स्लोवाकिया आणि वेलिक्झा साल्ट माइन क्राको पोलंड

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in भटकंती
2 Mar 2016 - 4:29 pm

मागील वर्षी मे जून महिन्यात कामानिमित्त स्लोवाकिया येथे जाण्याचा योग आला. तेव्हा पोलंड मधील वेलिक्झा साल्ट माईन ला भेट दिली या स्लोवाकिया आणि पोलंड भेटीचा संक्षिप्त वृत्तांत काही छायाचीत्रासहित येथे देत आहे.

सुरुवातीला स्लोवाकियाविषयी :

स्लोवाकिया हा मध्य युरोपातील एक प्रगत देश.

वास्तविक झेक आणि स्लोवाकिया मिळून झेकोस्लोवाकिया हे गणराज्य अस्तित्वात होते परंतु १९९३ मध्ये हे गणराज्य शांतीपूर्ण रितीने भंग पावले व झेक आणि स्लोवाक असे दोन देश झाले. यातील स्लोवाक म्हणजेच स्लोवाकिया.

आम्ही स्लोवाकिया ला जाण्यासाठी प्रथम मुंबई हून विमानाने फ़्रेंक्फ़र्ट जर्मनी येथे गेलो तेथून क्राको पोलंड येथे दुसऱ्या विमानाने जाउन मग क्राको वरून १०० किमी असलेल्या स्लोवाकिया येथील आमच्या नमेस्टोवो या कामाच्या ठिकाणी गेलो

a

b

स्लोवाकिया च्या दक्षिणेला हंगेरी , पूर्वेला युक्रेन , पश्चिमेला ऑस्ट्रिया आणि उत्तरेला पोलंड हे देश आहेत. बर्फाच्छादित डोंगरांनी व्यापलेला हा युरोपीय देश म्हणजे शेकडो हिमाचल प्रदेश राज्यांच्या सौंदर्याप्रमाणे प्रमाणे आहे. हिवाळ्यात प्रचंड थंडी , गोठलेली सरोवरे , उंच उंच झाडे असा निसर्ग सौंदर्याने नटलेला हा प्रदेश! निळ्याशार पाण्याची भव्य सरोवरे तर या सौंदर्यात आणखीच भर पाडतात.

3

आम्ही जेथे कामानिमित्त गेलो होतो त्या गावाचे नाव नमेस्टोवो असे होते. एक समृद्ध खेडेच म्हणाना!
संपूर्ण गाव एका भव्य सरोवराभोवती होते. ऑफिस ला येता जाता आमची आपसूकच रोज एक निसर्गरम्य सफर असायची . येथील नागरिक अतिशय आतिथ्यशील आहेत. येथे स्लोवाक ही भाषा वापरात असून लोकांना इंग्रजीचे
ज्ञान असण्याची गरज वाटत नाही. ज्ञान तर सोडाच पण आम्ही राहत असलेल्या भागात ९५% लोकांना इंग्रजीचा गंधही नसायचा. मग गुगल ट्रान्स्लेट ने आमचे काम आम्ही करून घेत असु.

प्रगत देश आपल्या भाषेला कसे जपतात हे आम्हाला पदोपदी जाणवत होते अर्थात आपल्या भारतात अनेक भाषा असल्यामुळे संपर्क भाषा म्हणून इंग्रजीचे प्रस्थ आहे पण
इंग्रजीचे आक्रमण सुध्धा आहेच. असो …. हे विषयांतर झाले.

आम्ही राहत असलेल्या होटेल च्या मालकांनी आमची अगदी नातेवाइकांची घेत्तात तशी उत्तम काळजी घेतली.

वर्क हार्ड एन्ड पार्टी हार्डर या उक्ति प्रमाणे येथील लोक सुट्टी दिवशी बोटींग वगैरे चा पुरेपुर आस्वाद घेतात.
असे समजले की हे सरोवर डिसेंबर च्या सुमारास पूर्णपणे गोठते आणि यावर आइस होकी खेळतात.
येथे आमचा दिवसाचा आणि संध्याकाळचा वेळ कामातच जायचा. फक्त रविवारी आम्ही सरोवराभोवती फिरत असू.
अखेर वेळात वेळ काढून आम्ही वेलिक्झा मिठाची खाण पाहायला गेलो. आमचा शेन गेन विसा असल्यामुळे आम्ही मध्य युरोपातील सर्व देश पाहू शकत होतो.

वेलिक्झा मिठाची खाण ही पोलंड मधील क्राको या शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर आहे. क्राको हे पोलंड मधील प्रमुख शहरांपैकी एक .

ही मिठाची खाण तेराव्या शतकात सुरु झाली. धरणीच्या गर्भात शेकडो मीटर या खाणीत त्या काळी खडकातून मीठ मिळवले जायचे. नंतर मात्र (१९९६ च्या सुमारास) मिठाच्या अत्यल्प किंमती आणि पुराचा धोका यामुळे खाणीतून मीठ मिळवण्याचा व्यवसाय बंद झाला. त्याकाळी हे मीठ कसे मिळवले जायचे याचे सर्व दृश्य या खाणीत
पर्यटकांसाठी पाहावयास मिळते. याशिवाय अनेक मूर्ती या खाणीत कोरल्या आहेत आणि खाली केथेड्रल (ख्रिस्ती प्रार्थनास्थळ) सुद्धा आहे. या खाणीची खोली ३३० मीटर आहे.
पर्यटकांना १०० मीटर पर्यंत ही पाहाता येते. नाझी आक्रमणाच्या काळात शेकडो ज्यू लोकांना या खाणीत सक्तीने पाठवले जायचे. परंतु रशियाच्या बळी तो कान पिळी या धोरणाने नाझी साम्राज्याला या खाणीतून ज्युंच्या सहायाने मीठ मिळवण्यात यश आले नाही. रशिया ने अनेक ज्यूंना आश्रय दिला व अन्यायापासून वाचवले. परंतु त्यामुळे
या मध्य युरोपीय देशांचा काही भाग अविकसित राहिला.

e

1

e1
मिनरल साल्ट हे विशिष्ठ प्रकारच्या खडकांपासून मिळवण्यात येते त्यासाठी जमीन शेकडो मीटर खोडून हे खडक शोधले जातात. नंतर पाइप च्या सहाय्याने गरम पाणी
इंजेक्शन केल्याप्रमाणे टोचून खारट पाणी मिळवून ते गोठवून मीठ बनवले जाते. अर्थात ड्राय मैनिंग ही सुधा एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे पाणी न वापरता मीठ मिळवता येते.
हे काम किती जोखमीची आहे याची कल्पना आपणास असेलच.

एक मनोरंजक आख्यायिका या खाणिबद्दल सांगितली जाते ती अशी :

हंगेरीची राजकुमारी किंगा हिचा वान्ग्निश्चय राजा बोल्स्ला याचेबरोबर झाल्यानंतर हुंड्यात (हुंडा तिथेही होता बरे! ) तिने सोनी चांदी वगैरे न देता चक्क मिठाची भांडारे द्यायचे निश्चित केले. मीठ हे त्याकाळी इतके किंमती किंवा अमुल्य होते. मग तिने आपली अंगठी पोलंडच्या दिशेने भिरकावून दिली. ती बरोबर या खाणिपाशी आली आणि
तिथे खोदल्यावर मीठ सापडले आणि ती अंगठी देखील व्यवस्थित मिळाली म्हणे!

r1

111

या खाणीतून मीठ इ स पूर्व ३५०० ते २५०० पासून मिळते असेही काही लोक म्हणतात. हे एक युनेस्कोचे महत्त्वाचे वारसास्थळ आहे. दरवर्षी सुमारे दहा लाख पर्यटक या
खाणीला भेट देतात. आम्ही गेलो तेव्हा कोरिया जपान इतक्या लांबूनही पर्यटक आले होते. या खाणीला अनेक दिग्गजांनी भेट दिली आहे. त्यापैकी काही कोलंबस कोपर्निकस हे होत. सुमारे ३८० पायऱ्या उतरून ही खाण दाखवली जाते. आत कामगारांची शिल्पे खाणीच्या स्मृती जपण्यासाठी ठेवली आहेत. जमिनीच्या गर्भात असलेमुळे येथे तापमान
७ ते ८ अंश सेल्सियस इतके असते. त्याकाळी लाकूड प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेमुळे लाकडाचे उद्वाहक येथे वापरले जात. मीठ मिळवण्याच्या इतर प्रक्रियांत सुद्द्धा लाकडी साहित्याचा वापर आहे. आत एक लहान सरोवरही आहे. या खाणीतच ऎक रेस्टोरंट आहे. परतताना उद्वाहानातून पर्यटकांना वर आणले जाते.

t11

rr1

r11

यानंतर आम्ही क्राको शहराला भेट दिली. काक म्हणजे छोटे शिकागोच. त्याचे काही फोटो दिले आहेत. आम्ही जेव्हा जुलै महिन्यात या ठिकाणी भेट दिली त्यावेळी
तापमान ३२ अंश सेल्सियस होते. युरोपात एवढे तापमान पाहून आम्हाला ग्लोबल वार्मिंग च्या भायावाहातेची कल्पना आलि. एकंदरीतच ही सहल आम्हाला पुढील कामासाठी ताजेतवाने करून गेली .

r111

r121

1111

ता क - आपण ज्याला शेंदेलोण म्हणतो ते एक प्रकारचे रॉक साल्ट च होय.

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

2 Mar 2016 - 4:35 pm | गॅरी ट्रुमन

मस्त. फोटो आणि वर्णन आवडले.

संक्षिप्त सहल. पण छान आहे.

अजया's picture

2 Mar 2016 - 4:39 pm | अजया

छान वर्णन.
आम्हाला स्लोव्हाकिया मिपा शेफ मृ चा देश म्हणून माहितीये!

Mrunalini's picture

2 Mar 2016 - 6:38 pm | Mrunalini

:P
शान्तिप्रिय, तुम्ही ब्रातिस्लाव्हाला नाही आले का? स्लोव्हाकियात काय काय बघितले त्याचा आता अजुन एक लेख येउद्या. :)

कपिलमुनी's picture

2 Mar 2016 - 6:22 pm | कपिलमुनी

पुभाप्र !
बादवे तुम्ही आयटी मध्ये आहात का ओ ?

शान्तिप्रिय's picture

2 Mar 2016 - 6:47 pm | शान्तिप्रिय

हो मी आय टी मध्ये आहे.

म्रुणालिनि,

तेव्हा मी मिसळ्पाव फार वाचत नव्हतो. नाहितर मी आपणास भेटायला ब्रातिस्लावाला
आलो असतो. ब्रातिस्लावा खुपच ऐतिहासिक शहर आहे असे ऐकले आहे.
पाहु परत जमले तर.

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 12:29 am | बोका-ए-आझम

दुस-या महायुद्धात पूर्ण उध्वस्त झाले होते, नंतर परत बांधून काढले असं ऐकलंय. तिथली पोलिश भाषा ही सर्वात अभिजात समजली जाते हे गाईडकडून ऐकल्यावर एका दोन अक्षरी शहराची फारच आठवण आली. आठवणी पुन्हा जाग्या केल्याबद्दल धन्यवाद शांतिप्रियजी!

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 12:40 am | श्रीरंग_जोशी

स्लोव्हाकियाचे वर्णन व फोटोज आवडले.

एक प्रश्नः मराठीत झेक लिहिलं जात असलं तरी त्याचा उच्चार चेक असा केला जातो नं? स्थानिक उच्चार नेमका कसा आहे?

शान्तिप्रिय's picture

3 Mar 2016 - 11:56 am | शान्तिप्रिय

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्स
श्रीरंग जोशी,
झेक चा उच्चार माझ्या माहितिप्रमाणे चेक असाच केला जातो.
बरेच देश आपल्या भाषांत आपण वेगळे उच्चरतो.
उदा - रशिया रुस (हिंदीत)
इजिप्त मिश्र
जपान जापान (सर्व हिंदीत) .

असंका's picture

3 Mar 2016 - 12:16 pm | असंका

जपान जापान!!

=)) =))

ग्रीस ला मला वाटतं युनान म्हणतात ना?

जगप्रवासी's picture

3 Mar 2016 - 3:17 pm | जगप्रवासी

मस्त छोटेखानी सफर

पद्मावति's picture

3 Mar 2016 - 3:26 pm | पद्मावति

छान लिहिलंय. स्लोवाकियावर अजुन लीखाण येऊ द्या.

आपण ज्याला शेंदेलोण म्हणतो ते एक प्रकारचे रॉक साल्ट च होय.

कित्ती नवीन माहिती? कसंं जमतं हो तुम्हाला?

जव्हेरगंज's picture

4 Mar 2016 - 1:17 pm | जव्हेरगंज

छान !

सुमीत भातखंडे's picture

4 Mar 2016 - 2:33 pm | सुमीत भातखंडे

फोटो आणि वर्णन

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Mar 2016 - 1:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

सगळं मिपा जगप्रवासालाच निघालाय कि काय? आजकाल रोज हापिसात येउन मिपा उघडावे तर भटक्यांचेच लेख वाचायला मिळताहेत. विशेष करुन अनाहितांचे जास्तच!
असो. लेख आणि छायाचित्रे मस्तच. सफर आवडली. जयप्रकाश प्रधान यांच्या "ऑफ बिट भटकंती" पुस्तकातही या मिठाच्या खाणीचा उल्लेख आहे.