स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच.
( दिवाळी नंतर पहिल्यांदाच बसलो , खाजवणं चालू आहे डोकं... अशी अवस्था... !)
मी - या. कशी झाली दिवाळी रं तुझी ?
तो - लै भारी रं...
मी - तुझ्यं थोबाड काय तरी येगळंच सांगत हाय ? काय झालं ?
तो - नाय रं... दिवाळी... ते काय म्हणत्यात्...सरपराईझ .. सरप्राईज गिफ्ट नाय दिलं घरात म्हणून येन दिवाळीतच एकादाशी घडवली तीनं.
मी - हा हा हा.
तो - हसतो काय लेका.. तुझं लग्न होऊ दे मग आम्ही हसू... रावणासारखं ! ते सोड काय हॉटेलात काय नवीन खबर..
मी - अबे ते लै बोलायला लागलं बे ?
तो- कोण रं ?
मी -अरे तोच रे... अनिवासी पण इथंला पडिक निवासी..
तो- अच्छा तो... जो दिवाळीला फटाके फोडत होता तो..
मी- हा तोच रे. मला वाटलं होतं ह्यावेळी पण फुटके फटाके घेउन येईल + १ वाले... पण ह्याला तर जोर चढला रे चांगलाच.
मी- चांगलं आहे जोर तर चढतोच आहे.... वारंच जरा वेगळ आहे. एका फटक्यात चार हॉटेलवाले आडवे ?
तो - बरोबर, मागे राहून चालणार नाय.. त्याचा ईतिहास हा विषय मजबूत बरं का... शॊलिड्ड आहे...
मी - ते सोड...तुला मिळाली का रं कधी चांदणी ???
तो - नाय रं... हॊटेलचा मालिक बोलला हुता की देतो देतो पण नाय दिली.. लै वंगाळ वाटलं बघ.
मी - पण मी म्हणतो.. नाय दिली तर नाय दिली च्यामायला... कुणा कुणाला चपला तर दिल्या असतील नव्हं ?
तो - काय बे ? च्यामायला इकडं बसून त्याच्याच नावानं दिवाळीत शिमगा.. मग चप्पल दिलं ना तर काय फराळ घालतो काय तो तोंडात.
मी - पण म्या म्हणतो कुणाला दिलं ?
तो - लै नगं बोलूस.. तुलाच मिळेलं... व तुझ्याबरोबर मला पण फुकट गिफ्ट..
मी - चुकलो बॉ... बा वरुन आठवलं ते ब्लॊग काय झंझट हाय रं ?
तो - स्वत:च स्वयपाक घरं रे.. तु कधी सुधरणारं रं ?
मी - पण मला काय बी नाय येत रं स्वयपाक घरातलं...
तो - सोड तू तो इशय आपला नाय... मला बी नाय कळतं.
मी - बरं... ईलेक्शन झालं त्याचं काय ?
तो - तु हुता महाराष्ट्रात ?
मी - नाय....
तो - मी बी नाय... मग म्हातारा हरला काय जिंकला काय काय फरक ?
मी - पण दमदार गडी हुता रं तो.. माझ्या बा च्या टाईमाला, माझ्या बाला लै आवडायचा तो..
तो - अरं त्याचा तो... महाभारतात अंधळा राजा हुता ना त्याचं नाव काय.... ह्म्म्म.. धुतुराष्ट्र झाला हाय रं... लै वंगाळ हाल.
मी - अरं अरं... पोरानं लै वाईट दिवस दाखवलं रं बाला..
तो - हो यार लैच वाईट... एकदम रसातळाला..
मी- ह्म्म बाकी.... ठाण्याचा काय हाल रे ?
तो - लै भारी, चालूच आहे ते.
मी - ते चालू हाय ते मला माहित हाय रं पण आजकाल लै शांत शांत दिसतयं रे ते.
तो- चालायचं रे, दिवाळी संपली सुस्तावला आसेल.
मी - ह्म्म, बरोबर, आणी ते आलं रे हॊटेलात परत.
तो - कोण रे.. तो का ? च्यामायला गचकलं नाय मोठी गोष्ट. दमदार गड्डी. पण तेज नाय राहिलं रे.
मी- अबे, आताच आला आहे.. बघ तु.. घालील धिंगाणा... त्याचा वावरच लै भारी पडेल.
तो - नाय रे नाही फरक पडणार.. आता गल्लीचे दादा बदला हाय.. तुला कळायचं नाय ते राजकारण.
मी - त्याचं पण हॊटेल हुतं ना रे ?
तो - हुतं, आधी आधी लै जोरात चाललं... पण त्याचं नव्हतं... कोण म्हणतं पार्टनर हुता त्यो.. कोण म्हणालं बाहेरुन सपोर्ट देत हुता.. काय खरं देवाला माहीत बॉ.
मी - अरे तीच्याआयला... म्हणजे.. डिच्चु.. की सपोर्ट ह्यानंच काढून इकडं उडी ?
तो - काय माहीत बॉ... दिला पण असेल.
मी - हे लै वंगाळ बॉ.. ते तर हायच रं.. पण आजकाल तिकडं चुकून पण कुणी जात नाय म्हणे..
तो - ते तर हाय रं... लै भारी डेकोरेशन केलं म्हणजे हॊटेल चालेल असं नाय रं.. डिश पाहिजे की चांगली टेस्टी.. काय म्हणतो.
मी - बरोबर हाय.... त्याचा पण जोर नाय राहिला रं आजकाल पैल्यासारखं...
तो- कोण रं....
मी - अरे त्योच रं... जर्सी गायीच्या दुधाचा नाय का धंदा करत आजकाल.... दही लै भारी जमवतं फिरतो रं तो.
तो- च्यामायला.. नाय रं हाय जोर लै त्या गडी मधी... पण दुधा-धयाच्यात अडक्लं हाय होईल फ्री.
मी- लै दिसं झालं रं... एक मनात इच्छा हाय..
तो - बोल रे, तु नुस्तं बोल....
मी - अरं मला ते कविता करायची हाय रं... पण लै झटाकमटाक करायची हाय.. म्हणजे काय लिव्हलं ते बरमदेवाच्या बाला पण नाय कळायला पाहिजे.
तो - हाततिच्या मायला... येवढंच.. नव्हं... आपल्या कडं लै नमुने हाईत रं..
मी - हो रं.. कळतच नाय हाय कसं लिव्हू...
तो - लै सोपं रं गड्या... हे बघ.. दोन अकशर इकडू श्यान चार अकशर तिकडुन श्यान... उचल आनी चिटकव.. लै बेस आयडिया.
मी - अरं पण,
तो- हे बघ लै सोपं हाय.. मी करुन दाखवतो बघ तुला....
फुस्स फुस्स करुन
कुठून तरी आवाज आला..
इकडून आला तिकडून आला
बावरलो मी आवाज कुठुन आला ?
रुमाल लावू नाकाशी..
की अत्तर शिंपडू आकाशी..
गंध पेरला कुणी
काहीच उमजत नाही,
पळून जाऊ की
चार वाजवू त्याच्या कानाशी...
फुस्स फुस्स करुन
कुठून तरी आवाज आला..
मी - थांब थांब.. च्यामायला तिच्या.. पब्लिक माझ्या कानाखाली आवाज काढलं रं...
तो - अरे तुला कविताच शिकायची हाय ना..
मी - अरं जरा लय काव्य वाली रं... अशी नाय..
तो - ह्म्म्म... मोदकाचा हंगामपण संपला रं... परवाच त्याचं पण इडिंबन पाडलं कार्ट्यांनी... दिनाची पण रात्र झाली.. सरळ ईचारलं असतं... कोड्यात उत्तर आलं असतं व आपण बसलो असतो बोंबलत... तिकडं अनिवासी पण संपावर हाईत... कोण बी नाय मदत करणार.. एक तायडी हाय.. पण ते परेम कविता लैहिते रं... काय बी नाय कळत.. उष:काल निशाकाल.. डोक्याचा भुतकाळ हुतो रं...
मी - च्यामायला राहू दे रं.. गड्या कविता नाय आपला एरिया उतारली तु सगळी... जातु आता मी.
तो - मग काय झालं बे...थांब... अजून एक रिपीट बोल...
मी - च्यामायला... रिपीट तर रिपीट ! आम्हीबी कविता करणं शिकतो हाय.. हून जाऊ दे रिपीट.
तो - अता कसं गड्यावाणी बोल्लासं...
मी - मंडळ कट्टा करु म्हणतयं रं..
तो - रिपीटचा कट्टा ?
मी - हो.
तो - होऊन जाऊ दे... घमाश्यानं !
मी - ह्म्म्म्म्म्म रिपीट एके रिपीट.
(भाग ७ समाप्त)
प्रतिक्रिया
24 Oct 2009 - 11:11 am | अवलिया
हम्म.
खरे आहे राजे तुझे म्हणणे... काही लोकांचे वय झाले असं दिसतंय ब्वा !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
24 Oct 2009 - 12:26 pm | दशानन
डार्विन सिध्दांत आपले अस्तित्व दाखवत आहे रे ;)
24 Oct 2009 - 1:13 pm | गणपा
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
लेका एकाच वेळी किती किती लोकांच्या धोतरांच्या निर्या फेडशील ?
24 Oct 2009 - 1:26 pm | मिसळभोक्ता
सर्व कंपूबाजांना कळवण्यात येते की, राजे उर्फ राज ह्यांना आम्ही आमच्या कंपूतून हद्दपार केले आहे, त्यामुळे त्यांचे आम्हाला आलेले, किंवा आमचे त्यांना गेलेले सर्व प्रतिसाद खारिज समजले जावेत.
श्री. राजे ह्यांचे लंगोटीयार किंवा (आता वयानुसार) चड्डीमित्र अवलिया, ह्यांना बेकंपूचा कंपूबाज, म्हणजेच बेकंपूबाज, ह्या न्यायाने आम्ही आमच्या कंपूतून हद्दपार करतो आहोत, ह्याची नोंद घ्यावी. आमच्या कंपूतील सर्वांना सूचना: सदर बेकंपूबाजांच्या कंपूत आपण असाल, अथवा आपण आहात असे आम्हाला वाटले, तर आपल्यालाही आमच्या कंपूतून हद्दपार केले जाईल.
ढुम ढुम ढुम.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
24 Oct 2009 - 1:51 pm | दशानन
अरं...
म्या काय केलं रं ?
च्यामायला आम्ही रिपीट पण करायचं नाय काय मग आता :?
हे नाय चांगलं बुवा.. नाय आवडलं !
तुम्ही बुधवार शनीवार करता... आम्ही शुक्रवार केला तर एवढा दंगा =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
24 Oct 2009 - 2:03 pm | मिसळभोक्ता
बरं, मग उद्यापासून आमच्या प्रत्येक प्रतिसादाला पुढचा आठवडाभर +१ दे.. मग बघू..
:-)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
24 Oct 2009 - 2:04 pm | दशानन
आम्ही पण काउंट वाढवतच आहोत...
खव नाय बघीतली वाटतं आपली ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
24 Oct 2009 - 4:27 pm | अवलिया
श्री. राजे ह्यांचे लंगोटीयार किंवा (आता वयानुसार) चड्डीमित्र अवलिया, ह्यांना बेकंपूचा कंपूबाज, म्हणजेच बेकंपूबाज, ह्या न्यायाने आम्ही आमच्या कंपूतून हद्दपार करतो आहोत, ह्याची नोंद घ्यावी.
धन्यवाद काका.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
24 Oct 2009 - 2:10 pm | प्रभो
फुस्स फुस्स करुन
कुठून तरी आवाज आला..
इकडून आला तिकडून आला
बावरलो मी आवाज कुठुन आला ?
रुमाल लावू नाकाशी..
की अत्तर शिंपडू आकाशी..
गंध पेरला कुणी
काहीच उमजत नाही,
पळून जाऊ की
चार वाजवू त्याच्या कानाशी...
फुस्स फुस्स करुन
कुठून तरी आवाज आला..
=)) हाहाहा
लै भारी... हहपुवा
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
24 Oct 2009 - 2:38 pm | झकासराव
=))
ही मात्र रात्रीची ही भानगड हाय व्हय.
मी आधीची वाचलीच नव्हती कळाची नाय म्हणुन.
ही ताजी भानगड कळाली :)
24 Oct 2009 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार
फुस्स फुस्स करुन
कुठून तरी आवाज आला..
इकडून आला तिकडून आला
हाणतेज्यायला !!
कवितेच्या खाली 'राजनंदीनी 'अशी सही पण कर की लेका.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
24 Oct 2009 - 3:04 pm | टारझन
मिसळभोक्त्याचा वरचा प्रतिसाद विरजणोत्तम ठरावा !
एखाद्या मद्यप्याच्या आनंदावर दुसर्या मद्यप्याने असं ताडीछाप विरजण शिंपडावे ह्याला मी केवळ विरोधाकरता विरोध समजेन.
- सुधारिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
6 Aug 2010 - 5:47 pm | अवलिया
ओ मालक पुढचा भाग कधी?????
1 Sep 2010 - 12:02 pm | दशानन
आज बघतो रे, तसा ही बुधवार आज ;)