मनाचे श्लोक आणि विवाद

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
13 Oct 2025 - 12:19 pm
गाभा: 

हिंदीत एक म्हण आहे—"बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो होगा!"
नाव + कुप्रसिद्धी = पैसा या गणितीय समीकरणाचा लाभ अनेकांना झालेला आहे. मराठी सिनेमांचे बजेट तसेच कमी असते. त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी डोके वापरावे लागते. या निर्मात्यानेही डोक्याचा वापर केला आणि सिनेमाला प्रसिद्धी मिळवून दिली.

ज्या सिनेमाचा समर्थ रामदास रचित मनाचे श्लोकशी काहीही संबंध नाही, त्या सिनेमाला मनाचे श्लोक हे नाव दिल्यावर जनता भडकली पाहिजे, विरोधात उतरली पाहिजे—अशी निर्मात्याची अपेक्षा होती आणि तसेच घडले. एक पैसा खर्च न करता सिनेमाला प्रसिद्धी मिळाली. आता जेंव्हा तो सिनेमा नवीन नावाने पुन्हा रिलीज होईल, तेंव्हा तो चालण्याची शक्यता अधिक आहे.

मला एकाने विचारले, "पटाईत साहेब, सेन्सॉर बोर्डने या नावाला अनुमती का दिली असेल?"

मी उत्तर दिले, मला असे वाटते सेन्सॉर बोर्ड फक्त दोन बाबींवर लक्ष देतो:
अल्पसंख्यकांच्या भावना दुखावल्या तर गेल्या नाही?
कारण तसे झाले तर 'सर तन से जुदा' फतवा निघू शकतो. त्याचा त्रास कलाकारांना आणि निर्मात्याला होऊ शकतो.
सिनेमात अश्लीलता आणि हिंसा कितपत आहे?
बहुतेक निर्मात्याच्या वजनाच्या आधारावर किती कात्री लावायची, हे ठरवले जात असेल.
मनाचे श्लोक या सिनेमात वरील दोन्ही बाबी नसल्यामुळे तो सेन्सॉरने सहज पास केला.

मराठी कलाकारांची प्रतिक्रिया फेसबुकवर वाचली. अधिकांश मराठी कलाकार शिक्षित आहेत. मनात अनेक प्रश्न आले,चित्रपटाचे समर्थन करताना त्यांनी कोट्यवधी समर्थ भक्तांच्या भावनांचा विचार का केला नाही? मनाचे श्लोक बाबत दुष्प्रचार होतो आहे, असे त्यांना का वाटले नाही. फक्त सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाचा दुरुपयोग करणाऱ्या निर्मात्याची निंदा त्यांनी का केली नाही.

जर मराठी सिनेसृष्टी आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करणार नसेल,आपल्या चुका सुधारण्या एवजी त्या चुकांचे समर्थन करीत राहील तर "मराठी सिनेमे मराठी दर्शकांनी पहावेत" ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ ठरेल.

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

13 Oct 2025 - 12:42 pm | युयुत्सु

मनाचे श्लोक बाबत दुष्प्रचार होतो आहे, असे त्यांना का वाटले नाही.

धर्मप्रेमाने विकृत पातळी गाठली आहे, इतकेच म्हणता येईल. यातल्या किती धर्म-संस्कृती-रक्षकांनी गणेश विसर्जनात पायदळी तुडवल्या जाणार्‍या गणेशमूर्तींची विटंबना थांबविण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले?

विवेकपटाईत's picture

13 Oct 2025 - 2:46 pm | विवेकपटाईत

एखाड्या प्रसिद्ध पुस्तकाचे नावचा वापर फक्त प्रसिद्धीसाठी करणे ही निर्मात्याची विकृती आहे . ती तुम्हाला दिसली नाही. याचे आश्चर्य आहे. मूर्ती देवाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. पूजा संपन्न झाल्यावर देवता निघून जातात. बाकी हिंदू धर्माच्या विरोधात मानसिक विकृतीची खालची स्तर सर्वच गाठतात.

अभ्या..'s picture

13 Oct 2025 - 3:26 pm | अभ्या..

ओके
मृण्मयी देशपांडे ही लेखिका दिग्दर्शिका आणि प्रमुख कलाकार आहे.
ती मानसिक विकृतीची सगळ्यात खालची स्तर गाठलेली आहे.
.
16 तारखेला चित्रपटाचे नाव बदलून प्रदर्शित झाला की ती पूर्णपणे रोगमुक्त होणार आहे.
.
छान.
शुभेच्छा.
.
जिसकी रचना इतकी विकृत, वो कितनी विकृत होगी.

युयुत्सु's picture

13 Oct 2025 - 6:21 pm | युयुत्सु

श्री० पटाईत

एखाड्या प्रसिद्ध पुस्तकाचे नावचा वापर फक्त प्रसिद्धीसाठी करणे ही निर्मात्याची विकृती आहे .

ज्ञानेश्वरी या नावाचा वापर करणारे काही उद्द्योग सापडले, त्यांचे काय करायचे?

| Name | Type / Industry | Location / Notes |
| ---------------------------------- | --------------------------------------------------- | ------------------------------------------------------------------------ |
| Dnyaneshwari Enterprises | Manufacturing (Engine, Turbine, Power Transmission) | Nashik, Maharashtra ([Dun & Bradstreet][1]) |
| Dnyaneshwari Trading Company | Trading | Near Bus Stand, Hivara, Ashti, Beed, Maharashtra ([Dun & Bradstreet][2]) |
| Dnyaneshwari Stone Private Limited | Stone / Construction materials | Pune, Maharashtra ([Tracxn][3]) |
| Dnyaneshwar Corrugations Pvt Ltd. | Packaging / corrugated boxes | India (private co) ([LinkedIn][4]) |
| Dnyaneshwari Agro Industries | Agricultural machinery / processing | (from Facebook listing) ([Facebook][5]) |

[1]: https://www.dnb.com/business-directory/company-profiles.dnyaneshwari_ent... "DNYANESHWARI ENTERPRISES Company Profile"
[2]: https://www.dnb.com/business-directory/company-profiles.dnyaneshwari_tra... "dnyaneshwari trading company"
[3]: https://tracxn.com/d/legal-entities/india/dnyaneshwari-stone-private-lim... "Dnyaneshwari Stone Private Limited - Company Profile"
[4]: https://in.linkedin.com/company/dnyaneshwar-corrugations-pvt-ltd?utm_sou... "Dnyaneshwar Corrugations Pvt Ltd."
[5]: https://www.facebook.com/p/Dnyaneshwari-Agro-Industries-100070898809494/... "Dnyaneshwari Agro Industries"

नावातकायआहे's picture

13 Oct 2025 - 3:38 pm | नावातकायआहे

@ विवेकपटाईत आता मोदी, संघ, भाजपा, वोटचोरी, निवडणूक आयोग, मनुस्मृती, संहिता, सवर्ण, मागास, वनवासी, गणपती, अल्पसंख्याक, विसर्जन मिरवणूक, माओवादी, दिवाळी, फटाके, प्रदूषण, फराळ, मोती साबण, समर्थ रामदास, अदानी, अंबानी, लोकसंख्या , टाटा, करुणाष्टके, सज्जनगड, चायना , व्हिसा ,शिवथरघळ, पाकिस्तान, गोदी मीडिया, जननायक, नोबेल पुरस्कार किंवा काहीही, ज्याचा ह्या घाग्याशी दूरदूर संबंध नसलेल्या आणि विस्कळीत प्रतिक्रियांना तयार व्हा! :-) :-) :-)

अभ्या..'s picture

13 Oct 2025 - 5:34 pm | अभ्या..

फारच मोठ्ठा स्पेक्ट्रम बुवा.
.
ते "वेळेवर मेंटेनन्स भरूनही सोसायटीचा वॉचमन सुध्दा नमस्कार घालत नाही" ते राहिलं.

सोत्रि's picture

13 Oct 2025 - 5:15 pm | सोत्रि

पटाईत काकांच्या इतर लेखांसारखाच हा लेख तद्दन वेळ घालवायला केलेले मुक्तपीठीय लेखन आहे.

मला एकाने विचारले, "पटाईत साहेब, सेन्सॉर बोर्डने या नावाला अनुमती का दिली असेल?"

विचारणार्‍याला एक नसेल माहिती आणि तो निरागस असेल असेही समजू (नाहीतर तो प्रश्नांची उत्तरं शोधायला पटाईत काकांकडे का जाईल ;) )

तर, सिनेमाचे टायटल सेंसॉर बोर्ड संमत करत नाही.

सिनेमाची टायटल्स फिल्म प्रोड्यूसर्सच्या असोसिएशनकडे नोंदणीकृत केली जातात, सेंसॉर बोर्डाकडे नाही.
Producers Guild of India, Indian Motion Picture Producers’ Association (IMPPA) ह्या काही संस्था नाव आधीपासून नोंदलेलं आहे का ते तपासतात आणि नाव उपलब्ध असल्यास, ते नाव निर्मात्यासाठी राखून ठेवतात आणि Title Registration Certificate दिल जाते.

चित्रपट पूर्ण झाल्यावर तो Central Board of Film Certification (CBFC) कडे पाठवावा लागतो. CBFC म्हणजेच सेन्सॉर बोर्ड. CBFC फक्त चित्रपटाचं मूल्यांकन करून प्रमाणपत्र ( U , U/A , A इत्यादी) देतं. नावाचं सेन्सॉरिंग होत नाही.

- (अनसेंसॉर्ड) सोकाजी

विवेकपटाईत's picture

17 Oct 2025 - 11:16 am | विवेकपटाईत

यहाँ दो उदाहरण हैं जहाँ भारत के CBFC (Central Board of Film Certification) ने फिल्म के टाइटल बदलने को कहा है:

---

1. “Yeh Saali Aashiqui”

पहले नाम था Paagal.

CBFC को इस नाम (Paagal) से आपत्ति थी कि ये कुछ लोगों की भावनाओं को आहत कर सकता है।

इसके बाद फिल्म का नाम बदल कर “Yeh Saali Aashiqui” कर दिया गया।

2. “Janaki vs State of Kerala” (हाल ही में) / “Janaki V vs State of Kerala”

यह मलयालम फिल्म है जिसमें मुख्य किरदार का नाम “Janaki” है, जो देवी सीता का नाम भी है। CBFC ने इस कारण शीर्षक में “Janaki” शब्द को बदलने की मांग की।

फिल्म अंत में नाम बदला गया “Janaki V vs State of Kerala” कर दिया।

---

अगर चाहो, तो एक और उदाहरण खोज सकता हूँ — ताकि तीन-चार हों।

गर्दीखेचू नाव ठेवणे यात हेतू असतो.

बाकी मृणृमयी चांगली कलाकार आहे पण इथे ती वाहवत गेली असं म्हणता येईल.

चौथा कोनाडा's picture

17 Oct 2025 - 7:29 pm | चौथा कोनाडा

मला वाटतं सिनेमाचे शिर्षक ठेवण्यात मार्केटींग टीमचा मोठा वाटा असतो.... फक्त दिगदर्शकाचा नाही !
मार्केटींगचे गणितच वेगळे असते. आकर्षक नाव, प्रोमो, टिझर, ट्रेलर, पोस्टर्स, सोशल मिडिया प्रसिद्धी ई.

मला आठवतं दि ग्रेट गॅम्बलर हा अमिताभ अभिनित सिनेमा जेव्हा १९७९ ला प्रददर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिस वर अपे क्षे इ त का गल्ल्ला जमवू शकला नव्ह्ता.
तो तीन चार वर्षांनी " सबसे बडा जुआँरी" या नावाने प्रदर्शित केल्यावर सुपर हिट झाला होता.
टायटल मॅटर्स

चौथा कोनाडा's picture

13 Oct 2025 - 6:47 pm | चौथा कोनाडा

आरं कित्ती सोपं ....

"मनाचे" मधलं म काढायचं ... मग "नाचे श्लोक"
नाय तर

श्लोक मधलं श काढायचं .... मग "मनाचे लोक"

हाय काय अन नाय काय !

अ‍ॅडजेस्ट्मेण्ट करायला शिका भाऊंनो !

स्वधर्म's picture

13 Oct 2025 - 6:56 pm | स्वधर्म

.

युयुत्सु's picture

13 Oct 2025 - 7:49 pm | युयुत्सु

आचार्य अत्र्यांनी झेंडूची फुले मध्ये मनाच्या श्लोकांचं विडंबन केलेल आहे. त्यांच्यावर किंवा त्यांच्या पुस्तकावर कोणत्याही धार्मिक संघटनेने बहिष्कार टाकला नाही किंवा त्या पुस्तकाचे प्रकाशन थांबवलं नाही.

चौथा कोनाडा's picture

13 Oct 2025 - 8:40 pm | चौथा कोनाडा


आचार्य अत्र्यांनी झेंडूची फुले मध्ये मनाच्या श्लोकांचं विडंबन केलेल आहे.


हे कधी ऐकण्यात किंवा वाचण्यात आलं नाही ... सविस्तर काही माहिती असेल तर द्यालं इथं ?

युयुत्सु's picture

13 Oct 2025 - 9:15 pm | युयुत्सु

श्री० चौथा कोनाडा

https://i.postimg.cc/VvwxYVsF/image.png

सगळ्या पानांचे फोटो टाकणे शक्य नाही, त्याबद्दल क्षमस्व.

सदर पुस्तक परचुरे प्रकाशन ने प्रसिद्ध केले आहे

चौथा कोनाडा's picture

13 Oct 2025 - 8:45 pm | चौथा कोनाडा

UDB

आग्या१९९०'s picture

16 Oct 2025 - 8:24 pm | आग्या१९९०

चित्र स्पष्ट दिसत नाही, परंतु पाडगावकरांच्या हातात पुरुष आणि स्त्री संतती नियमनाचे साधन आहे का? निरोध आणि कॉपर टी ?

नावातकायआहे's picture

17 Oct 2025 - 9:38 am | नावातकायआहे

आपल्या अचाट आणि अफाट कल्पनाशक्ति पुढे नि:शब्द आणि नतमस्तक!!
पामराकडून दंडवत स्विकारा!!

गामा पैलवान's picture

17 Oct 2025 - 11:46 pm | गामा पैलवान

एकाच वेळी दोन्ही साधनं कशाला हातात घ्यायला पाहिजेत? दोघांचे संभाव्य योजक ( user group ) वेगळे आहेत. त्यामुळे संततीनियमन साधनांचा मुद्दा अतिरंजित वाटतो. वै.म.
-गा.पै.

सेन्सर बोर्डाने परवानगी नाकारण्यासारखं ह्या नावात काहीही नाहीये. उगाच फालतुगिरी.

जे ऐकले त्या प्रमाणे मना ही मुलगी, श्लोक हा मुलगा, त्यांची प्रेमकहाणी म्हणून मनाचे श्लोक, पण व्याकरण दृष्ट्या चे हा प्रत्यय चुकीचा नाही का? मनाचा श्लोक हे योग्य नाही का? की कॅचिंग फ्रेझ पाहिजे म्हणून व्याकरणाचा खून?

रामचंद्र's picture

16 Oct 2025 - 11:33 pm | रामचंद्र

आपला व्याकरणाचा मुद्दा पटला.

नावे वापरली आहेत , हे स्पष्ट दिसते , हे असले यमीकरण समीकरण सांता बांता विनोदात छान दिसते , नावाचा छद्मीपना करत भावना दुखावणे कितपत बरोबर ही काही कळत नाही , नंतर सांता बांता विनोदावरही भावनेच्या नावाखाली बंदी आली होती असे ऐकले होत , मग इथे का नाही किंवा नको .

युयुत्सु's picture

16 Oct 2025 - 6:47 pm | युयुत्सु

"मनाचे श्लोक" या नावाने दु:खी झालेल्यांसाठी

शिवतांडव स्तोत्र
https://youtu.be/EXTLsNochPo?si=PYUi-s-hkH6mbrVh
अयि गिरीनंदिनी
https://youtu.be/klvsjG0NP5g?si=topRvFoQ59Tc_9Ce

ही दोन स्तोत्रे फिरंग्यांना फारच आवडलेली दिसतात...

गामा पैलवान's picture

17 Oct 2025 - 11:50 pm | गामा पैलवान

मला वाटतं की मनाचे श्लोक असं नाव ठेऊन रामदासस्वामींना लक्ष्य केलं गेलं आहे. त्यांनी लोकांना बलोपासनेची सवय लावली. नेमकी तीच काही शक्तींना खटकते. आता रामदासस्वामींवर थेट आरोप करता येत नाहीत. मग करा त्यांचं कार्य बदनाम. अशी व्यूहरचना आहे.

मंगेश पाडगावकर वा आचार्य अत्रेंना रामदासस्वामींना लक्ष्य बनवायचं उद्दिष्ट प्रथमदर्शी दिसंत तरी नाही. पण याबाबत अधिक चर्चा झालेली आवडेल.

-गामा पैलवान

अभ्या..'s picture

18 Oct 2025 - 12:20 am | अभ्या..

आता रामदासस्वामींवर थेट आरोप करता येत नाहीत. मग करा त्यांचं कार्य बदनाम. अशी व्यूहरचना आहे.

कशी आहे ही व्यूहरचना?
ह्या व्यूहाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.
इस्पेशली कसा लावला आहे हा व्यूह ह्या चित्रपटाच्या निमित्ताने हेही कळाले तर बरेच.

गामा पैलवान's picture

19 Oct 2025 - 2:54 pm | गामा पैलवान

अभय..,

संघावर कुजबूजीद्वारे गांधीनेहरूंची बदनामी केल्याचा आरोप होतो. तेच तंत्र इथेही वापरलेलं असू शकतं.

असो. शुभ दीपावली.

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2025 - 2:11 pm | चौथा कोनाडा

गापै.. तुमच्या तर्कात तथ्य वाटते. ... बलोपासना शिकवून पुढं हिंसेच्या मार्गाला लावून तरुण पिढीला दिशाहीन करण्याचा कुटिल हेतू असू शकतो. मग पुन्हा नेहरू गांधी गोडसे सावरकर असलं चर्वण करायला मोकळे

गामा पैलवान's picture

19 Oct 2025 - 3:00 pm | गामा पैलवान

चौथा कोनाडा,

प्रतिसादाबद्दल आभार. मात्र बलोपासना म्हणजे हिंसा हे समीकरण मला मान्य नाही. हनुमान, भीम वगैरे बलोपासानेचे आदर्श हिंसक नव्हते. क्वचित भीम हिंसेस उद्युक्त होऊन टोकाला गेला असेल, पण त्याला युधिष्ठिराने सावरून धरलं. फार काय दुर्योधनही छद्मी, क्रूर, कपटी असेल, पण अकारण हिंसक कधीच नव्हता. शिवाजीनेही आयुष्यभर बलोपासना केली. परंतु त्याच्या आयुष्यात अकारण हिंसेचं एकही उदाहरण सापडंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

मूकवाचक's picture

20 Oct 2025 - 12:03 pm | मूकवाचक

आपण(च) कसे संतुलित विचाराचे आहोत, उदारमतवादी आहोत, बुद्धीवादी(!), सहिष्णु वगैरे आहोत अशी आत्मप्रतिमा जपत बसलेल्या काही लोकांनी आपला धर्म, संत परंपरा, सणवार, संस्कृती, संत साहित्य हा टवाळीचा विषय करून ठेवलेला होता. नव्हे, तो टवाळीचाच विषय आहे हे गृहीत धरत सुखेनैव तो कित्ता गिरवत बसलेल्या एक दोन पिढ्या आपण पाहिल्या. काहींची राजकीय सोय होत असल्याने यांना राजाश्रय होता, सत्तापालट झाल्यावर देखील काही प्रमाणात तो टिकून आहे.

आपल्याच धर्माच्या बाबतीत टोकाचा आत्मवंचकपणा करणारे अन्य धर्मातल्या कित्येक पटींनी घातक असलेल्या चालीरीतींबाबत मात्र मूग गिळून गप्प बसतात, कधी लंगडे समर्थन करतात, किंवा मी सफाईची सुरुवात आपल्या घरातून करतो असे फसवे युक्तीवाद करतात हे आता कित्येकांच्या लक्षात आले आहे, काही युट्युबर्स आवर्जुन ते लक्षात आणून देत आहेत. नव्याने आत्मभान आलेले लोक कधीकधी टोकाची प्रतिक्रिया देतात, तेव्हा त्यांना खजिल करण्याची एकही संधी तथाकथित विचारवंत सोडत नसले, तरी त्यांच्या टीकेचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. 'मनाचे श्लोक' च्या बाबतीत असेच काहीसी घडले असावे. असो.

मेंटाळ्याची ह्येल्थ गं बाई मेंटाळ्याची ह्येल्थ म्हणून हल्ली नाचतात कित्येक लोकं. नाचू द्या त्यांना. तो प्रश्न नाहीये. मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी मनाचे श्लोक आचरणांत आणायला हवेत. त्या मनाच्या श्लोकांची मात्र खिल्ली उडवायची. हा कुठला उफराटा न्याय?

-गामा पैलवान