शब्द चिमुकले सांडत होते ...

जेनी...'s picture
जेनी... in जे न देखे रवी...
16 Oct 2013 - 11:53 pm

त्या इवलुश्या पानावरती
शब्द चिमुकले सांडत होते
फुलपाखरापरी फडफडणारे
कवितेचे मन भासत होते

अलगद कागद हातावरती
हाताच्याही बोटावरती
मन बोटासंगे बोलत होते
शब्द चिमुकले सांडत होते

बरेच काहि अवती भवती
भोवतालीच्या ओठावरती
सार तयाचे मांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते

मी न माझी, माझे न काहि
माझ्यासाठी मीपण नाहि
नाहि नाहि म्हणता म्हणता
कवितेला मी सांगत होते

ओळी ओळीवर अक्षरांचे
पुंजकेच जणु साठत होते
शब्द म्हणुनी शब्दासंगे
कवितेचे मन डोलत होते

शब्द चिमुकले सांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते...

कविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

16 Oct 2013 - 11:59 pm | मुक्त विहारि

पण

अनुभवली होती....

तिच्या सहवासात
माझ्या मुखातून
शब्द बाहेर पडत होते
ती ते पाळत ही होती...

असा रमणीय काळ होता बघा..

आज काल मात्र

तिच्या मुखातुन शब्द गोळे फेकल्या जात होते.
ते टाळतांना धोतर पण माझे सुटत होते.

असा काळ आला आहे बघा....

जावु दे

गेले ते दिन गेले.....

जेनी...'s picture

17 Oct 2013 - 12:21 am | जेनी...

धन्यवाद !

माफ करा हं ! मी इथे नविन आहे , कवितेत काहि चुका असतिल तर मला नक्की नक्की
सांगा हं ! मी नक्कीच ऐकेन ...:)

मुक्त विहारि's picture

17 Oct 2013 - 9:13 am | मुक्त विहारि

असो,

तुमचा भाबडेपणा आणि निरागसपणा आवडला...

अद्याप रांगता मिपाकर मुवि....

खटासि खट's picture

24 Oct 2013 - 8:24 am | खटासि खट

चार च्या जागी आठ पेग झाले कि अशीच अवस्था होते...

विजुभाऊ's picture

17 Oct 2013 - 12:46 am | विजुभाऊ

मी इथे नविन आहे , कवितेत काहि चुका असतिल तर मला नक्की नक्की
सांगा हं ! मी नक्कीच ऐकेन ...:)

अरे बापरे. अजून किती काळ नवीन म्हणून मिरवणार...... असो दोन वर्षामागच्या वर्षातील नवीन म्हणून की कसे ?

♥ " मेरा पती ' पती ' Smile ... तेरा पती ' वनस्पती ' Blum 3 " ♥

पती वनस्पती?????/? तेरा पती उचापती........ चायकी पत्ती ,,,

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2013 - 12:56 am | अत्रुप्त आत्मा

@मी न माझी , माझे न काहि
माझ्यासाठी मीपण नाहि
नाहि नाहि म्हणता म्हणता
कवितेला मी सांगत होते. >>> वा वा वा! किति मत्त मत्त लिवते ही बालिका! :)

अवांतर- म्हणेल... म्हणेल कुणी ही बालिका एव्हढि ढालगज आहे म्हणुन! ;-)

'त्या एव्ढ्याश्या जालावारती सदस्य मिपाचे भाण्डत होते'
असे विडंबन किंवा सुडम्बन पाडावे काय? ;-)
जौद्या, इरेशिरेने विडंबन कविता पाडायला आपल्याला जमणार नाय. त्याला ढिग्भर खरडफ़ळी प्रतिसाद मिळय्ण्यासाठि आपला एखादा कम्पू पण नाय :-(
.
.
असो. तुमी लिव्हा पुजाबै. चांगले लिवताव. :)

आदूबाळ's picture

17 Oct 2013 - 1:29 am | आदूबाळ

क्या बात!

स्पंदना's picture

17 Oct 2013 - 4:57 am | स्पंदना

ओ नव्या पूजाबै! तुमच नव्यान स्वागत,

हे म्हणजे कस? प्रेयसीची बायको होण्यासारख. म्हणजे माणुस तेच उपाधी वेगळी.

तरीही या सगळ्याच्या पलिकडे......कवितेशी प्रामाणिकपणा राखुन...कविता चांगली म्हणजे चांगलीच आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2013 - 6:59 am | अत्रुप्त आत्मा

@हे म्हणजे कस? प्रेयसीची बायको होण्यासारख>>> खिक्क...! :-D

इरसाल's picture

17 Oct 2013 - 12:35 pm | इरसाल

हे म्हणजे कस? प्रेयसीची बायको होण्यासारख.

लोकं नावं नाही का ठेवणार ? अजुन कायदा झाला तरी लोकांनी अ‍ॅक्सेप्ट कुठ केलय ?

कविता कळली...चांगल लिहिता...

कविता जमलिये पण शुद्धलेखनाचं तेवढं बघा ना...,!

मुक्त विहारि's picture

17 Oct 2013 - 9:16 am | मुक्त विहारि

आँ....

आमच्या बाबांच्या भाषेत नो कॉमेंटस....

पैसा's picture

17 Oct 2013 - 10:01 am | पैसा

बरेच दिवसांनी कविता का? असो. थोडेसे सूद्दलेखन दुरुस्त केले आहे.

स्पंदना's picture

17 Oct 2013 - 2:20 pm | स्पंदना

घुसलीस का? घुसलीस का तिच्या लेकनात?
आग आता ल्येक गेला हातातन, तर लेकनात कशापाई जीव आडकवतियास?

जेनी...'s picture

17 Oct 2013 - 10:19 pm | जेनी...

थँक्स हं सासुबै !

बाकि माझी नविन वाली प्रतिक्रिया एकट्या अप्पुला कळली .... बाकिचे सगळे म्ट्ठ्चेत
नुसते :-/

कोमल's picture

17 Oct 2013 - 10:23 am | कोमल

:!

नक्शत्त्रा's picture

17 Oct 2013 - 11:49 am | नक्शत्त्रा

पूजा चे हे नवीन रूप चं अहे….मनाला हि भावले !!!चिमुकले…. !!!चिमुकले!!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Oct 2013 - 12:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

संपूर्ण कविता मनापासून आवडली.

बरेच काहि अवती भवती
भोवतालीच्या ओठावरती
सार तयाचे मांडत होते
शब्द चिमुकले सांडत होते

हे खासचं!

छान लिहीतेस गं.. नियमीतपणे लिहीत जा.

चौकटराजा's picture

17 Oct 2013 - 5:09 pm | चौकटराजा

मला आवडली पण सासूबाईंना आवडली का ........ ?

जेनी...'s picture

17 Oct 2013 - 10:20 pm | जेनी...

सगळ्यांचे आभार !

कवितानागेश's picture

18 Oct 2013 - 12:03 am | कवितानागेश

खूप आवडली कविता.
अजून एक कर. :)

अर्धवटराव's picture

18 Oct 2013 - 1:59 am | अर्धवटराव

नाहि, म्हणजे म्हणजे कविता एकदमच सट्ल् का काय म्हणतात तशी झाली आहे.

प्यारे१'s picture

18 Oct 2013 - 3:19 am | प्यारे१

चित्रपटात दाखवतात तसं वार्‍यावर विहरणारं पिस आठवलं कविता वाचून....

विजुभाऊ's picture

19 Oct 2013 - 11:35 am | विजुभाऊ

इ लिकेद थिस पोएम वेर्य मुच. इफ योउ चोन्तिनुए सुच व्रित्तिन्ग्स ओने दय योउ विल ल्बे रेचोग्निसेद अस शेल्लेय ओफ मिसळ्पाव संस्थळ.
कीप इत उप . ई अम सुरे थत ओने दय योउ विल्ल एक्ष्चेल इन व्र्रित्तिन्ग पोएम्स.
एवेर्य पोएम ब्य्योउ विल्ल बे इन्स्पिरतिओनल फोर अल्ल्ल ओथेर्स इन थे वोर्ल्द.

अग्निकोल्हा's picture

20 Oct 2013 - 1:19 am | अग्निकोल्हा

Stop this nonsense!

मीनल's picture

20 Oct 2013 - 4:20 am | मीनल

कविता आवडली. रिदमिक आहे. भवनापूर्ण आहे.
शूध्द लेखन सबकूछ माफ!!!!

विअर्ड विक्स's picture

23 Oct 2013 - 3:01 pm | विअर्ड विक्स

शब्द चिमुकले सांडत होते , अपुले मनातील मांडत होते,
अपुल्या स्वप्नांतील अपुरी गम्मत जम्मत, शब्दांद्वारे सांगत होते....

एखाद्या कवितेची निर्मिती कशी होते हे सहज सोप्या शब्दात सांगितले आहे.....

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Oct 2013 - 3:17 pm | माम्लेदारचा पन्खा

लिहित रहा.....वाचत आहे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2013 - 3:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता चांगली जमलीय. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

चिमुकले वरून आठवलं. नेटवर एक लेख वाचला, त्यात कुणाच्यातरी बोबड्या बोलांविषयी किस्सा आहे.
मास्तर शिकवतात
पंख चिमुकले निळे जांभळे

गण्याचं लक्ष नाही म्हणून त्याला विचारतात, सांग मी काय शिकवलं ?
गण्या बोबडं बोबडं बोलत सांगतो

पंतचि मुतले निळे जांभळे