काही अडचणी आहेत का?

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
4 May 2011 - 7:30 pm

नमस्कार,
गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वापरताना खूप अडचणी येत होत्या. आता जवळपास सर्वच अडचणी दूर झाल्या असतील. आता सुध्दा कुणाला मिसळपाव वापरताना काही अडचणी असतील तर त्या त्यांनी येथे मांडाव्या किंवा मला व्यक्तिगत निरोप पाठवावा.

- नीलकांत

प्रतिक्रिया

वन टाइम पासवर्डने लॉगीन केलं की ताबडतोब आधी तुमचा पसवर्ड बदलून घ्या.
उजव्या समासात 'आवागमन'च्या खालीच तुमचं सदस्य नाम दिसेल. त्या लिंकवर क्लिककरुन 'संपादन' टॅबमध्ये गेल्यावर तुम्हाला पासवर्ड बदलता येईल.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Apr 2013 - 2:42 pm | प्रकाश घाटपांडे

पोलिस खात्यात साहेबांचा दरबार असतो. त्यात साहेब विचारतात काही अडचणी आहेत का? त्या वेळी काही अडचणी नाही अशा आशयाचे मौन बाळगायचे असते. काही अडचण तुम्ही सांगितली की तुम्ही अडचणीत आलाच म्हणुन समजा असे अनुभवी सहकार्‍यांनी सांगितले होते त्याची आठवण आली.

नीलकांत's picture

27 Apr 2013 - 4:32 pm | नीलकांत

:-) __/\__ काका दंडवत बरं का :-)

प्रकाश घाटपांडे's picture

27 Apr 2013 - 6:17 pm | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ!

अविनाशकुलकर्णी's picture

27 Apr 2013 - 3:01 pm | अविनाशकुलकर्णी

२ सुचना
प्रतिसाद दिल्यानतर जर तो एडिट करावासा वाटला तर करता येईल अशी व्यवस्था मी.पा वर करता येणे शक्य आहे का?

एखादा धागा गुंफला व समजा तो योग्य न वाटणे वा अन्य कारणास्तव डिलिट करावासा वाटला तर तशी सोय करता येईल का??

सदर सुविधा फेस बुक व अन्य ठिकाणी आढळतात त्या वरुन हे सुचले म्हणुन शेअर करित आहे

स्वसंपादन ही सोय मिळणार का ?

पिलीयन रायडर's picture

29 Apr 2013 - 11:22 am | पिलीयन रायडर

खरड आली हे कधी कळणार?
आणि आधी खरड करताना "उत्तर द्या" असा टॅब होता. ज्यामुळे सरळ दुसर्‍याच्या खरडवहीमध्ये जाता येत होते. आता जे Add Comments येत आहे त्याने आपल्यालाच खरड जातेय...

मैत्र's picture

29 Apr 2013 - 1:22 pm | मैत्र

शोध हा पर्याय पूर्णत: काढून टाकण्यात आला आहे का?
धागे शोधण्याचा काही मार्ग उपलब्ध नाही.
अनेक वर्ष शोध नीट चालत नव्हता तो काही काळापूर्वी उत्तम काम करायला लागला होता तांत्रिक सुधारणांमुळे.
अशी चांगली चालणारी उपयुक्त सुविधा बंद होण्याचं कारण समजलं नाही.
आणि सहज दिसेल / सापडेल अशा ठिकाणी हे असावे. नाही तर शोधचाच शोध अपयशी होतो..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 May 2013 - 2:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. खरड आल्याचं इमेल नोटीफीकेशन खात्यात सुरू आहे, पण इमेल येत नाही.
२. या धाग्यावर पूर्वपरिक्षणाशिवाय प्रतिसाद प्रकाशित करण्याची सोय नाही.

आपापल्या खरडवहीत आलेल्या खरडी पूर्वी उडवता येण्याची सोय होती, ती पुन्हा मिळाली तर बरं होईल.

jaypal's picture

6 May 2013 - 7:59 pm | jaypal

नोंद बंद आहे. :-(

प्रमोद देर्देकर's picture

23 Aug 2013 - 10:54 am | प्रमोद देर्देकर

नीलकांत साहेब
अहो, मि लोग-इन होताना प्रत्येक वेळी सान्केतिक शब्द चुकीचा टाकला आहे असा message
का येतो. मग वन टाइम पासवर्ड ने करावे लागते.

प्रमोद देर्देकर
कळवा - ठाणे

अनिरुद्ध प's picture

23 Aug 2013 - 1:24 pm | अनिरुद्ध प

लोग इन झालो तरि लोग इन झाल्याचे जाणवत नाही,परत परत लोगिन करावे लागते,एकदा लोगिन झाले की धागा वाचुन सम्पल्यावर वर जाण्यासाठी एरो वर क्लिक केल्या वर कधी कधी स्वग्रुहात जाते आणि लोग ओउट झाले असे जाणवते.

आशु जोग's picture

23 Aug 2013 - 11:17 pm | आशु जोग

आम्ही कोण?

abour ऐवजी about हवे होते का ?

सिद्धेश महाजन's picture

23 Jan 2016 - 7:39 pm | सिद्धेश महाजन

१. मिपा वर लोग इन होणे माहित आहे, लोग आउट कस होतात? (कुठे होतात त्यचि लिन्क मिळेल का?)
२. पासवर्ड विसरल्यास - १ टाइम पास-वर्ड वापरुन झाल्यावर, दुसर्या दिवशि नविन लोग इन कसे व्हावे? जुन्या आयडि ला नविन पासवर्ड द्याव कि नव खात उघडाव? (त्याचि लिन्क मिळेल का?)
३. व्यनि म्हन्जे काय? ते कसे चेक करवे? (त्याचि लिन्क मिळेल का?)

श्रीरंग_जोशी's picture

23 Jan 2016 - 8:08 pm | श्रीरंग_जोशी

१. मिपा वर लोग इन होणे माहित आहे, लोग आउट कस होतात? (कुठे होतात त्यचि लिन्क मिळेल का?)

- उजव्या समासात गमन दुवा आहे. त्याने लॉग आउट करता येते

२. पासवर्ड विसरल्यास - १ टाइम पास-वर्ड वापरुन झाल्यावर, दुसर्या दिवशि नविन लोग इन कसे व्हावे? जुन्या आयडि ला नविन पासवर्ड द्याव कि नव खात उघडाव? (त्याचि लिन्क मिळेल का?)

बहुतेक तरी अशा वेळी नव्याने वन टाइम पासवर्ड मागवता येतो. या कारणास्तव नवं खातं उघडण्याची गरज नाही.

३. व्यनि म्हन्जे काय? ते कसे चेक करवे? (त्याचि लिन्क मिळेल का?)

व्यनि हे व्यक्तिगत निरोपचे लघुरुप आहे. या सुविधेद्वारे मिपाकर एकमेकांना संदेश पाठवू शकतात. उजव्या समासात संदेश हा दुवा आहे.

अधिक काही प्रश्न असल्यास प्रथम मदत पानांवरची माहिती वाचा. त्यातून नेमकी उत्तरे न मिळाल्यास इथे प्रतिसादाद्वारे प्रश्न विचारू शकता.

मिपावर स्वागत व मिपावाटचालीसाठी शुभेच्छा!!

ravpil's picture

18 Feb 2017 - 1:39 pm | ravpil

सर्च करु शकत नाहि. सर्च चालु करा

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2017 - 3:19 pm | श्रीगुरुजी

भ्रमणध्वनीमधून मिपा बघताना उजव्या बाजूला सरकत गेलेले उपप्रतिसाद अजिबात दिसत नाहीत. साधारणपणे मूळ प्रतिसादावर उपप्रतिसाद, त्यावर अजून उपप्रतिसाद, त्यावर अजून एक उपप्रतिसाद . . . असा प्रतिसादांचा ट्री तयार झाला की साधारणपणे चौथ्या किंवा पाचव्या उपप्रतिसादांपासून पुढील उपप्रतिसाद अजिबात दिसत नाहीत.

पैसा's picture

18 Feb 2017 - 4:07 pm | पैसा

Settings मधून request desktop site वर क्लिक करा. अख्खे वेबपेज दिसेल.

संजय क्षीरसागर's picture

18 Feb 2017 - 3:26 pm | संजय क्षीरसागर

ही किरकोळ सुधारणा शक्य असेल तर लगेच कराल काय ?

पैसा's picture

18 Feb 2017 - 4:03 pm | पैसा

नीट दिसतंय. तुमचा मोबाईल / pc / लॅपटॉप / browser / os बदलून बघा जरा.

संजय क्षीरसागर's picture

18 Feb 2017 - 4:25 pm | संजय क्षीरसागर

कारण तुमचा र्‍या बरोबर दिसतोयं पण माझा तसाच दिसतोयं.

पैसा's picture

18 Feb 2017 - 4:43 pm | पैसा

यु युनिक प्लस मोबाईल + ऑपेरा ब्राउझर + गुगल इंडिक इनपुट.

मजा म्हणजे मगाशी मोबाईलवर आणि आता विंडोज पीसीवर बघतानाही मला दोन्ही र्‍या एकसारखेच दिसत आहेत. लिनक्स उबुंटुवरून वाचताना पायमोडका र् + य असं दिसतं मात्र.

संजय क्षीरसागर's picture

18 Feb 2017 - 4:54 pm | संजय क्षीरसागर

प्रशांतनी जादू केली असावी .

संजय क्षीरसागर's picture

18 Feb 2017 - 5:00 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही टाईपींगसाठी इतके पर्याय वापरण्यापेक्षा एकदा गुगल हँडरायटींग अॅप वापरून पाहा. इकडे विचार की समोर शब्द ! नो कीबोर्ड हॅसल अॅट ऑल .

पैसा's picture

18 Feb 2017 - 5:03 pm | पैसा

आहे मोबायल्यात. कधी वापरत नाही. बघेन आता.