७७) आता आमची बोट सुनामी आयलंडच्या दिशेने निघाली.
७८) सुनामी आयलंड. हे सुनामी यायच्या आधी छोट होत. सुनामी आल्यावर इथे अधीक वाळू फेकली गेली व ती जागा मोठी होऊन त्याला हे नाव देण्यात आल.
८०) सुनामी आयलंडच्या समोरच्या किनार्यावर बोटींग ची व्यवस्था आहे. तसेच उकडीचे मोदक व सरबतेही मिळतात.
८३) इथुनच समोर दिसणार्या भागाला क्रोकोडाईल पॉईंट म्हणतात त्याच्या आकारामुळे.
८४) आता आम्ही आलो स्नॉर्क्लींगला. त्या अथांग सागरात उतरायला सुरुवातीला भिती वाटली पण एक दोन वेळा स्नॉर्कलींगचा गॉगल लावून पाण्याखाली पाहील्यावर भिती दुर झाली. मला कोरल व काही मासे दिसले. ह्यासाठी टायरवर आजिबात हालचाल करायची नसते. गाईड आपल्याला बरोबर त्या दिशेने घेऊन जातात.
८५) प्रवास संपल्यावर पुन्हा एकदा बोट तितक्याच कष्टाने किनार्यावर आणावी लागते. मग माझ्या मिस्टरांनी आणि त्यांच्या मित्रानेही बोटवाल्यांना मदत केली. त्यांना तसे करण्यात मजा आली. बोट वाले बोट ओढताना हुय्या हुय्या काहीतरी ओरडत होते तसे ते दोघेही त्यांच्या बरोब्र ओरडत होते. हे सुद्धा त्यांनी एन्जॉय केल.
८६) इथे जेवण वगैरे आटोपून मग आम्ही मालवणात गेलो. लांबुनच मालवणचा किल्ला पाहीला.
९२) घुमटावर अष्ट्भुजा गणपती आहेत.
९३) संध्याकाळी आलो रॉक गार्डन येथे. सुर्यास्त पाहण्यासाठी हा पॉइंट प्रसिद्ध आहे.
९६) रॉक गार्डनच्या पाठीमागचा भाग.
९८) माझ फोटो सेशन फुलांवरच अधिक चालू होत.
१०४) मालवणातुन सकाळी निघालो आणि सावंतवाडी उरकून आम्ही आंबोली घाटातून कोल्हापुरला निघालो. आंबोली घाट जितका भयानक तितकाच प्रचंड सुंदर आहे. रानफुलांनी पुर्ण घाट स्वागत करत होता.
१०५) मध्ये मध्ये धबधवेही लागत होते.
१०६) मध्येच आपल्या पुर्वजांचे दर्शन झाल्याने मुलांना दाखवण्यासाठी गाडी थांबवली व काच लावूनच फोटो काढले.
१०८) महाशयांना आम्ही केळी दिली.
१०९) आता कोल्हापुरात आलो. संध्याकाळी रंकाळा तलावावर गेलो.
११०)सकाळी ५ ला अभिषेक घालण्यासाठी निघालो. हे महालक्ष्मीच्या देवळाचे फोटो दर्शन झाल्यानंतरचे.
११५) त्यानंतर आम्ही शाहू पॅलेसला भेट दिली.
११६) शाहू पॅलेसच्या आवारात एन्ट्री करतानाच हे प्राणी/पक्षी लागतात.
१२०) शाहू महाराजांचे वारस इथे राहतात.
इथून आम्ही थेट घरच्या दिशेला निघालो.
प्रतिक्रिया
30 Nov 2011 - 12:34 pm | सुहास झेले
मस्त सफर.... !!
७९ आणि ९९ विशेष आवडले :) :)
30 Nov 2011 - 1:05 pm | गणपा
चित्रमय सफर आवडली गो जागुतै. :)
30 Nov 2011 - 1:16 pm | farnaz naikwadi
फाटा॓ खुप सुदर आह॓त
30 Nov 2011 - 1:17 pm | प्रचेतस
कोकण दर्शन अतिशय सुरेख.
30 Nov 2011 - 1:29 pm | मन१
काय मस्त पसरलाय समुद्र.
काय सुंदर आहे मंदिर.
सुंदर, शांत(सुशेगात ह्यालाच म्हणतात ना?)
30 Nov 2011 - 1:47 pm | अत्रुप्त आत्मा
छान करवलीत सफर .... :-) खरं म्हणजे फोटो सेशन जास्त कोकणावर आहे...ते अवडलही, पण आंम्हाला आपलं रं-काळा आणी शाहु पॅलेस पाहिल्यावर घर जवळ आल्यासारखं वाटलं
30 Nov 2011 - 2:01 pm | मानस्
छान! ह्या भागातले फोटो पण आवडले.
शाहू महाराजांचे वारस नॅनो वापरतात की काय ? अरेरे काय दिवस आलेत
1 Dec 2011 - 2:33 am | यकु
मानसांनो, अहो काहीतरीच काय बोलताय?
जागूताईंनी त्या नॅनोमधून कुणीतरी वयस्कर बाई उतरुन महालात जाताना पाहिली असेल म्हणून ही नॅनो शाहूंच्या वारसांचीच असेल असे काही नाही.
तसंही नॅनो त्या लोककल्याणकारी छत्रपतीच्या वारसांनी वापरायची नाही तर कुणी वापरायची?
30 Nov 2011 - 3:08 pm | जागु
मानस अगदी हाच प्रश्न आम्हाला तेंव्हा पडला. आणि आमच्या डोळ्यादेखत त्या नॅनोत बसून त्या पॅलेसमधली एक ६० वर्षांच्या आसपासची महीला त्यातून गेली.
सगळ्यांचे धन्यवाद.
30 Nov 2011 - 3:48 pm | जाई.
व्वा जागुतै कोकणाची मस्त सफर घडवलीस
30 Nov 2011 - 8:48 pm | रेवती
या भागातले फोटू सगळ्यात जास्त आवडले.
एकूण किती दिवसांची सहल झाली?
30 Nov 2011 - 9:05 pm | अन्या दातार
सफर घडवलीस ग जागुतै. कोल्हापुरचे फोटो बघुन काय भारी वाटलं म्हणून सांगू तुला!
मंदिरात कॅमेरा नेऊ दिला? मला नाही जाऊ दिले पोलिसाने. (कदाचित माझ्या कॅमेर्याचे धूड जास्त असल्याने) :(
11 Dec 2011 - 4:23 pm | पक पक पक
तोंड उघडले असेल नेहमी प्रमाणे.....दुसरे काय ?
11 Dec 2011 - 4:26 pm | पक पक पक
पोलिस म्हणजे काय मि पा वरचा सभासद वाटला का तुम्हाला....?
12 Dec 2011 - 10:47 am | अन्या दातार
पोलिस म्हणजे काय मि पा वरचा सभासद वाटला का तुम्हाला....?
पोलिसाला विनंती केली होती, त्याने मान्य केली नाही. आणि मला उगा नको तिथे तोंड उचकटायची सवय नाहीये. इथे परत २ प्रतिसाद देऊन तुम्ही तुमचा कोडगेपणा सिद्धच केला आहे, जे मला मंदिरात जमले नाही. स्वभावच नाही ना माझा तसा.
असो, चालायचेच.
12 Dec 2011 - 11:07 am | प्रचेतस
13 Dec 2011 - 10:03 am | पक पक पक
छान चित्रपट आहे...सगळे कलाकार वल्लि आहेत...
13 Dec 2011 - 10:00 am | पक पक पक
मला उगा नको तिथे तोंड उचकटायची सवय नाहीये.
काय सांगता...?
13 Dec 2011 - 10:08 am | पक पक पक
आपली ओळख तुमच्या याच सवई मुळे झाली ना........
13 Dec 2011 - 10:34 am | अन्या दातार
ड्वाळे पाणावले. आधी २ आणि आता ३-३ प्रतिसाद बघून.
* मूळ मुद्दा समजून न घेता फक्त टिका आणि टिकाच करायची असे धोरण असलेल्या लोकांना मी जास्त समजवायला जात नाही. एकदा समजवायचा प्रयत्न केला, जो निष्फळ ठरलाय हे स्पष्ट दिसतेय.*
13 Dec 2011 - 1:19 pm | पक पक पक
डोक्यातल्या पाण्या बद्द्ल माहित होत तुमच्या..पण आता हे काय नविन....?
दाखवुन घ्या एकदा चांगल्या डॉ़क्टरला..
13 Dec 2011 - 6:35 pm | वपाडाव
एखादा पंप लावुन घ्या.... डोक्यातले पाणी रिकामे होउन जाइल.... अन असल्या कुचेष्टा करण्यापेक्षा जागुतैच्या धाग्याला अनुसरुन काहीतरी लिहा..... म्हणजे सार्थक होइल....
*बादवे :: आपली राशी कर्क आहे का?*
1 Dec 2011 - 1:03 am | सचिन भालेकर
एकदम सुन्दर फोटो आहेत............................................ :)
1 Dec 2011 - 9:06 am | मदनबाण
सुरेख फोटु...
कोल्हापुर चे फोटु पाहुन लयं आनंद झाला बघा. ! :)
1 Dec 2011 - 10:22 am | इरसाल
मस्त फोटो, घरबसल्या दर्शनाचा आनंद मिळाला
1 Dec 2011 - 11:08 am | जागु
रेवती ५ दिवसांची झाली टुर.
अन्या माझा कॅमेरा पर्स मध्ये होता म्हणून कोणी चेक नसेल केला. पण एक सुवर्ण मंदीर सोडले तर कुठल्याच देवळात फोटो काढून दिले नाहीत.
सगळ्यांचे धन्यवाद.
2 Dec 2011 - 2:11 am | प्रभाकर पेठकर
नयनरम्य कोकणाची अप्रतिम छायाचित्रे. अभिनंदन.
आंबोली मार्गे कोल्हापुरात येण्याचा मार्ग अतिशय रोमांचकारी आहे. आंबोली घाटाच्या धबधब्याला पाणी नव्हते?? तिथे थांबून धबधब्याची छायाचित्रे घेणे आणि समोरच्या टपर्यांवर चहा-भजी हादडणे हा त्या मार्गावरील विश्रांचीचा नितांतसुंदर मुद्दा आहे.
कोल्हापुरातील छायाचित्रेही सुंदर आहेत. महालक्ष्मी मंदीर, शाहूमहाराजांचा राजवाडा, मस्तं. रंकाळा अंधारात गायब झाला आहे.
महालक्ष्मी मंदिराच्या आवारात पेढे फार छान मिळतात. मी घेतले होते. पण कोल्हापुरातून गोव्याला गेलो तिथून पुन्हा कोल्हापुरात आणि नंतर पुण्यात. आमच्या घरापर्यंत पेढे व्यवस्थित पोहोचले पण नंतर शीतपेटीत (फ्रिजमध्ये) ठेवूनही खराब झाले.
कालच, महालक्ष्मीच्या मंदीरातील प्रसादाच्या लाडवांनी विषबाधा झाल्याने, प्रसादाचे लाडू बंद ठेवल्याचे, दूरचित्रवाणीच्या बातमीत ऐकले.
2 Dec 2011 - 5:55 am | प्राजु
मस्तच!!
आमच्या कोल्हापूरचं दर्शन घडलं!! वा वा वा!
जागु.. धन्यवाद गं! :)
2 Dec 2011 - 10:25 am | जागु
प्रभाकर त्या पेढ्यांच्या बाबतीत माझ्याकडूनही तसेच झाले.
प्राजू धन्स.
9 Dec 2011 - 5:07 pm | नरेंद्र गोळे
११५, ११६ आणि १२० हे फोटो छानच आलेले आहेत. सर्वच वर्णने सुरेख आहेत. आवडली.
"स्नॉर्क्लींग" म्हणजे नक्की काय? टायरवर तरून जाणे?
10 Dec 2011 - 8:27 am | पैसा
पण तुम्ही मालवणच्या सिंधुदुर्गावर गेला नाहीत? :( तुम्ही काय हुकवलंत हे माहिती आहे? साक्षात छत्रपतींच्या हाताचा आणि पायाचा ठसा चुन्यात उमटवलेला आहे, तो पहाताना प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो...
12 Dec 2011 - 8:22 am | टुकुल
मस्त चित्रमय सफर घडवली कोकणाची, चारही भाग आवडले.
--टुकुल
12 Dec 2011 - 10:54 am | sneharani
मस्त आलेत फोटो!
ट्रीप चांगली झालेली दिसते!!
:)
12 Dec 2011 - 4:02 pm | वपाडाव
वाह !! वाह !! वाह !! भारीच.......
14 Dec 2011 - 2:18 am | रेनि
झक्कास!!!!!