मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता ? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
16 Jun 2013 - 11:03 pm
गाभा: 

१] कार्यालयात कामात गुंतवून घेतो.

२] घरकामात व्यस्त असतो.

३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो.

४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.

५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.

६] मिपा कधी सुरु होईल याची चौकशी करतो.

७] मिपाचा राग येतो.

८] चित्रपट पाहिले, दूरदर्शनच्या मालिका पाहिल्या.

९] भटकंती केली.

१०] काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही.

११] अन्य. [प्रतिसादात मत लिहिले आहे]

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Jun 2013 - 11:22 pm | पैसा

तुमचा आवडत्या विषयाचा धागा आलाच शेवट! २ ते ९ सगळे प्रकार आलटून पालटून करते. मात्र यावेळी जरा वेगळे प्रकार केले. थोडेफार शिवणकाम केले. घर आवरले. एबीसीडी, बोलबच्चन, नवा चष्मेबद्दूर, बर्फी, हॅरी पॉटरचा शेवटचा भाग वगैरे सिनेमे पाहिले. आणि भरपूर झोपा काढल्या!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jun 2013 - 11:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे सर्वात जास्त हाल झाले. सुटी चालू असल्यामुळे काही मौजमजा करावी म्हटलं तर मिपावर भला मोठा येरर. कितीही रिफ्रेश मार तो उदास येरर माझ्या स्वागतासाठी दात वेंगाडून हजर. कोणत्या जन्माचा बदला घेत होता माहिती नै पण माझ्या मनात त्या येररचा लैच द्वेष निर्माण झाला. बाकी, माझा एक कलमी कार्यक्रम सकाळ, दुपार, संध्याकाळ मिपाच्या पानावर रिफ्रेश मारणे. आणि जमलंच तर मिपा मालकांना, मालक करा ना राव मिपा चालू असा एसेमेस करणे.

आता तुम्हाला म्हणून सांगतो मायबोलीवर काही कविता आणि गझला चाळल्या पण तिकडेही साचेबद्ध, सुबक, गझलांवर काफिया,रदीफ, आणि मतलात रमणा-या आणि आशयाचा पत्ता नसणा-या गझलांशी सालं आपलं काही जमलं नाही.

फ़ेसबूकवर एका थोर जाल साहित्यिकाराने महानुभाव संप्रदायात चारोळी प्रकार लिहिल्या जात होता असा विचार मांडून मला बेशुद्ध पाडण्याचा प्रयत्न केला. बाकी, फेसबूकवर काही मित्रांच्या पोष्टी लाईक केल्या. फेसबूकवर माझ्या भिंतीवर आजतागायत एकही पोष्ट मी टाकली नाही. पण, अन्य मित्रांच्या भिंती रंगवल्या पण काही खास नाही.

एक चरित्रवजा 'जगी ऐसा बाप व्हावा' चाळून काढले. बाकी, एककलमी कार्यक्रम मिपाच्या पानावर रिफ्रेश मारणे.

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

18 Jun 2013 - 3:56 pm | कवितानागेश

'जगी ऐसा बाप व्हावा' मीपण मध्ये वाचलं अर्धं. :)

मदनबाण's picture

20 Jun 2013 - 9:42 am | मदनबाण

@बिरुटे सर...

सर्वात प्रथम तुम्हालाच व्होट्सअप मधुन विचारणा केली,मग निलकांत शेठला मेल पाठवले. हापिसात कामात जराशी सवड मिळाली तर उगाच पेज रिफ्रेश मारुन पहायचे असे उद्योग या काळात केले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jun 2013 - 11:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झी क्लासिक वर नवरंग पाहिला. त्याच्यातला कवी मला भावला. आवडला. गाणी तर मस्तच. ट्रीपल एक्स पाहिला. आणि एकदा आमच्या कुटुंबाच्या नादाला लागून एक दोन दिवस 'पवित्र रिश्ता' मालिकाही पाहिली. लै भारी आहे म्हणे, या मालिकेत अर्चना का कोण तरी ती म्हातारीचा रोल करणार नाही म्हणून कोमात गेली की मेली त्या दिवशी आमचं सर्व घर चकचक करत होतं. मला काही ते समजलं नाही. तुम्हाला नै माहिती, तिच्यामुळेच ही मालिका चालू होती वगैरे बरचं ऐकलं. मग, मीही त्यांच्यासोबत त्या दिवशी सिरियस राहीलो.

एक दिवस शिर्डीला गेलो. वाटर पार्कात दिवसभर डुबत राहीलो.... अजून काय काय केलं ते आठवणीनं लिहितो.

-दिलीप बिरुटे

आशु जोग's picture

16 Jun 2013 - 11:34 pm | आशु जोग

> अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.
हे केलं. त्यात नावे आठवेनात. एक संस्थळ उघडलं तर कुठल्यातरी दुकानाच्या साइटला पोचलो.
मिसळ का आवडते याचा विचार केला. एक कारण इंटरफेस. साधा सोपा सरळ समजण्यास खूप सोपा.
इतर कारणे स्वातंत्र्य, खरी लोकशाही अनुभवायला मिळते इथे.
ते स्वातंत्र्य मिस करत होतो आम्ही. मिसळ बंद पडल्यावर हा सगळा विचार करत होतो.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2013 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा

१) http://www.sherv.net/cm/emoticons/drink/reading-newspaper.gif
==============================================

२)http://www.sherv.net/cm/emoticons/birds/bird-watching-smiley-emoticon.gif
==============================================

३)http://www.sherv.net/cm/emoticons/bugs/funny-fly-swatter-smiley-emoticon.gif
==============================================

४)http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/mechanic-smiley-emoticon.gif
==============================================

५)http://www.sherv.net/cm/emoticons/housework/gardening-smiley-emoticon.gif
==============================================

६)http://www.sherv.net/cm/emoticons/olympics/synchronized-swimming-smiley-emoticon.gif
==============================================

७)http://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking.gif
==============================================

८)http://www.sherv.net/cm/emoticons/birthday/birthday-dancer.gif
==============================================
.
.
.
.
.
.
.
.
.
.
९)अश्या स्मायल्या शोधण्याचे काम करतो... =))

४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.
लय संस्थळांवर लय चकरा टाकल्या, पण "प्रकृती" जुळेना. बरेच लेखक इतर स्थळांवरही असल्यामुळे त्यांचं लेखन वाचायला मिळालं, अन मिपावर कोणाच्या काय प्रतिक्रिया असल्या असत्या याचा कल्पनाविलास करून खुदूखुदू हसत होतो.

५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.
आगीनकोल्ह्यावर मिपा घरगुती पान असल्याने आपोआप रिफ्रेश होत होतंच.

७] मिपाचा राग येतो.
काऊंटर बघून बघून लय डोकं सराकलं होतं.

---
अजून एक म्हणजे "टेलिपोर्टेशन अ‍ॅक्सिडेंट" नावाचं एक भन्नाट पुस्तक वाचलं. "जॉनर बेंडर" प्रकारच्या या पुस्तकात साय फाय, इतिहास, कॉमेडी वगैरे बर्‍याच प्रकारांची सरमिसळ आहे.

पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा ही ओळखः

...a historical novel that doesn't know what year it is; a noir novel that turns all the lights on; a romance novel that arrives drunk to dinner; a science fiction novel that can't remember what 'isotope' means; a stunningly inventive, exceptionally funny, dangerously unsteady and (largely) coherent novel about sex, violence, space, time, and how the best way to deal with history is to ignore it.

पैसा's picture

18 Jun 2013 - 4:36 pm | पैसा

परीक्षण्/रसग्रहण येऊ द्या!

> आगीनकोल्ह्यावर मिपा घरगुती पान
२ मिनिटे समजेनाच....

आदूबाळ's picture

18 Jun 2013 - 6:03 pm | आदूबाळ

ही ही ही ही! परत वाचल्यावर थोडं चमत्कारिक वाटलं मलाही.

बर्‍याच वर्षांपूर्वी कुठल्यातरी मराठी संस्थळावर (मिपा नसावं) एक कथा वाचली होती. त्यातला नायक "उन्मुक्त बर्छीगिरी" करत होता. मला बराच वेळ कळेना याचा नक्की व्यवसाय काय असावा. खाली कोणीतरी प्रतिक्रियेत free lancing असा खुलासा केल्यावर एकदम "युरेका युरेका" झालं!

भावना कल्लोळ's picture

18 Jun 2013 - 3:56 pm | भावना कल्लोळ

मी काही संबंध नसताना सुद्धा संगणक देवाला पाया पडते, कुलदेवतेच्या नावाचा जाप करते, मिपाचे वेब पेज ओपन करते,एरर येतो,त्याला परत ताज तवाने करते, पण काही उपयोग नाही, मग हाफिसातली खोळंबलेली कामे ना इलाजाने उरकून घेते, परत वर लिहिल्या प्रमाणे प्रयत्न करते, मग सरते शेवटी चेपु वर जाऊन अनाहिताच्या विभागात टाहो फोडत सुटते, आणि पैसाताई ला पिडत बसते.

अक्षया's picture

18 Jun 2013 - 4:38 pm | अक्षया

चेंज म्हणुन ऑफीस मधे काम करते..;)

दिपक.कुवेत's picture

18 Jun 2013 - 4:45 pm | दिपक.कुवेत

बघुन भोवळ यायची बाकि होती. आता हि प्रतिक्रिया सुद्धा दिसेल कि नाहि शंका वाटतेय. बाकि नाईलाजानं ऑफिसची कामं उरकली. बाकि ह्या निमित्ताने फेसबुकवर नविन अकाउंट ओपन झाले.

विकास's picture

19 Jun 2013 - 7:35 pm | विकास

मिपा बंद असतं? ;)

हं म्हणजे केवळ हे संस्थळ आणि त्याच्या मागे लागलेले स्पॅमर्स म्हणजेच मिपा म्हणायचे असले तर गोष्ट वेगळी आहे. पण फेसबुकावर आणि इतरत्रही संवाद साधताना मिपा म्हणूनच होत असतो. मग एखादा धागा टाकला नाही अथवा प्रतिसादाची पिंक पाडता आली नाही म्हणून मिपा बंद आहे असे समजायचे का?

विकिभैय्यांशी सहमत बरं का!

नितिन थत्ते's picture

19 Jun 2013 - 8:26 pm | नितिन थत्ते

विकासभौंना विकि म्हणणे म्हणजे अतीच होतंय हां ! :)

विकास's picture

19 Jun 2013 - 9:47 pm | विकास

अगदी सहमत!

रेवती's picture

19 Jun 2013 - 9:55 pm | रेवती

तुम्हाला उतरप्रदेशी म्हणण्याचे काही मनात नव्हते पण तसे वाटत असेल तर उडवा की माझा प्रतिसाद! त्यात काय यवढं! मला बरेच दिवसांपासून विकीभैय्या म्हणून बघायचं होतं ते काम केलं. बाकी काही नाही. माझा प्रतिसाद हा काही महत्वाचा दस्तैवज नाही. खुश्शाल उडवा.

विकास's picture

19 Jun 2013 - 10:27 pm | विकास

नितिनरावांनी म्हणले आहे, "विकासभौंना विकि म्हणणे.." त्यावरून कॉम्रेड विकी हे मित्र आठवले इतकेच. :)

नितिन थत्ते's picture

20 Jun 2013 - 8:29 am | नितिन थत्ते

तेच विकि म्हणायचे होते. तुम्हाला शोधण्याची खास फॅसिलिटी उपलब्ध आहे का?

विकास's picture

20 Jun 2013 - 9:43 am | विकास

तुम्हाला शोधण्याची खास फॅसिलिटी उपलब्ध आहे का?

अर्थातच ;) त्याला गुगल म्हणतात!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2013 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुद्द्याशी सहमत.

मिपा एक तांत्रिक गोष्ट असेल पण त्याच्याभोवतीचा पाफटपसार्‍यालाही मिपाच म्हटलं पाहिजे, त्याला ना स्पॅमर्स अडवू शकतात ना, अन्य कोणी. आणि अशा मिपा गणगोतात तांत्रिकदृष्ट्या येरर येऊ शकत नाही, याची प्रचिती अनेकांना अशा काळात येते. मिपाकरांशी तसा संवाद सुरुच असतो.

-दिलीप बिरुटे

मी डॉ. कलामांचे अग्निपंख हे पुस्तक पुन्हा एकदा वाचले, बहुतेक आठव्यांदा असेल! अक्कल्दाढ काढून घेतली, नाहीतरी मिपावर काम नव्हते, आता एक गाल सुजवून बसलीये. त्यामुळे माझी बडबड बंद असल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. मिपा बंद असताना कपाटे, ड्रॉवर्स आवरणे, कागदपत्रे नीट लावून ठेवणे अशी कामे होतात व मनाला आनंद मिळतो. वाणसामानाची यादी केली, घरकामे असतातच, ती यात धरलेली नाहीत. ;) मुलाबरोबर क्रिकेट खेळले. चक्क एक कॅच घेतला, बाकीचा वेळ ग्राऊंडशेजारी उभ्या असलेल्या कारच्या खाली अडकलेला बॉल काढण्यात गेला. आता काय करणार? नाही जमत नीट फिल्डींग करायला!

स्पंदना's picture

20 Jun 2013 - 6:26 am | स्पंदना

:)) :)) :)) :))

पाषाणभेद's picture

19 Jun 2013 - 9:30 pm | पाषाणभेद

अजूनही मिपा म्हणावे तसे पळत नाहीये. अन जुने लेखही दिसत आहे काय? मला तर नाही.
नक्की काय प्रॉब्लेम असावा?

सस्नेह's picture

19 Jun 2013 - 9:55 pm | सस्नेह

मी मुलाचा दहावीचा अभ्यास जातीने घेतला अन त्याला फेस आणला...! a

यशोधरा's picture

19 Jun 2013 - 10:18 pm | यशोधरा

अग्गग! बिच्चारा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2013 - 7:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लंबर एक आवडले. :)

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

25 Jun 2013 - 12:30 pm | प्रभाकर पेठकर

त्याच्याच प्रार्थनेला यश येवून मिपा पुन्हा सुरु झालेले दिसते आहे.

गंगाधर मुटे's picture

20 Jun 2013 - 1:45 am | गंगाधर मुटे

कपाशीची पेरणी केली.
मिपाच काय आख्खे इंटरनेट बंद पडले असते तर पेरणीवर जास्त लक्ष केंद्रीत करता आले असते. (असा एक विचार डोक्यात डोकावून गेला. :) )

२.एक खोली रंगवायला घेतलीय .५.मिपाच्या बुकमाकवर काम थांबल्यावर टिचकी मारतो .आणि ७.##??

स्पंदना's picture

20 Jun 2013 - 6:30 am | स्पंदना

मी खुप काही केलं.
म्हणजे मिपा चालु असताना करत नाही ते सगळे उद्योग केले अन नवर्‍याकडुन "कुणी हे उद्योग सांगीतले होते?" अस रागावुन घेतल.

प्रचेतस's picture

20 Jun 2013 - 8:18 am | प्रचेतस

सध्या हापिसात भयानक काम असल्याने मिपा चालू असले तरीही येता आले नसतेच त्यामुळे दिवसा कुठे वेळ घालवावा हा फारसा प्रश्न पडला नाही. रात्री घरी आल्यावर मात्र मिपा पेजवर सतत रिफ्रेश मारणे आणि नंतर वैतागून झोपणे हाच क्रम चालू होता. मध्येच स्टार वॉर्सची सिरीज पण पाहून झाली.

नित्य नियमाप्रमाणे रोज मिपार येउन जाने . तसे बरेचशे ब्लॉग वाचुन काढले , मिपा व्यतिरिक्त जे काही मराठी संस्थळे आहेत ती पालथी घातली . बाकी काय खरेच सांगायचे तर ऑफिस मधले काम मन लाऊन करण्याचा प्रयत्न केला .:)

अनन्न्या's picture

20 Jun 2013 - 6:59 pm | अनन्न्या

फेरी मारून मिपाकर मिपा चालू झाल्याची बातमी कधी देतायत याची वाट पाहत होते. आज चालू झालेय हे कळल्यावर आधी मिपावर सगळीकडे फेरी मारून आले. हायसे वाटले. आज काम बंद, मिपा सुरू!!

विनायक प्रभू's picture

21 Jun 2013 - 10:28 am | विनायक प्रभू

अपुर्ण होम वर्क पूर्ण केले.

सुहास..'s picture

21 Jun 2013 - 2:51 pm | सुहास..

अपुर्ण होम वर्क पूर्ण केले. >>>>

तुमच्य होमवर्क चा पब्लीक ने काय अर्थ घ्यायचा ;) ( व्यनी करा हवे तर :) )

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2013 - 12:24 pm | श्रीगुरुजी

www.misalpav.comwww.misalpav.in ही दोन्ही संकेतस्थळे वेगवेगळी आहेत की एकच आहेत?

मंदार कात्रे's picture

21 Jun 2013 - 9:48 pm | मंदार कात्रे

३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो.

४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.

५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.

५० फक्त's picture

22 Jun 2013 - 10:35 am | ५० फक्त

ऑफिसात भयाण काम आहे
ऑफिसात मिपा बंद झालं आहे
घरी पोराची शाळा सुरु झाली
त्यामुळं फार फरक पडला नाही पण कसंतरी वाटतं हे खरं
असो. वल्ली पोहायला शिकतो असा नवस बोलला आहे म्हणे मिपा बंड पडु नये म्हणुन..

प्रचेतस's picture

22 Jun 2013 - 11:09 am | प्रचेतस

वल्ली पोहायला शिकतो असा नवस बोलला आहे म्हणे मिपा बंड पडु नये म्हणुन..

आइंग. जी गोष्ट पहिल्यापासून येतेय तिच्याबद्दल नवस कशाला बोलायला पायजे म्हणे.

लै कामे होतेत मिपा बंद असले की किंवा यायचे बंद केले की,
बोलायची भाषा सुधारली, प्रत्युत्तरे देण्याची सवय आटोक्यात आली.
चार पैसे जास्त मिळाले. खर्च करायचे चार मार्ग अजून सापडले.
एकूणच लै मस्त टैम्पास झाला.

सूड's picture

23 Jun 2013 - 2:55 pm | सूड

ते प्रत्युत्तर देण्याचं आटोक्यात मात्र नाही आलं बुवा !!

चौकटराजा's picture

23 Jun 2013 - 3:12 pm | चौकटराजा

आपल्या देशात एवढे कवि, साहित्यक, बुवा, महाराज, मंत्री, मॅडम, युवराज, प्रा, डॉ, सिंग , सिंगर ई असताना यातला एकही माणूस गव्हर्नन्स चा आग्रह धरून आपले जीवन पणाला का लावीत नाही? हजारो नागरिकांचे प्रलयात बळी जात असताना हे पदमविभूषण पदमश्री गप्प कसे ? याचा विचार करायला मिपा बंद पडल्याने संधी मिळाली. पण विचार कर करून डोक्याचा भुगा झाला.

प्रभाकर पेठकर's picture

25 Jun 2013 - 12:36 pm | प्रभाकर पेठकर

अनेक दिवसांची तुंबलेली कामे मार्गी लागली.
बाकी वेळ मिळाला की मिपाच्या दरवाजा बाहेर लोचटासारखा आशाळभूत नजरेने वाट पाहण्याचे काम करीत राहिलो.

पुष्कर जोशी's picture

25 Jun 2013 - 4:25 pm | पुष्कर जोशी

Suites, Ancient Aliens, आणि उंच माझा झोका आशा serials पाहिल्या ...

ब़जरबट्टू's picture

1 Jul 2013 - 10:23 am | ब़जरबट्टू

सध्या तर "मिपा" सुरु कधी असते असा प्रश्न पडाया लागलाय। Error फार येताहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2013 - 6:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय सांगू आणि किती सांगू... मिपा असं वागतं पाहून माझी तर तब्येतच बिघडली आहे सध्या. :(

देवा पांडुरंगा, लोकायला सुखात ठेव, पाऊसपाणी जोरदार होऊ दे, आणि एवढं मिपा नियमित व्यवस्थित चालु दे, लै मागणं नै बाबा तुझ्याकडे आमचं.

-दिलीप बिरुटे

पापं लै झालेत तुमची म्हणून पांडुरंग ऐकत नै तुमचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंय.....! पांडुरंग तरी कुठे कुठे लक्ष घालेल म्हणा....
पण पुण्याची कामं थोडीफार तरी होत असतीलच ना ?

मला आवडेललं हे एक काम आता त्याला पुण्य म्हणायचं की कसं ते ठरवा बॉ...
असं थोडंफार कोणीही चांगलं केलेलं काम येईल की मिपाच्या कामाला. :)

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

7 Jul 2013 - 10:46 am | यशोधरा

वा! सही आहे. :) तुम्हांला मदत करायची आहे उत्तराखंडसाठी? एक सोर्स सांगू शकते.

पण पुण्याची कामं थोडीफार तरी होत असतीलच ना ?

पुण्याची कामे पांडुरंग कशाला करेल. ती पुणे म न पा करेल की.
प्रत्येक बाबीत पुण्याचा उल्लेख करणे हा विदर्भ मराठवाड्यावर अन्याय आहे

वारंवार हा प्रश्न पडु नये अशी अशी सध्या अपेक्षा करतोय !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2013 - 6:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हम्म, या वेळेस कामं असल्यामुळे मिपा फ्रीज असण्याचा फार लोड आला नाही.

बाकी, अजुन काय केलं ते स्याटरडे इव्हिनिंगला निवांत लिहितो.

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

3 Aug 2013 - 8:47 am | चित्रगुप्त

मला वाटलं, की फक्त माझ्याच खात्याची काहीतरी गडबड झाल्यामुळे मिपा उघडत नाहीये, कारण दरवेळी 'हॉटेलात आलेली' वेगवेगळ्या माणसांची नावं दिसत होती.
शेवटी एकदाचं चालू झालं, हुश्श्य..

रुमानी's picture

3 Aug 2013 - 9:36 am | रुमानी

वा वा झाले का चालु असेच म्ह्न्ते......:)

मदनबाण's picture

3 Aug 2013 - 11:36 am | मदनबाण

या वेळी ताटी उघडा ज्ञानेश्वरा आळवावे का ? असे वाटले ! ;)

पिवळा डांबिस's picture

3 Aug 2013 - 12:16 pm | पिवळा डांबिस

अलास्काला जाऊन आलो.
मिपाच काय पण कुठल्याही संस्थळांची, किंबहुना आंतरजालाचीच कमतरता भासली नाही!!!!
सेम वॉज ट्रू फॉर टीव्ही आणि वर्तमानपत्रे!!!

धमाल मुलगा's picture

3 Aug 2013 - 7:41 pm | धमाल मुलगा

लय भारी! बिग बेम हंट का? ;)

धमाल मुलगा's picture

4 Aug 2013 - 3:53 am | धमाल मुलगा

बेम = गेम असं वाचावे ही णम्र इनंती.

चौकटराजा's picture

3 Aug 2013 - 12:21 pm | चौकटराजा

मला तर यावेळी वाटले मिपा ही हनीमूनला गेले की काय ?

धमाल मुलगा's picture

3 Aug 2013 - 7:40 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))
काकानुं...कॉफी अडकली राव नरड्यात. वरचा श्वास वर, खालचा खाली!

प्रभाकर पेठकर's picture

4 Aug 2013 - 2:18 am | प्रभाकर पेठकर

आयला, तुम्ही 'खालून' पण श्वास घेता?

धमाल मुलगा's picture

4 Aug 2013 - 3:53 am | धमाल मुलगा

=)) =))
_/\_
अडकला म्हणालो हो...म्हणजे श्वास कोंडला! आता कोंडला म्हणजे..... ;)

बॅटमॅन's picture

5 Aug 2013 - 12:00 pm | बॅटमॅन

पेठकरकाका, हे म्हंजे लैच =)) =))

मदनबाण's picture

5 Aug 2013 - 3:58 pm | मदनबाण

हॅहॅहॅ !!! हॅहॅहॅ काकाश्री तुस्सी ग्रेट हो ! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2013 - 11:06 pm | अत्रुप्त आत्मा

@मला तर यावेळी वाटले मिपा ही हनीमूनला गेले की काय?>>>__/\__ http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif खप्ल्या गेलो आहे...!

माझीही शॅम्पेन's picture

5 Aug 2013 - 11:59 am | माझीही शॅम्पेन

मला तर यावेळी वाटले मिपा ही हनीमूनला गेले की काय

आणि हा चेंडू सीमा-पार गेलेला गेलेला आहे :)

चौकट राजा ऐवजी बदाम राजा हा आयडी घ्या बघू आता ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2013 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा

@बदाम राजा हा आयडी घ्या बघू आता >>> =)) आणी हा http://www.sherv.net/cm/emo/hearts/nerd.gif आयकॉन =))

अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.
मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.

यशोधरा's picture

3 Aug 2013 - 6:24 pm | यशोधरा

दर वेळी हा धागा वर येतो! :(
कायतरी कायमस्वरुपी उपाय करा की मिपासाठी. नीलकांताऽऽ ऐकतो/ वाचतो आहेस की नाही?

धमाल मुलगा's picture

3 Aug 2013 - 7:49 pm | धमाल मुलगा

थोडे दिवस तरी बिचार्‍याला आयुष्यातले गुलाबी दिवस जगू द्या की सुखानं. :)

पयले हमारी मांगे पुरी करो आणि मह हवं तेवढं गुलाबी दिवस जगो :P

प्रभाकर पेठकर's picture

5 Aug 2013 - 2:12 am | प्रभाकर पेठकर

नव्या नवलाईचे दिवस सरले की 'गेले ते दिवस' असा उसासा टाकत निलकान्त परतेल तो पर्यंत वाट पाहावी लागणार.

धमाल मुलगा's picture

3 Aug 2013 - 7:48 pm | धमाल मुलगा

साचलेली कामं पुर्ण केली, नवं सॉफ्टवेअर शिकून झालं, एका गोर्‍या दोस्ताला मराठी(तल्या शिव्या) शिकवून झालं. :D
लंचब्रेकमध्ये जेवणानंतर त्याच टेबलाची गोलमेज परिषद करुन रोज तेलंगणा ते विदर्भ ते शोभाडे(जिथं हवी तिथं स्पेस आपल्या सोयीनुसार देऊन वाचा.) अशी चर्चासत्रं ('मी तुमच्या मताशी सहमत आहे' इथपासून ते 'तू गप भाड्या. फुटीरतावादी साले..बघावं ते तिसरंच तुणतुणं' पर्यंतच्या रेंजमध्ये) चालवली. अन शेवटी, चेपूवर बुवांच्या कृपेनं मिपाची इनकमिंग सेवा सुरु झाल्याचं कळल्यावर बाकी सगळ्या यक्ष्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिविट्या बंद करुन परत मिपा मिपा खेळायला लागलो. :)

कवितानागेश's picture

3 Aug 2013 - 11:47 pm | कवितानागेश

यावेळेस मी फेस्बुकावर जाउन फुकाचे वाद घालत बसले! ;)

तुला चिवडा शिकवला होता तो केलास की नाही? ;) आंतरजालीय चिवडा!

बॅटमॅन's picture

5 Aug 2013 - 12:02 pm | बॅटमॅन

मीही!!! एरवीपेक्षा यावेळी प्रतिवादी मात्र वेगळे होते. इस्कॉनवाल्यांबरोबर व्हेज विरुद्ध नॉनव्हेज असा वाद घालताना लै मजा येते.

एखादा लेख किवा प्रतिसाद आवडला तर लाईक बटण असावे अशी ईच्छा आहे.

सुबोध खरे's picture

4 Aug 2013 - 11:02 am | सुबोध खरे

+११११

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Aug 2013 - 10:01 am | निनाद मुक्काम प...

सदर गाणे व त्यातील बोल व त्यामागील भाव ,आचार , विचार हे माझ्यातर्फे मिपासाठीच जणू लिहिले गेले आहेत.
हेच सरांच्या प्रश्नाचे उत्तर आहे.

मिपा कधी सुरु होईल याची वाट बघत असतो.

नक्शत्त्रा's picture

5 Aug 2013 - 12:09 pm | नक्शत्त्रा

एखादा लेख किवा प्रतिसाद आवडला तर लाईक बटण असावे अशी ईच्छा आहे......आगदि सह्मत...पण मिपा चे फेसबुक होवू नये …मिपा चे मिपा पण टिकवून रहावे!!! मिपा बंद असल्यावर भारतात फोन करते आणि सर्व ठीक आहे न याची खात्री करते……नी मिपा लवकर चालू व्हावा मानून chinese देवते कडे पण साकडे घलते. भारतीय देवांना तुम्ही busy ठेवलेले असते ना मानून.

चायनीज देवतांना नैवेद्य काय ठेवता?

"मिपा सुरू होऊदे, एक शेझवान चिकन आणि दोन हाक्का नूडल्स अर्पण करेन" असा नवस करता काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2013 - 12:49 am | डॉ सुहास म्हात्रे

त्याबरोबर "एक लाख रुपयांचा पेपर मनी जाळेन" हेही पाहिजे, त्याशिवाय चीनी देव खूष होत नाहीत ;)

दादा कोंडके's picture

5 Aug 2013 - 3:06 pm | दादा कोंडके

मिपा बंद असल्यावर भारतात फोन करते आणि सर्व ठीक आहे न याची खात्री करते

मिपा वरचेवर बंद पडो आणि तुम्ही नेहमी 'सर्व ठिक आहे न' याची खात्री करण्यासाठीका होइना पण भारतात फोन करो, अशी तुमच्या पिचक्या डोळ्याच्या चायनिझ देवीच्या चरणी प्रार्थना,

नक्शत्त्रा's picture

5 Aug 2013 - 4:07 pm | नक्शत्त्रा

बॅटमॅन!!!मग काय …सर्व्च लागते ह्या देवताना … एक शेझवान चिकन आणि दोन हाक्का नूडल्स वर नाही चालत. पूर्ण सागर संगीत लगते. तेव्हा कुठे मिपा login होते. दादा कोंडके -भारतात फोन दररोज होतो… पण मिपा बंद पडले कि सारखासारखा होतो…. आई कडून पाकृ च्या टिप्स घायला …।

बॅटमॅन's picture

5 Aug 2013 - 5:27 pm | बॅटमॅन

पूर्ण सागर संगीत लगते.

आता हे संगीत वाजवणारा सागर कुठून आणता म्हणे बॉ तुम्ही? की ते बकासुराला गाडीभर भात आणि एक माणूस लागायचा तसं एक संगीतकार लागतो या चैनीझ देवतांना?

कपिलमुनी's picture

5 Aug 2013 - 5:09 pm | कपिलमुनी

माझा दुसरीकडे आय डी नसल्याने लै लोच्या होतो !

एकदम दुसर्या लांबच्या गावात रहायला गेल्यासारख अनोळखी होउन जाता ..

मग ब्लॉग वाचत बसायचे

सौंदाळा's picture

5 Aug 2013 - 6:16 pm | सौंदाळा

आम्ही वाचनाची भुक आणि आपली मनातली इच्छा व्हर्च्युली पुर्ण करण्यासाठी गुगलबाबाला साकडे घालतो.
उदा. असे की-वर्ड्स (मराठीत) देतो: 'कोकणात गेलो', 'टकमक टोकापर्यंत गेलो', 'मस्तपैकी मासे खाल्ले' (यात पण बांगडा, खापी, कोळंबी असे व्हेरिएशन करतो ;)), 'हिरवागार निसर्ग', फेसाळते धबधबे' वगैरे वगैरे..
आणि जे रीझल्ट्स येतात ते घुट्क्या-घुटक्याने वाचतो. लई मज्जा येते राव.. एखादे मस्त लिखाण सापडते कधी कधी.
मिपा पेज रीफ्रेश तर चालुच असतं.

चित्रगुप्त's picture

4 Sep 2013 - 12:58 pm | चित्रगुप्त

@ सौंदाळा: तुमची गूगलबाबाला मराठीतून साकडे घालण्याच्या आयडियाची कल्पना आम्ही वापरून बघितली, आणि एक नवीनच खजिना उघडला. उदाहरणार्थ 'मराठी विश्वकोश'
अनेक आभार.

मदनबाण's picture

4 Sep 2013 - 1:17 pm | मदनबाण
डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2013 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त आयडियाची कल्पना !

हे आता नेहमीचेच झाले बुवा... :(

काय करावे..?
आता मिपा बंद असताना काय करवे हा धागा येउ देत ओ सर.. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2013 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> हे आता नेहमीचेच झाले बुवा

मिपा नियमित विनाव्यत्यय चालावं ही सदस्य, संपादकांबरोबर मिपा मालकाची सुद्धा इच्छा असतेच, असते. मिपाचा परिवार वाढतोय. अनेक नवनवीन सदस्यांबरोबर अनेक आगंतुक गोष्टीही मिपावर येत असतात तेव्हा तंत्रज्ञ म्हणुन जितके योगदान मिपा मालकांना देता येते ते देतच असतात, ते आम्ही संपादक पाहातही असतो. बाकी, काही ड्रूपल येरर्सही कधी कधी जिद्दीला पेटतात तेव्हा अधिक वेळ लागतो असे मला वाटते. :)

>>> आता मिपा बंद असताना काय करवे हा धागा येउ देत ओ सर

मिपा बंद असतांना पुस्तक वाचावे, वाट्सप वाट्सप खेळावे, फेसबुकच्या लाईक बटनावर टीचक्या द्याव्यात. गुगल गप्पांवरुन सर्वांना हाय हॅलो करावे. इ.इ.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

6 Jul 2016 - 4:40 pm | कुंदन

घड्याळाकडे बघत बसतो.

आशु जोग's picture

4 Sep 2013 - 12:33 pm | आशु जोग

हा धागा खरोखर मिसळ बंद असताना उघडा राहिला तर बरे होइल.
आता काय उपेग...

बिरुटेसर जरा तुमचा या वेळचा उपडेट द्या की राव ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2013 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाणा, यावेळी भिमाशंकरला जाऊन आलो. मी पहिल्यांदाच तिकडे गेलो. रविवारी सकाळी निघुन सायंकाळी परत. कसलं जबरी वातावरण होतं सांगु... आभाळ द-यांमधे उतरलेले. कधी भुरभुरता तर कधीचा जोराचा पाऊस. भाजलेलं मक्याचं भारी कणीस, गवती चहा, मजा आली. स्वतःला विसरुन जावं असं वातावरण.

-दिलीप बिरुटे

आशु जोग's picture

4 Sep 2013 - 11:18 pm | आशु जोग

गर्दी किती होती ?
ईदच्या दिवशी भीमाशंकरला प्रचंड गर्दी झाली होती म्हणे. गाड्यांचे पार्किंगच ६ किमी झाले होते. त्यामुळे मागाहून आलेल्यांना गाडी पार्क करून ६ किमी चालत जावे लागले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2013 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गर्दी लैच मरणाची होती. भीमाशंकर च्या पार्किंग जवळ पोहचायला दोनेक तास लागले. पाऊस चालु होता आणि पायी चालणारे भक्त, दहा दहा रुपात पानकापडाचे घोंगट विकणारे,गर्दीतून गाडी काढायचे प्रयत्न करणारे आपले येडपट बंधु असं सर्व आणि दर्शनार्थी रांग तीन तास असे सर्व वर्णन प्रवासातुन वगळले आहे.

-दिलीप बिरुटे

ब़जरबट्टू's picture

4 Sep 2013 - 12:52 pm | ब़जरबट्टू

लेख टाकला आणि पहिली प्रतिक्रिया पडायच्या आता मिपा गार, वाटल मिपामालक आत्ता दारात वारंट घेऊन येतील, किडे सोडले म्हणून, झोप नव्हती राव डोळ्यात, आज झोपतो निवांत

विटेकर's picture

4 Sep 2013 - 12:53 pm | विटेकर

श्या... ! अन्य संस्थळावर चक्कर मारली .. उपक्र्म पण चालत नव्हते. मनोगत्वरील संक्षीचे सर्व लेख वाचून काढले. मध्ये मध्ये रिफ्रेश चालूच होते. परवा खफ वर टैम पास केला.. प. पू.(परम पूज्य) सोरी पू. प.( पूजा पवार.. नुसत्याच "पूज्य" ..परम पूज्य नव्हे ) होत्या... पूज्य संक्षी होते पण अध्यात्म मोड ऑन नव्हता म्हणून वाचलो. एकूण काव्य षास्त्र विणोदात वेळ मजेत चालला होता.. पण मालकांना ते ही बगवले नाही ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2016 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांत आणि निलकातंला, खरमरीत मेसेज टाकले. आमच्यावर तुमचं प्रेम असेल तर दहा मिनिटात मिपा सुरु करा. बस बाकी काही नाही. नीलकांत आणि प्रशांतचे दोघांचीही उत्तरं आली बरं वाटलं. दहा मिनिटात मिपा सुरु करतो म्हणाले. आणि मिपा सुरु झालं. धन्यवाद. मालक आणि प्रशांत आपण आपली सर्व व्यक्तीगत कामं बाजूला ठेवून मिपा सुरु केलं. आभार. मिपापब्लिकवर असंच प्रेम राहू द्या भो.

ईदच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. :)

-दिलीप बिरुटे
(सुटीचा मिपावर पडीक असलेला)

धर्मराजमुटके's picture

6 Jul 2016 - 12:57 pm | धर्मराजमुटके

गेल्या १० दिवसांपासून नियमित प्रो. कबड्डीचे अपडेटस टाकत आहे. काल रात्री ११.०० वाजता मिपावर आलो तर ते बंद झालेलं. अर्धा एक तास प्रयत्न केला मग गुमान झोपून गेलो. सकाळी ७ वाजता उठून पुन्हा चेक केलं पण तरीही बंदच होतं. मला वाटलं मिपाच्या सर्व्हरला जोडणारी इंटरनेटची केबल पावसाच्या पाण्यात वाहून गेली असेल काय ? म्युनिसिपाल्टीने कोठे खोदकाम केल्यामुळे केबल तुटली असेल काय ? किंवा गेलाबाजार एमेशीबीचा टॉवर खराब झाल्यामुळे बत्ती गुल झाली की काय ?
:)
शेवटी आता चेक केलं तर चालू झालं व्हतं ! जीवात जीव आला बघा !
आज दोनदा अपडेटस टाकावे लागणार !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2016 - 1:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी मुंबा कडून आहे, जिंकलो पाहिजे. :)
मागचा सामना काठावर हरलो.

कबड्डीचे तुम्ही काय स्टेट्स टाकले ते बघायला आलो तर मिपाच्या अंगात आलेलं होतं. :/

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

रातराणी's picture

6 Jul 2016 - 1:57 pm | रातराणी

जॅकी बिरुटेसर:
मुझे तुमसे है कितने गिले हाँ हाँ हाँ
तुम कितने दिन बाद मिले क्यूं क्यूं क्यूं
बोलो इतने दिन क्या किया क्या किया क्या किया
डींपल मिपा:
तेरा नाम लिया हो ओ ओ ओ
तुझे याद किया हो ओ ओ ओ
तेरा नाम लिया तुझे याद किया

सगळे हाँ आणि क्यूं आणि हो ओ ओ ओ म्हणल्याशिवाय मज्जा येत नाही.

सर आता फटके देणार बहुतेक. पळलेल बर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2016 - 2:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्री आयडी घेऊन पुरुष आयडी जेव्हा प्रतिसाद लिहितात तेव्हा त्यांना मी फटके देत नाही, इग्नोर करतो. :)

(अब भागने की बारी मेरी)

-दिलीप बिरुटे

संपादकांना काय काय झेलाव लागत ! :)

माहितगार's picture

6 Jul 2016 - 3:00 pm | माहितगार

ह.घ्या हे लिहिण्याचे राहीले. ह.घ्या.

रातराणी's picture

6 Jul 2016 - 4:37 pm | रातराणी

हैला सर संपादक आहेत?
(मरतय आता)

अभ्या..'s picture

6 Jul 2016 - 4:49 pm | अभ्या..

हैला सर संपादक आहेत

हे कवा झालं? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2016 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी संपादक नाही. मी शस्त्र हातात घेत नाही, मी फक्त युक्तीच्या चार गोष्टी सांगतो. भलं बुरं, दिसलेलं सांगतो. आम्ही सांगितलेलं, कोणालाही बंधनकारक नसतं. संपादक आणि सल्लागार यांचं मिपावर सरकार असतं, पण मतभेद शिवसेना भाजपा नेत्यांसारखे असतात. एकदा मिपा व्यवस्था चालते कशी यावर धागा काढतोच, काढतो. :)

-दिलीप बिरुटे
(मिपा सल्लागार)

रातराणी's picture

6 Jul 2016 - 4:56 pm | रातराणी

सरकार...गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा.
( आता सर घरी येऊन मारतायत बहुतेक)

रातराणी's picture

6 Jul 2016 - 4:35 pm | रातराणी

सर सर ह्यावर अतिशय पान्च्ट जोक सुचला आहे पण तुमचा हुद्दा (नव्याने माहीत झालेला) पाहता मोह आवरला आहे.
:)

इरसाल's picture

6 Jul 2016 - 4:15 pm | इरसाल

मिपा चालु व्हायची वाट बघुन "मा. दुनाली उर्फ ड्ब्बल बॅरल" यांच्या धाग्यावर प्रतिसाद टाकायची वाट बघतो.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

6 Jul 2016 - 5:20 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मिपा बंद असताना मी नवीन जीमेल आयडी काढून ठेवतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2018 - 2:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या डोकं गरम आहे, थंडं झाल्यावर प्रतिसाद लिहितो.

-दिलीप बिरुटे

भीडस्त's picture

2 Apr 2018 - 5:49 pm | भीडस्त

आमरस प्या दोन ग्लास तांबे ...
मग बघू बाकीचं ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2018 - 8:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मान्य आहे की फुकट मिळणार्‍या संस्थळावर आपण निमूट राहीलं पाहिजे.
पण, व्यसन लावायचं आणि पुन्हा म्हणायचं 'संयम ठेवा' लवकर हजर होऊ..

आपली मानसिक स्थिती बिघडून जाते हो. दुसरं काय. :(

-दिलीप बिरुटे