कैलास-मानससरोवर यात्रा करण्यासाठी १लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो, कारण तिबेटमधील प्रवासासाठी चीन सरकारला ७०० डॉलर द्यावे लागतात. पासपोर्टही लागतो. त्याशिवाय या यात्रेसाठी 'स्ट्रेसटेस्ट' वगैरेसारख्या महागड्या, पण आवश्यक तपासण्या कराव्या लागतात. आमच्याजवळ पासपोर्ट नाही आणि एवढे पैसेही नाहीत. कैलासयात्रा घडावी असे खूप वाटत असे. पण हे आपल्याला शक्य नाही म्हणून गप्प बसत होतो.
शिवशंभोला आम्हाला यात्रा घडावी असे वाटत होते, म्हणूनच एक दिवस म.टा.मधील एका बातमीकडे लक्ष गेले. गोरेगाव-मुंबई येथील श्री. वाशीकर यांनी ती बातमी दिली होती. 'आदिकैलास-ओमपर्वत यात्रा आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा.' फोन नंबरही दिला होता. लगेच त्यांना फोन केला. वाशीकर हे वयोवृद्ध गृहस्थ आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे जनता पक्षाच्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असताना चीन दौर्यावर गेले होते, तिथे त्यांनी चीनबरोबर करार करुन कैलास-मानस यात्रा पुन्हा सुरू केली होती; जी १९६२च्या लढाई पासून बंद पडली होती. श्री. वाशीकर या यात्रेच्या पहिल्या ट्रीपचे सदस्य होते. आणि आता महाराष्ट्राचे या यात्रेचे ऑनररी सेक्रेटरी आहेत.
वाशीकरांना फोन केला. ते स्वतः भेटले. त्यांनी प्रत्येकी १५०० रुपयांचा ड्राफ्ट 'कुमाऊं मंडल विकास निगम' यांच्या नावाचा त्यांच्या गोरेगावच्या पत्त्यावर पाठवायला सांगितला. एकूण खर्च प्रत्येकी १२,५०० रुपये येईल असे सांगितले. लगेच दोघांसाठी म्हणून ३००० रुपयांचा ड्राफ्ट पाठवला. त्यांनी फॉर्म पाठवले.
जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात एकूण आठ ग्रुप पाठवतात. एक ग्रुप २०/२५ जणांचा असतो. नोंदणी झाल्यावर त्यांनी पाठवलेले फॉर्म भरून, एम.डी. फिजिशियनकडून मेडिकल करून, पोलिस क्लिअरन्स घेऊन ११,००० प्रत्येकीचा 'कुमाऊं मंडल विकास निगम' यांच्या नावाचा ड्राफ्ट फॉर्मसोबत पाठवायचा. आपल्याला हव्या त्या महिन्यातील तारीख आपल्याला निवडता येते. सरकारी नोकरी असलेल्यांना ट्रेकिंगसाठी असलेली स्पेशल भरपगारी रजा मिळते.
दिल्ली ते दिल्ली साधारण २०/२१ दिवसांची यात्रा असते. त्यापैकी दोन दिवस जाताना आणि दोन दिवस येताना असा चार दिवसांचा प्रवास बसने असतो. आणि १६ दिवस पायी किंवा घोड्यावरुन असतो. दिल्लीबाहेरून येणार्यांसाठी रेल्वे यात्रीनिवासात स्वखर्चाने राहण्याची सोय होते. तिथूनच यात्रेला सुरवात होते. यात्रेच्या आदल्या दिवशी इथेच सर्व यात्रेकरूंची मिटिंग होते. ओळखदेख व यात्रेच्या कार्यक्रमाची, तेथील हवामान, संभाव्य धोके याची कल्पना त्यावेळी दिली जाते. दिल्लीपासून महाराष्ट्रातर्फे एक मार्गदर्शक असतो, तर निगमचा मार्गदर्शक काठगोदामला भेटतो.
आम्ही २००२ साली जून महिन्यात गेलो होतो. त्यावेळीचा खर्च मी सांगितला आहे. आता कदाचित जास्त असेल. असो, आता उद्यापासून आपण प्रत्यक्ष यात्रेला निघू.
हर हर महादेव. नर्मदे हर!
प्रतिक्रिया
28 Aug 2014 - 1:37 pm | राजेंद्र मेहेंदळे
चला तुमच्या निमित्ताने आम्हीपण बसल्या बसल्या कैलास मानस फिरुन येउ.
रच्याकने मी पयला!!!
28 Aug 2014 - 2:13 pm | एस
मस्त सुरुवात. वाचतोय.
मायबोलीवर याच परिक्रमेचे काही अनुभव मिळाले तेही वाचकांसाठी शेअर करत आहे.
माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा - अनया
भाग १ : पूर्वतयारी: http://www.maayboli.com/node/30416
भाग २ : दिल्ली ते नारायण आश्रम: http://www.maayboli.com/node/30637
भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261
भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407
भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704
भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889
भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246
भाग ९: गाला ते पुणे: http://www.maayboli.com/node/32565
भाग १०: यात्रेची तयारी: http://www.maayboli.com/node/34063
भाग ११: समारोप: http://www.maayboli.com/node/34065
आणि -
कैलास मानससरोवर यात्रा: भाग १- पुनःश्च हरीॐ ! - Adm
http://www.maayboli.com/node/50335
लेखमालिकेस शुभेच्छा. तेवढं शुद्धलेखनासाठी कोणी यांना मदत करील काय?
28 Aug 2014 - 3:07 pm | खुशि
नमस्कार,आपणच मदत कराल तर बरे होइल.मी आदिकैलास ओम्पर्वत यात्रा केली. मोठ्या कैलासची नाही.आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असु शकतात नाही का?
31 Aug 2014 - 7:34 am | जयंत कुलकर्णी
मला वाटतं एखाद्याने काही लिहिले की त्याच विषयावरील इतर दुवे लगेचच देऊ नयेत. कदाचित आपल्याला हे सगळे पुर्वीच माहीत आहे या भावनेने हे होत असावे. पण त्यामुळे होते काय की जो लिहितोय त्याचा लिहिण्यातील रस निघून जाण्याची शक्यता आहे. लेख संपल्यानंतर हे लिहिले असते तर जास्त संयुक्तिक झाले असते.
काही जण प्रतिसादातच इतकी माहिती देतात की लेखाचे प्रयोजनच उरत नाही......:-)
हे लिहिल्याबद्दल राग नसावा....
31 Aug 2014 - 2:14 pm | एस
असे मात्र अजिबात नव्हते.
संपादकांना माझा प्रतिसाद काढून टाकण्यासाठी विनंती करून पाहतो.
@खुशी, तुम्हांला जमेल तशी मदत नक्कीच करेन.
31 Aug 2014 - 3:45 pm | जयंत कुलकर्णी
स्वॅप्स,
ते वाक्य तुम्हाला उद्देशून नव्हते..पण तुम्हाला तसे वाटणे स्वाभाविक आहे. त्याचा संबंध त्यानंतर येणार्या वाक्याशी आहे. माझ्या सूचनेवर सकारात्मक विचार केल्याबद्दल धन्यवाद !
2 Sep 2014 - 6:16 pm | खुशि
धन्यवाद.आपण सर्वजण वाचता म्हणुन मी लिहिते.आणि सर्वांच्या मदतीची मला गरज आहेच.कारण मी काही कॉम्प्युटर शिकलेली नाही.आणि प्रतिसाद काढुन टाकण्याची काहीच आवश्यकता नाही.
28 Aug 2014 - 3:38 pm | दिपक.कुवेत
उत्सुकता आहे आणि महादेवाची मर्जी असली तर करायची ईच्छा देखील. पण ह्या निमित्ताने आदिकैलास ओम्पर्वत यात्रेचे वर्णन घडतयं हे हि नसे थोडके. एक विनंती आहे...जमल्यास फोटो पण डकवा. तो मंत्रमुग्ध निसर्ग किती पाहु आणि किती नको असं होउन जातं.
2 Sep 2014 - 6:19 pm | खुशि
धन्यवाद.मला फोटॉ टाकता येत नाही पण माझ्या पिकासा फोटो अल्बम मध्ये फोटो आहेत ते सार्वजनिक केले आहेत आपण जरुर पहावेत आणि जमल्यास इथे चिकटवाते.
28 Aug 2014 - 3:42 pm | दिपक.कुवेत
त्याच्यामुळे मायबोलीवरची हि यात्रा अथपासुन ईतीपर्यंत निदान वाचायला मिळतेय.
28 Aug 2014 - 4:05 pm | कंजूस
चला सुरुवात तर झाली .छान !
28 Aug 2014 - 4:46 pm | अजया
पुभाप्र.