राष्ट्रपतींचा निर्णय लांबल्यास फाशीऐवजी जन्मठेप द्यावी?
वर्तमानपत्रातील वरील शीर्षकाच्या बातमीने चांगलेच लक्ष वेधून घेतले ! पंजाबमधील फाशीची शिक्षा झालेल्या दहशतवादी भुल्लर याने राष्ट्रपतींकडे 'साडेसात वर्षांपूर्वी ' दयेचा अर्ज केलेला आहे. बिचा-याची (!) तब्येत , दहा वर्षांहून अधिक काळ तुरुंगातच असल्याने, ठीक नाही. त्यामुळे ' आपल्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत व्हावे ' , अशी मागणी करणा-या भुल्लरच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे!
राष्ट्रपतीकडे सादर केलेल्या दयेच्या याचिकेवर दीर्घकाळ निर्णय न झाल्यास संबंधित गुन्हेगाराच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात यावे , अशा प्रकारची मागणी भुल्लरच्या याचिकेत केलेली आहे.
राष्ट्रपतीनी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीच्या दयेच्या अर्जावर ' अमुक मुदतीत ' निर्णय द्यावा, अन्यथा तसा निर्णय ' तमुक मुदतीत न दिल्यास , फाशीऐवजी जन्मठेप द्यावी - ' असा कायदा करावा लागेल काय? एकतर राष्ट्रपतींच्या कामकाज पद्धतीवर ही टीका वाटत आहे , दुसरे म्हणजे आरोपीच्या मागणीवर कायदा-बदल होणे , ही विसंगती वाटते!
यावर असे म्हणावेसे वाटते की न्यायाची बूज राखण्यासाठी, राष्ट्रपतीनी आपल्या 'भारतभर चालत राहणाऱ्या दौ-यातल्या , ' वेळ-काढू धोरणा 'तून , ' पुरेसा वेळ ' दयेच्या अर्जावरील 'महत्वाच्या पण अति-प्रलंबित निर्णयां 'साठी, अतिशीघ्रतेने काढावा ! राष्ट्रपतींच्या प्रलंबित निर्णयामुळे अंतिमत: आमचाच पैसा गुन्हेगारांच्या 'पालन-पोषणा 'त खर्च होत आहे, हेही दुर्लक्षून चालणार नाही!
त्या क्रूरकर्मा निर्दयी कसाबाला फासावर लवकरात लवकर लटकलेले पहायला सा-या जगातल्या भारतियांचे डोळे लागून राहिले आहेत हो ,राष्ट्रपती महोदया! त्याशिवाय शहिदांच्या आत्म्याला शांती मिळणारच नाही ; असे मला तरी वाटते , ... तुम्हाला ?
प्रतिक्रिया
25 May 2011 - 12:52 am | विकास
जरी औपचारीकपणे राष्ट्रपती दयेचा अर्ज मान्य/अमान्य करत असले तरी त्यासंदर्भातील निर्णयप्रक्रीया ही गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीतील आहे. आठवते त्याप्रमाणे, अफझल गुरूच्या बाब्तील त्याचा अर्थ गृहमंत्रालयातच रखडलेला आहे त्यामुळे राष्ट्रपती निर्णय घेऊ शकत नाहीत.
25 May 2011 - 1:15 am | पंगा
एक गोष्ट समजली नाही. यात दिल्ली सरकारचा नेमका काय संबंध? दिल्ली सरकारला नोटीस काय म्हणून बजावण्यात आलेली आहे? राष्ट्रपती / गृहमंत्रालय हे केंद्रशासनाच्या अखत्यारीत येतात की दिल्ली सरकारच्या?
25 May 2011 - 1:39 am | विकास
ही बातमी पाहील्यावर मला वाटते त्यांना केंद्रसरकारच म्हणायचे असावे. मी तसेच या बातमीमुळे गृहीत धरले होते.
25 May 2011 - 1:44 am | पंगा
स्पष्टीकरणाबद्दल आभारी आहे.
(माहिती ही जर अशी स्वतः अर्थ लावून वाचावी लागणार असेल, तर कठीण आहे.)
28 May 2011 - 6:05 am | गोगोल
असेच म्हणतो.
25 May 2011 - 12:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मा.न्यायालयाचा एकदा निर्णय झाला की, उगाच मानवीय दृष्टीकोन, दयेचा अर्ज वगैरे किंवा अन्य कारणाने असलेला निर्णय बदलू नये असे वाटते.
बाकी, चालू द्या......!
-दिलीप बिरुटे
25 May 2011 - 1:01 am | शुचि
आरोपीच नाही तर गुन्हेगार.
गुन्हेगारच असा राष्ट्रपतींवर दबाव आणू लागले तर विचारायलाच नको.
चोर तो चोर अन वर शिरजोर म्हणतात ते असे.
25 May 2011 - 1:27 am | पंगा
कसे?
त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका - बोले तो विनंती - दाखल केली. त्यावर काही कृती करायची की नाही हा निर्णय सर्वस्वी सर्वोच्च न्यायालयाचा. एकदा कृती करायचा निर्णय झाल्यावर नोटीस बजावणारेही सर्वोच्च न्यायालयच. यात त्याच्या अरेरावीचा प्रश्न कोठे आला?
आरोपी असो वा गुन्हेगार असो वा निर्दोष असो, सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे. तो त्याने बजावला, इतकेच. त्यापुढे चेंडू हा पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात आहे, आणि त्यावर काय वाटेल तो निर्णय घेणे हे संपूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत आहे, आणि कोणत्याही एका प्रकारचा निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालय बांधील नाही.
उगाच नसत्या झाडावर भुंकण्यात काय हशील?
25 May 2011 - 1:49 am | शुचि
मी ती बातमी मिस्-इन्टरप्रिट केली. आता नीट कळली.
25 May 2011 - 8:16 am | नरेशकुमार
ह्म्म
हम्म.
27 May 2011 - 10:37 pm | देवदत्त
आपल्या राष्ट्रपती नाहीतरी उद्घाटनांच्या फीती कापण्यात मग्न असतात.
त्यामुळे त्यांना वेळ मिळणारच नाही. आणि मग निर्णयाची वाट पाहत कैद्याला तुरुंगात रहावे लागल्याने ती आपोआपच जन्मठेप होईल.