वर्षे सुकली गुच्छ बांधले काडी एक तयातिल चंदन
वळून मागे शोधू पाहे; गंध मंडली; शापित मन
उगाळली आयुष्ये परि ना वात सरे ना ऋतुमंथन
काळावरती ठसे अबाधित; तलम रेशमी हे बंधन
घटअमृतसय निराकार; उभयांना विरहाचे प्राक्तन
शोध निरागस क्षतापलिकडे; रोज सागराचे स्पंदन
.............................अज्ञात
प्रतिक्रिया
12 Jun 2011 - 9:22 am | पाषाणभेद
व्वा अज्ञातकुल एका वेगळ्याच शैलीने तूम्ही विरहाची वेदना चितारली आहे.
फक्त घटअमृतसय हा उल्लेख का केलात ते सांगितले तर उत्तमच आहे. त्यामुळे नायकाच्या भावना अधिक समजतील.
12 Jun 2011 - 9:52 am | अज्ञातकुल
अमृतघटाप्रमाणे असलेली आठवण अथवा "आठवणींचा अमृतघट" असं म्हणायचंय मला. :)
आपल्या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार. असाच लोभ असू द्यावा कायम. धन्यवाद.