(पडुन आहे गात्र कुजुनि)

मेघवेडा's picture
मेघवेडा in जे न देखे रवी...
11 Nov 2010 - 4:57 am

प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे. तिला प्रेत आणि आत्मा यांच्या वेशीवर सोडून तो एकटाच सुटला आहे.

पडुन आहे गात्र कुजुनि, राजसा जळलास का रे?
सोडुनि मज प्रेतरूपी, एकटा पळलास का रे?

अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला
अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे?

आग या मसणात पडलेल्या शवाला लाव ना तू
कुजतसे अंगांग माझे, येत आहे वास का रे?

बघ जरा कुजतोच आहे, दक्षिणेचा हात माझा
नाक आणि कान कुजले, एवढा उरला घसा रे

उसळती पोटात माझ्या आम्लपित्ताच्याच लाटा
आतडे फुटले बिचारे, यकृताचीही दशा रे

गोठलेले थंड सारे, गात्र करि हे बंड सारे
विझुन गेलेल्या चितेवर अजुनही मज भरवसा रे

******************************************************************

मूळ गीत. तरूण आहे रात्र अजुनि

भयानकहास्यबिभत्सअद्भुतरसकविताविडंबन

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

11 Nov 2010 - 5:04 am | प्रियाली

असे म्हणायलाच पाहिजे ना. ;)

अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे?

हाय तू विझलास का रे? असे सुद्धा चालेल.

आग या मसणात पडलेल्या शवाला लाव ना तू
कुजतसे अंगांग माझे, येत आहे वास का रे?

हाहाहाहाहा!!!!! अरे काय हा भयंकरपणा. ;)

असुर's picture

11 Nov 2010 - 5:10 am | असुर

व्यॉSSSSक!!
अ‍ॅबसोल्यूटली घाण!!! :D
बीभत्स रसाची परिसीमा गाठल्याबद्दल मेघवेडा यांचे अजीर्ण होईपर्यंत अभिनंदन!
मेव्या, *ड्या, तुझ्या घाणेड्रं लिहीण्याला काय लिमिट?? =)) =))
किमान एका व्यक्तीस तरी हे विडंबन वाचून भडभडून उलटी करावीशी वाटली तर या कवितेच्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणेन!!! ;-)

* = ग! भलते अर्थ काढू नयेत!!!

--असुर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2010 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेव्या, बीभत्स रसातलं काहीही साहित्य कधीही वाचावं लागेल असं वाटलं नव्हतं; पण तू हा समज खोटा ठरवलास! झक्कास, ए१ जमलं आहे विडंबन आणि प्रियालीच्या सुचवणीशी सहमत.

सूड's picture

11 Nov 2010 - 1:38 pm | सूड

+१

नंदन's picture

12 Nov 2010 - 3:24 am | नंदन

सहमत आहे!

प्रभो's picture

12 Nov 2010 - 8:04 pm | प्रभो

सहमत आहे!

सहज's picture

11 Nov 2010 - 6:45 am | सहज

हा हा!

बेसनलाडू's picture

11 Nov 2010 - 7:10 am | बेसनलाडू

पण
अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला
अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे?

हे आवडले. शिजलास ऐवजी विझलास ही प्रियालीताईंची सुचवणी योग्य वाटते.
(जागृत)बेसनलाडू

अवलिया's picture

11 Nov 2010 - 12:47 pm | अवलिया

ख त र ना क !!!

राजेश घासकडवी's picture

11 Nov 2010 - 12:48 pm | राजेश घासकडवी

बीभत्स रसाच्या परिसीमेची खूण म्हणजे 'और आने दो' वगैरे म्हणावंसं वाटत नाही... तसंच झालंय. खरं म्हणजे अजून येऊ देत, पण एवढ्यात नको :)

अस्मी's picture

13 Nov 2010 - 12:22 pm | अस्मी

सह्ही :)

भयानक! :D बीभत्स रसाला छान छान कसं म्हणायचं म्हणून फक्त!
भारी भयानक जमलय मात्र!

इनो घ्यावंसं वाटतंय !!

अमोल केळकर's picture

11 Nov 2010 - 6:01 pm | अमोल केळकर

मस्त :)

अमोल

पैसा's picture

11 Nov 2010 - 8:14 pm | पैसा

बीभत्स रसाचा कळस गाठलास, तो पण मात्रेत जराही ओढाताण न करता. याहून भयानक (आणि तरी विनोदी) लिहिता येणं कोणालाही अशक्य आहे!

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2010 - 9:47 pm | प्रीत-मोहर

मस्त रे मेव्या :

अविनाशकुलकर्णी's picture

12 Nov 2010 - 6:53 am | अविनाशकुलकर्णी

भय रसाच्या ऐवजी बीभत्स रसात काव्य रचना झाल्याने झंडु बाम झाला

नरेशकुमार's picture

12 Nov 2010 - 8:25 am | नरेशकुमार

खल्लास
तरूण आहे रात्र अजुनि हे गाने आयुश्यात ऐकुन जानार नाहि आता. ह्याचिच आठवन येतिल.

-------------------------------------------------------------------------------------
सहि
एक रिप्लाय द्या मझ्या ब्लोग वर. ग्लोगलगाय च्या.

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 Nov 2010 - 1:33 pm | फ्रॅक्चर बंड्या

जबराट ...

गोठलेले थंड सारे, गात्र करि हे बंड सारे
विझुन गेलेल्या चितेवर अजुनही मज भरवसा रे

आवडले ..

मितान's picture

13 Nov 2010 - 3:30 pm | मितान

वॅक्क ! वॅक्क्क्क्क !!!!

भयानक घाण आहे हे सारं ! झोपेत आठवले तर ओकत उठेन मी !!!!!

घाणेरडा आहेस !

आता आशाबाईंच्या आवाजात हे शब्द ऐकू येतील !!!

आता तुझ्या एखाद्या आवडत्या गाण्याची वाट लावलीच पाहिजे मला ! हे सुरांनो चंद्र व्हा.....