नख

पेशवा's picture
पेशवा in जे न देखे रवी...
30 Jan 2013 - 12:55 pm

पुन्हा शोधावी का तिला ?
किती सहज उकरायची गाडलेले कबुलीजबाब
फुल्या शिवलेले डोळे
फुल्या शिवलेले ओठ
कधी हसत कधी रडत
विचारायची नुसत्या खुणांनी
'कशी दिसते ह्या नवीन टाक्यांत?'

लांबसडक बोटे, न्याहाळायची ती
कधी शापा सारखी कधी श्वापदा सारखी
बिलगायची अशी की नक्षत्र भारले आभाळ व्हायचे शरीर
आणि कधी हिंस्रतेने करायची शिकार
धारदार, रासवटतेने झालेला छिन्नविछिन्न देह
शिवत बसायची तासंतास
तिने पाळलेली बेवारशी विरह-गाणी
पाहायचो घुटमळताना तिच्या आसपास...

पुन्हा शोधावी का तिला ?
मला भेटून ती निराश झाली तर?
मन धजत नाही, हे रिकामेपण झाकता येत नाही
तिने दिलेल्या जखमा पुन्हा पुन्हा गोंजारताना
दीनवाणा झालेला मी
कुठल्याशा कर्तबगारीने लावेन का कधी
मागे राहिलेले तिचे तीक्ष्ण नख
माझ्याच हुंदका संपलेल्या गळ्याला?

बिभत्समुक्तक

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

30 Jan 2013 - 1:04 pm | बॅटमॅन

:(

संजय क्षीरसागर's picture

30 Jan 2013 - 1:17 pm | संजय क्षीरसागर

पण एखादी तरी मन प्रसन्न करणारी कविता लिहा कधी तरी...
सारखा पिकासो काही कामाचा नाही.

कवितानागेश's picture

30 Jan 2013 - 1:17 pm | कवितानागेश

...हम्म

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Jan 2013 - 1:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बिलगायची अशी की नक्षत्र भारले आभाळ व्हायचे शरीर

Explicitly Stunning!! (याला मराठी शब्द ??)

इनिगोय's picture

30 Jan 2013 - 4:36 pm | इनिगोय

मनस्वी, गूढ 'ती'.
पद्यातले जीए वाचल्यासारखं वाटलं.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2013 - 5:35 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/food-fight.gif

यशोधरा's picture

30 Jan 2013 - 6:46 pm | यशोधरा

आरपार पोचणारी कविता.

दादा कोंडके's picture

30 Jan 2013 - 6:56 pm | दादा कोंडके

आत पर्यंत पोहोचली.

शुचि's picture

30 Jan 2013 - 9:29 pm | शुचि

आवडली. फार आवडली.

अग्निकोल्हा's picture

30 Jan 2013 - 9:33 pm | अग्निकोल्हा

जी.ए.ची ऑफिलीअसची कथा आठवली.

विलास अध्यापक's picture

5 Feb 2013 - 9:20 am | विलास अध्यापक

लै भारी !!