खेळ दैवाचा....

हर्षद प्रभुदेसाई's picture
हर्षद प्रभुदेसाई in जे न देखे रवी...
12 Dec 2011 - 8:36 pm

कसा प्रसंग हा येतो पहा तो,
कधी कुणाच्या आयुष्यामध्ये |
जिथल्या तिथे थांबते सारे,
चालले होते जे वेगामध्ये |

कुणास मिळता हा पुर्णविराम तो,
अल्पविराम कुणास त्या मिळूनी जातो |
कुणाची सोडूनी साथ कुणीतरी,
एकांत कुणास त्या देऊनी जातो |

आपण म्हणतो जरी त्यास त्या क्षणी,
आम्ही आहोत ना तुझ्या सोबती |
सोबत असते ती परी.. क्षणभराची,
अथांग उरल्या त्या जन्मातली |

क्षण सरता तो जलद गतीने,
पाऊले मागे का..? अडखळती |
कुणास आठवूनी कुणी असे का..?
वळणावर एका त्या घुटमळती |

घुटमळणारे मन ते सोडूनी,
जावेच लागते तिला पुढे |
काळा सोबत जर.. पाउले चालती तर..,
चालावेच लागते ना तिला..? त्यांच्यासवे |

चालता-चालता मग पाउले थकली तर,
आधार हातांचा तिला कुणाच्या मिळे |
कुणी दिला हात जरी आधार म्हणुनी तरी,
झेपावेल मन का तिचे..? त्या कुणाच्या कडे |

असे काही सुचवूनी गेले मन रडवूनी,
प्रश्न मनात ह्या माझ्या एकच उरे |
देव खेळ खेळी का हा..? दोघा एक करी का हा..?
न्यावे लागे जर त्याला कुणा एकाला सवे |

हर्षद अ. प्रभुदेसाई..........

कविता

प्रतिक्रिया

हेच खरं. आपलं असं काही नसतंच. श्वास सरले आणि वेळ भरली की उठायचं आणि निघून जायचं.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2011 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा

वा वा,काव्य... छान भावपूर्ण जमलय .

लीलाधर's picture

13 Dec 2011 - 8:14 am | लीलाधर

शेवटी एकच म्हणेन

खेळ कुणाला दैवाचा कळला?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Dec 2011 - 10:01 am | मिसळलेला काव्यप्रेमी

छान रचना!

फिझा's picture

13 Dec 2011 - 10:46 am | फिझा

खुप छान !!!

क्रान्ति's picture

13 Dec 2011 - 1:29 pm | क्रान्ति

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गाठ

या ओळी आठवल्या. चंगली रचना.