भेट

santosh waghmare's picture
santosh waghmare in जे न देखे रवी...
26 Dec 2011 - 10:46 pm

ती तरुणी चालली कुणिकड,
डोक्यावर घेउनी घागर,
पडता कानी बासरीचे ते स्वर,
धुंद होऊनी ती चालली बेफिकीर.

तहान आणि भुकेचा आता पडला विसर,
नाजूक पायी तिच्या ना ठेचाचा असर,
त्या स्वरातील हाक आहे ती जाणून,
मग बेभान होऊनी ती चालली बेफिकीर.

खरच त्या स्वरात आहे खूप माधुर्य,
पण तिला तर सख्याची ओढ,
ते तर आहे तिच्यासाठी भेटीच माध्यम,
मग सख्याच्या ओढीन ती चालली बेफिकीर.

आता ना कसल्या थकव्याची जाणीव,
नाजूक पद तिचे पडती भर भर,
आता त्याच्या भेटीशिवाय तिच्या मनास कसले चैन,
मग बैचैन होऊनी ती चालली बेफिकीर.

पाण्याच्या बहाण्याने ती सख्यास भेटत,
त्रासली ती डोक्यावर घेउनी घागर,
पण भेतीसमोर हा त्रास तिला वाटे नगण्य,
मग सोसुनी हा त्रास ती चालली बेफिकीर.

रोजच तर असते दोघांची भेट,
आणि रोजचाच हा जीव असत आतुर,
रोजच्या प्रभातसम ह्यातील गोडवाही कायम,
मग त्या भेटीतील गोडवा चाखण्यास ती चालली बेफिकीर.

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

27 Dec 2011 - 7:18 am | प्रचेतस

कैच्याकै

जरा जागा बघुन तरी कराय्चीत ना 'कविता ?'....

आत्मशून्य's picture

27 Dec 2011 - 11:58 pm | आत्मशून्य

.

santosh waghmare's picture

29 Dec 2011 - 10:48 pm | santosh waghmare

आभारि आहे

santosh waghmare's picture

29 Dec 2011 - 10:51 pm | santosh waghmare

आभारि आहे