'नांदा सौख्यभरे' (राखी तू मांडले। तुझे स्वयंवर)

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in जे न देखे रवी...
5 Aug 2009 - 7:08 pm

राखी तू मांडले। तुझे स्वयंवर
'वर' अनावर। देशोदेशी

'टीआरपी'साठीच। मिडियाचा स्टंट
प्रसिद्धी इंस्टंट। मिळे तुला

आपुल्या देहाचा। मांडसी बाजार
कैसा हा आजार। राखी तुझा

भारतीय नार। आहेस तू राखी
संस्कृतीची 'राखी'। लाज थोडी

देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा
एकाशीच 'नांदा। सौख्यभरे'

-अविनाश ओगले

हास्यकविताविनोद

प्रतिक्रिया

नाना बेरके's picture

5 Aug 2009 - 7:19 pm | नाना बेरके

राखीला आशिर्वाद :O ?

कविता राखीसाठी लिहीली असल्याने "बांधा " हा शब्दच जरा वेगळ्या नजरेनेच वाचला गेला.
'वर' अनावर। देशोदेशी
- हे ही तसेच.

लिखाळ's picture

5 Aug 2009 - 8:06 pm | लिखाळ

हा हा .. मजेदार.
आवडली कविता :)

-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

तर्री's picture

5 Aug 2009 - 8:15 pm | तर्री

अनावर वर , राखी व बांधा वरचे ष्लेश अप्रतिम.

श्रावण मोडक's picture

5 Aug 2009 - 10:32 pm | श्रावण मोडक

दिवसांनी आलात... पण असे आलात की अगदी साजेसेच. :)

बेसनलाडू's picture

5 Aug 2009 - 11:21 pm | बेसनलाडू

भारीच आवडली कविता
(भिकंभट्ट)बेसनलाडू