महिला दिन विशेषांक २०१७

स्वराली - नंदिनी सहस्रबुद्धे

मंजूताई's picture
मंजूताई in लेखमाला
8 Mar 2017 - 6:06 am

.

भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्‍यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय!