कृपाशंकर सिंह यांना आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केल्याचा साक्षात्कार नुकताच झाला असून, या आपल्या जीवनातल्या वाटचालीविषयी त्यांनी एक पुस्तक लिहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सतरंज्या उचलण्यात राजकारणांत आयुष्य घालविणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच, आयुष्यभर लोकलच्या हँडलला लटकून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना जे आजपर्यंत कधी जमले नाही ते कृपाशंकर सिंह यांना कसे शक्य झाले याचे रहस्य या पुस्तकातून उलगडले जाणार आहे.
ही बातमी आम्हाला कळताच आम्ही त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचे हक्क त्वरित मिळविले आहेत. पण ते हक्क देतानाच कृपाशंकर सिंह यांनी "ते पुस्तकला काय नाव द्यायचा ते तुमीच बगा" असे सांगितल्यामुळे आता आम्ही या पुस्तकाच्या शीर्षकाच्या शोधात आहोत. आमच्या मनात काही नांवे आहेत ती याप्रमाणे,
'तरंगा'तून तुरुंगाकडे
सोनिया कृपा
यूपी ते दिल्ली व्हाया महाराष्ट्र
याकरिता आम्ही या पुस्तकाला शीर्षक सुचवा ही स्पर्धा येथे आयोजित केली आहे, ज्यांचे शीर्षक या पुस्तकांसाठी निवडले जाईल, त्या विजेत्यास या पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून देण्यात येईल.
प्रतिक्रिया
5 Mar 2012 - 8:20 am | सांजसंध्या
भैय्या हातपाय पसरी
5 Mar 2012 - 9:35 am | मूकवाचक
कृपानिधी (कृपा आणि निधी दोन्ही महत्वाचे).
5 Mar 2012 - 10:25 am | राजो
"केळ्याने होत आहे रे..."
5 Mar 2012 - 12:40 pm | चौकटराजा
कृपा व सिंधु दुर्ग यांची वाटचाल सारखीच आहे का हो ? असेल तर कोण कुणाचे प्रेरणास्थान आहे ?
5 Mar 2012 - 12:43 pm | चौकटराजा
अर्थ- एक चांगले कोडे !
5 Mar 2012 - 1:39 pm | रानी १३
मी आणि सोनिया !!!!
5 Mar 2012 - 2:47 pm | अत्रुप्त आत्मा
माझे मुंबईतले बस्तान आणी मुंबई बाहेरचे कब्रस्तान ... (एक धावता अढावा ;-) )
5 Mar 2012 - 2:51 pm | यकु
कृपा झाला सांडा फुल्या फुल्या फुल्या
5 Mar 2012 - 3:09 pm | परिकथेतील राजकुमार
बिन डोकू
5 Mar 2012 - 7:47 pm | सू डोकू
प.क.तील 'खाज'कुमार
5 Mar 2012 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा
@प.क.तील 'खाज'कुमार>>>
सू डोकू ,पार सड्कून हाणलस रे 
6 Mar 2012 - 1:39 am | सू डोकू
क्षमस्व महात्मन! काही आगळिक, प्रमाद माझ्याकडून अजाणतेपणी घडला असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी!
6 Mar 2012 - 1:23 pm | परिकथेतील राजकुमार
झोंबतय का हो फार ?
आम्ही सांगितलेले नाव फारच मनाला लागलेले दिसतेय बॉ तुमच्या. ;)
असो...
पुढील चर्चा खवत करू.
6 Mar 2012 - 3:07 pm | सू डोकू
झोंबले नाही ब्वा तुम्ही जसे नाव सुचविले, तसेच आम्हालाही सुचले इतकेच.
5 Mar 2012 - 4:34 pm | मी-सौरभ
'मै भी (सोनिया) गांधीवादी'
5 Mar 2012 - 6:05 pm | निश
मुंबई तुमचि, लुटतो क्रुपा सिंग आणि कलमाडी
5 Mar 2012 - 7:19 pm | अमृत
अमृत
5 Mar 2012 - 11:25 pm | आशु जोग
कृपा संबंधी वाचताना
एक नाव 'रावसाहेब शेखावत' हे नाव ऐकायला मिळते
ही व्यक्ती कोण. तिचा नेमका रोल काय
6 Mar 2012 - 3:54 am | हुप्प्या
कुटुंब रंगलंय काळ्या पैशात.
बाप नंबरी बेटा दस नंबरी
6 Mar 2012 - 1:11 pm | Hrushikesh
अनेक शीर्षके असु शकतील कारण कृपाशंकर यांच्या लीला अगाध आहेत. त्यामुळे विश्वकोशा सारखे अनेक भाग बनू शकतील.
मला भावलेली काही (भाग - अ ते आ साठी):
१ कमरेवरचे डोईवर
२ हिमनगाची काहीच टोके (वर आलेली)
३ विषवल्ली आम्हा सोयरे
४ सोनियांची कृपा