नेहमीचीच संध्याकाळ

अन्या दातार's picture
अन्या दातार in जनातलं, मनातलं
18 Mar 2011 - 2:00 pm

संध्याकाळचे ५.३० वाजतात. सगळेच पीसी बंद करुन उठतात. वर्गात काही लोक सोडून कुणालाच बसायची इच्छा नसते; तरीपण लॅब मध्ये काहीतरी काम करतोय असे मॅडमना दाखवावे लागते. त्याला पर्याय नाही. प्रत्येक शुक्रवारचा हाच दिनक्रम! मॅडमचा शाब्दिक मार, धमक्या सहन होत नाहीयेत, खर्‍या करुन दाखवल्या तर धडगत नाही. त्यातच मंगळवारच्या सेमिनारचे टेंशन. एक ना दोन, हजार लचांडे मागे लावून प्रोफेसर लोक मात्र निवांत चहा आणि सिगरेट प्यायला शहीद भवनात किंवा टिक्कावर!
सायकली काढून सगळेच टांग टाकून हॉस्टेलकडे. गप्पा नेहमीच्याच; मॅडमच्या कॉमेंट्स आणि पुढच्या आठवड्यात करायच्या असाईनमेंट्स. काय करायचे, कोणी करायचे याचा थांग नसतो.
बाकीचे डीपार्टमेंट्सचे विद्यार्थी तोपर्यंत बाहेर पडलेले असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या कलरचा ड्रेस घालून आलेला असतो. ड्रेसचे रंग, डीझाईन्स यामुळे डोळे सुखावतात; काय पण मनुष्याचा चमत्कार आहे!!! विचारांचे घोडे या दोन विषयांच्या पुढे जातच नाहीत.
ढग दाटून आलेले असतात, अंधार पडायच्या बेतात असतो. पावसाचे चिन्हही कधी दिसत नाही, अंगाची आणि जीवाची काहिली मात्र नेहमीचीच. बाजूनेच एखादी गाडी जाते. कुठल्यातरी प्रोफेसरचीच असणार, नाहीतर इथे कोणत्या स्टुडंटकडे फोर व्हीलर येणार? तंद्रीतच सायकल चालवत असतो. तरीपण कुणाचाही अपघात वगैरे होत नाही :( काय साला जिंदगी आहे? एखादा हवाहवासा अपघातपण नाही! छे! स्वतःच्या नशीबावर चरफडत होस्टेल गाठतो. संध्याकाळचा नाश्ता खाणेबल असेल तरच करायचा. नाहीतर नेहमीचेच कँटीन गाठायचे. संध्याकाळचे कँटीन ठरलेले, ऑर्डर ठरलेली. नवीन नवीन असे काही राहिलेलेच नाही. मनात कसल्याच नवीन भावना, कल्पना नाहीत. कँटीनवर भेटणारे मित्रही ठरलेले, विषयही ठरलेले.
नाश्ता करुन परत खुराडेवजा खोलीत परत. लॅपटॉप चालू करुन तोंड खुपसुन बसतो. एका छोट्या खिडकीतून मोठ्ठे जग माझ्या डोळ्यांनी बघत असतो.

मुक्तकविडंबनप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

18 Mar 2011 - 6:02 pm | इंटरनेटस्नेही

ह्म्म्म कॉलेज आठवलं.. फक्त ते जरा 'कँटीन'च्या जागी हा 'बार' हा शब्द योजण्यात यावा!
छान छान.
-
(डिस्टंस एज्युकेशन या प्रकराचा भारीच कंटाळा आल्यामुळे लवकरच कॉलेज मध्ये परत अ‍ॅडमिशन घेऊ इच्छिणारा) इंट्या.

वपाडाव's picture

18 Mar 2011 - 6:43 pm | वपाडाव

मग काय कराय्चं सांगु का?
वेज्जी वर जाउन त्याच्या कौंटरवर बसलेल्या प्वरींकडे बगत र्‍हायचं.....
न्हाईतर लिटल सिस्टर्स वर जाउन एक्-एक घ्यायची.....

अन्या दातार's picture

18 Mar 2011 - 8:32 pm | अन्या दातार

वपाडाव, तुम्ही पण हितं असंच बोअर व्हायचात वाटतं!!!

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2011 - 5:14 pm | अप्पा जोगळेकर

मस्तच.
काय साला जिंदगी आहे? एखादा हवाहवासा अपघातपण नाही!
हे खूपच भारी आहे. आवडलं.

स्पा's picture

20 Mar 2011 - 2:46 pm | स्पा

अन्या झकास रे