कोकण दर्शन (भाग - २)

जागु's picture
जागु in कलादालन
23 Nov 2011 - 10:59 pm

२१) वेळणेश्वरला आम्हाला अगदीच संध्याकाळ झाली म्हणून आम्ही तिथल्याच समुद्रकिनार्‍या जवळ असणार्‍या एम.टी.डी.सी. च्या रुम्स मध्ये राहीलो. तिथे रात्री अगदी शांत, थंड आणि समुद्राच्या लाटांचा आवाज ह्या वातावरणात आम्ही गप्पा मारत बसलो. ही सकाळ

२२)

२३)मला सगळ्यात जास्त आवडलेला हा नजारा.

२४) तिथे हे पक्षी भरपूर होते पण पोझ देत नव्हते.

२५) पारव्याने मात्र व्यवस्थित भाव न खाता फोटो काढून दिला.

२६) कण्हेरीची फुले

२७) तिथुन निघून आम्ही प्रथम हेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला गेलो.

२८) हेदवीच्या गणपतीच्या आजूबाजूचा हिरवागार परीसर.

२९)

३०) ही फुले कोकणात सगळीकडेच पहायला मिळाली.

३१) तिथून आम्ही मालवणच्या दिशेने निघालो त्या वाटेतील दृश्ये.

३२)

३३) मालवणात जाता जाता अचानक भराडी देवीच्या दर्शनाला जायचे ठरले. आणि इतके सुंदर मनमुराद दर्शन झाले की आम्हाला खुप प्रसन्न वाटून दिवसभराचा थकवा क्षणात दूर झाला. तिथे स्ट्रीक्टली देवीचा फोटो काढणे मनाई आहे.

३४) त्या रात्री तारकर्लीला राहून आम्ही सकाळी समुद्र सफर करण्यास सज्ज झालो.

३५) तारकर्लीच्या किनार्‍यावर लागलेल्या बोटी ह्या समुद्र सफर घडवून आणणार्‍या फायबरच्या बोटी आहेत. आम्ही लाकडाची बोट घेतली होती.

३६) ही आम्ही बुक केलेली लाकडी बोट. बिचारे ते बोटवाले खुप कष्ट करून बोट आत नेतात आणि बाहेर आणतात.

३७)

३८) तिथले सगळेच समुद्रकिनारे स्वच्छ आणि अप्रतिम. तारकर्लीच्या समुद्र किनार्‍यावे हे शंख शिंपले आलेले. त्यातील पाण्यातले बरेचशे शंख जिवंतही होते.

३९) सुंदर दिसत आहेत ना.

४०) वेगवेगळे प्रकार

४१) अफाट समुद्र आम्ही बोट मध्ये बसुन न्याहाळत होतो.

४२) सकाळच्या उन्हात किनारा चमकत होता.

४३)

४४)

४५) हा बहुतेक वेंगुर्ल्याचा किनारा.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

छान आलेत फोटो
२३वा फोटो मलाही फार आवडला

रेवती's picture

23 Nov 2011 - 11:38 pm | रेवती

बोटीची सफर किती वेळाची होती?
सगळे फोटू आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2011 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा

सगळे फोटो सफर घडवुन अणतायत्...पण नंबर-२३...म्हणजे लाजवाब

विलासराव's picture

24 Nov 2011 - 12:51 am | विलासराव

फोटो आवडले.

मला शंख शिंपल्यांचे फोटो आवडले. जागुताय काही शंखशिंपले गोळा केलेस का?

- पिंगू

मदनबाण's picture

24 Nov 2011 - 7:07 am | मदनबाण

अरे वा... :) मस्त कोकण दर्शन घडतयं !

प्रचेतस's picture

24 Nov 2011 - 8:29 am | प्रचेतस

अप्रतिम फोटो जागुतै.
तळकोकणाचे सुरेख दर्शन घडवलत.

सविता००१'s picture

24 Nov 2011 - 10:28 am | सविता००१

जागुताई, तुम्ही आणलेत का काही शंखशिंपले? कसले मस्त आहेत! बाकी तुमचे फोटो नेहमीच सुंदर असतात.:)

साबु's picture

24 Nov 2011 - 11:28 am | साबु

शंखशिंपल्यान्चे फोटो मस्तच...

सुहास झेले's picture

24 Nov 2011 - 11:35 am | सुहास झेले

मस्त... खूप प्रसन्न वाटलं फोटो बघून :) :)

अमोल केळकर's picture

24 Nov 2011 - 11:44 am | अमोल केळकर

नेहमीप्रमाणे सुंदर :)

अमोल

अत्यंत सुंदर..

कोंकण म्हणजे जिवाभावाची गोष्ट..

प्यारे१'s picture

24 Nov 2011 - 12:14 pm | प्यारे१

मस्त फटु आहेत....

लौकरच जायचे आहे. ;)

अन्या दातार's picture

24 Nov 2011 - 12:41 pm | अन्या दातार

तारकर्लीला पहाटे पहाटे डॉल्फिन्स दिसतात म्हणे. तुम्ही बघितलेत का?

(कॉलेजमधला डॉल्फिन ग्रुप सदस्य) अन्या

वपाडाव's picture

24 Nov 2011 - 1:08 pm | वपाडाव

मन प्रसन्न झाले फटु पाहुन.....

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2011 - 1:31 pm | प्रभाकर पेठकर

निसर्गरम्य कोंकणाची अप्रतिम छायाचित्रे. अभिनंदन.

चिपळूण सासुरवाडी असल्याने अनेकदा चिपळूणास भेट दिली आहे. हेदवी, गणपतीपुळेही पाहून झाले आहे. पण, छायाचित्रांची हौस भागविण्यासाठी लवकरच समग्र कोंकणाचा फेरफटका मारण्याच्या विचारात आहे. पाहूया कधी योग जुळून येतो ते.

गणपा's picture

24 Nov 2011 - 1:46 pm | गणपा

वरील सर्वांशी सहमत. :)

शिल्पा नाईक's picture

24 Nov 2011 - 3:57 pm | शिल्पा नाईक

इतके शंख शिंपले पाहून मी तर वेडीच झाले असते. आमच्या विरारच्या समुद्रावर कधी कधी असाच खच पडतो. गोळा केलेस की नाही शंख?

हेदवीची ब्राम्हण घळ राह्यली वाट्ट्ं, जाम भारी जागा आहे ती एक, तरी बाकीचे सगळेच फोटो एकदम मस्त आलेत, आता जातोच आहोत जानेवारीत तेव्हा एक फोटोची स्पर्धाच आयोजित करतो मी.

अन्या नाही त्या दिवशी आम्हाला त्यांनी समुद्रातूनच इक इक केले असणार.

सर्वांना मनापासून धन्यवाद.

चिंतामणी's picture

26 Nov 2011 - 8:28 am | चिंतामणी

२३वा अप्रतीमच आहे.

वॉल पोस्टर करण्यासारखा आहे.

चित्रा's picture

28 Nov 2011 - 6:39 pm | चित्रा

सुंदर. शिंपल्यांचे फोटो फार आवडले.

प्राजु's picture

29 Nov 2011 - 1:53 am | प्राजु

मस्त!!
आमच्या वेळणेश्वरचा किनारा आहेच सुंदर!! :)

टुकुल's picture

29 Nov 2011 - 5:00 am | टुकुल

सर्व फोटो इतके सुंदर आलेत कि कोकणात एकदा निवांत वेळ काढुन फिरायला जायचा मोह आवरत नाहीये.

--टुकुल

चिंतामणी, चित्रा, प्राजू धन्यवाद.

टुकूल कोकण फोटोंपेक्षाही सुंदर आहे. एकदा नक्कीच जा. फोटोत काहीच भाग कैद झालाय पण तिथल्या डोंगर वाटांचे सौंदर्य अजून डोळ्यात कैद आहे.

जागुतै,

मस्त फोटो.

तारकर्लीचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. 'क्रिस्टल क्लीयर' म्हणावे असा.
त्या किनर्‍यावर मला स्टार फिश आणि रंगीत मासा दिसला होता. स्टार फिशला पकडले ही होते.
दुर्दैवाने तेव्हा कॅमेरा नव्हता जवळ.

- (तारकर्लीच्या आठवणीत बुडालेला) सोकाजी