अर्थक्षेत्र भाग - ५ - गुंतवणूक

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
4 Jan 2014 - 5:46 pm

"सामान्यतः मला काहीच येत नाही असे गृहीत धरूनच आपण दुसर्याला "संधी " देतो. त्या ऐवजी आपण स्वतः जर सगळी माहिती काढून सर्वसमावेशक तयारी केली म्हणजेच थोडक्यात स्वतःलाच प्रथम "संधी" दिली तर एक अतिशय मोठा धोका आपण टाळू शकतो आणि पुढचे संभाव्य धोके परतवण्याचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो."

माझे एक अशील श्री हेरंब जोशी, ह्यांनी प्रथम स्वतःला "संधी" दिली. व्यवसाय भिक्षुकी नोव्हेंबर २००० साली त्यांनी रुपये १३५००० नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या नावे बँक ऑफ बरोडामध्ये फिक्सला ठेवले. व्याज दर महिन्याला येते रुपये 1153/- त्यातून १००० रुपयाचे एफ डी दर महिन्याला मुलाचे नावे करतात आणि रुपये ५३/- ते म्हणतात त्याचा पोकेटमनी (जेव्हा तो त्याला द्यायची वेळ येईल तेव्हा ) हि प्रथा पिढी दर पिढी चालूच राहिली पाहिजे असा दंडक मी कुटुंबात घातला आहे असे हि सांगतात. आज मुलगा ८ वीत आहे. दहावी झाला कॉलेजात जाऊ लागला की देऊ.
मी म्हणले जोश्या अरे पण महागाईचा विचार केलास का ? त्यावर म्हणतो
"अरे मेलो का रे मी लगेच. आंबा आणि भिक्षुकी ८५० लाखाचे पकेज आहे माझे. तूच भरतोस ना आयकर.....भरतोस ना रे .....बाकी तुमचे ते शेअर्स म्युचअल फंड्स, बॉंड मला काही कळत नाही रे ! उद्या पैसे बुडाले तर मी कागदी घोडे नाचवणार आणि तू पैसे त्याचे पैसे घेणार. म्हणजे आंबा माझा आणि विकणार, खाणार तू. बाकी माझ्या गुंतवणुकी आहेत ना तुला माहित पण इथे मला माझा आजा आठवतो रे विहिरीतून पाणी काढून, पाखाडी चढून जाऊन त्याने १५० आंब्याची कलमे शिंपली... मोठी केली आणि आम्हाला देऊन गेला. माझ्या वडलांनी, मी आणि माझ्या मुलांनी जितके आंबे खाल्ले त्याच्या १/१० तरी त्याला मिळाले असतील का रे? आणि रा*च्या माझे दोंद बघ मी कसला विहिरीचे पाणी काढून आंबे शिंपणार. मग दरवर्षी लावतो १००० रुपयाचे एक कलम विनायकाच्या नावाने त्यालाहि सांगितले आहे, मी एक लक्ष पस्तीस हजार गुतवले तू तेरा लक्ष पस्तीस हजार गुतव. झाडे वाचवू झाडे वाढवू....काय? चल तुला कळायचे नाही ते "
श्री हेरंब जोशी ह्यांची पर्सनल थिअरी मांडून ते "किती किती सांगू तुलां...." हे गुणगुणत निघून गेले. आता त्यांची थिअरी बरोबर कि चूक ? त्यांनी इतरत्र गुंतवणूक केल्यास ती कशी जास्त "फलदायी" ठरली असती त्याबद्दल तज्ञ कदाचित सांगू शकतील.
म्हणजे जिथे श्री हेरंब जोशी थांबले तिथे ते जर एखाद्या गुंतवणूक तज्ञाकडे गेले असते तर?( त्याचा सल्ला त्यांनी मानवा की नाही हा नंतरचा भाग.) पण त्यांचे उद्दिष्ट क्लियर असल्याने त्यांच्यापुरती हि गुंतवणूक योग्यच असे माझे मत आहे कारण सुरक्षित आणि उद्दिष्ट पूर्ण गुंतवणूक आहे म्हणून. जे ५३ रुपये ते पोकेटमनी म्हणतात ते हि मिळणाऱ्या व्याजाच्या ५.३% आहेत. रिस्क.... व्याजदर उतरले तर ? महागाईचा निर्देशांक इथे गृहीत धरलाच नाहीये.? आयकर किती जाईल ?

मग त्यावर उत्तर काय?

चला सांगा तुम्हीच.

प्रतिक्रिया

ज्ञानव's picture

4 Jan 2014 - 5:54 pm | ज्ञानव

पोकेटमनी रुपये १५३ वाचावा.

आंबा आणि भिक्षुकी ८५० लाखाचे पकेज आहे माझे हे बरोबर आहे का ?

ज्ञानव's picture

5 Jan 2014 - 11:52 am | ज्ञानव

मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये आधी टाइप करून मिसळपाव वर पेस्ट करताना सगळी चौकोनरुपी अक्षरे दिसू लागली त्यामुळे ते करेक्ट करताना बर्याच मिस्टेक्स झाल्या आणि जवळ जवळ अर्धा लेख उडवावा लागला ८.५० ऐवेजी ८५० दिसते आहे.
साडेआठ लाख असे आहे
सॉरी ती मिस्टेक राहुन गेली.
आता वर्ड मध्येही टाईप करणार नाही.

रॉजरमूर's picture

5 Jan 2014 - 2:02 pm | रॉजरमूर

मराठी टंकायला अडचण आहे तर मग गूगल मराठीत टंका की