जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे
बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे
भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे
घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना
आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे
माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध
भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे
सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे
झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे
रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य
झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे
छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती
नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे
स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द काहूर
विचारांच्या भोवर्यात अंतर्धान अस्तित्व माझे
-------- शब्दमेघ
प्रतिक्रिया
26 Mar 2012 - 9:27 pm | प्रचेतस
सुंदर कविता रे.
कविता टार्याने लिहिली आहे की काय असे क्षणभर वाटून गेले.
कविता लिहिताना शक्यतो शुद्धलेखनातच लिहा हो कविवर्य. इतक्या चांगल्या कवितेची अशी वाट लावू नका.
26 Mar 2012 - 9:39 pm | अन्या दातार
अगदी कळकळीची विनंती आहे ही. (नाहीतर एके दिवशी "मोकलाया दाही दिशा" ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही)
26 Mar 2012 - 9:46 pm | गणेशा
शुद्धलेखना बद्दल दिलगिरी !
तेव्हडी चुक पदरात / शर्टात घ्या. लवकर शिकवणी लावतो.
अवांतर :
आधीच मराठी कच्चे ! ( म्हणजे मराठीत काठावर पास होणारा विद्यार्थी)..
त्यात मातृभाषेतील शुद्धलेखनातील उनिवेमुळे अनेक मातृभाषेतील शिव्या खायला मिळालेल्या.
कविता.. कादंबरी , हा आपला प्रांतच नाही .. कळणार पण नाही.. आणि गरज पण नाही असे समजुन १० वी पर्यंतची वर्षे गेली.
शुद्धलेखन तर राहिलेच .. पण मराठी कायमचेच दूरावले. अजुनही.
आणि आता मराठीसाठी बघु घरीच शिकवनी लावावी का ? असा विचार करतो आहे.
अति अवांतर:
वल्ली मित्रा काव्य-विभागाच्या प्रेमात पडलास की दोस्ता. सगळीकडे रिप्लाय दिसत आहेत.
असे काय झाले ? की एखादी काव्या मनाला/? स्पर्शुन गेली ..
26 Mar 2012 - 9:57 pm | चौकटराजा
अति अवांतर:
वल्ली मित्रा काव्य-विभागाच्या प्रेमात पडलास की दोस्ता. सगळीकडे रिप्लाय दिसत आहेत.
असे काय झाले ? की एखादी काव्या मनाला/? स्पर्शुन गेली ..
आसाच सोउशेय माला यकू चा बी येव लागून रायला बा गनेशा !
26 Mar 2012 - 10:06 pm | चौकटराजा
सुद्धलेखणाबद्दल दीलगिरि
असा मथळा बदलून लिहा.
काही मराठी तज्ञ म्हणतात . पानी हाच शब्द बरोबर आहे. संस्कृतोत्द्भव आहे .मूळ पानीय.
मी पाणी प्यालो = चूक
मि पानी पिलो = हे बरोबर .
26 Mar 2012 - 10:27 pm | प्रचेतस
गणेशा, आवरा. लग्न झाल्यापासून लैच हळूवार झाला आहेस. :P
27 Mar 2012 - 1:36 pm | चौकटराजा
बा मित्रा गणेशा,
जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे
या ओळीत मला एक शंका येते ती अशी की " जीवणाच्या" या शब्दात शुद्धलेखन णा मधे चुकले नसून जी मधे चुकले असावे
कारण याच्या खालच्या ओळीत पंक्तीचा उल्ल्लेख आहे.
तुझा जागृत मित्र
वल्ल्ली
( शुध्द्लेखन स्पेश्यालिष्ट )
27 Mar 2012 - 1:45 pm | प्रचेतस
बुल्स आय चौराकाका.
जेवणाच्या भाऊगर्दित मेहमान अस्तित्व माझे
बसू कसा पंक्तीत तुमच्या, आमरसात सामर्थ्य माझे :P
26 Mar 2012 - 9:37 pm | अत्रुप्त आत्मा
कवितेला आपला सलामच आहे... पण वल्ली म्हणतो तंसं ... शुद्धलेखनात लिहा हो गणेशभाऊ ...अत्यंत चविष्ट पदार्थात केस आल्यासारखं वाटतं
26 Mar 2012 - 9:42 pm | चौकटराजा
हे श्री गणेशा ,
वृत्त बर्याच जागी गणले आहे असे वाटते.
भावगर्दीत की भाउगर्दीत ?
घायाळ नजर शोधती की शोधते ?
किंवा मग घायाळ नजरा शीधती असे हवे की नाही ?
नभांकणात की नभांगणात ?
सर्व जागी अस्तित्व माझे पूर्वी ४ अक्ष्ररी शब्द आहे एकाच जागी बेभान असा ३ अक्ष्ररी शब्द आल्याने जरा काही वेगळे वाटते त्यात
बेभान हे अस्तित्व माझे असे करून रिदम जमला असता.
तसेच
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे
या ओळीत रिदम घसरला आहे .
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,आणि तारे
यातील सुधारित रिदम बरा वाटतो का ?
26 Mar 2012 - 9:52 pm | प्रचेतस
शीधती म्हणजे काय हो चौराकाका? शोधती असे हवे ना. ;)
26 Mar 2012 - 10:00 pm | चौकटराजा
तेव्डी टंकी गणेशा खिशात घ्या ! पण बाकी ?
26 Mar 2012 - 10:02 pm | प्रचेतस
कविता रसग्रहण अजिबात जमत नसल्याने तेव्हढेच दिसते हो. छिद्रान्वेशी ना आम्ही ;)
26 Mar 2012 - 10:03 pm | गणेशा
राजाजी ,
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,आणि तारे
छान वाटते आहे.
बाकी वृत्त यात बघितले नाही. गझल म्हणुन नाहि लिहिली कविता.
फक्त मतला आणि नंतर शेरा मध्ये रदिफ आणि काफिला लिहिलेला आहे. पण ते फक्त गझल सदृष्य आहे. एका शेरात एक वेगळी कविता लिहिता येते म्हणुन शेर लिहायला आवडतात, म्हणुन असे लिहिलेले होते.
पण वृत्तामध्ये प्रत्येक लघु. गुरु यांचे स्थान पक्के करता करता लिखान नॅचरल होत नाही. तेव्हडी प्रतिभा नाही..
मला वेगवेगळे शेर लिहायला आवडते.. पण वृत्त.. शब्दांची योग्य जागा असे लिहायला जमत नाहि.
त्यामुळे गझलेच्या राज्यात जातच नाही सहसा.
..
भाऊगर्दीत . हा शब्द प्रयोग बरोबर आहे का ? मला खरेच माहित नाही. भाव गर्दित असेच लिहिले आहे मी. वेगवगळे भाव.. भावना यांच्या गर्दित या अर्थाने.
...
नभांकणात बरोबर आहे, नभांगणात विखुरले म्हंतले की, आकाशात होयील.
मी त्याच्या प्रत्येक कनामधेय विखुरले आहे माझे अस्तित्व असेच सांगावयाचे आहे.
...
घायाळ नजर शोधते ही छान वाटते आहे.
'शोधती' हा शब्द माझ्या बोलीभाषेत वापरला जातो.
मम्हण्जे आम्ही असे म्हणतो :
काय शोधतीयेस / शोधतोयस असे. त्यामुळे आले तसे.
---- तुमच्या आभ्यासाला सलाम करणारा
गणेशा
27 Mar 2012 - 9:27 am | चौकटराजा
नभांकणात बरोबर आहे, नभांगणात विखुरले म्हंतले की, आकाशात होयील.
मी त्याच्या प्रत्येक कनामधेय विखुरले आहे माझे अस्तित्व असेच सांगावयाचे आहे.
@ गणेशा मित्रा, रात्रभर झोप नाही आली. या " नभांकणा" नी लै म्हंजी लैच तरास दिला.
नभांकण हा काय शब्द आहे ?
नभांचे कण षष्ठी तत्पुरूष
की नभांतील कण सप्तमी तत्पुरूष
नभांगण = नभ रूपी अंगण
पण नभ हे एकच असते . त्यामुळे नभांगण मधील अनुस्वार हा नभाचा नव्हे तर अंगणाचा आहे. मग तो नभांकण या शब्दात कसा येईल ?
खालील उदा पहा
नभ मेघानी आक्रमिले , तारांगण सर्वही व्यापुन आले
त्यात नभ एकच आहे. मेघ अनेक असू शकतात नभ नाही. तेंव्हा नभांकण याची फोड नभ + अंकण करायची झाली तर कण म्हणजे अणू असा
अर्थ रहात नाही. अंकण या शब्दाला जवळचा अर्थ मांडी असा आहे. किंवा आकडेमोड असा आहे.
त्वा मित्रासारखे ब्वोला म्हनलास गड्या ! आ ! आता इसारला का काय ?
26 Mar 2012 - 10:10 pm | चौकटराजा
गणेशा तू वकील हायस का काय ? की कवि हैस ?
मी तुला व्याक्र्ण शिकिवतो तू मला दतीफ टाफिया शिकिव .
27 Mar 2012 - 10:43 am | सांजसंध्या
भापो..पुलेशु
27 Mar 2012 - 12:38 pm | ५० फक्त
जे न देखे रवि, ते देखे कवि,
संपादक तो भावी, कदाचित,
या ओळीची महती पुन्हा एकदा पटवुन देणारी कविता आहे.