातली सगळ्यात मोठी धोंड म्हणजे मराठी राज्य, जे एक हिंदु राज्य म्हणुन उदयास आले होते. संभाजीच्या धर्मपरिवर्तनात औरंगजेबाच्या जीवनची इति:पूर्ती होती... सो, ज्याप्रमाणे अफजलखानाने शिवाजीवर पहिला वार केला का याचा पुरावा इम्मटेरीयल आहे, त्याच प्रमाणे औरंगजेबाने संभाजीला धर्मंतराची ऑफर दिली कि नाहि याचा पुरावा देखील इम्मटेरीयल आहे.
अर्धवटराव
18 May 2012 - 6:52 am | टवाळ कार्टा
थोडे करेक्शन
>>"या उद्देशाची पूर्तीच्या मार्गातली सगळ्यात मोठी धोंड म्हणजे मराठी राज्य, जे एक हिंदु राज्य म्हणुन उदयास आले होते."
या उद्देशाची पूर्तीच्या मार्गातली सगळ्यात मोठी धोंड म्हणजे मराठी राज्य, जे त्याच्या द्रुश्टीने एक हिंदु राज्य म्हणुन उदयास आले होते.
18 May 2012 - 7:36 am | अर्धवटराव
>>जे त्याच्या द्रुश्टीने एक हिंदु राज्य म्हणुन उदयास आले होते
-- आयला.. म्हणजे आमची आणि औरंगजेबाची दृष्टी निदान या बाबतीत तरी सेम टु सेम म्हणायची कि... "अर्धऔरंगराव" अशी नवीन आयडी बनवावी काय??? किंव्हा आलमगिराला अर्धवटजेब म्हणावे, असाहि पर्याय आहेच.
अर्धवटराव
16 May 2012 - 9:06 am | पैसा
शौर्य, विद्वत्ता आणि राजकारण. अगदी लहान वयात संस्कृत ग्रंथरचना केली. राजांनी एकाच वेळी चार चार आघाड्यांवर शत्रूला नामोहरम करून राज्य राखलेच नाही तर वाढवले. शाहजादा अकबराला आश्रय दिला आणि औरंगजेबाला महाराष्ट्रात खिळवून ठेवलं, धीरोदात्त मरणसुद्धा इतकं प्रेरणादायी की संभाजी राजांच्या मृत्यूनंतर सर्व मराठ्यानी एक होऊन औरंगजेबाला जवळपास निर्नायकी, अभूतपूर्व लढा दिला. सगळ्या जगाच्या इतिहासात इतकी वर्ष चाललेल्या असमान बल असलेल्यांच्या लढाईचं हे एकमेव उदाहरण असावं. या महान योद्ध्याला शतशः प्रणाम!
16 May 2012 - 10:00 am | मी-सौरभ
पैसा काकूंशी सहमत.
(+१ टंकण किती सोप्पं असतं ;) नायतर एवढ चान चान मला नाय बा लिहिता येत)
16 May 2012 - 1:58 pm | किलमाऊस्की
आठवण करुन दिल्याबद्दल. या विषयावर फारस वाचन नसल्याने फार काही लिहित नाही. तुमच्याकडे काही संदर्भ असतिल जरुर नावं सांगा. (कादंबर्या नकोत. कादंबर्यातले ते जड्जंजाळ शब्द बघुन शंका येते हे लोक खरचं असं अलंकारिक बोलत असतिल का?)
प्रतिसाद ही फार सुंदर आहेत.
16 May 2012 - 3:19 pm | मुक्त विहारि
पण उदाहरणे आहेत.
जंजिर्याच्या आसपास जी मराठी आडनावे लावणारे मुस्लिम भावंडे आहेत त्यांनी सिद्दी जोहरवरच्या प्रेमासाठी हिंदू धर्म सोडला.
तर
संभाजी राजांना पकडल्यानंतर कोंकणांत औरंगझेबवरच्या प्रेमासाठी कित्येक हिंदू लोक मुस्लिम झाले.मग ह्या संभाजी राज्यांवर त्याने किती प्रेमाचा वर्षाव केला असेल, ह्याची थोडी-फार कल्पना येवू शकते.अर्थात ह्या सर्व प्रेमा-प्रेमाच्या गोष्टी असल्याने त्या लिखित स्वरूपात मिळणे तसे कठीणच नाही का?ह्या अश्या प्रेमाच्या गोष्टी चार-चौघात थोडीच सांगता येतात?
पै.औरंगझेबाने हा प्रेम-प्रयोग आधी नेताजी पालकर ह्यांच्यावर पण केला होताच.त्यांचे नाव बदलून महंमद कूलीखान (कूलीखानच ना, कारण संदर्भासाठी "राजा शिव छत्रपती" हे पुस्तक आत्ता माझ्याकडे नाही आहे.त्यात ह्याचा उल्लेख आहे)आता खुद्द सेनापती जर प्रेमाने धर्म बदलू शकत असतील तर महाराजांवर किती वर्षाव झाला असेल? साधे तर्क-शास्त्र आहे.आपल्या घरात पण नाही का , आपण बघत.आई मुलीवर प्रेम करते , आणि आज्जी आपल्या आईवर प्रेम करते, म्हणूनच तर आज्जी आपल्या नातीवर जास्त प्रेम करते.
म्हणून लिहिले की पै.औरंगझेबाने, इतका प्रेमाचा वर्षाव करून देखिल आमचे महाराज मागे हटले नाहित हा माझा तर्क झाला आणि एव्हढा प्रेमाचा वर्षाव होवून देखिल महाराजांनी धर्म बदलला नाही हा गूण मला आवडला.आता कुणाला, कुठला, गूण आवडेल हे काय सांगता येते काय?
16 May 2012 - 3:27 pm | पुण्याचे वटवाघूळ
सिद्दी जोहर आणि जंजिर्याच्या नक्की संबंध काय? जोहर मुळचा सद्यकालीन इथियोपीयामधला. महाराजांवर चालून जाण्यापूर्वी आदिलशाहाचा नोकर म्हणून तो तेलंगणमधील कर्नुलमध्ये होता.मग पुढची पन्हाळगडाचा वेढा, महाराज निसटणे आणि बाजीप्रभूंचे बलिदान या घटना घडल्या. कोंडीत पकडललेले राजे निसटले म्हणून संतापलेल्या आदिलशाहाने जोहरवर विषप्रयोग केला (काही लोक म्हणतात त्याने आत्महत्या केली). या सगळ्यात तो जंजिर्याला नक्की कधी गेला?
16 May 2012 - 3:29 pm | मुक्त विहारि
जंजिर्याचा सिद्दी आणि सिद्दी जोहर आम्हाला एकच वाटले.
16 May 2012 - 3:30 pm | परिकथेतील राजकुमार
आंतरजालावरती प्रत्येकाचा इतिहास हा वेगळा असतो हे मी पामराने तुम्हास सांगण्याची गरज आहे का ? ;)
16 May 2012 - 3:36 pm | पुण्याचे वटवाघूळ
:)
16 May 2012 - 3:34 pm | मनराव
जंजिर्यावर फक्त एकच सिद्दी नव्हता..... सिद्दी हि जात आहे......आणि सिद्दी जोहर हा तात्कालीन सिद्दींचा प्रमुख होता...
16 May 2012 - 3:35 pm | पुण्याचे वटवाघूळ
मग अगदी तसाच प्रेमाचा वर्षाव औरंगजेबाने शंभूपुत्र शाहू आणि त्याची आई येसूबाईवर का केला नाही? याचे कारण म्हणजे औरंगजेबाचे राजकारण!! शाहूला हिंदू म्हणूनच जिवंत ठेऊन मराठ्यांमध्ये दुसरे सत्ताकेंद्र भविष्यात उभे राहिल याची दक्षता त्याने घेतली. (नंतरच्या काळात ते झालेच-- शाहू आणि ताराबाईंच्या सैन्यात लढाईपर्यंत वेळ आली होती पण ती बाळाजी विश्वनाथच्या शिष्टाईने टळली).
तेव्हा यातच औरंगजेब राजकारणाला महत्व देत होता हे समजते. तो धर्मपिसाट नक्कीच होता पण आपले राजकारण साधताना त्याने धर्म मधे येऊ दिला नाही. राजा शिवछत्रपतीमध्ये लिहिले आहे की संभाजी दिलेरखानाला मिळाल्यानंतर या गोष्टीचा राजकारणासाठी वापर न करता संभाजीला पकडून सक्तीने मुसलमान बनविण्याचे आदेश त्याने दिलेरखानाला दिला होता. पण संभाजीराजे वेळीच निसटले. पण पुढे शाहूला त्याने चांगली वागणूक दिली किंबहुना चांगली बडदास्त ठेवली. तेव्हा औरंगजेब दक्षिणेत आल्यानंतरच्या काळात (सुरवातीला नसले तरी) त्याने धर्मापेक्षा राजकारणाला जास्त महत्व दिले असे दिसते.
16 May 2012 - 5:26 pm | मुक्त विहारि
दसर्याच्या आदल्या दिवशी त्याने संभाजी आणि कलश ह्यांना देह दंड दिला.त्याचा परीणाम औरंगझबाला खूप अनपेक्षीत होता.औरंगझबाच्या चाकरीत असलेल्या मराठी सरदारांचा असंतोष वाढीस लागला.संताजी-धनाजी जसे जमतील तसे ह्या
औरंगझबाला त्रास देत होतेच.शिवाय ह्या घटनेमूळे मराठी सैन्याला जास्त चेव चढला आणि ते बर्याच प्रमाणात एकसंघ पण
झाले.
मराठी सैन्यात दूफळी माजवायवण्यासाठीच त्याने हे राजकारण खेळले असावे.आधी तुला खातो आणि मग तुझ्या घरादाराला हेच तर खरे धोरण असते.
17 May 2012 - 7:29 am | विद्याधर३१
दसरा नाही तर वर्षप्रतिपदा..
17 May 2012 - 11:52 am | मुक्त विहारि
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद..
16 May 2012 - 2:14 pm | कवितानागेश
मी पूर्वी वाचले होते की संभाजी राजे आणि थोरले बाजीराव हे २ योद्धे असे आहेत, की जे कुठलीच लढाई कधीच हरले नाहीत.
पण ही माहिती मी इतरत्र वाचली आहे, 'ऑथेंटिक' इतिहासाच्या पुस्तकात नाही.
अर्थात, इतिहास जरी भयानक वाईट पद्धतीनी शिकवला जात असला तरी 'संभाजी राजांचे' मनातले स्थान कायमच 'सुपरहीरो' चे आहे.
16 May 2012 - 5:24 pm | चिगो
रसिक, गुणग्राही आणि शौर्यवान संभाजीराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..
16 May 2012 - 8:42 pm | प्राध्यापक
एखाद्या कर्तबगार शासकाच्या कार्याची तुलना नेहमीच त्याच्या मुलाशी केली जाते शिवाजी महाराजांच्या तुलनेत संभाजी राजांचे कार्य पाहीले जाउ नये असे मला वाटते. शिवाजीला त्याच्या कारकिर्दित अनेक संकटांशी तोंड द्यावे लागले व त्यांनी आपल्या मुसद्दी पणाने व पराक्रमाने त्याला तोंड दिलेही.मात्र संभाजी चा कालखंड हा जास्त खडतर होता असे मला वाटते याला मुख्य कारण स्वतः औरंगजेब आपले सर्व सामर्थ्य घेउन दक्षिणेत उतरला होता.याच काळात सिद्दी ,पोर्तुगीज यासारख्या शत्रुंनीही डोके वरती काढले होते ,इकडे स्वराज्यातही अन्नाजी दत्तो,बाळाजी चिटणिस,सोयराबाइ यांच्या विरोधाला ही त्यांना तोंड द्यावे लागले .
तरीही या सर्वांना तोंड देउन अत्यंत पराक्रमाने त्यांनी आपल्या कालखंडात राज्याचे संरक्षण केले ,त्यांना १६८० ते १६८९ असा फक्त ९ वर्षांचा काळ मिळाला तरी या काळात त्यानी अनेक शत्रुंना समर्थ पणे तोंड दिले .
त्यांच्या त्यापराक्रमास विनम्र अभिवादन.
17 May 2012 - 4:46 am | शिल्पा ब
+१
16 May 2012 - 9:28 pm | jaypal
मानाचा मुजरा.
17 May 2012 - 8:04 am | अर्धवटराव
सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजीले दात अशी हि जात मराठ्याची !!!
अशी काहितरी विरश्रीपूर्ण फेंटसी आवडते आपल्याला... आयला... नाद नाय करायचा...
अर्धवटराव
17 May 2012 - 10:13 am | नितिन थत्ते
>>सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजीले दात अशी हि जात मराठ्याची !!!
अशी काहितरी विरश्रीपूर्ण फेंटसी आवडते आपल्याला
त्यासाठी रजनीकांत असतो की. (मराठी सुद्धा आहे तो). :)
17 May 2012 - 5:51 pm | साती
and his name is shivaji too. May be he is maratha also. :)
17 May 2012 - 6:36 pm | बॅटमॅन
मराठी :)
17 May 2012 - 7:29 pm | पैसा
शिवाजी गायकवाड तो!
17 May 2012 - 8:53 pm | अर्धवटराव
रजनीने देखील मूळ प्ररणा कोल्हापुरहुन घेतली असं आम्हाला विश्वसनीय सुत्रांकडुन कळलय ;)
अर्धवटराव
21 May 2012 - 9:35 pm | अप्पा जोगळेकर
संभाजी राजांना काय काय भोगावे लागले या यादीमध्ये
'त्यांच्या नावाने एक घाणेरडी संस्था स्थापन झाली' हे राहिले.
संभाजी राजांच्या कर्तबगारीबद्दल आदर वाटतोच. पण मुघलांना जाउन मिळणे हा त्यांच्यावरचा न धुता येणारा डाग आहे असे वाटते. बाकी चालू द्या.
21 May 2012 - 10:11 pm | मृगनयनी
त्यांच्या नावाने एक घाणेरडी संस्था स्थापन झाली' हे राहिले.
मला वाटतं.. त्या घाणेरड्या सन्स्थेपेक्षा त्यांच्या नावाने सुरु झालेला विडी कारखाना जास्त उच्च प्रतीचा आहे.. कारण किमान त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो! :)
संभाजी राजांच्या कर्तबगारीबद्दल आदर वाटतोच. पण मुघलांना जाउन मिळणे हा त्यांच्यावरचा न धुता येणारा डाग आहे असे वाटते.
शेवटी सम्भाजीराजे पण एक माणूसच होते.. आणि चुका माणसांच्या हातूनच होतात... माणूस त्याच्या प्रवृत्तीनुसार अडचणीत कुठलीतरी तडतोड करतोच!
@ मुवि..
चान्गली माहिती!
आजकाल बर्याच जणांच्या लेखनात सम्भाजीराजांची सावत्र आई- सोयराबाई.. हिला सात्विकतेचे रुप देण्याचा प्रयत्न केला जातो.. आपण तसा केला नाही.. त्याबद्दल आभार!
सोयराबाईने सम्भाजीराजांवर विषप्रयोग वगैरे केला होता. पण पूर्वपुण्याईमुळे सम्भजीराजे त्यातून वाचले. पण त्यांचे पूर्ण जीवनच विषापेक्षा भयन्कर घटनांनी भरलेले होते... सॅल्युट फोर दॅट.. तो सम्भाजीराजे!!! :)