जुलेस वेर्ने या जगप्रसिद्ध लेखकाने सुमारे शंभर ते सव्वाशे वर्षापुर्वी भविष्यकाल कसा असेल त्याबद्दल काही पुस्तके लिहुन ठेवली आहेत आणि विशेष म्हणजे ही त्यांची भाकिते अचुक ठरली आहेत
त्या पैकी त्यांचे काही विचार म्हणजे
१) ईलेक्ट्रिक पाणबुडी - ज्याचे वरिल चित्र जे मी आंतर्जाला वरुन साभार घेतले आहे
२)फ्रोम अर्थ टु मून या पुस्तकात त्यानी अशी कल्पना केली होती की मानव प्रुथ्वीवरुन चंद्रावर जावु शकेल
३) दुरदर्शन टीवी किवा अशा एखाद्या यन्त्राचा शोध की ज्या द्वारा माणुस बातम्या पाहु शकेल
४)फ्रोम अर्थ टु मुन या पुस्तकामधे कल्पना आहे की स्पेसशिप किवा यान असे असेल की समुद्रात उतरुन तरंगु शकेल
ही त्यांची पुस्तके संशोधकाना व मानवजातीला अभ्यासक व उपयोगी ठरली आहेत
मिपा करानो, ही झाली ईतिहासाची कालकुपी ,की जी भाकिते खरी झाली
तुमच्या कडे काही भविष्याबद्दल अंदाज आहेत काय
किवा पुढील शंभर वर्षामध्ये जगात किवा भारतात काय घटना होऊ शकतील्, आपण (संपुर्ण मानव जात) प्रगती पथावर जाऊ शकतो काय का अधोगती होण्याची वेळ आली आहे ????
काल कुपी भाग १/२
गाभा:
प्रतिक्रिया
24 Jun 2012 - 9:56 am | पक पक पक
अधोगती होण्याची वेळ आली आहे ????
24 Jun 2012 - 9:58 am | पक पक पक
मंत्रालय पेट्ले (की पेटवले...?) आहे आता संसद भवन......
24 Jun 2012 - 10:01 am | शिल्पा ब
स्टार ट्रेक मधे सुद्धा मोबाईल, परग्रहावरची सृष्टी अन मुख्य म्हणजे सायंटीस्ट अजुनही ज्यावर काम करत आहेत ते एका ठीकाणाहुन मोलेक्युल्स वेगळे करुन दुसर्या ठीकाणी पुन्हा माणसात रुपांतरीत करुन निर्धोक अन जलद प्रवास करता येईलसे यंत्र आहे.
मानवी तंत्रज्ञानातील स्टार ट्रेक हा एक उत्क्रांतीचाच टप्पा आहे हे आमचं मत.
24 Jun 2012 - 10:04 am | पक पक पक
त्यांना भारताच्या प्रगती वा अधोगती बद्दल चर्चा अपेक्षित आहे.
24 Jun 2012 - 10:12 am | शिल्पा ब
तेच तर म्हंटला ना मी!
स्टार ट्रेक सारखी सुविधा मिळु शकेल. मोबाईल नै का आले? आता ही प्रगती की अधोगती हे शकु आज्जींनाच ठरवु द्या.
24 Jun 2012 - 10:30 am | अत्रुप्त आत्मा
हा धागा फारतर तिशी गाठेल, ही आमची बत्तिशी खरि ठरण्याची दाट शक्यता ;-)
24 Jun 2012 - 1:16 pm | रणजित चितळे
१. २०९० पर्यंत चीनने अरुणाचल प्रदेश व लडाखचा पुर्व भाग घेतला असेल.
२. काश्मिर नेहमीची डोके दुखी होणार.
३. पाकिस्तान ते बांगलादेश ह्या कॉरिडॉर मध्ये (राजस्थान, युपी, बिहार, बंगाल) हळूहळू मुस्लिम लोकसंख्येची डेन्सिटी वाढत जाणार व २५ % च्या वर गेली की वेगळी व्हायची स्वप्ने बघणार.
४. भारताची लोकसंख्या १,६००,०००,००० होणार.
24 Jun 2012 - 10:41 pm | संजय क्षीरसागर
त्यांनी त्यांच्या चालू लेखमालेत म्हटलय काल `भविष्याकडून भूतकाळाकडे जातोय', त्वरित संपर्क साधावा (कालाशी नाही, सरांशी)