तात्यांना गाण्याच्या रसग्रहणाची विनंती

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
29 Jan 2012 - 8:52 pm

प्रिय तात्या,

परवा यु ट्युबवर शोध घेत असताना पुढील नितांता श्रवणीय गीत सापडले. कितीही ऐकले तरी मन काही केल्या भरतच नाही असे. या गीताखाली काही प्रतिसादांमध्ये असे वाचनात आले की गैरफिल्मी असे गीता दत्त या ज्येष्ठ गायिकेने गायले असून "बंगाली" पद्धतीचे हे गीत आहे.

माझ्या विनंतीस मान देऊन, आपण या गाण्याचे रसग्रहण कराल काय? सुरवातीला उडत्या चालीचे हे गाणे नंतर मध्येच "विरह व्याकुळ" आलाप लेऊन सामोरे येते. विशेषतः - "बिरही गगन रोये" या ओळींपासून. येथे राग बदलला आहे का?
हे गाणे मनावर इतकी जादू करते त्याचे कारण गीता दत्त यांचा स्वर्गीय आवाज केवळ की विविध (कदाचित) रागांची मनोहारी गुंफण?
माझी आपणांस विनंती आहे की आपण जरूर या गाण्याचे आपल्या नेहेमीच्या शैलीत रसग्रहण करावे. गाणे खाली "एम्बेड" करीत आहे.-
अन्य मिपाकरांनी या गाण्याचा जरूर आस्वाद घ्यावा.

सस्नेह.
शुचि

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

व्यनीचा चुकुन धागा झाला की काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2012 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रकाटाआ

नाही. हे गाणे मिपाकरांबरोबर देखील शेअर करायचे होते.

पाषाणभेद's picture

29 Jan 2012 - 9:34 pm | पाषाणभेद

इतक्या दिवस कोठे होत्या तुम्ही?

हंस's picture

30 Jan 2012 - 1:33 pm | हंस

हेच म्हणतो!

वपाडाव's picture

31 Jan 2012 - 8:11 pm | वपाडाव

+१

प्रभाकर पेठकर's picture

31 Jan 2012 - 10:18 am | प्रभाकर पेठकर

तात्या बहुतेक 'सिंगल माल्ट'च्या 'रसग्रहणात' व्यस्त दिसत आहेत. इतक्या दिवसात काहिच प्रतिसाद नाही.