जनलोकपाल बिल नापास झाल्यावर तुम्ही कुणाच्या नावाने बोटे मोडाल?

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
27 Aug 2011 - 12:22 am
गाभा: 

चर्चेसाठी समजू या की तमाम विद्वान, "ठेविले अनंते तैसेची रहावे" ह्या वचनावर ठाम असणार्‍या विचारवंतांच्या रेट्यामुळे आणि निष्कलंक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने जनपाल बिल नापास झाले. सगळी मंडळी आपापल्या घरला गेली, अण्णा जिवंत असले तर राळेगणशिंदीला रवाना नाहीतर पंचत्त्वात विलीन झाले असे समजू .
मला उत्सुकता आहे की पुढचा लाखो करोडोंचा भ्रष्टाचार उघडकीस येईल आणि परमपवित्र संसद आपल्या परमपूज्य सदस्यांच्या तोंडातून जेव्हा असे आश्वासन देईल की (नेहमीप्रमाणेच) चौकशी चालू आहे, निर्णय झाला तर आणि की शिक्षा होईलच. तेव्हा आपण कुणाच्या नावाने बोटे मोडाल?
चर्चेच्या आधारासाठी काही मुद्दे
१. संसद ही सर्वश्रेष्ट, परमपवित्र आहे.
२. सगळे लोकनियुक्त प्रतिनिधी स्वच्छ चारित्र्याचे आणि संशय घेण्यापलीकडचे आहेत.
३. न्यायालये राजकीय हस्तक्षेपापासून दूर असतात आणि आपले काम चोख करत असतात.
४. कुणीही उपटसुंभाने उठावे आणि आंदोलन करावे अशी आपली लोकशाही रस्त्यावर पडलेली नाही. बदल फक्त निवडणूकीच्या वेळीच होऊ शकतो.
वगैरे, वगैरे, वगैरे नेहमीचेच यशस्वी मुद्दे.

काही पर्याय असे
१. ठेविले अनंते तैसेचि रहावे.
२. भ्रष्टाचार वगैरे अफवा आहेत. आपल्या स्वच्छ नेत्यांचा मत्सर वाटून काही लोकांनी परकीय शक्तीच्या मदतीने रचलेला हा एक कट आहे.
३. बघताय काय सामील व्हा!

प्रतिक्रिया

चर्चेच्या आधारातील मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा, कि संसद सर्वश्रेष्ठ ( आणि परमपवित्र देखील )देखील, यात दुमत नसावे.
पर्यायांपैकी म्हणाल, तर त्यात ३रा पर्याय उत्तम... आणि मध्ये मध्ये दमल्या-भागल्यास पहिला पर्याय बॅकअप म्हणुन आहेच :)

अर्धवटराव

हुप्प्या's picture

27 Aug 2011 - 3:11 am | हुप्प्या

नामास नव्हे तर नापास म्हणायचे होते. प्रमादाबद्दल क्षमस्व. आता संपादन करता येत नाही.

चिरोटा's picture

27 Aug 2011 - 8:06 pm | चिरोटा

उद्या अण्णा उपोषण सोडणार. महत्वाचे मुद्दे मान्य झाले.(म्हणजे तसे टी.व्ही.वाल्यांनी तरी सांगितले).

संजीव नाईक's picture

28 Aug 2011 - 7:29 pm | संजीव नाईक

जरा लिहण्यास कटांळा आला म्हणुन थेट दुवा देत आहे आपल्याला आण्णा बद्द्ल १९९८ चे आण्णा का आदर्शलोक यह कभी एक विशाल मंदिरालय था, मगर आज एक प्रगतीशील गाव है! कितु...............

http://vastuclass.blogspot.com

वर पाहा २७ पानी निबंध मी आणि माझे गुरुजी,,,,,,,,,,,,,,,,,,, संजीव.