ती वेळ निराळी होती . . . ..

अरूण म्हात्रे's picture
अरूण म्हात्रे in जे न देखे रवी...
15 Mar 2012 - 11:52 pm

छातीत फुले फुलण्याची
वार्‍यावर मन झुलण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

डोळ्यात ऋतुंचे पाणी
मौनात मिसळले कोणी
वाळूत स्तब्ध राहताना
लाटेने गहिवरण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

तू वळून हसलीस जेव्हा
नक्षत्र निथळले तेव्हा
मन शहारून मिटण्याची
डोळ्यात चंद्र टिपण्याची . . .
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

ज्या चंद्र कवडशा खाली
कुणी साद घातली ओली
मग चंद्र वळून जाताना
किरणात जळून जाण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

पाऊस परतला जेव्हा
नभ नदीत हसले तेव्हा
कोरड्या मनाने कोणी
गावात परत येण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

थबकून थांबल्या गाई
की जशी शुभ्र पुण्याई
त्या जुन्याच विहिरीपाशी
आईस हाक देण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

गावाच्या सीमेवरती
जगण्याच्या हाका येती
त्या कौलारु स्वप्नांना
आयुष्य दान देण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

हे गाणे जेव्हा लिहिले
मी खूप मला आठवले
शब्दास हाक देताना
आतून रिते होण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

कविता

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

16 Mar 2012 - 12:00 am | दादा कोंडके

खतरनाक कविता!

तुम्ही म्हणून दाखवता तेव्हा - ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे ला ‍पब्लिक ठेका धरतं त्याला जबाव नाही सर.
इथे पण ते आठवतोय.

चाणक्य's picture

17 Mar 2012 - 9:10 am | चाणक्य

काही कार्यक्रम वगॆरे झाला होता काय? (कि हे माझे अद्न्यान आहे)

हो.. कविसंमेलनात ऐकली आहे म्हात्रे साहेबांकडून.
बहुतेक ते असलेल्या कोणत्याही कविसंमेलनात मिळू शकेल.
अधिक माहिती: यूट्यूब.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2012 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा

२काळांचं गणित अतिशय उत्तम मांडलय... मस्त..मस्त..मस्त.. :-)

कवितानागेश's picture

16 Mar 2012 - 12:32 am | कवितानागेश

आवडली.

मेघवेडा's picture

16 Mar 2012 - 1:17 am | मेघवेडा

वा! आवडली कविता. :)

प्राजु's picture

16 Mar 2012 - 4:43 am | प्राजु

नितांत सुंदर!

प्रचेतस's picture

16 Mar 2012 - 8:22 am | प्रचेतस

अत्यंत सुंदर.

पक पक पक's picture

16 Mar 2012 - 8:44 am | पक पक पक

जय हो.... आवड्ली आहे...... :)

शैलेन्द्र's picture

16 Mar 2012 - 9:10 am | शैलेन्द्र

अतिव सुंदर..

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 9:50 am | चौकटराजा

तू वळून हसलीस जेव्हा
नक्षत्र निथळले तेव्हा
मन शहारून मिटण्याची
डोळ्यात चंद्र टिपण्याची . . .
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

वरील ओळीतील नक्शत्राचा उल्लेख पटला नाही.चंद्राचे अस्तित्व आकाशात असताना नेहमी तारकांची दीप्ती नगण्य असते .चंद्र पौणिमेचा असेल विचारूच नका . तू वळून हसलीस जेंव्हा चांद्णे निथळले तेंव्हा अशी ओळ अधिक अर्थ वाही झाली असती. परंतू तिच्या हसण्यातून दृग्गोचर होण्यात ती उडूरदना आहे असे म्हणावयाचे झाल्यास नक्षत्र या शब्दाचे योजन परफेक्ट टेन !

त्या पहिल्या प्रीतिच्या आज लोपल्या खुणा अशा अर्थाचे आजच्या वेळ्चे वर्णन करणारे शेवटचे कडवे टाकले असते तर अंमळ रसिकाला
अधिक आपलेसे करता आले असते .

शैलेन्द्र's picture

16 Mar 2012 - 10:21 am | शैलेन्द्र

:)

समीक्षक काका, जाउद्या ना.. मोजुन मापुन शब्द लिहायला, कविता म्हणजे लिगल ड्राफ्ट नसतो हो. जे त्या क्षणी सुचत, ते तस उतरवल जात, एखाद्या क्षणी उघडलेल्या मनाच्या खिडकीतुन, आत डोकावल्यावर जे प्रकाशचित्र कागदावर उमटत त्यातले सगळेच शब्द-रंग अर्थाचे गुलाम नसतात, तर त्या चित्राचा एकंदर परीणाम कसा साधतोय, ते जास्त महत्वाच असत.

तुमच्या विद्वत्तेचा आणि मताचा आदर आहे पण राहवल नाही म्हणुन लिहील..

जेनी...'s picture

16 Mar 2012 - 10:38 am | जेनी...

शैलेन्द्र सहमत .
एखाद्या क्षणी उघडलेल्या मनाच्या खिडकीतुन, आत डोकावल्यावर जे प्रकाशचित्र कागदावर उमटत त्यातले सगळेच शब्द-रंग अर्थाचे गुलाम नसतात, तर त्या चित्राचा एकंदर परीणाम कसा साधतोय, ते जास्त महत्वाच असत.

ह्या वाक्याना माझ्याकडुन तरि तुम्हाला +++++१२३४५६७८९१०

शैलेंद्र बाबू , प्रणाम, मी समीक्षक नाही. तसा असतो तर ... ही कविता अनुबोधताना. या कवितेच्या तीन गोष्टी प्रामुख्याने विदित होतात हे आपण
सम्यकपणे जाणले पाहिजे म्हणजे रविकिरण मंडळाच्या कविते पासून मराठी कवितेने कशी व्यामिश्र उत्क्रांति साधली आहे याची पुरेपूर अनुभूती
काव्य रसाच्या विशाल सागरात लीलया विहार करणार्‍याला येते. ......नवकविता असो वा जुन्या ओव्या साकी दिंडी असो कोणत्याही भाषेचे यथार्थ एकात्मिक दर्शन देणारा कवि द्रष्टाच म्हटला पाहिजे... नव्हे मी तर पुढे जाउन म्हणेन युगप्रवर्तक ......

अशी काहीशी भाषा वापरली असती. कविता हा भाषेवर आधारित साहित्यप्रकार आहे हे कोणी नाकारून चालेल का ? मग त्यात आस्वादाच्या
पातळीवर थोडासा शब्द खल होणारच ! दुसरे असे मी मी चित्रकार देखील आहे पण आकाश कधीच हिरवे नसते मग सर्जनशीलता म्हणून त्याला
हिरवे बनवून त्यावर " हे आकाश समजावे " अशी पाटी लावायची की काय ?
गायकाने लहर आली म्हणून मालकंसात पंचम घ्यायचा नसतो, दुर्गा रागात कोमल गंधार् ही कसा घेता येईल ?

समीक्षक कुणाला म्हणावे - सोपी व्याख्या-
किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत जागे पणीही

गवतात झोपलेली भिजली दंवात वाट
झाली भली पहाट !
या " गीता" त कविंनाही विचार करायला लावेल अशी, पटेल अशी कविकल्पना आहे. तरीही माडगूळकर हे कवि नव्हेत ते गीतकार आहेत व गीत हा कवितेपेक्षा कमी सर्जनशील प्रकार आहे. " असा घोष करणार्‍याला समीक्षक म्हणावे.

सांजसंध्या's picture

16 Mar 2012 - 1:30 pm | सांजसंध्या

काका
तुमचं ज्ञान, प्रतिभा पाहून थक्क व्हायला होतंय. एक सुचवू का ?
तुम्ही एक नवा बाफ उघडा ना. त्यात तुमच्याकडे असलेले काव्यविषयक ज्ञान लिहून काढले तर ते वाचून कविता पोस्टायला बरं पडेल.

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 2:07 pm | चौकटराजा

मी फक्त आस्वादक आहे. प्रतिभा वगैरे काही नाही. ती असती तर ..... चौकटराजाची धाव शेरापर्यंत च हे वास्त्व मी स्वत: होऊन टाकलेच नसते.
बहिणाबाईंची कविता हे माझे उदाहरण आहे का ? मी बाहवा म्हणलेली काव्ये ही इथे आहेत .

सांजसंध्या's picture

17 Mar 2012 - 6:37 am | सांजसंध्या

या " गीता" त कविंनाही विचार करायला लावेल अशी, पटेल अशी कविकल्पना आहे. तरीही माडगूळकर हे कवि नव्हेत ते गीतकार आहेत व गीत हा कवितेपेक्षा कमी सर्जनशील प्रकार आहे. " असा घोष करणार्‍याला समीक्षक म्हणावे.

काका
तुमच्या विश्लेषणाप्रती प्रचंड आदर बाळगूनही असं म्हणावंसं वाटतंय कि..

तुमच्या खरडवहीत दिलेल्या प्रतिसादासाठी हा टोमणा दिसतोय ;) दुर्दैव ! एका प्रकांड पंडीत असलेल्या आपल्यासारख्या आस्वादकाला मला मुद्दा समजावून सांगता आला नाही , किंवा तुम्हाला मला काय म्हणायचं ते समजून घेता आलं नाही असंही म्हणता येईल.. सुस्पष्ट विचार असले कि नेमकी उदाहरणं देता येतात कदाचित माझ्यासारख्या कविता न कळणा-या (स्वयंघोषित) कवयित्रीला ते जमलं नसावं. हे.मा.शे.पो.

चौकटराजा's picture

17 Mar 2012 - 7:25 am | चौकटराजा

माझ्या माहिती प्रमाणे असे अनेक आहेत जे गदिमाना कवि मानीत नाहीत. याचा उल्लेख नुकत्याच मटा मधे संगीतकार रवि यांचेवर लिहिलेल्या लेखातही केलेला आहे . तो लेख मी लिहिलेला नाही.

सर्वांचा सूर एकंदरीत असा दिसतो की फेसबुक प्रमाणेच इथेही लाइक चे क्लिक मारीत बसा. व कट पेस्ट करण्यासाठी खालील प्रमाणे एक फाईल
तयार करा
वा. नंबरी कविता !
वॉव ! शब्दरचना आवडली !
सुरेख कविता !
लै खास !
आवडली.
+१११११११११११११११११
मस्तय !
छान जमली आहे !
मनाला हुर्हूर लावणारी कविता !
( इथे डोळा बारीक केलेली स्मायली टाकली आहे , ती प्रतिकात्मक आहे . आमची स्मायली आमचा स्वयंभू सर्जनशील अविष्कार असल्याने
ती आस्वादकाच्या सूचने प्रमाणे बदलण्याचे बंधन आमचे वर नाही.. आम्ही कोण म्हणून काय पुसता.....आम्ही असू.......... ! )

सांजसंध्या's picture

17 Mar 2012 - 7:43 am | सांजसंध्या

सर्वांचा सूर एकंदरीत असा दिसतो की फेसबुक प्रमाणेच इथेही लाइक चे क्लिक मारीत बसा. व कट पेस्ट करण्यासाठी खालील प्रमाणे एक फाईल

असा समज झाला का तुमचा ?? बरं बर.. चालू द्या. समज - गैरसमज खोडून काढणे हे आपले काम नसावे, हो ना हो काका ?

मटाचा संदर्भ आधी दिला नाही ना म्हणून कळालं नाही हो काका. क्षमस्व ! तुम्ही मटाला पत्र लिहून त्या लेखाचा समाचार का घेत नाही ?

चौकटराजा's picture

17 Mar 2012 - 9:26 am | चौकटराजा

त्यात लेखकाने रवि व माडगूळकर यांची समीक्षकानी नीट दखल घेतली नाही असा माझाच सूर लावला आहे. त्यामुळे मटाला आभाराचे पत्र लिहीन म्हणतो.

चौकटराजा's picture

17 Mar 2012 - 9:47 am | चौकटराजा

"जाउ द्या ना काका " असे सल्ले आलेले आहेत ना ?

शैलेन्द्र's picture

16 Mar 2012 - 1:37 pm | शैलेन्द्र

प्रणाम काका,

"कविता हा भाषेवर आधारित साहित्यप्रकार आहे हे कोणी नाकारून चालेल का ? मग त्यात आस्वादाच्या
पातळीवर थोडासा शब्द खल होणारच !"

शब्द खल होण्यावर बंधन नाही, पण मला म्हणायच अस की कवितेतल्या एका एका शब्दाला पारखुन त्याचे वजन करु गेले तर कविता हे एक शास्त्र होइल, किंबहुना बांधेसुद कविता पाडणे हे तांत्रीक काम ठरेल, कविच्या मनस्वितेला, जो माझ्या मते तरी कवितेचा प्राण आहे, जागा राहणार नाही. अरुणजींनी ही कविता कोणत्या मुडमध्ये लिहीली ते आपल्याला माहीत नाही, पण ती माझ्या एका विशीष्ट संवेदनांना हलवुन गेली, आता जिथे ती मला भिडली, तिथे"च" इतरांना भिडावी, किंवा अरुणजींना जे म्हणायचेय, ते अगदी तसेच मला आकळावे असेही काही नाही. त्याअर्थी प्रत्येक कविता प्रत्येकापुर्ती वेगळी असते अस मला वाटत. शब्द्प्रामाण्यापेक्षा कवितेचा कोलाज, मनावर कोणते चित्र काढतोय ते अनुभवा असं मी जे म्हणतो ते त्या अर्थाने.

"दुसरे असे मी मी चित्रकार देखील आहे पण आकाश कधीच हिरवे नसते मग सर्जनशीलता म्हणून त्याला हिरवे बनवून त्यावर " हे आकाश समजावे " अशी पाटी लावायची की काय ?"

काय हरकत आहे? तस करता येत नसेल तर, मग चित्रकलेत व छायाचित्रणात फरक काय राहिला? जर तुमच्या मनातल आकाश हिरव असेल तर ते कागदावर हिरवच उतरायला हव, नपेक्शा ते चित्र म्हणजे एक मोजुनमापुन केलेले रंगलेपण होइल.

चौकटराजा's picture

16 Mar 2012 - 1:58 pm | चौकटराजा

यात फरक आहेच ना , चित्रात निवड आहे. प्रकाश चित्रात कमी निवड. ( नको ते फोकसच्या बाहेर नेता येते) पण म्हणून पोटात डोळा काढायचा काय ? कला जी जरा फक्त स्वत: साठी असेल तर प्रश्न मिटला. त्यात भागीदार आला की निकष आलेच. रसिकाना कलाकार मायबाप म्हणतात ते
काही निकष पाळूनच ! मला हे असं ठेवायचं आहे ! तुम्हाला काय समजायचे ते समजा ! असा अप्रोच खुद्द अरूण साहेब घेतात ते त्याना एकदा
विचार्रोन पहा ना !

दुसरे असे की एकेक शव्दाचा कीस मी कुठे काढला आहे. उलट तिचे दात उडू म्हणहे तारकांसारखे असतील तर नक्शत्र हा शब्द् १०० टक्के दाद देण्यासारखा आहे असेच मी म्हटले आहे.
उगीच तोडू लचका नाही अशातला मी
क्या बात है ही म्हणतो आहे तशातला मी

शैलेन्द्र's picture

16 Mar 2012 - 2:35 pm | शैलेन्द्र

"कला जी जरा फक्त स्वत: साठी असेल तर प्रश्न मिटला. त्यात भागीदार आला की निकष आलेच. रसिकाना कलाकार मायबाप म्हणतात ते काही निकष पाळूनच ! "

नाही पटत, एकवेळेस पर्फोर्मींग आर्टवाल्यांनी हे म्हटल तर मी मान्य करेन, कारण त्यांना स्वता:ला व्यक्त करण्याईतकेच इतरांचे रंजन्/प्रबोधन करणे महत्वाचे वाटते. पण कविता असा रसिकांचा विचार करुन लिहीली तर ती नक्किच निम्न दर्जाची होइल. कवितेत मला काय वाटते किंवा कसे वाटते हे जास्त महत्वाचे असते.

"मला हे असं ठेवायचं आहे ! तुम्हाला काय समजायचे ते समजा ! असा अप्रोच खुद्द अरूण साहेब घेतात ते त्याना एकदा विचार्रोन पहा ना !"

असा उघड अप्रोच कोणी सभ्य माणुस घेत नाही (ग्रेससारखे कवी घेतातही) , पण म्हणुन "आम्हाला अशा स्पेसीफिकेशनचा माल पाहिजे, काढा भट्टीतुन आणि द्या बांधुन" अशी मागणी करनही चुकच ना..

तुम्हांला काय म्हणायचय ते मला कळतय पण पटत नाही, आणि तुमच्या वेगळ्या मताचाही आदर आहेच.. तेंव्हा हा शेवटचा प्रतिसाद..

:)

मला हे असं ठेवायचं आहे ! तुम्हाला काय समजायचे ते समजा ! असा अप्रोच खुद्द अरूण साहेब घेतात ते त्याना एकदा विचार्रोन पहा ना ! "

यकु's picture

16 Mar 2012 - 2:44 pm | यकु

सहमत.

सांजसंध्या's picture

16 Mar 2012 - 8:18 pm | सांजसंध्या

माफ करा. खरं तर मला या चर्चेत भाग घेण्याचा अधिकार नाही. माझं एक तोड़कं मोडकं मत इथे द्यायचा मोह आवरत नाही.

अ‍ॅस्ट्रॅक्ट आर्ट या प्रकाराला पिकासोने मान्यता मिळवून दिली. हे त्या कलाकाराचं व्यक्त होणं आहे. जसं आहे तसं चित्र काढलं तर त्यात कारागिरी दिसून येते. सृजनाला वाव राहत नाही. यामुळेच मनस्वी चित्रकार अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कलेकडे वळाले. मला व्हॅन गॉगची स्टारी नाईट या नावाने प्रसिद्ध असलेल्या चित्रांनी भुरळ घातली. कलाकार भाष्य करू पाहतो तेव्हां कमीत कमी शब्दांत, रेषांत जास्तीत जास्त आशय येण्यासाठी त्याला पतिमांची मालिका उभी करून त्यातून आपलं भाष्य मांडायचं असतं. त्याने अनुभवलेली अस्वस्थता तो प्रतिमांमधून मांडत जातो . तो ज्या प्रसण्गातून गेला तेच प्रसंग दुस-याच्या वाट्याला येणं शक्य नाही. पण त्यातून येणा-या अस्वस्थता आदी जाणिवांची तीव्रता कुणी ना कुणी अनुभवलेली असते. ती अनुभूति त्या कलाकृतीकडे पाहतांना दुस-या कुणाला आली तर ती जाणीव पलिकडे पोहोचते. प्रत्येकाला अशी आर्ट, कविता, व्यक्तीकरण आवडेलच असे नाही पण कुणाला न कुणाला ते आपलंस वाटू शकेल. तीच या कलेची पावती. शेवटी म्हणतात ना, ज्याला जो अर्थ लागेल तोच त्याच्यापुरता खरा !

व्हॅन गॉगच्या चित्रात झाडं आकाशाला टेकलेली असतात. तशी ती असतात का ? पण अशी आभाळाला गवसणी घालण्याचं स्वप्न त्याने पाहीलं होतं. तेच त्याने चित्रांमधून सांगितलं. चित्रांची ही भाषा कलाकाराला समजून घेतल्याशिवाय शक्य नाही अथवा त्या प्रतिभेशी रिलेट झाल्याशिवाय शक्य नाही. त्याच्या चित्रांमधे चांदण्या सर्पाकृती आकारात दाख्वल्या जातात. त्याने चित्राला एक गती प्राप्त होते. त्यांचं एकमेकांशी असलेलं संभाषंण दिसून येत. त्याने कलाकार म्हणून रेखाटलं तेच आता आईनस्टाईनच्या सिद्धांतातून सिद्ध होतंय.

असाधारण प्रतिभा बहुधा यालाच म्हणत असावेत. नव्याला नावं ठेवण्याआधी किमान त्यामागचा विचार जाणून घेतला जावा असं प्रांमाणिकपणे म्हणावंसं वाटतं.

>>>>>माफ करा. खरं तर मला या चर्चेत भाग घेण्याचा अधिकार नाही. माझं एक तोड़कं मोडकं मत इथे द्यायचा मोह आवरत नाही.

----- आपल्या विनयशील वागण्याचा मला नेहमीच हेवा वाटत आला आहे.
(हे तुम्हाला नाही बरं, हे इथलं असंच एक मिपाप्रसिद्ध वाक्य आहे).

चर्चेत भाग घेण्याचा अधिकार नाही? इथं चर्चा करायला कुणाला केंब्रिजच्या परिक्षा पास व्हाव्या लागत नाही.
सदस्य झालात की जे वाट्‍टेल ते ठणकवू शकता. विनय वगैरे ठिक आहे, पण उगाच इथल्या भयानक अभ्यासू, हुशार, महान, मूर्ख, वाया गेलेले, स्क्रू ढिले वगैरे वगैरे वाटणार्‍या लोकांची ‍भीती बाळगू नका, एवढंच सांगतो.

बाकी प्रतिसाद निवांत वाचला जाईल.

शैलेन्द्र's picture

16 Mar 2012 - 8:39 pm | शैलेन्द्र

"सदस्य झालात की जे वाट्‍टेल ते ठणकवू शकता. विनय वगैरे ठिक आहे, पण उगाच इथल्या भयानक अभ्यासू, हुशार, महान, मूर्ख, वाया गेलेले, स्क्रू ढिले वगैरे वगैरे वाटणार्‍या लोकांची ‍भीती बाळगू नका, एवढंच सांगतो."

+१

"सदस्य झालात की जे वाट्‍टेल ते ठणकवू शकता. विनय वगैरे ठिक आहे, पण उगाच इथल्या भयानक अभ्यासू, हुशार, महान, मूर्ख, वाया गेलेले, स्क्रू ढिले वगैरे वगैरे वाटणार्‍या लोकांची ‍भीती बाळगू नका, एवढंच सांगतो."

________________________________________________________________________

तरि वाटतेच भिती :(...कधी कोन येवुन कुठला शब्द उचलुन आप्ल्या तोंडावर फेकुन मारेल ह्याचा नेमच नाय लागत . म्ह्न्जे मारनार्‍याचा नेम लागतो ,बरोब्बर तोन्डावर मारतो , पण नेम चुकवायची प्र्याक्टिस नाय ना अजुन
ती एकदा झाली कि मग आम्हि नवोदित सुद्धा भारि पडायला लागु :P

( आशा बाळगनारि ...एक चुर्मुरित नारि ) पूजा ;)

:D

>>>ती एकदा झाली कि मग आम्हि नवोदित सुद्धा भारि पडायला लागु

----- पहा, पहा, आत्ताच ही हिंमत तर पुढे काय मिरे वाटणार आहात ते दिसतंयच. :p

अहो पूजा काकू, इथे ज्येष्‍ठ, श्रेष्‍ठ, ‍वरिष्‍ठ, सुष्‍ठ, खाष्‍ठ, भ्रमिष्‍ठ,‍‍ किर्मीनिष्‍ठ सदस्यांच्या हजार पिढ्या नांदत असतील..
तेव्हा नवोदित कधी प्रस्थापित होतात आणि प्रस्थापित कधी अडगळीत जातात ते कळतही नाही.
रोज लॉगिन केलं की ज्येष्‍ठ, श्रेष्‍ठ, ‍वरिष्‍ठ, सुष्‍ठ, खाष्‍ठ, भ्रमिष्‍ठ,‍‍ किर्मीनिष्‍ठ व्हायचं आणि चालू पडायचं हे उत्तम!
उगाच कसलीही प्रॅक्टीस करत बसू नका.

ब्वार्र काका
तुमचा सल्ला प्रियोरिटित घेतलाय

:P

;)

ढॅण्‍णवॅद.. ढॅण्णवॅद.

ते तुम्ही कोणत्या परस्पेक्टीव्ह कोनातून पहाता त्यावर आहे. गॉग च्या काय माझ्या चित्रात सुद्धा झाडे आकाशाला टेकलेली दाखविता येतील.
पण ती टेकलेली असणार नाहीत. गगनचुम्बी इमारती आपण म्हणतोच ना ! ते त्याची उंची सांगण्याचे एक लाक्षणिक स्वरूप आहे. तसे कविनी
घेतले तर त्यात वावगे काहीच नाही. गवतात झोपलेली वाट हे वास्तव नाही पण ती अगदीच खुळी कवि कल्पना नाही.

सांजसंध्या's picture

17 Mar 2012 - 7:48 am | सांजसंध्या

हम्म
तो व्हॅन गॉग एक खुळा, त्याला मानणारे सात खुळे आणि त्याचं उदाहरण देणारी खुळचट मी... ! आम्हाला तुमचं म्हणणं समजण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

काय असते . एक कलाकृति निर्माण होते. मग कलाकार कालानुक्रमाने दिवंगत होतो . आपापली नजर, वृती व विचार या प्रमाणे रसिक त्याच्या उद्देशाची कल्पना करीत रहातात. तो जर हयात असेल तर या कल्पनांच्या अविष्काराने व्यथित तरी होतो, भारून जातो किंवा चाट पडतो. गप्प बसला तर कल्पनांना उत येतो. बोलला तर सार्‍याच कल्पना उन्मलून पडतात.
तीनशे चारशे वर्षानी हती व चार आंधळे अशी त्या कला़कृतीची अवस्था होउ शकते.

माझे आजोबा टिळकांचा पुतळा करीत असताना जाता येताचे विचारीत. हे काय न्या रानडे ? हे काय तुमचे वडील वाटते ? आजोबा सांगत हे लो. आहेत . हे जर आजोबा गप्प बसते तर वामनरावानी त्यांच्या वडिलांचा सुंदर पुतळा केलेला असून त्यातून त्यांची आपल्या पित्यावरील भक्ती
दिसून येते. असे ही लिहिले गेले असते. असो.

कमाल आहे , हेच तर शैलेन्द्रजी समजावन्याचा प्रयत्न करतायत काका...

जरा पून्हा एकदा त्यांच्या सगळ्या पोस्ट नजरेखालुन घाला ...तुम्हाला
कळेल मग कि तुमची ही पोस्ट आणि त्यांच्या एकंदरित सगळ्या पोस्ट ह्यत किती साम्य आहे ते.

बाकि आपल्या एवढि चिरफाड कुनाला इथे जमेल अस वाटत नाहि .

जाई.'s picture

16 Mar 2012 - 9:53 am | जाई.

सुंदर

ज्या चंद्र कवडशा खाली
कुणी साद घातली ओली
मग चंद्र वळून जाताना
किरणात जळून जाण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

अफलातून ..........

प्यारे१'s picture

16 Mar 2012 - 10:25 am | प्यारे१

खूपच छान!

गोंधळी's picture

16 Mar 2012 - 10:53 am | गोंधळी

कविता आवडली.

स्वातीविशु's picture

16 Mar 2012 - 11:14 am | स्वातीविशु

कविता आवडली.

सांजसंध्या's picture

16 Mar 2012 - 11:24 am | सांजसंध्या

अप्रतिम कविता / गीत..
खूप्प आवडली..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Mar 2012 - 11:25 am | मिसळलेला काव्यप्रेमी

खुपचं सुंदर!!

थबकून थांबल्या गाई
की जशी शुभ्र पुण्याई
त्या जुन्याच विहिरीपाशी
आईस हाक देण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

भन्नाट!!

चिगो's picture

16 Mar 2012 - 12:44 pm | चिगो

शब्दास हाक देताना
आतून रिते होण्याची
ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे.

व्वा.. क्या बात है !

सुंदर कविता.. अतिशय आवडली.

प्रभो's picture

16 Mar 2012 - 1:12 pm | प्रभो

आवडली.

sneharani's picture

16 Mar 2012 - 1:35 pm | sneharani

मस्त कविता!!

पैसा's picture

16 Mar 2012 - 6:53 pm | पैसा

वाचता वाचता "वो शाम कुछ अजीब थी" उगाच आठवलं.

चाणक्य's picture

17 Mar 2012 - 7:26 am | चाणक्य

सहमत. मला ही आठवल होत

मृत्युन्जय's picture

16 Mar 2012 - 9:32 pm | मृत्युन्जय

सुंदर कविता

अभिजीत राजवाडे's picture

17 Mar 2012 - 12:17 am | अभिजीत राजवाडे

साधी सोपी रचना असलेली व मनापर्यंत पोहचणारी नादमय कविता.

मस्त कविता.

या निमित्ताने आम्हाला आमचे हिंदीतले लाडके गायक अल्ताफ राजा यांनी गायलेल्या "तूम तो ठेहरे परदेसी" या अप्रतिम, नितांत सुंदर, भावव्याकूल, हळूवार गीताच्या "वोह काल दुसरा था, ये काल दुसरा हैं" या सुमधूर काव्यपंक्तींची आठवण झाली. ;)

ही कविता अनुबोधताना. या कवितेच्या तीन गोष्टी प्रामुख्याने विदित होतात हे आपण
सम्यकपणे जाणले पाहिजे म्हणजे रविकिरण मंडळाच्या कविते पासून मराठी कवितेने कशी व्यामिश्र उत्क्रांति साधली आहे याची पुरेपूर अनुभूती
काव्य रसाच्या विशाल सागरात लीलया विहार करणार्‍याला येते. ......नवकविता असो वा जुन्या ओव्या साकी दिंडी असो कोणत्याही भाषेचे यथार्थ एकात्मिक दर्शन देणारा कवि द्रष्टाच म्हटला पाहिजे... नव्हे मी तर पुढे जाउन म्हणेन युगप्रवर्तक ......

देवनागरी लीपीत लिहिलेली वरील वाक्ये कुठल्या भाषेतील आहेत हे कुणी सांगेल काय?

चौकटराजा's picture

17 Mar 2012 - 10:07 am | चौकटराजा

विशिष्ट लोकानी वापरावयाची . आपल्याला सामान्य( त्यात चौकट ही आला ) आस्वादकाना ती अलाउड नाही .

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2012 - 1:12 pm | परिकथेतील राजकुमार

एखाद्या इतक्या सुंदर धाग्यावरती येवढ्या वेडझव्या प्रतिक्रिया आजवर कधीच बघितल्या नव्हत्या.

चौकटराजा's picture

17 Mar 2012 - 3:06 pm | चौकटराजा

मिपा मधे " परा" चा कावळा करण्याची परंपरा जुनीच आहे. एकटाच एखादा " वेडा" भिंतीवर दगड मारीत बसला तर सवालच नाही. अनेक एकमेकांवर दगड मारायला लागले तर ...... ? तर ................ तर ... या तर मधेच गोम आहे. पण मला वाटते. प्रतिसाद " येडझवा " म्हण्ण्या पेक्षा सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर सुंदर ....अतिसुंदर सुंदर असा धतड ततड टाईप प्रतिसाद आपणच का टाकत नाही ?