मी शोधतो आहे एक तो अन एक ती ...
बर्याच वर्षांपूर्वी ह्या इथेच दिसायचे ते
दिलखुलास एकत्र रडायचे अन हसायचे ते ...
न चुकता पहिल्या पावसात भिजायचे ते ...
गर्दीतहि स्वतापुरते वेगळे असायचे ते ...
मी शोधतो आहे एक तो अन एक ती ...
तो तिला रोज घरी सोडायला जायचा ...
कित्येक वेळ नंतर तिथेच घुटमळायचा ...
तिची खिडकीतली लाजरी नजर टाळायचा ...
अन त्याच चोरट्या नजर भेटीवर भाळायचा ...
मी शोधतो आहे एक तो अन एक ती ...
तिला आवडतात म्हणून तो कविता करायचा ...
कुठल्याश्या बहाण्याने तो तिचा हात धरायचा ...
तिच्या हळू हळू हात सोडवून घेण्यावर मरायचा ...
अन त्याच भावना पुन्हा कागदावर उतरवायचा ...
मी शोधतो आहे एक तो अन एक ती ...
परवा पुन्हा तश्याच पावसात मनसोक्त भिजलो ...
धगधगत होतो किती दिवस तेव्हा खरा विझलो ...
त्यांच्या ठरलेल्या त्या जुन्या ठिकाणी तडक निघालो ...
पाहुनी लांबूनच तिला ... तिथे ... पुन्हा मागे फिरलो ...
पाहुनी लांबूनच तिला ... तिथे ... पुन्हा मागे फिरलो ...
तेव्हापासून अजूनही ...
मी शोधतो आहे "माझ्यातला एक" तो
अन ती शोधते आहे "तिच्यातली एक" ती ...
- विश्वेश
प्रतिक्रिया
30 Sep 2011 - 12:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
रचना छान झाली आहे, आणि शेवटी कहानी मे ट्विस्ट पण मस्त साधलाय.
फक्त एक शब्द खटकतो आहे:
माहीत नाही कां ते, पण ते मरायला वाचले आणि एकदम खडा लागला.
30 Sep 2011 - 1:54 pm | धन्या
मस्तच आहे कविता.
30 Sep 2011 - 5:28 pm | michmadhura
सुंदर शब्दरचना.
1 Oct 2011 - 10:39 pm | प्रास
कविता आवडली.
एक सुचवावसं वाटतंय -
मिकाभौंनी म्हण्टल्याप्रमाणे ते 'मरायचा' खटकतंय खरं तेव्हा त्या ऐवजी
हे कसं वाटतंय?
2 Oct 2011 - 12:45 am | सुहास झेले
मस्तच.. आवडली !!