ती .....
जमलेच होते तिला मस्त जगायला
आखून दिलेल्या चौकटीत मुक्त फिरायला
खंत नव्हती कसली आभाळ तिचेच होते
दोरी असली तरीही, पतंगाचे रंग तिचेच होते .....
होईलच पहाट वाट बघुनी
होईलच सकाळ मग रंग भरुनी
आकाश कधी झोपते का असे विचारायची
उगीचच हसून हसून मग रडायची ......
जमलेच होते तिला हसायला
आणि खोटे खोटे रुसायला
संगतीला बरेच होते पण ..
साथ कुणाचीच नव्हती जगायला........
पतंग असूनही पक्षासारखी उडायची
दुरूनच मग क्षितीज पहायची
जगण्यासाठी धडपड नसायची तिची
हसण्यासाठी मात्र ......कारणे शोधायची ती.......
हातात येईपर्यंत प्रत्येक गोष्ट निसटायची
हट्ट नव्हता कसलाच, पण तगमग मात्र व्हायची
स्वप्नातील राजकुमार येणार होता कुठून तरी
त्याच्यासवे जायचे होते स्वप्ननगरी .....
पडेल का भुरळ राजकुमाराला त्या रानफुलाची
कळतील का त्याला बंधने त्या प्रेमाची
कळतील का भावना आणि लय ती सुरांची .....
एका नजरेतून सांगेल ती गोष्ट गतजन्माची
उमगेल मग त्यालाही ती ओढ श्वासांची !!
प्रतिक्रिया
3 Jan 2012 - 2:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुरेख! सुंदर!!
3 Jan 2012 - 3:05 pm | निश
मस्त सुंदर सहि कविता
3 Jan 2012 - 3:22 pm | पियुशा
छान कविता :)
5 Jan 2012 - 8:50 am | लीलाधर
एवढंच म्हणेन फारच सुंदर :)